Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home टॉडलर (१-३ वर्षे) पॉटी ट्रेनिंग मुलांचे शौचालय प्रशिक्षण (पॉटी ट्रेनिंग)

मुलांचे शौचालय प्रशिक्षण (पॉटी ट्रेनिंग)

मुलांचे शौचालय प्रशिक्षण (पॉटी ट्रेनिंग)

बाळ झाल्यानंतर सारखी वेगवेगळ्या प्रकारची साफसफाई करावी लागते आणि त्याची सुरुवात बाळाचे डायपर बदलण्यापासून होते! मुले आणि मुलींसाठी पॉटी ट्रेनिंगच्या टिप्स सारख्याच आहेत, परंतु मुलांना पॉटी सीट वापरण्याचे प्रशिक्षण देणे थोडे अधिक आव्हानात्मक आहे.

व्हिडिओ: मुलांसाठी पॉटी ट्रेनिंग

पॉटी ट्रेनिंग म्हणजे काय?

लहान मुलांना लघवी आणि मलविसर्जनासाठी शौचालय वापरण्यासाठी प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया म्हणजे पॉटी ट्रेनिंग. लहान मुलांना डायपरची सवय असते. परंतु जसजशी मुलांची वाढ होते तसे त्यांना शौचालय वापरण्याचे प्रशिक्षण देणे महत्वाचे आहे आणि ते योग्य वयात केले पाहिजे.

पॉटी ट्रेनिंगची सुरुवात मुलांना लगेच टॉयलेटचा वापर करायला लावून होत नाही. ही प्रक्रिया हळू हळू होते. डायपर ते योग्य शौचालय वापरण्यापर्यंतच्या संपूर्ण टप्प्याला पॉटी ट्रेनिंग म्हणतात. म्हणून, ह्या लेखामध्ये मुलांचे पॉटी ट्रेनिंग कसे करावे आणि ते करत असताना काय करू नये हे स्पष्टपणे सांगितले आहे.

मुलांसाठी पॉटी ट्रेनिंग कसे सुरू करावे?

सुरुवातीला, लहान मुलाला पॉटी ट्रेनिंग देण्यासाठी खूप संयम आवश्यक आहे आणि असे म्हणतात की मुले  मुलींपेक्षा जास्त काळ डायपर घालतात. मुलांना सतत प्रेरणा देत राहिल्याने पॉटी ट्रेनिंग लवकर होण्यास मदत होईल. तुम्ही तुमच्या लहान मुलाला पॉटी ट्रेनिंग सुरू करण्यापूर्वी खालील काही गोष्टी लक्षात ठेवू शकता-

तुमच्या मुलाला कोणत्याही त्रासाशिवाय पॉटी ट्रेनिंग करण्यासाठी त्याचे वय खूप मोठी भूमिका बजावते. जेव्हा तुमचे लहान मूल पॉटी ट्रेनिंग साठी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार असेल तेव्हा पालकांनी पॉटी ट्रेनिंग सुरु केले पाहिजे.

काही मुले 2 वर्षांची होताच पॉटी ट्रेनिंग साठी तयार होऊ शकतात, तर काही मुले त्यांच्या तिसऱ्या वाढदिवसानंतरच तयार होऊ शकतात. 3 वर्षांचे झाल्यावर शौचालय प्रशिक्षणासाठी खूप उशीर झाल्यासारखे वाटू शकते, परंतु जर तुमचे लहान मूल तयार नसेल, तर तुम्ही त्याला ट्रेनिंग देण्याचा आग्रह धरू नये.

मुलांसाठी पॉटी ट्रेनिंग कसे सुरू करावे

.तसेच, जर तुमचे लहान मूल नवीन भावंडाचे आगमन, शाळा बदल किंवा प्रवास यासारख्या इतर बदलांना सामोरे जात असेल, तर इतर कोणत्याही गोष्टीची ओळख करून देण्यापूर्वी वाट पाहणे योग्य आहे.

