Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३७ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३७ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३७ वा आठवडा

In this Article

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह ३७ आठवड्यांच्या गर्भवती राहिल्याने बहुतेक माता आता निराश होऊ शकतात, परंतु त्यांची बाळे अद्याप त्यांच्या शरीरात आरामात असतात. जर तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यात असाल तर तुम्हाला किती थकल्यासारखे होत असेल हे आम्हाला समजते. जवळजवळ प्रत्येकजण प्रसूती कळांची वाट पहात असतो. परंतु, त्यासाठी काही दिवस किंवा कदाचित एखादा आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त दिवस सुद्धा लागू शकतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. बाळांचा जन्म ३७ व्या आठवड्यात झाल्यास ते बाळांसाठी चांगले असते परंतु जर आणखी काळ बाळे पोटात राहिल्यास ते त्यांच्यासाठी फायद्याचे आहे. तुम्ही गरोदरपणाला थकला आहेत म्हणून प्रसूती कळा सुरु होण्याची औषधे दिली जात नाहीत किंवा सिझेरिअन केले जात नाही. फक्त पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी ह्या पर्यायांचा विचार केला जातो. गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्याबद्दल माहिती असल्यास थोडे आणखी धैर्य का बाळगले पाहिजे हे तुम्हाला समजण्यास मदत होईल. गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यात तुमच्या बाळांच्या वाढीपासून सुरुवात करूयात.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यात बाळांची वाढ

गरोदरपणाच्या ३७व्या आठवड्यात सुद्धा बाळाचा विकास होत आहे हे जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. खरं सांगायचे तर, बाळांची वाढ आणि प्रगती सुरूच राहते मग ती गर्भाशयाच्या आत असो किंवा बाहेर.

तुमच्या गर्भाशयात बाळे क्रियाकलापांचा पूर्वाभ्यास करतात कारण प्रत्येक गोष्ट अपेक्षेप्रमाणेच कार्यरत आहे याची खात्री करण्यासाठी तुमच्या लहान बाळांचे शरीर आणि मेंदू एकत्रितपणे कार्य करतात. आता तुमची बाळे त्यांचे डोळे मिचकायला लागतील. बाळे सवयीनुसार अंगठे चोखतील, तसेच त्यांची मूठ घट्टपणे बंद करण्याच्या प्रवृत्ती सुद्धा वाढेल. तसेच, गर्भजल त्यांच्या डायाफ्राम आणि फुफ्फुसांमधून वाहते, कारण बाळे गर्भाशयात श्वास घेण्याचा सराव करीत असतात.

बाहेरील जगामध्ये बाळांना सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असणारे दोन घटक देखील या आठवड्यात आणि ह्यापुढे सुद्धा एक चांगली पातळी गाठतील. ते घटक म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आणि शरीराची थर्मोरेगुलेटरी सिस्टम हे होत.

शरीराला बाहेरील संक्रमणापासून किंवा बाळाला हानी पोहोचवू शकणार्‍या घटकांपासून संरक्षित करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती आतमध्ये एक मजबूत बचावात्मक जाळे तयार करते. एकदा बाहेर आल्यावर, आईच्या दुधात पोषक आणि प्रतिपिंडे असतात. तसेच यापुढे कोणत्याही हल्ल्यापासून बचाव करण्याची क्षमता सुधारण्याचे काम सुरू राहते.

त्याचप्रमाणे, बाळांना देखील आपल्या शरीराचे तापमान चांगले ठेवणे आवश्यक आहे. गर्भाशय व गर्भजल वातावरण अनुकूल करण्यासाठी सतत समायोजित करत असतात. वास्तविक जगात, बाळांच्या अंगावरील चरबी त्यांना उबदार ठेवते आणि त्यांना जिवंत राहण्यास मदत करते. या प्राथमिक कारणास्तव बहुतेक डॉक्टर ३७ व्या आठवड्यात होणाऱ्या प्रसूतीस प्राधान्य देतात कारण बाळांच्या अंगावर चरबीचा एक चांगला स्तर असतो.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यातील बाळांचा आकार

बाळांच्या वाढीमध्ये गरोदरपणाचे शेवटचे टप्पे बरेच गहन असतात. वास्तविक जगात येण्यासाठी त्यांच्याकडे आता फारच कमी दिवस आहेत हे जाणून, वजन आणि चरबी वाढवण्यासाठी दररोज अंदाजे ३० ग्रॅम्स वजन वाढते.

तुमच्या गर्भाशयातील प्रत्येक बाळाची लांबी अंदाजे ४७४८ सेंटीमीटर पर्यंत असते आणि त्यांचे वैयक्तिक वजन अंदाजे २.७ किलोग्राम असते. जर २ पेक्षा जास्त बाळे असतील तर प्रत्येक बाळाची लांबी आणि वजन कदाचित थोडे कमी असेल.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यातील सामान्य शारीरिक बदल

तुमच्या प्रसूतीची तारीख पूर्वीपेक्षा जवळ आलेली असल्याने तुमच्या शरीरात होणारे बहुतेक बदल बहुधा पोटाच्या खालच्या भागात होतात आणि त्याचा परिणाम तुमच्या बाळाच्या सभोवतालच्या भागात होतो.

