Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २१ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २१ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २१ वा आठवडा

आता तुम्ही जुळ्या बाळांसह २१ आठवड्यांच्या गर्भवती आहात. आता तुम्ही खरोखर तुमच्या बाळांना भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. तुम्ही प्रसूतीच्या तारखेबद्दल विचार करीत असाल, परंतु तुमच्या लहान बाळांचा अद्याप विकास होत आहे आणि वाढ होण्यासाठी त्यांना वेळेची आवश्यकता आहे. २१ व्या आठवड्यांत, तुमच्या लहान बाळांची वाढ होत राहील तसेच तुमच्या शरीरात सुद्धा बदल होतील. ह्या बदलांमुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो, परंतु तुमच्यात वाढत असलेल्या लहान मुलांना सामावून घेण्यासाठी ते आवश्यक आहेत. २१व्या आठवड्यात तुमच्या बाळांचा विकास कसा होतो, तसेच तुमच्या शरीरात कुठल्या बदलांची अपेक्षा केली पाहिजे आणि इतर बरेच काही जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

२१ व्या आठवड्यात बाळांची वाढ

गरोदरपणाचा अर्धा टप्पा पार केल्याने आता बाळांनासुद्धा वाढीचा वेग वाढवला पाहिजे हे समजण्यास सुरुवात होते. सगळ्या यंत्रणा नीट कार्यरत करण्यावर सगळे लक्ष केंद्रित केले जाते.

अन्न हे जगण्याची गुरुकिल्ली आहे आणि या आठवड्यात बाळांच्या वाढीसाठी तो सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. पचनक्रिया योग्य प्रकारे विकसित झाल्यानंतर, कार्य करण्यास सुरुवात करते आणि अन्न पचविण्याच्या प्रयत्नांना सुरुवात करते ह्याच कालावधीत काळ्या रंगाचे मेकोनियम बाळाच्या शरीरात तयार होते आणि बाळाच्या पहिल्या शौचाद्वारे बाहेर येईपर्यंत ते तिथेच राहते. बाळाची सुरुवातीची पचनक्रिया नीट कार्यरत होण्यासाठी एंझाइम आणि ऍसिड्सची निर्मिती होते.

शोधण्याच्या आणि गिळण्याची क्रियेमध्ये देखील बाळे वेगाने प्रगती करतात, कारण तुमच्या बाळांची भरपूर प्रमाणात अ‍ॅम्निओटिक द्रवपदार्थ घेण्याची प्रवृत्ती असते आणि बाळे नेहमीपेक्षा जास्त अंगठा चोखण्यास देखील प्राधान्य देतात. ह्या सर्व पद्धती बाळाला बाहेरच्या जगात टिकून राहण्यास मदत करतात.

अन्न आणि पचन यावर लक्ष केंद्रित केले की ते संश्लेषित केले जाऊ शकते आहे ना ह्याची खात्री करुन, बाळांमधील मलमूत्र प्रणाली देखील अगदी सुरळीत कार्य करण्यास सुरवात करते. बाळांनी आत घेतलेल्या गर्भजलवार मूत्रपिंड आणि मूत्रमार्गाचे अवयव प्रक्रिया करणे सुरु करतात आणि पुन्हा बाहेर टाकतात. हे अशा प्रकारचे चक्र शरीराच्या कार्यप्रणालीला योग्य पद्धतीने कार्य करण्यास प्रवृत्त करते.

या व्यतिरिक्त, अंतःस्रावी प्रणाली आणि प्लीहा देखील कार्य करण्यास सुरवात करतात, तर स्नायू आणि हाडांची रचना वेगाने विकसित होते.

बाळांचा आकार केवढा आहे?

गरोदरपणाच्या २१व्या आठवड्याच्या आसपास, डॉक्टर सामान्यत: बाळांच्या डोक्यांपासून पायांपर्यंत बाळाची लांबीही मोजतात. बहुतेक वेळा बाळांची लांबी साधारणतः २५ सेंटीमीटर असते. एकाधिक बाळांसाठी ती कमी असते. तसेच बाळांचे वजन सुद्धा २५०३०० ग्रॅम्सच्या आसपास असते आणि जुळ्या किंवा एकाधिक बाळांच्या बाबतीत ते थोडे कमी असते. तुमच्या पोटातील बाळे आता जवळपास गाजराच्या आकाराची असतात.