 • सुरुवातीला, तुम्हाला तुमच्या बाळाला लहान पॉटी सीटवर बसून शौचास करण्यास शिकवावे लागेल. पण ते करण्यापूर्वी, तुम्ही एखादी समग्र योजना तयार करण्याची गरज आहे. पॉटी ट्रेनिंग कसे आणि केव्हा सुरू करायचे, अपघात झाल्यास त्याची काळजी कशी घ्यायची हे तुम्ही ठरवले पाहिजे आणि आवश्यक असल्यास लवचिक रहा आणि पुन्हा सुरुवात करण्यास तयार रहा. तुमच्या मुलाची सुरुवातीची प्रगती तुम्हाला आनंदी करू शकते, परंतु जर तो मागे पडण्याची चिन्हे दर्शवित असेल, तर तुम्ही काही वेळाने थांबून पुन्हा सुरुवात करण्यास तयार असले पाहिजे. तसेच, तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी, आपल्या मुलाचे बालरोगतज्ञ आणि पाळणा घरातील प्रशिक्षकांचा सल्ला घ्या.
 • अनुभवावर आधारित त्यांचे मौल्यवान सल्ले तुम्हाला खरोखर उपयुक्त असू शकतात. तुमची योजना तयार झाल्यानंतर, बाळाची    काळजी घेणाऱ्या प्रत्येकासोबत ती योजना शेअर करा आणि त्या योजनेचे पालन करा.
 • पॉटी ट्रेनिंगची वेळ प्रत्येक मुलानुसार बदलू शकते. म्हणून, पालकांनी मुलांना वेळ देणे महत्वाचे आहे. रात्रीपेक्षा दिवस मुलांना पॉटी ट्रेनिंग द्यावे आणि ते कठीण असू शकते.

तुम्ही तुमच्या मुलाचे पॉटी ट्रेनिंग केव्हा सुरू करू शकता?

पॉटी ट्रेनिंग सुरू करण्यासाठी कोणत्याही तज्ञाने निश्चित वेळ सांगितलेली नाही. तुमचे मूल अंदाजे 18 महिने ते 3 वर्षांचे झाल्यानंतर तुम्ही पॉटी ट्रेनिंगची सुरुवात करू शकतात. काही मुले 4 वर्षांची झाल्यावर  पॉटी ट्रेनिंगसाठी तयार होतात. परंतु तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी, आपण काही लक्षणांकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

मुले पॉटी ट्रेनिंगसाठी तयार असल्याची चिन्हे

नवीन पालकांसाठी मुलांना पॉटी ट्रेनिंग करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी, तज्ञांनी काही निश्चित चिन्हे सांगितलेली आहेत. तुम्ही मुलांना पॉटी प्रशिक्षित करण्याची योजना बनवण्याआधी ही लक्षणे जाणून घेणे गरजेचे आहे.

 • शारीरिक चिन्हे :प्रथम, तुमचा मुलगा चालण्यासाठी पुरेसा शारीरिकदृष्ट्या विकसित झाला आहे की नाही हे तुम्ही तपासून घ्या. त्याला योग्य प्रमाणात लघवी होईपर्यंत आणि शौचास नीट होईपर्यंत तुम्हाला वाट पहावी लागेल. तसेच, झोपेच्या वेळी कमीतकमी 2 ते 3 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ बाळाला डायपर लावून ठेवल्यास तुमच्या मुलासाठी पॉटी ट्रेनिंग योजना बनवणे खूप उपयुक्त ठरेल.
 • वर्तणुकीची चिन्हे: तुमचे बाळ एका जागी किमान पाच मिनिटे शांतपणे बसेपर्यंत तुम्हाला थांबावे लागेल. त्याला त्याची पँट त्याला स्वतः वर खाली खेचता आली पाहिजे. जेव्हा एखाद्या मुलास डायपर मध्ये शी किंवा शू झालेली आवडत नाही तेव्हा पॉटी प्रशिक्षणाने सुरुवात करावी. तसेच, जर इतर लोक शौचालयात जात असल्याचे बाळ बघत असल्यास त्याच्यासाठी योजना बनवण्याची हीच वेळ आहे. सगळे स्वतःचे स्वतः करण्याची इच्छा आणि ते केल्याचा अभिमान बाळगणे आणि सहकार्य करणे इत्यादी लक्षणांचा सुद्धा समावेश होतो.
 • संज्ञानात्मक चिन्हे: 2 वर्षाच्या मुलाला पॉटी ट्रेनिंग देताना खालील संज्ञानात्मक विकासाचे टप्पे देखील महत्त्वाचे आहेत. शारीरिक लक्षणे समजण्यास मूल सक्षम असले पाहिजे आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा मुलांनी सांगणे आवश्यक आहे. मुलांना साध्या आणि सरळ सूचनांचे पालन करता येणे हा आणखी एक संज्ञानात्मक विकासाचा टप्पा महत्वाचा आहे आणि तो आवश्यक आहे. स्वतःला स्वच्छ ठेवायला शिकण्यापेक्षा मुलांनी त्यांची खेळणी नीटनेटकी ठेवायला शिकणे अधिक महत्त्वाचे आहे, यावरही तज्ञांनी भर दिला आहे. तसेच शी आणि शू साठी काही कोड शब्द देखील असावेत जेणेकरून त्याचा वापर ते संवाद साधण्यासाठी करू शकतात.

वर नमूद केलेली चिन्हे पालकांना मुलांसाठी पॉटी प्रशिक्षण देण्यासाठीचे वय ठरवण्यासाठी  मदत करू शकतात.

