Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळाच्या त्वचेवरील फोडांवर कसे उपचार करावेत?

बाळाच्या त्वचेवरील फोडांवर कसे उपचार करावेत?

बाळाच्या त्वचेवरील फोडांवर कसे उपचार करावेत?

बाळांची त्वचा संवेदनशील असते आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अद्याप पूर्णतः विकसित झालेली नसते. त्यामुळे बाळाच्या त्वचेला संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. त्यात जर हवामानाची परिस्थिती प्रतिकूल असेल तर, बाळांच्या त्वचेवर फोड किंवा पुरळ उठू शकते.

ह्या परिस्थितीत आणखी वाढ होऊ नये म्हणून योग्य स्वच्छता बाळगणे आणि बाळाची त्वचा थंड ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही बाळासाठी वापरत असलेली बेबी प्रॉडक्ट्स बदलण्याबद्दल विचार करू शकता जसे की आंघोळीसाठी साबण, तेल किंवा लोशन, आणि टॅल्कम पावडर इत्यादी . वेळेवर उपचार न केल्यास हे फोड वेदनादायक किंवा गंभीर होऊ शकतात

त्वचेवर येणारे फोड म्हणजे काय?

What-Are-Boils2.jpg (696×476)

फोड म्हणजे एक प्रकारची गाठ असते जी त्वचेच्या तैलग्रंथींमध्ये किंवा केसांच्या कूपात संसर्ग झाल्यामुळे दिसून येते. स्टेफिलोकोकस ऑरियस नावाच्या बॅक्टेरियममुळे हा संसर्ग सामान्यत: होतो. हा जीवाणू आपल्या त्वचेवर, नाकात आणि तोंडात राहतो. त्वचा सामान्यत: या जीवाणूंमध्ये अडथळा म्हणून कार्य करते, ह्या जीवाणूंना शरीरात प्रवेश करण्यापासून आणि संसर्ग पसरवण्यापासून प्रतिबंधित करते

जेव्हा आपल्याला खरचटते, कापते किंवा चावले जाते तेव्हा जीवाणू आत प्रवेश करतात. हे जीवाणू त्वचेच्या लहान भेगांमधून किंवा केसांच्या फॉलिकलपासून शरीरात जातात. ह्या संसर्गामुळे फोड तयार होतो. जेव्हा बाळाच्या त्वचेवर या जीवाणूंचा परिणाम होतो तेव्हा शरीर त्या विषाणूविरूद्ध लढण्यासाठी पांढऱ्या रक्त पेशी पाठवून प्रतिसाद देते. पांढऱ्या रक्त पेशी, मृत जीवाणू आणि त्वचा ह्यांचे मिश्रण पू म्हणून ओळखले जाते.

सुरुवातीला, प्रभावित त्वचा लाल होईल आणि एक छोटी गाठ दिसून येईल. त्वचेच्या आत पू तयार होऊ लागल्यावर तो फोड पांढरा होऊ शकतो. पू तयार झाल्यावर जोरदार वेदना होऊ शकते

चेहरा, पाठ, मान, खांदे, मांडी आणि कुल्ले ह्या शरीराच्या भागावर हे फोड उठतात. काही प्रकरणांमध्ये, मुलांना ताप देखील येऊ शकतो. घरगुती उपचारांचा वापर करून उष्णतेमुळे उठणारे फोड बरे करता येतात , परंतु काही शंका असल्यास वैद्यकीय मदत घेणे चांगले.

हे फोड संक्रमक असतात का?

ज्या फोडांमध्ये पू होतो, ते संक्रामक असू शकतात. स्टेफ बॅक्टेरियांद्वारे केसांच्या कूपात संक्रमणामुळे पू असलेले फोड तयार होतात. सुरुवातीला हे फोड अगदी छोटे असतात परंतु काही काळानंतर ते मोठे होतात आणि त्यामध्ये पू होतो. ते केवळ बाळाच्या शरीराच्या इतर भागात पसरत नाहीत तर त्या बाळाच्या संपर्कात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस संक्रमित करतात. टॉवेल्स, बेडशीट आणि टूथब्रशच्या माध्यमातूनही हा संसर्ग प्रसारित होऊ शकतो.

पू असलेले एकापेक्षा जास्त फोड असल्यास त्यांना गळू म्हणतात. लहान मुलांमध्ये हे पू असलेले फोड शरीराच्या कोणत्याही भागावर दिसू शकतात कारण केसांचे फोलिकल्स संपूर्ण त्वचेवर असतात. तथापि, त्यांचा चेहरा, मान, काख, मांडी आणि कुल्ले ह्यासारख्या भागांमध्ये जिथे जास्त घाम येतो आणि घर्षण होते अशा भागावर दिसण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच बर्‍याच मातांना सामान्यत: उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या हंगामात बाळांमध्ये हे पू असलेले फोड आढळतात.

लहान बाळांमध्ये हे फोड किती काळ राहतात?

