Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home टॉडलर (१-३ वर्षे) अन्न आणि पोषण १४ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – विविध पर्याय, आहार तक्ता आणि पाककृती

१४ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – विविध पर्याय, आहार तक्ता आणि पाककृती

१४ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – विविध पर्याय, आहार तक्ता आणि पाककृती

जर तुमचे बाळ येत्या काही दिवसात १४ महिन्यांचे होणार असेल तर तुम्ही बाळाला कुठले अन्नपदार्थ द्यावेत हे शोधत असाल ना? परंतु पालक म्हणून १४ महिन्यांच्या बाळासाठी मेन्यू ठरवणे ही काही सोपी गोष्ट नाही. बाळ एक वर्षाचे झाल्यापासून बाळाच्या खाण्याच्या सवयींमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. त्यामुळे बाळाला काहीही द्यायच्या आधी तुम्ही विचार केला पाहिजे कारण ह्या वयात बाळ खाण्याच्या बाबतीत खूप चिकित्सक होईल. बाळाला नवीन पदार्थांची ओळख करून देण्याआधी बाळाच्या पोषणाच्या गरज भागत आहेत ना ह्याची तुम्ही खात्री केली पाहिजे. जर तुम्ही बाळाला काय खायला द्यावे ह्या विचारात असाल तर हा लेख वाचा.

१४ महिन्यांच्या बाळाच्या पोषणाच्या गरजा

तुमचे बाळ अजूनही वाढीच्या टप्प्यावर आहे आणि बाळाचा विकास योग्य रीतीने व्हावा म्हणून बाळाला सर्वोत्तम पोषणाची गरज असते.

. कॅलरी

१४ महिन्यांच्या मुलांसाठी ऊर्जेचा स्रोत सर्वात महत्वाचा आहे. मागच्या महिन्यातील १००० कॅलरीज ची गरज आता १२००१३०० कॅलरीज पर्यंत वाढली आहे.

. प्रथिने

आपला आहार हा कर्बोदकांनी समृद्ध असतो आणि त्यामुळे प्रथिने कमी पडतात. परंतु त्याकडे दुर्लक्ष करू नका. १४ महिन्यांच्या बाळाला १३१५ ग्रॅम्स प्रथिने दिवसाला लागतात.

. कर्बोदके

तुमच्या बाळाच्या आहारात कर्बोदकांचा समावेश केला पाहिजे कारण त्यामुळे बाळाच्या मेंदूला ऊर्जा मिळते आणि त्याचे कार्य आणि वाढ नीट होण्यास मदत होते. मोठ्या व्यक्तीला जितकी गरज असते साधारण तितकीच गरज म्हणजेच १३०१५० ग्रॅम्स बाळाला सुद्धा असते.

. तंतुमय पदार्थ

बाळाच्या आरोग्यासाठी तंतुमय पदार्थ महत्वाचे असतात. पचनास ह्या पदार्थांची मदत होते आणि आतड्यांची हालचाल सुरळीत होते.

. सोडियम

शारीरिक प्रक्रियांसाठी सोडियम हे अत्यावश्यक आहे. मुलांना सुद्धा त्याची गरज असते. बाळाला साधारणपणे दिवसाला १ ग्रॅम सोडियमची गरज असते.

. लोह

जर तुमच्या बाळाचे स्तनपान बंद झाले असेल तर बाळाने दुसऱ्या स्रोतांपासून लोह घेतले पाहिजे. दररोज ७ मिग्रॅ लोह घेतल्याने तुमच्या बाळाला लोहाची कमतरता होणार नाही.

. पाणी

बरेचसे पालक पाण्याकडे एक पोषक घटक म्हणून बघत नाहीत. शरीराच्या इलेकट्रोलाईटचे संतुलन राहण्यासाठी पाण्याची गरज असते. तुमचे बाळ दिवसाला कमीत कमी १ लिटर पाणी पीत आहे ना ह्याकडे लक्ष दिले पाहिजे.

. पुरक पोषणमूल्ये

मुख्य घटकांव्यतिरिक्त काही घटक शरीराला सूक्ष्म प्रमाणात सुद्धा लागतात. ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स, डीएचए आणि इतरही काही घटकांचा जेवणात समावेश केला जाऊ शकतो.

१४ महिन्यांच्या नुकत्याच चालू लागलेल्या बाळाला किती अन्नाची गरज असते?

तुमच्या चिमुकल्यासाठी नाश्त्याच्या पर्यायांचा विचार करण्याआधी तुमचे १४ महिन्यांचे बाळ आधी जितके खात होते तितके खाणार नाही ह्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. बाळाच्या वाढीच्या विकासाचा दर आता स्थिर होत असतो. ह्या वयाच्या बाळांसाठी दररोज १००० कॅलरीज पुरेशा आहेत.

१४ महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थ

तुमच्या १४ महिन्यांच्या बाळाला सर्वोत्तम आहार मिळावा म्हणून इथे काही प्रसिद्ध अन्नपदार्थ दिले आहेत ज्याचा तुम्ही तुमच्या आहारात न चुकता समावेश केला पाहिजे.

