In this Article
वसंत ऋतूच्या आगमनामुळे झाडे फुलांनी बहरलेली आहेत. पिके शेतात आनंदाने नाचत आहेत, खिन्न हिवाळ्याच्या दिवसांना निरोप देऊन, वसंतऋतूचा आनंद आणि आशा यांचा हंगाम म्हणजेच होळीचा सण! बाजारपेठा वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या पिचकाऱ्यांनी नटलेल्या असतात. मुलांमध्ये हा आनंददायक उत्सव इतका लोकप्रिय होण्याचे ते मुख्य कारण आहे. तुम्ही सणाच्या तयारीत व्यस्त असताना हा होळीचा सण आपण का साजरा करतो हे सांगण्यास विसरू नका.
होळी हा सण साजरा करण्याची अनेक कारणे आहेत. होळीच्या विविध पैलूंमुळे होळीचे वेगळे महत्व आहे. आपल्या मुलांना हे पैलू समजले पाहिजेत, तसेच होळीचे महत्व त्यांना माहिती झाले पाहिजे. आपण होळी का साजरी करतो ह्याचे प्रशिक्षण त्यांना मिळावे आणि होळीचा सण उत्साहाने व प्रेमाने साजरा करता यावा म्हणून हा लेख जरूर वाचा.
आपण होळी का साजरी करतो?
होळी साजरी करण्याची पौराणिक, सामाजिक, वैज्ञानिक किंवा पर्यावरण विषयक अनेक कारणे आहेत.
पौराणिक महत्व
होळीच्या संध्याकाळी होळीभोवती जमल्यावर आपल्या मुलाला होळीचा इतिहास सांगा. होळीची कथा पुढीलप्रमाणे आहे. हिरण्यकश्यपू नावाचा प्राचीन भारतातील एक राक्षस राजा होता. भगवान विष्णूने ठार मारलेल्या त्याच्या धाकट्या भावाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाकडे अनेक वर्षे प्रार्थना केली. त्याची भक्ती आणि तपश्चर्येमुळे प्रसन्न झाल्यावर ब्रह्मदेवाने त्याला एक वरदान दिले ज्यामुळे तो अजेय बनला. यामुळे हिरण्यकश्यपूला तो देवासारखा आहे असे वाटू लागेल आणि त्याने लोकांना त्याची उपासना करण्यास भाग पाडले. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा एक उदात्त मुलगा होता. त्याने क्रूर राजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आणि भगवान विष्णूचा एकनिष्ठ भक्त राहिला. म्हणून हिरण्यकश्यपू रागावला, त्याने आपल्या बहिणीच्या मदतीने स्वत: च्या मुलाची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याची बहीण होलिकाकडे अग्नीपासून रक्षण करण्याचे साधन होते. अशा प्रकारे, प्रल्हादला तिच्या मांडीवर बसवून जिवंत जाळण्याच्या उद्देशाने ती अग्निच्या ज्वरात बसली.
तथापि, जेव्हा प्रल्हादने भगवान विष्णूचे नाव सर्वत्र ऐकले तेव्हा त्यांची योजना चुकीची ठरली. दुसरीकडे, होलिका आगीतून वाचली नाही. भगवान विष्णूने लवकरच हिरण्यकश्यपूचा वध केला. होलिकाचा मृत्यू हा सर्व वाईट प्रवृत्तींचा पराभव दर्शवतो आणि त्यामुळे होळी साजरी केली जाते.
रंगांचा वापर केव्हापासून सुरु झाला?
ही परंपरा भगवान श्रीकृष्णाच्या काळाची आहे. श्रीकृष्ण हे श्रीविष्णूंचे अवतार आहेत. श्रीकृष्णाला वृंदावन आणि गोकुळामध्ये रंगानी होळी साजरी करायला आवडत असे आणि त्यामुळे तो एक सामुदायिक कार्यक्रम बनला.
ह्या गोष्टी ऐकत असताना तुमचे मूल आनंदी होईल आणि ह्या संधीचा उपयोग करून त्याला वाईटावर चांगल्याचा कसा विजय होतो हे शिकवा.