जेव्हा बाळाच्या त्वचेवर फोड येतो तेव्हा एक मऊ गाठ तयार होते आणि काही काळानंतर ती मोठी आणि लाल होऊ लागते. ही गाठ दिसू लागल्यानंतर एक आठवड्यांनंतर त्यामध्ये पू भरण्यास सुरूवात होते. नैसर्गिकरित्या ती दोन आठवड्यात बरी होते. जर दोन आठवडयांनी सुद्धा तो फोड नैसर्गिकरित्या बरा झाला नाही तर वैद्यकीय मदत घेणे चांगले.

बाळांमध्ये फोड येण्याची कारणे

विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमुळे बाळाला हे फोड होण्याचा धोका जास्त असतो. ती कारणे खालीलप्रमाणे:

 • चांगली वैयक्तिक स्वच्छता नसणे
 • कमी प्रतिकारशक्ती
 • शरीरात आवश्यक पोषक तत्वांचा अभाव
 • अशक्तपणा किंवा लोहाची कमतरता
 • साबण, क्रीम किंवा डिटर्जंट्सचा रासायनिक संपर्क यामुळे त्वचेवर जळजळ होते
 • तीव्र उष्णता किंवा आर्द्रता यासारखी प्रतिकूल हवामान परिस्थिती

लहान बाळांमध्ये फोड होण्याची चिन्हे आणि लक्षणे

बाळांना होणाऱ्या फोडांची चिन्हे आणि लक्षणे अशी आहेतः

 • फोडाच्या भोवतालच्या त्वचेला सूज येऊन लाल होण्याची प्रवृत्ती असते
 • काही वेळा बाळाला ताप येऊ शकतो
 • प्रथम जिथे फोड आला होता त्या ठिकाणी अनेक फोड तयार होऊ शकतात
 • फोडाच्या सभोवतालच्या लिम्फ ग्लॅण्डस ना सूज येऊ शकते

निदान

जर संक्रमण शरीराच्या इतर भागात पसरले असेल तर डॉक्टर बाळाच्या शरीराची संपूर्ण तपासणी करू शकतात. फोड येण्यामागे इतर काही वैद्यकीय कारण तर नाही ना ह्याचीसुद्धा डॉक्टर तपासणी करून पाहतील. सर्व घटकांचे विश्लेषण केल्यानंतर, डॉक्टर त्यांचे निदान सादर करतील.

गुंतागुंत

लहान बाळांना येणाऱ्या फोडांमुळे कुठलीही वैद्यकीय समस्या निर्माण होत नाही आणि वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता नसते. परंतु जर फोड फोडले तर यामुळे काही प्रमाणात डाग येऊ शकतात. जर फोड खूप मोठे झाले तर ते सेल्युलाईट बनू शकते आणि कदाचित प्रतिजैविक औषधांनी उपचार करणे आवश्यक असते. जर त्या फोडाचे मोठे गळू झाले आणि गायब होण्याची चिन्हे दिसली नाहीत तर शस्त्रक्रिया सुचविली जाऊ शकते.फोडांमध्ये पू झाला तर विशेष काळजी घेण्याची गरज असते कारण त्यामुळे संसर्ग पसरू शकतो.

बाळांना वारंवार फोड येणे

कधीकधी, वारंवार येणाया फोडांमुळे बाळांना त्रास होतो. जोपर्यंत शरीरात इतर काही संसर्ग नसतो तोपर्यंत हे काळजीचे कारण नसते. वारंवार फोड येणे संसर्गजन्य असू शकते कारण त्वचेवरचे जिवाणू एका शरीरातून दुसर्‍या शरीरात सहजपणे हस्तांतरित होतात , म्हणूनच कुटुंबातील इतर सदस्यांना हे फोड नाहीत ना आणि त्यांच्यापासून बाळाला संसर्ग झाला नाही ना हे तपासून पहिले पाहिजे.

उपचार

संसर्गाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी योग्य ठिकाणी अँटिसेप्टिकने नियमितपणे बाधित भागाची साफसफाई करणे महत्वाचे आहे. जर फोड फुटला तर कापूस आणि अँटीसेप्टिक वॉशने ही जागा स्वच्छ पुसून टाका. कोरडे झाल्यावर,ड्रेसिंग करा जेणेकरून बाळाचा स्पर्श त्यास होणार नाही. हे फोड पिळून काढणे किंवा फोडणे टाळा कारण यामुळे आजूबाजूच्या भागात डाग येऊ शकतात आणि संक्रमणाचा प्रसार होऊ शकतो.

जर फोड मोठे होत असल्यास किंवा पसरत असल्यास डॉक्टर अँटीबायोटिक्स लिहू शकतात. जरी फोड पूर्ण बरे झाले तरीसुद्धा औषधांचा संपूर्ण कोर्स पूर्ण करा नाही तर फोड पुन्हा येऊ शकतात. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही फोडांवर अँटीइन्फेक्टीव्ह क्रीम सुद्धा लावू शकता. काही वेळा, डॉक्टर शस्त्रक्रियेने फोड उघडून पू काढून टाकण्यास सांगू शकतात. ही प्रक्रिया भूल देऊन केली जाते.