मुलांसाठी पॉटी ट्रेनिंग टिप्स

पालक या नात्याने, बाळाला आत्मविश्वासाने प्रत्येक टप्पा गाठण्यात मदत करण्यासाठी पूर्णपणे तयार असणे महत्त्वाचे आहे. या पॉटी ट्रेनिंग टिप्स तुम्हाला तुमच्या मुलाच्या विकासाचा हा टप्पा जास्त त्रास न होता पार पाडण्यास मदत करतील.

 • मुलांना अनुकरण करायला आवडते. त्यामुळे, मुलाला प्रशिक्षित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे लघवी करताना टॉयलेटचा वापर करताना त्याला त्याच्या बाबांचे निरीक्षण करू देणे. लवकरच त्याला कुतूहल वाटेल आणि तो स्वतः प्रयत्न करू लागेल.
 • प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने देणे महत्वाचे आहे. तज्ञ सांगतात की लहान आकाराच्या पॉटीमध्ये जाण्यासाठी प्रशिक्षण देणे नेहमीच उपयुक्त ठरते कारण तेथे तो आरामात बसू शकतो आणि त्याचे पाय जमिनीला स्पर्श करूशकतात. तो कदाचित एक नवीन खेळण्यासारखा पॉटी सीटचा विचार करेल आणि शांतपणे शौचास करेल. जर तुम्ही 18 महिन्यांपासून सुरुवात करत असाल तर छोट्या पॉटी सीटने सुरुवात करा. परंतु, जर तुम्ही वयाच्या 3 किंवा त्याहून अधिक वयात प्रशिक्षण सुरू केले तर तुम्ही तुमच्या टॉयलेटसाठी फक्त एक आरामदायक अडॅप्टर सीट खरेदी करू शकता. त्याला पाय ठेवण्यासाठी नीट जागा हवी जेणेकरून त्याचे पाय लटकणार नाहीत आणि तो आरामांत बसू शकेल. पॉटीवरून सहज आणि स्वतंत्रपणे उतरण्यासाठी देखील हे उपयुक्त ठरेल.

युरीन गार्डशिवाय पॉटी सीट विकत घेणे हा एक अतिरिक्त सल्ला आहे.

 • पुढचा टप्पा म्हणजे मुलाला पॉटी सीटची ओळख करून द्या. पॉटी सीट त्याचे असल्याचे त्याला सांगा. त्यावर तुमच्या मुलाचे नाव लिहा किंवा काही स्टिकर्सने सजवा. त्याने त्याची पॅन्ट काढून त्यावर बसण्यास सांगण्यापूर्वी  त्याला खेळकरपणे त्यावर एक आठवडा बसू द्या. पॉटी सीट कसे वापरायचे ह्याचा तुम्ही रोल प्ले देखील करू शकता. प्रात्यक्षिकासाठी त्याची आवडती बाहुली किंवा खेळणे वापरा. यामुळे पॉटी ट्रेनिंगची  संपूर्ण प्रक्रिया त्याच्यासाठी आनंददायी आणि तुमच्यासाठी सोपी बनते.
 • तुमच्या मुलाला त्याच्या वडिलांसारखे किंवा मोठ्या भावासारखे बनण्यास प्रवृत्त करा. त्याला आवडणारी अंडरवेअर तो निवडू शकतो आणि त्याचे वडील आणि भावाप्रमाणे  घालू शकतो असे त्याला सांगा. जर तो सुरुवातीला अस्वस्थ असेल तर त्याला डायपरच्या वर अंडरवेअर  घालण्याचा प्रयत्न करू द्या. हळुहळू तो डायपर सोडून फक्त अंडरवेअर घालण्यास तयार होईल.
 • तुमचे वैयक्तिक वेळापत्रक आणि तुमच्या मुलाचे वेळापत्रक यावर आधारित पॉटी ट्रेनिंगचे वेळापत्रक सेट करणे खूप महत्वाचे आहे. जर तुमचा मुलगा पाळणाघर  किंवा प्री-स्कूलमध्ये गेला असेल, तर तुमची पॉटी ट्रेनिंग स्ट्रॅटेजी त्यांच्यासोबत शेअर करा. तुमचा मुलगा शिकण्यासाठी स्वत:चा वेळ घेणार असल्याने, रात्रीच्या वेळेसाठी आणि प्रवासासाठी काही डायपर आणि डिस्पोजेबल पॅंट जवळ  ठेवा.

