Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात बदाम खाणे

गरोदरपणात बदाम खाणे

गरोदरपणात बदाम खाणे

गरोदरपणात स्त्रियांनी काय खावे याची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण गर्भारपणात त्यांचे शरीर नाजूक असते आणि काही खाद्यपदार्थांमुळे प्रतिकूल प्रतिक्रिया येऊ शकते. प्रत्येक तिमाहीमध्ये बाळासाठी आवश्यक असणारी चरबी, प्रथिने आणि महत्वपूर्ण जीवनसत्वे बदामामध्ये असतात. आहारात योग्य प्रमाणात बदामाचा समावेश केल्यास निरोगी गर्भधारणा होण्यास नक्कीच मदत होईल.

व्हिडिओ: गरोदरपणात बदाम खाणे फायदेशीर आहे का?

गरोदरपणात बदामच्या फायद्यांसंबंधी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे खाली दिलेली आहेत.

गरोदरपणात बदाम खाणे

गरोदरपणात कमी प्रमाणात बदाम खाल्ल्यास ते आरोग्यासाठी सुरक्षित आणि चांगले असतात. गरोदरपणात बदाम खाण्याचे काही फायदे पाहूया. खाली दिलेल्या सर्व पोषक तत्वांनी बदाम समृद्ध आहेत:

  • तंतुमय पदार्थ योग्य पचनक्रियेस आवश्यक असतात तर व्हिटॅमिन ई त्वचा आणि केसांना निरोगी ठेवते.
  • मेंदूच्या योग्य कार्यासाठी तसेच मज्जासंस्था नीट राखण्यासाठी मॅग्नेशियम, रिबोफ्लेविन आणि फोलेट (व्हिटॅमिन बी9) आवश्यक आहे.
  • मॅंगनीज आई आणि बाळाच्या शरीराचे वजन नियंत्रित करते.

बदामाचे पौष्टिक मूल्य

योग्य प्रमाणात खाल्ल्यास कच्चे बदाम स्नॅक म्हणून किंवा जेवणासोबत खाल्ले जाऊ शकतात

बदामाचा पोषण तक्ता (प्रति 100 ग्रॅम रक्कम):

  • ऊर्जा – 576 किकॅलरी
  • कर्बोदकांमधे – 69ग्रॅम
  • चरबी – 42ग्रॅम
  • प्रथिने – 22ग्रॅम
  • जीवनसत्त्वे – बीटा कॅरोटीन, ए, बी1, बी2, बी3, बी5, बी6, बी9, कोलीन, ई, के
  • खनिजे – कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जस्त

(स्रोत: राष्ट्रीय पोषक डेटाबेस)

वरील तक्त्यावरून आपण पाहू शकतो की लहान आकाराच्या बदामात विविध प्रकारचे पोषक घटक असतात!

गरोदरपणात बदाम खाणे सुरक्षित आहे का?

सामान्यत: स्त्रिया गरोदरपणात काजू आणि सुका मेवा खाणे टाळतात कारण बदामामध्ये उष्णता आणि चरबीचे प्रमाण जास्त असते.

गरोदरपणात बदाम खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे. गरोदरपणात सुकामेवा खाल्ल्याने बाळांना ऍलर्जी होऊ शकते हे सत्य नाही आणि त्यास कोणताही वैज्ञानिक आधार नाही. जर तुम्हाला बदामाची ऍलर्जी असेल तर तुम्ही बदाम खाणे टाळावे. जर तुम्हाला सर्वसाधारणपणे बदाम किंवा सुक्यामेव्याची ऍलर्जी असेल तर कृपया बदामाचा आहारात समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. परंतु जर गर्भधारणेपूर्वी तुम्हाला बदामाची ऍलर्जी नसेल, तर गरोदरपणाच्या कालावधीत सुद्धा तुम्हाला ऍलर्जी नसण्याची शक्यता आहे.

परंतु काही अहवालांमध्ये कच्चे बदाम खाल्ल्याने अकाली प्रसूती होण्याची शक्यता असते. म्हणून , मध्यम प्रमाणात सेवन करणे चांगले आहे.

बदामाचे सेवन करण्याचा सुरक्षित आणि आरोग्यदायी मार्ग म्हणजे बदाम पाण्यात भिजवून खाण्यापूर्वी सोलून खाणे. बदामाच्या सालांमध्ये टॅनिन असते. त्वचा सोलून काढल्याने पोषकद्रव्ये बाहेर पडतात. बदाम भिजवल्यावर पचनासाठी उपयुक्त एन्झाइम्स देखील बाहेर पडतात.

गरोदरपणात बदाम खाण्याचे प्रमुख आरोग्य फायदे

गरोदरपणात बदाम खाणे सुरक्षित आहे असे विज्ञान सांगते. बदामाचे आरोग्यविषयक फायदे खाली दिलेले आहेत.