बाळाच्या डोक्यावरील फोडांवर अल्कोहोल चोळून उपचार केले जातात.असे केल्याने तो भाग निर्जंतुक होईल आणि साध्या संसर्गामुळे तयार झालेले फोड बरे होऊ शकतील. डोक्यावर एकापेक्षा जास्त फोड येण्याची कारणे म्हणजे उष्णता आणि उबदार, दमट हवामान ही आहेत. अशा परिस्थितीत, नारळ तेल लावल्याने ते उपयुक्त ठरेल कारण त्यात थंड गुणधर्म आहेत.

फोड बरे होण्यासाठी घरगुती उपचार

बऱ्याच वेळा फोड काही दिवसात स्वतःचे स्वतः बरे होतात. परंतु लवकर बरे करण्यासाठी आपण खालील घरगुती उपचार करून बघू शकता

. उबदार कॉम्प्रेस

वेदनांपासून त्वरित आराम मिळविण्यासाठी, प्रभावित क्षेत्रावर काही मिनिटांसाठी एक उबदार कॉम्प्रेस ठेवता येईल. ही क्रिया दिवसातून काही वेळा पुनःपुन्हा करू शकता. ह्यामुळे फोडांमधून पू बाहेर पडण्यास देखील मदत होऊ शकते त्यानंतर फोड बरा होण्याची प्रक्रिया सुरु होते.

. मध थेरपी

फोडांना मध लावणे ही चांगली कल्पना आहे कारण मध एक नैसर्गिक एंटीसेप्टिक आहे.

. लापशी लावणे

तुम्ही लापशी उपचार देखील करू शकता. स्वच्छ सूती कपड्यात लापशी लपेटून एक उबदार कॉम्प्रेस बनवा आणि गरम दुधात बुडवा. लापशी जळजळ कमी करते, ज्यामुळे उपचारांची प्रक्रिया वेगवान होते.

. ओव्याची पाने

तुम्ही ओव्याच्या पानांचा कॉम्प्रेस देखील वापरू शकता पाने मऊ होईपर्यंत उकळवा आणि कॉम्प्रेस करण्यासाठी अतिरिक्त पाणी काढून टाका. ही पाने आता फोडांना लावल्यास ते लवकर बरे होण्यास मदत होते.

. हळद

फोडांवर हळद घालणे देखील हळदीच्या अँटिसेप्टिक गुणधर्मांमुळे उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

. कांदा आणि लसूण रस यांचे मिश्रण

जर फोड फुटला नाही तर आपण त्यावर कांदा आणि लसूणचा रस घालू शकता.ह्यामुळे केवळ जिवाणू नष्ट होत नाहीत तर लवकर बरे होण्यास सुद्धा मदत होते.

बाळांना होणाऱ्या फोडांना प्रतिबंध कसा घालाल?

तुमच्या बाळाला फोड नये म्हणून काही गोष्टींचा सराव केला जाऊ शकतो

 • तुमच्या बाळाची योग्य स्वच्छता ठेवा
 • तुमच्या मुलास निरोगी आणि संतुलित जेवण देत असल्याची खात्री करा
 • बाळाला हाताळताना वारंवार हात धुवा
 • बाळाचे टॉवेल्स आणि बेडशीट नियमितपणे बदला, गरम पाण्याने बाळाचे कपडे धुवा
 • फोडाचा संसर्ग आणखी पसरण्यापासून रोखण्यासाठी, त्यांना ड्रेसिंग करा आणि वेळोवेळी ड्रेसिंग बदला. ड्रेसिंगची काळजीपूर्वक विल्हेवाट लावण्याचे लक्षात ठेवा
 • जर फोड फुटला असेल तर तो व्यवस्थित स्वच्छ करा आणि मुलाच्या शरीराच्या इतर भागात संसर्ग होत नाही ना ह्याची खात्री करा.
 • बाळाच्या शरीरावर नवीन फोडांच्या चिन्हांकडे लक्ष ठेवा

आपण डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे जेव्हा

 • बाळाला ताप येतो
 • फोड आकाराने वाढू लागतात आणि वेदनादायक होतात
 • फोड बाळाच्या चेहऱ्यावर असतात
 • दोन आठवड्यांनंतरही फोड बरे होण्याची चिन्हे दिसत नाहीत
 • वारंवार फोड येतात आणि शरीराच्या इतर भागात पसरतात
 • बाळाचे लिम्फ नोड्स सूजतात
 • बाळाच्या फोडांमध्ये पू होतो

लहान मुलांच्या शरीरावर फोड सामान्यतः फार चिंताजनक परिस्थिती नसते. शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली सहसा याची काळजी घेते. परंतु जर तुम्हाला असे वाटले की फोड कमी होत नाहीत आणि शरीराच्या इतर भागात पसरत आहेत तर त्यामागे इतर वैद्यकीय समस्या असू शकतात. अशा परिस्थितीत, नेहमीच वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो

आणखी वाचा: बाळांना होणारा सनबर्न

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article