मुलांसाठी पॉटी ट्रेनिंग टिप्स

 • बाळाला शी आणि शू सहसा एकाच वेळी लागते. त्यामुळे बाळाला आधी पॉटी सीट वर बसवा. त्याला जास्त वेळ पॉटी सीटवर बसवणे टाळा कारण तो पुढच्या वेळीबसण्याचा प्रयत्न करणार नाही. एकदा तुमचे मूल बसून शी आणि शू करू लागला कि त्याला उभे राहून लघवी कशी करायची ते शिकवा. पुन्हा एकदा, बाबांचे प्रात्यक्षिक उपयुक्त ठरेल. सरावासाठी तुम्ही एखादी अंडाकृती-वस्तू देखील फ्लोट करू शकता, परंतु कृपया लक्षात ठेवा की हा तुमचा शेवटचा उपाय असेल कारण ते खूप गोंधळात टाकणारे असू शकते.
 • साधारणपणे शौचास आल्यावर त्याची पॅन्ट काढा आणि त्याला काही काळ तसेच राहू द्या. पॉटी सीट लवकर सापडेल असे ठेवा जेणेकरून बाळाला शौचास जाण्याची चिन्हे दिसताच तुम्ही बाळाला त्यावर बसवू शकाल.
 • त्याला स्टिकर्स किंवा स्टार्स देऊन प्रत्येक वेळी प्रोत्साहन द्या. त्यामुळे त्याला प्रेरणा मिळेल. पहिल्यांदा यशस्वी न झाल्यास, वारंवार प्रयत्न करा. परंतु खूप प्रेम, संयम, नावीन्य आणि सकारात्मकता ठेवा. तुम्ही त्याला पॉटी ट्रेनिंगच्या आसपास चित्रे असलेली पुस्तके आणि कार्टून सीडी देखील विकत घेऊन देऊ शकता आणि त्याला ती पाहू द्या.सहसा ह्या सीडी मजेदार असतात आणि मुलांना त्या पाहणे आणि शिकणे आवडते.
 • एकदा तुमचे बाळ दिवसा पॉटी मध्ये शौचास करू लागले की, रात्रीच्या प्रशिक्षणाची वेळ येते. ह्यास जास्त वेळ लागेल कारण त्याला ठराविक कालावधीसाठी  लघवी रोखून धरावी लागेल. जर तुमच्या लहान मुलाला डायपरशिवाय झोपायचे असेल तर त्याला ते करू द्या. काही दिवस प्रायोगिक असतील, आणि तो पलंग ओला करू शकतो, पण हळूहळू तो लघवीसाठी उठायला शिकेल आणि शेवटी उरलेल्या रात्री लघवी रोखून ठेवेल. या प्रशिक्षणाला काही आठवडे किंवा महिने लागू शकतात.

पॉटी ट्रेनिंग करताना काय करावे आणि काय करू नये?

वर नमूद केलेल्या पॉटी ट्रेनिंगच्या मार्गदर्शनामुळे नवीन पालकांना मुलांच्या पॉटी ट्रेनिंगबद्दल असलेल्या शंका दूर होतील. आम्ही आतापर्यंत चर्चा केलेल्या काही गोष्टींचा सारांश देण्यासाठी येथे काय करावे आणि काय करू नये हे सांगितले आहे

काय करावे:

 • खूप संयम दाखवा
 • सुरुवात करण्यापूर्वी शारीरिक, वर्तणूकविषयक आणि संज्ञानात्मक लक्षणे पहा
 • योजना तयार करण्यापूर्वी त्यांच्या शाळेचे शिक्षक किंवा पाळणाघराच्या प्रशिक्षकाकडून मौल्यवान टिप्स घ्या
 • विविध नाविन्यपूर्ण पद्धती वापरून हे प्रशिक्षण मजेदार आणि प्रेरक बनवा. त्याविषयीची पुस्तके आणि सीडी मिळवा आणि त्याला पाहू द्या. तसेच, त्याला बक्षीस द्या.

काय करू नये:

 • एकदा सुरुवात केल्यावर त्याला जबरदस्ती करू नका किंवा सतत आग्रह धरू नका
 • एकाच वेळी सर्व टप्पे साध्य करण्याचा प्रयत्न करू नका
 • त्याला चिडवू नका किंवा त्याची तुलना दुसऱ्याशी करू नका
 • निराशेची कोणतीही चिन्हे दर्शवू नका. त्यामुळे तो मागे पडेल

पालकत्व म्हणजे केकवॉक नाही. मुलांसाठीच्या पॉटी ट्रेनिंग टिप्स, ह्या लेखात तपशीलवार दिलेल्या आहेत. आम्हाला आशा आहे की तरुण पालकांना हा लेख,  संयमाची परीक्षा पाहणारा काळ पार करण्यास नक्कीच मदत करेल.

आणखी वाचा: 

मुलांमधील पोटदुखीसाठी प्रभावी घरगुती उपचार
छोट्या मुलांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेवर सर्वोत्तम घरगुती उपाय

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article