  1. बदामातून फॉलिक ऍसिड मिळते, मेंदूच्या आणि गर्भाच्या न्यूरोलॉजिकल विकासासाठी हा एक अविभाज्य घटक आहे.
  2. बदाम आहारातील चरबी आणि कर्बोदकांचा एक चांगला स्रोत आहे. बदामामुळे तणाव, जळजळ आणि रक्तातील साखर कमी करण्यात देखील मदत होते. आईला जर लठ्ठपणा आणि मधुमेह अश्या समस्या असतील तर बाळांना पुढील आयुष्यात पचनाचे विकार बदामामुळे होत नाहीत.
  3. घेरलिन हे भूक कमी करणारे संप्रेरक बदामामुळे कमी होते तसेच भूक कमी करणारे हार्मोन, लेप्टिन वाढविण्यास मदत करतात.त्यामुळे तुमचे निरोगी वजन राखण्यास मदत होते. ह्यामुळे  तुम्हाला प्रसूतीनंतर वजन कमी करण्यात देखील मदत होईल.
  4. बदामात भरपूर लोह असते आणि ते बाळाचे हृदय विकसित करण्यास मदत करते आणि प्रतिकारशक्ती वाढवते.
  5. रोज सकाळी 4-6बदाम खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती सुधारते.
  6. बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट, फेस स्क्रब म्हणून वापरल्यास मृत त्वचेच्या पेशी बाहेर टाकल्या जातात आणि तुमची त्वचा तेजस्वी होते.
  7. बदाम भिजवल्याने लिपेस बाहेर पडण्यास सुरुवात होते, आणि चरबीचे विघटन होण्यास मदत होते. त्यामुळे पचन आणि पोषक तत्वांचे शोषण सुधारते.
  8. अभ्यासानुसार बदामाचे सेवन केल्याने अल्फा-टोकोफेरॉलचे प्रमाण वाढवण्यास मदत होते, रक्तातील ह्या संयुगामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.

गरोदरपणात बदाम सेवन करताना घ्यावयाची काळजी

  1. व्हिटॅमिन ई ओव्हरडोज: बदाम हे व्हिटॅमिन ईच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे. 1 औंस बदामातून 48% व्हिटॅमिन इ मिळते. पालेभाज्या आणि फळे इत्यादी मधून देखील भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई मिळते. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ई चे सेवन केल्याने अंधुक दृष्टी, डोकेदुखी आणि अतिसार होऊ शकतो.
  2. पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता: शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त बदाम खाल्ल्याने सूज येणे आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. कारण बदाम फायबर युक्त असतात आणि तुमच्या शरीराला दररोज इतक्या प्रमाणात तंतुमय पदार्थांची सवय नसते.

बदाम खाण्याचे सर्वोत्तम मार्ग

बदाम खाण्याचे सर्वोत्तम मार्ग

  • च्चे बदाम: बदाम कापून सॅलेडवर टॉपिंग केल्याने चव वाढते आणि सॅलेड कुरकुरीत लागते. बदाम कच्चे खाल्ल्याने तो एक झटपट नाश्ता सुद्धा होतो.
  • भिजवलेले बदाम: बदाम रात्रभर भिजवून ठेवल्याने त्यांच्या आवरणातील विषारी पदार्थ निघून जातात. ग्लूटेनचे विघटन होते आणि फायटिक ऍसिड बाहेर पडते. त्यामुळे बदाम कच्चे खाणे हा एक आरोग्यदायी पर्याय बनतो.
  • गरोदरपणासाठी बदामाचे दूध: गाईच्या दुधाइतके आरोग्यदायी नसले तरी बदामाचे दूध अजूनही अत्यंत पौष्टिक आहे. ज्यांना लैक्टोज असहिष्णुता आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
  • बदामाचे लोणी: बदामाच्या पेस्ट मधून तुम्हाला बदामाचे लोणी मिळते. त्यात पाणी टाकल्याने बदामाचे दूध मिळते. बदामाचे लोणी हे प्रथिने, फायबर आणि निरोगी चरबीचा एक उत्तम स्रोत आहे आणि त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होते.

गर्भवती स्त्रीने एका दिवसात किती बदाम खावेत?

एक औंस (28 ग्रॅम) बदामामध्ये सरासरी 23 बदाम असतात. दररोज एक औंस बदाम खाल्ल्याने आरोग्यासाठी चांगले असते आणि कोणतेही नुकसान होत नाही.

बदामाच्या 1 औंसमध्ये 164 कॅलरीज, 14.36 ग्रॅम फॅट (73%), 5.6 ग्रॅम कार्ब (14%) आणि 6.03 ग्रॅम प्रोटीन (13%) असतात.

बदाम आणि खजूर एकत्र खाल्ल्याने रक्तातील पित्ताचा त्रास कमी होतो. पित्ताची योग्य पातळी न राखल्यास छातीत जळजळ आणि ऍसिडिटी होऊ शकते.

केव्हा आणि किती बदाम खावेत याचे वेळापत्रक हवे असल्यास सकाळी 10 आणि संध्याकाळी 10 बदाम खाणे ही योजना चांगली असू शकते. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुमच्या शरीराला अनुकूल अशी योजना तयार करा

निष्कर्ष: बदामाचे असंख्य फायदे आहेत, ज्या गर्भवती स्त्रियांना ऍलर्जी नाही त्यांनी त्यांच्या आहारात बदामचा समावेश नक्कीच करावा. बदामाचे सेवन मर्यादित स्वरूपात असू द्या कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने वाईट परिणाम होऊ शकतात. बदाम रात्री पाण्यात भिजत घाला. कोरडे बदाम खाल्ल्याचे बरेच फायदे असतात. योग्य प्रमाणात बदाम खा. चांगल्या आरोग्यासाठी आणि आनंदी गर्भारपणासाठी तुम्हाला शुभेच्छा!

आणखी वाचा: 

गरोदरपणात खजूर खाणे
गरोदरपणात अक्रोड खाण्याचे फायदे आणि जोखीम

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article