 • मागील आठवड्यात बाळे पोटाच्या खालच्या भागाकडे सरकलेली नसल्यास , या आठवड्यात कधीतरी नक्कीच ते होईल. केवळ तुम्हीच त्याचा अनुभव घेणार नाही तर दररोज तुमचे निरीक्षण करत असलेल्या कोणालाही लक्षात येईल की वरच्या भागापेक्षा तुमच्या पोटाच्या खालच्या भागात जास्त वजन आहे. बाळे खाली सरकल्यामुळे आणि त्यांच्या स्थितीमध्ये झालेल्या बदलामुळे फुफ्फुसांना श्वास घेण्यास सुलभ होते. हे आपल्या शरीरास आकार देते आणि त्यामुळे तुमचा गरोदरपणाचा शेवटचा टप्पा सुरु आहे हे लक्षात येते.
 • बाळांचे गर्भाशयामध्ये खाली जन्मकालव्याच्या दिशेने सरकणे हे प्रसूतीच्या तयारीचे लक्षण असू शकते, शरीराच्या वेगवेगळ्या भागात अचानक झालेल्या वजनातील बदलांमुळे तुमचे चालणे आणि पावित्रा ह्यांच्या मध्ये बदल होतो. तुम्ही विचार करता तेवढे ते महत्वाचे नसतील परंतु गुरुत्वाकर्षणाचा मध्य बदलल्यामुळे तुम्हाला स्वतःला योग्य रित्या आधार देण्यासाठी नवीन पद्दत अवलंबवावी लागू शकते. त्यामुळे तुम्हाला कंबरेकडील भागात वेदना जाणवू शकतात. तसेच तुमच्या गर्भाशयाच्या खालच्या भागातील वजनामुळे तुमच्या मूत्राशायावर दबाव येऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला वारंवार बाथरूमला जावे लागेल. गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यात बहुतेक स्त्रियांमध्ये हे थकवा आणणारे आणि चिडचिड निर्माण करणारे असू शकते.
 • गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यात, जवळजवळ प्रत्येक स्त्री प्रसूतीच्या लक्षणांची वाट पहात असते. सराव कळा येणे काही असामान्य नाही. ह्या सराव कळा दिवसेंदिवस तीव्र होत जातात आणि तुमचे शरीर प्रसूतीसाठी तयार होत जाते. ह्यामुळे तुमच्या मूड्स मध्ये बदल होत राहतात. तुम्हाला प्रसूती कळा सुरु झाले आहे असे वाटू शकते परंतु तुम्ही थोडी हालचाल केल्यास ह्या कळा नाहीशा होतात. तसेच योनीमार्गातून येणारा स्त्राव वाढतो आणि घट्ट होत जातो. परंतु जर तो स्त्राव तपकिरी किंवा लालसर रंगाचा असेल तर तुमचा म्युकस प्लग निघाला असल्याचे ते लक्षण आहे. त्याचाच अर्थ तुमची प्रसूती येत्या आठवड्यात केव्हाही होऊ शकते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यातील सामान्य शारीरिक बदल

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यातील लक्षणे

काही लक्षणे ३७ व्या आठवड्यातील असतात. तथापि काही जुनी लक्षणे संपूर्णपणे नाहीशी होण्याआधी तुम्हाला निराश करण्यासाठी पुन्हा दिसतील.

 • तुमच्या पोटाचा आकार आतापर्यंत सर्वात जास्त असेल. तथापि, तुमच्या बाळांची अजूनही वाढ होत आहे आणि त्यामुळे तुमच्या पोटाच्या आकारात वाढ होत राहील आणि तुमची त्वचा आणखी ताणली जाईल. म्हणूनच, तुमच्या पोटावर काही नवीन स्ट्रेच मार्क्स दिसल्यास आश्चर्यचकित होऊ नका. ते कमी होण्यासाठी क्रीम वापरा.
 • लैंगिक क्रिया या टप्प्यावर सुरू ठेवली जाऊ शकते परंतु केवळ तुमच्या डॉक्टरांच्या परवानगीने तुम्ही ते करू शकता. बऱ्याच स्त्रियांमध्ये त्यामुळे योनीमार्गातून येणाऱ्या स्रावामध्ये थोडे रक्त दिसून येते. हलके डाग असणे सामान्य आहे परंतु रक्तस्त्राव होत असेल तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
 • तुम्हाला आधीसारखी पुन्हा मळमळ होण्यास सुरुवात होईल. होय, हे मॉर्निंग सिकनेस सारखे नसते परंतु पोटावरील गर्भाशयाच्या दाबामुळे तुम्हाला मळमळ होऊ शकते. परंतु ह्या मळमळ होण्याच्या लक्षणांनंतर बऱ्याच स्त्रियांना प्रसूतीची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. त्यामुळे हे लक्षण ह्या टप्प्यावर बहुतेकांसाठी स्वागतार्ह लक्षण असेल.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण ३७ वा आठवडा पोटाचा आकार

तुमची बाळे गर्भाशयाच्या खालच्या भागाकडे सरकतील हा ह्या आठवड्यातील मोठा बदल आहे. जडपणा आणि हलक्या वेदना जाणवतील तसेच खोल श्वास घेणे शक्य होईल.