. स्तनपान

स्तनपान

बऱ्याचशा माता स्तनपान सोडवण्याचा प्रयत्न करीत असतात, पण जर स्तनपान ह्या वयात सुरूच ठेवले तर ते तुमच्या बाळासाठी खूप फायदेशीर ठरते. वेगवेगळ्या प्रकारची संप्रेरके आणि जीवनसत्त्वे यांच्यासह असंख्य प्रतिपिंडे स्तनपानाद्वारे सहजपणे बाळाला मिळतात आणि निरोगी ठेवतात तसेच दीर्घ कालावधीसाठी संक्रमणापासून वाचवतात.

. मांस

मांसाची निवड करताना तुमच्या बाळासाठी मासे किंवा चिकन ह्यांची निवड करण्याची गरज आहे. त्यांच्याद्वारे बाळास आवश्यक असलेली प्रथिने मिळतील तसेच बाळाला चवदार अन्न सुद्धा मिळेल. ३० ग्रॅम मांस बाळासाठी पुरेसे आहे.

. चीझ

मुलांना चीझ खायला खूप आवडते. ते ब्रेड सोबत किंवा फास्ट फूड सोबतच खायला हवे असे नाही. तुमच्या नेहमीच्या भाज्या आणि नाश्त्यासोबत चीझ खायला हरकत नाही कारण त्यामुळे त्याद्वारे तुमच्या मुलास पुरेसे कॅल्शिअम आणि प्रथिने मिळतील.

चीझ

. बीन्स

बाळाला बीन्स देताना मॅश करा. शाकाहारी लोकांसाठी बीन्स हा खरंच चांगला पर्याय आहे कारण त्यामुळे बाळास प्रथिने आणि व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात मिळते. तसेच, त्यामुळे शरीरात लोहाची निर्मिती होते.

. अंडी

अंडी म्हणजे नाश्त्यासाठी प्रसिद्ध पर्याय आहे. अंडी तुम्ही बाळाला वेगवेगळ्या स्वरूपात देऊ शकता त्यामुळे बाळ कंटाळणार नाही. तसेच त्यामध्ये फोलेट, व्हिटॅमिन बी १२ आणि इतर पोषण मूल्ये असल्याने तो तुमच्या बाळासाठी पोषक आहार होईल.

अंडी

. फळांचा रस

जेव्हा आपण फळांचा रस म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ फक्त आणि फक्त ताज्या फळांचा रस असा असतो. तुमच्या बाळाला कुठलाही खूप साखर आणि संरक्षक पदार्थ असलेला कृत्रिम रस देऊ नका. ताज्या फळांचा रस जास्तीत जास्त १८०२०० मिली इतका द्या.

. दूध

१४ व्या महिन्यापर्यंत काही मुलांचे स्तनपान बंद झालेले असते त्यामुळे त्यांनी दररोज अर्धा कप दूध न चुकता घेतले पाहिजे. दुसऱ्या मजेदार अन्नपदार्थांसोबत दूध दिल्यास चव वाढण्यास मदत होते आणि दुधापासून मिळणाऱ्या चरबी पासून बाळाला ऊर्जा मिळते.

दूध

. भाज्या

बाळाच्या जेवणाचा भाज्या हा प्रमुख भाग आहे. बाळाला कच्च्या भाज्या देणे टाळा. भाज्या गरम पाण्यात उकळून किंवा त्या उकडून घेऊन त्या मऊ करून बाळाला द्या. वेगवेगळ्या रंगांच्या पदार्थांचा समावेश केल्यास बाळाची अन्नपदार्थांविषयीची उत्सुकता वाढेल आणि व्हिटॅमिन्स सुद्धा योग्य रीतीने घेतले जातील.

. फळे

जेवण झाल्यावर फळे खाणे ही एक चांगली सवय आहे आणि त्यामुळे तुमच्या शरीराला लागणारी पोषणमूल्ये मिळतील. तुमच्या बाळाला देताना फळे पिकलेली आहेत ह्याची खात्री करा. १४ महिन्यांचे बाळ फळांच्या प्युरीचा छोटा कप सहज खाऊ शकते.

फळे

१०. अन्नधान्ये

बाळाच्या आहारातील बराचसा भाग हा अन्नधान्यांनी बनलेला असतो. भाज्यांनी युक्त पास्ता किंवा संपूर्णधान्यांनी बनवलेले अन्नपदार्थ हे तुमच्या आहारात धान्याचा समावेश करण्यासाठी उत्तम मार्ग आहेत. संपूर्ण गव्हाचा किंवा ओटमीलयुक्त ब्रेड नाश्त्यासाठी घेण्याची शिफारस केली जाते त्यामुळे सोप्या पद्धतीने बाळाची पोषणमूल्यांची गरज भागते.

१४ महिन्यांच्या बाळासाठी आहार/जेवणाचा तक्ता

जर तुम्हाला तुमच्या १४ महिन्यांच्या बाळाच्या जेवणाचा किंवा आहाराचा तक्ता करणे अवघड जात असेल तर खाली काही सोपे आहार तक्ते दिले आहेत जे तुम्ही सुरुवातीला वापरू शकता.