बाळांचा आकार केवढा आहे?

सामान्य शारीरिक बदल

गर्भधारणेचा २१ वा आठवडा हा जीवशास्त्रीय दृष्टीकोनातून एक महत्त्वाचा टप्पा आहे कारण ह्या आठवड्यात बाळांना तसेच आईला प्रसूतीपूर्वी होणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्यास मजबूत संकेत दिले जातात

 • तुमचा गरोदरपणाचा टप्पा इतका पुढे आल्यामुळे तुमच्या बहुतेक चिंता आणि भीती आता कमी झाली असेल. परंतु बाळाचा सतत विकास होत असल्या कारणाने तुमच्या शरीरात अनेक बदल अजूनही होत आहेत. बदलांच्या बाबतीत एकमेव मुद्दा असा आहे की ते क्वचितच एकमेकांशी समन्वय साधतात त्यामुळे तुम्हाला एकामागून एक ते हाताळावे लागतात. तुम्ही दुपारच्या विश्रांतीची अपेक्षा करत असताना तुम्ही भविष्यातील विचारांची चिंता करू शकता तसेच बाळांशी संबंधित इतर कोणत्याही गोष्टींचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो. जरी तुम्हाला प्रयत्नानंतर झोप लागली तरी सुद्धा वारंवार बाथरूमला जाण्यासाठी उठावे लागेल. बऱ्याच स्त्रियांना निद्रानाश होऊ शकतो आणि त्यांना त्यामुळे अस्वस्थता येऊ शकते.
 • जरी स्त्रीसाठी जीवनाची निर्मिती ही एक रहस्यमय प्रक्रिया असली तरीसुद्धा तुम्हाला मागच्या काही महिन्यात खावेसे वाटलेले पदार्थ तुम्हाला माहित असतील. तुमच्या बाळांची पचनक्रिया विकसित होत आहे म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांची लालसा उत्पन्न होऊ शकते. गर्भजलाच्या माध्यमातून बाळ तुमच्या आहारासोबत जोडले जाते. म्हणूनच जर बाळाच्या खाण्याच्या आवडीनिवडी तुमच्यापेक्षा भिन्न असतील तर तुमचे शरीर बाळाला हव्या असलेल्या पदार्थांचे संकेत देईल आणि तुम्ही गोंधळात पडू शकता.
 • तुम्हाला कदाचित या आठवड्यात किंवा नंतर देखील आपल्या योनीतून पारदर्शक स्त्राव जाणवेल. काही स्त्रियांना तो कमी होण्याची अपेक्षा असते, परंतु सहसा अशी शक्यता नसते. तुमची प्रसूती होईपर्यंत ह्या स्रावामध्ये वाढ होते. कारण त्यामुळे योनीमार्गाची स्वच्छता होते आणि बाळाच्या जन्माच्या वेळी जन्मकालवा स्वच्छ असल्याने बाळ सुरक्षितपणे तिथून प्रवास करू शकते.

सामान्य शारीरिक बदल

जुळ्या गर्भधारणेसह गरोदरपणाच्या २१ व्या आठवड्यातील लक्षणे

एकीकडे, तुम्ही कदाचित सुरुवातीच्या काळात जाणवणाऱ्या पूर्वीच्या लक्षणांना निरोप देत आहात. परंतु २१व्या आठवड्यापासून अंतिम तिमाहीत काय येऊ शकते याचा टीझर तुम्हाला जाणवण्यास सुरुवात होईल.