काही वेळा, बाळे खाली सरकण्यापूर्वी प्रसूती सुरु होऊ शकते आणि ते अगदी सामान्य आहे. बाळाला तुमच्या शरीरात अगदीच थोडी जागा आहे आणि त्यामुळे बाळे लवकर बाहेर पडणे सुरु करू शकतात. तुमच्या बारगड्याना आता बाळाचे पाय मारणे जाणवू शकते आणि ते वेदनादायक असू शकते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण ३७ वा आठवडा अल्ट्रासाऊंड

जर तुमच्या गरोदरपणात काही गुंतागुंत नसेल तर डॉक्टर ह्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड करणार नाहीत. बाहेरच्या जगात येण्यासाठी बाळे किती तयार आहेत हे पाहण्यासाठी बऱ्याचदा ह्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड केला जातो.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण ३७ वा आठवडा आहार

तुमचा मूड चांगला राहण्यासाठी फळांच्या स्मूदी, चिप्स किंवा सलाड ह्यासारखे हलके आणि पोषणमूल्य असलेले अन्नपदार्थ खाणे चांगले. तिखट रस्सा किंवा इतर मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने प्रसूती प्रेरित होण्यास मदत होऊ शकते. ताजा अननसाचा रस जास्त प्रमाणात घेण्याची शिफारस केली जाते कारण त्यामुळे गर्भाशयाचे मुख मऊ होण्यास मदत होते.

दुहेरी किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यात प्रसूती

बहुतेक डॉक्टर तुमच्या गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यात जुळ्या बाळांच्या प्रसूतीची शिफारस करतात कारण नवजात बाळांचा जन्मतः मृत्यू होण्याचा धोका त्यामुळे कमी असतो.

जर जुळी बाळे गर्भाशयात जास्त काळ राहिली तर कमी जागेमुळे मृत्यूचा धोका संभवतो. परंतु जर त्यांचा अकाली जन्म झाला तर बाळे जिवंत राहण्याची शक्यता सुद्धा कमी असते. म्हणून गरोदरपणाचा ३७ वा आठवडा हा सुवर्णमध्य आहे कारण तो दोन्ही दृष्ट्या सुरक्षित असतो.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यातील काळजीविषयक टिप्स

तुमच्या बाळांचा जन्म आता लवकरच होणार आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही टिप्स तुमच्याजवळ असणे जरुरीचे आहे.

हे करा

 • बाळांना घरी आणण्यासाठी आपले घर योग्य स्थितीत असल्याची तपासणी करा.
 • तुमच्या पतीस तुम्हाला मसाज करण्यास किंवा कोणत्याही कामात मदत हवी असल्यास मोकळ्या मनाने सांगा.

काय टाळावे?

 • असामान्य लक्षणे दिसल्यास घाबरू नका.
 • चिंता करू नका आणि आपली नेमकी तारीख केव्हा येईल ह्याचा विचार करून ताण घेऊ नका

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यात तुम्हाला कुठल्या गोष्टींची खरेदी केली पाहिजे?

एकदा आपण इस्पितळात आल्यावर, आपण सहजपणे खरेदी करू शकता अशा उत्पादनांचा वापर करुन आपण आरामदायक राहण्याची खात्री करू शकता:

 • तुमचा फोन चार्ज ठेवण्यासाठी आणि आपल्या प्रियजनांशी कनेक्ट होण्यासाठी एक पॉवर बँक.
 • तुम्हाला शांत करू शकेल असे संगीत ऐकण्यासाठी इयरफोन.

ह्या आठवड्यात आपल्याला आवश्यक असलेल्या बहुतेक वस्तू जसे की नर्सिंग ब्रा, कपडे, अतिरिक्त गाऊन, टॉवेल्स, बाळांचे कपडे, डायपर, मऊ टिश्यू इत्यादी आधीच्या आठवड्यात आधीच विकत घेऊन झाल्या आहेत. तथापि, तुम्ही एखादे आवश्यक उत्पादन विसरल्यास, तुम्ही ते तुमच्यासाठी आणण्यास किंवा ऑर्डर करण्यास सांगू शकता.

ज्या स्त्रिया जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह ३७ आठवड्यांच्या गरोदर आहेत, त्यांच्या बाळांचा विकास अशा टप्प्यावर पोहोचला आहे की बाहेरच्या जगात बाळे जास्त त्रास न होता सहज जगू शकतात. स्वतःला तयार करा आणि आपल्या छोट्या छोट्या बाळांच्या जन्माच्या अद्भुत अनुभवाची वाट पहा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article