सामाजिक महत्त्व
शत्रूंना मित्र बनवण्याचा हा दिवस असल्याचे तुमच्या मुलांना सांगा. त्यांच्याबद्दलचा राग काढून टाकण्याचा हा दिवस आहे. ह्या दिवसात रंगांचा वापर करून आपले नाती अधिक दृढ करून लोकांशी चांगले बंध निर्माण करण्यास शिकवा. संध्याकाळी मित्र आणि नातेवाईकांना भेटायला त्याला सोबत घेऊन जा. हा दिवस प्रेम साजरा करण्यासाठी आहे आणि इतरांचे नुकसान होऊ नये ह्याकडे लक्ष द्या.
वैज्ञानिक महत्त्व
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे रंगामुळे शरीराचे आरोग्य आणि सौंदर्य वाढते. आपल्या मुलास वेगवेगळी फुले व पानांनी बनवलेल्या नैसर्गिक रंगांचा चांगुलपणा समजावून सांगा. रासायनिक रंगांचे दुष्परिणाम जाणून घेतल्यास होळी खेळण्यासाठी त्यांचा वापर कमी होईल. तसेच होळी पेटवण्यामागचे वैज्ञानिक कारणही त्याला समजू द्या. जिवाणूंची सर्वात जास्त वाढ जेव्हा होते त्या कालावधीत होळीचा सण येतो. होळी पेटवल्यानंतर निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे आजूबाजूच्या परिसरातील जिवाणूंचा नाश होतो आणि आजारांपासून बचाव होतो.
पर्यावरणीय महत्त्व
होळीच्या सणासोबत वसंत ऋतूचे आगमन होते. वसंत ऋतूमध्ये वातावरण कसे बदलते ते आपल्या मुलास समजावून सांगा. त्याला फुलणारी फुले, नवीन पाने असलेली झाडे, मधमाश्या गुंजन आणि सकाळचा पक्ष्यांचा किलबिलाट दाखवा. रंगीबेरंगी फुले, दीर्घ संध्याकाळ आणि उशीरा सूर्यास्त – अशा पद्धतीने निसर्गाचे सौंदर्य ह्या काळात खुललेले असते. होळी हा निसर्गाचा उत्सव आहे हे तुमच्या मुलास सांगा. ह्यामुळे तुमच्या मुलाला निसर्ग प्रेमी बनण्यास देखील मदत होईल.
होळी उत्सवाचे ३ दिवस
भारतातील बर्याच राज्यांत होळीचा सण ३ दिवस साजरा केला जातो आणि प्रत्येक दिवशी वेगळा विधी असतो.
- पहिला दिवस: होळी पौर्णिमा हा एक पौर्णिमेचा दिवस आहे. यानिमित्ताने थाळीवर पाण्याने व रंगांनी भरलेली लहान पितळेची भांडी ठेवतात आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य त्यांच्या नातेवाईकांवर रंग शिंपडतात आणि सेलिब्रेशन सुरू होते.
- दुसरा दिवस: होळीची पूजा करून नंतर होळी पेटवली जाते. महाराष्ट्रात होळीला पुरणपोळीचा नेवैद्य दाखवून स्त्रिया, त्यांच्या मुलांसमवेत अग्नीदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी होळीभोवती प्रदक्षिणा घालतात.
- तिसरा दिवस: ह्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात. कृष्ण आणि राधा यांच्या मूर्तींना रंगांनी रंगवून त्यांची पूजा केली जाते.
ह्या होळीला, तुमच्या मुलाला हिंदू कॅलेंडर मधील ‘फाल्गुन’ महिन्याचे महत्व समजावून सांगा. पौणिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते हे त्याला कळू द्या. देशाच्या विविध भागात होळी कशी साजरी केली जाते हे दर्शविण्यासाठी इंटरनेटचा वापर करा. तसेच, आपल्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना पर्यावरणास अनुकूल होळी साजरी करण्यासाठी प्रोत्साहित करा.
आणखी वाचा: होळीचा सण साजरा करताना तुमच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी टिप्स