 • बऱ्याच स्त्रिया जेव्हा जुळ्या किंवा तिळ्या बाळांसह पहिल्यांदा गरोदर असतात आणि जेव्हा त्यांना पहिल्यांदा गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात कळा जाणवतात तेव्हा त्यांना भीती वाटू शकते. काही स्त्रियांना गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यात त्या जाणवू लागतात. ह्या कळाना सराव कळा (Braxton Hicks contractions) असे म्हणतात. ह्या कळा साधारणपणे अर्धा मिनिट राहतात आणि हालचाल केली किंवा स्थिती बदलली तर त्या थांबतात. ह्या कळा बाळाच्या वेगवेगळ्या शारीरिक हालचालींमुळे होतात आणि त्यामुळे तुमचे शरीर प्रसूतीसाठी तयार होते.
 • गर्भाशय त्याचे कार्य कोणत्याही व्यत्ययाशिवाय चालूच ठेवते. त्याचा वेगवान विकास करून ते बाळांसाठी जागा तयार करतात. त्यामुळे त्वचा ताणली जाते. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी दिसणारे स्ट्रेच मार्क्स आता इतर ठिकाणी सुद्धा दिसू लागतात. काहीवेळा त्यामुळे त्वचेला खाज सुटते. हलका मसाज केल्यास मदत होऊ शकते.
 • होय, तुमच्या पोटासह तुमच्या स्तनांचा आकार देखील वाढेल, कारण काही महिन्यांत तुमची प्रसूतीची तारीख जवळ येत आहे. २४व्या आठवड्यात साधारणत: वाढ पूर्ण होत असताना, स्तनाग्रांभोवती किंवा ब्रा मध्ये दूध गळती झालेली तुम्हाला जाणवू शकते.

जुळ्या बाळांसह गरोदरपण २१ वा आठवडा पोटाचा आकार

तुमच्या पोटाचा आकार आता लक्षणीयरित्या वाढला असेल. एकाधिक बाळे असतील तर त्वचा खूप ताणली जाते, त्यामुळे बाळाच्या हालचाली अधूनमधून दिसू शकतात.

एकाधिक बाळांसह गरोदरपण २१ वा आठवडा अल्ट्रासाऊंड

मागील आठवड्यात वगळण्यात आलेले अल्ट्रासाऊंड स्कॅन, सर्व चाचण्या आणि तपासणीसह या आठवड्यात पूर्ण केली जाईल. तुमची बाळे आता अगदी स्पष्ट दिसायला लागतील, अधूनमधून काही क्षण तुम्ही त्यांना गिळताना आणि फिरत असताना देखील पाहू शकता.

काय खावे?

काय खावे?

गरोदरपणात तुम्ही निरोगी रहाणे महत्वाचे आहे. तुम्ही कोणत्या आठवड्यात आहात याची पर्वा नाही, निरोगी पदार्थ खाणे आणि तीव्र वास असणारा कोणताही आहार टाळणे महत्वाचे आहे.

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

गरोदरपणाच्या २१ व्या आठवड्यात होणारे बहुतेक बदल सामान्यत: आपल्या स्वतःच्या शरीराची चांगली काळजी घेतात आणि येणाऱ्या महिन्यांमध्ये त्याची सवय होऊन नियमित दिनक्रम तयार होतो.

हे करा

 • कुठल्याही समस्येची आधीच तपासणी करण्यासाठी आधी ग्लूकोजची तपासणी तपासणी करा.
 • शक्य असल्यास बेबी शॉवर किंवा सेलिब्रेशन आयोजित करा, कारण तुमच्याकडे ह्या आठवड्यात सुद्धा अद्याप ऊर्जा शिल्लक आहे.

काय टाळावे?

 • मिठाई खाणे टाळा कारण यामुळे आपल्या बाळावर परिणाम होऊ शकतो आणि दातांचे आरोग्य सुद्धा खराब होऊ शकते.
 • संपूर्ण व्यायाम थांबविण्याची आवश्यकता नाही परंतु आपण या आठवड्यापर्यंत व्यायामाची तीव्रता कमी करू शकता.

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे

आपली मुले आपल्या प्रगतीशी सुसंगत आहेत हे जाणून घेतल्याने आपण एक पाऊल पुढे जाऊन काही आवश्यक वस्तू खरेदी करू शकता, जसे की:

 • आपल्या त्वचेसाठी मॉइश्चरायझर किंवा स्ट्रेच मार्क क्रीम.
 • बाळांसाठी शाम्पू किंवा बेबी ऑइल.

या आठवड्यापासून जुळ्या बाळाची वाढ वेगवान होते. बाळांच्या जन्मानंतर तुम्ही त्यांच्यासाठी तयार असल्याची स्वत: ला खात्री द्या आणि वेळ येईल तेव्हा आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य इष्टतम ठेवा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article