१४ महिन्यांच्या बाळासाठी आहाराचा तक्ता १ ला आठवडा

आहार

नाश्ता सकाळी

दुपारी

संध्याकाळी

रात्री
दिवस १ ला १ उकडलेले अंडे + छोटा पराठा मोसंबी किंवा पीच ज्यूस संपूर्ण धान्य पोळी + डाळ +

आवडीची भाजी + काकडीचे काही तुकडे

पोहे+ दूध पालक + पनीर पराठा
दिवस २ रा ठेपला + चुंदा + १ छोटा ग्लास केशर वेलची घालून केलेले दूध पनीर, अंजीर अक्रोड बर्फी पोळी +तुमच्या आवडीची भाजी + गाजराचे काही तुकडे संपूर्ण धान्य बिस्किटे दही किंवा पालक डीप किसलेली काकडी आणि दही भात
दिवस ३ रा अंडाभुर्जी+ संपूर्ण धान्य टोस्ट आंब्याचा मिल्कशेक संपूर्णधान्य पोळी + डाळ + तुमच्या आवडीची भाजी + काकडीचे काही तुकडे रव्याची खीर गव्हाचा पास्ता घरी केलेल्या टोमॅटो प्युरी सोबत
दिवस ४ था

१ कप पोहे + १ छोटा ग्लास ताज्या मोसंबीचा रस

बेरी किंवा केळी योगर्ट पोळी + डाळ + तुमच्या आवडीची भाजी + गाजराचे काही तुकडे मधासोबत किंवा चाट मसाला सोबत पनीरचे तुकडे भाज्यांच्या सूप सोबत डाळ खिचडी
दिवस ५ वा १ हाफ फ्राय अंडे + संपूर्ण धान्य टोस्ट चॉकलेट मिल्कशेक संपूर्णधान्य पोळी + डाळ + तुमच्या आवडीची भाजी + काकडीचे काही तुकडे भाज्यांचा उपमा + दूध दही किंवा लस्सीसोबत पराठा
दिवस ६ वा २ छोटे नाचणीचे डोसे + हिरवी चटणी दूध + छोटे सफरचंद किंवा पेर पोळी + डाळ + तुमच्या आवडीची भाजी + बीटरुटचे काही तुकडे फ्रुट कस्टर्ड बाजरीगहू रोटी डाळ मेथीसोबत
दिवस ७ वा

१ अंड्याचे ऑम्लेट

ओट्स किंवा ज्वारीची लापशी

संपूर्ण धान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप

डाळ पकोडा आणि पुदिन्याची चटणी

पनीर पुलाव आणि भोपळ्याचे सूप

१४ महिन्यांच्या बाळासाठी आहाराचा तक्ता २ रा आठवडा

आहार नाश्ता सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री
दिवस १ ला

ज्वारीची लापशी

पेअरचे तुकडे

संपूर्णधान्य रोटी+ डाळ+ आवडीची भाजी + काकडीचे तुकडे

शेव मुरमुरे

किसलेली काकडी दह्यासोबत
दिवस २ रा संपूर्णधान्य धिरडे + दूध दही जिरे भात आणि दालफ्राय साल काढलेले पीच/सफरचंदाच्या फोडी

बाजरी आणि गहू रोटी डाळ मेथी सोबत

दिवस ३ रा

गव्हाचा शिरा

उकडलेले अंडे किंवा घरी केलेले पनीर मुळ्याचा पराठा घरी केलेले लोणी आणि लस्सीसोबत

चिकूचे छोटे तुकडे

पनीर किंवा अंडाभुर्जी, पोळी आणि भाज्यांच्या सूप सोबत
दिवस ४ था भाज्यांचा उपमा + दूध पालक + द्राक्षे + सफरचंद स्मूदी पोळी +डाळ +तुमच्या आवडीची भाजी + गाजराचे काही तुकडे पालक पुरी तिखट नसलेली पावभाजी मुगाच्या सूप सोबत
दिवस ५ वा ओट्सची लापशी पनीर, अंजीरअक्रोड बर्फी संपूर्णधान्य रोटी+ डाळ+ तुमच्या आवडीची भाजी + काकडीच्या फोडी किसलेले सफरचंद

बेसन पीठ, ज्वारी कोथिंबीर घालून केलेले धिरडे. दह्यासोबत

दिवस ६ वा दलिया कुस्करलेले अव्होकॅडो पोळी+ डाळ + तुमच्या आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही तुकडे काकडीची कोशिंबीर राजमा भात आणि टोमॅटो सूप
दिवस ७ वा नाचणीचे मोदक + केशर इलायची घालून केलेले दूध कापलेले कलिंगड संपूर्णधान्य रोटी + डाळ + तुमच्या आवडीची भाजी + काकडीच्या काही फोडी पॉपकॉर्न गव्हाचा पास्ता घरी केलेल्या टोमॅटो प्युरीसोबत

१४ महिन्यांच्या बाळासाठी आहाराचा तक्ता ३ रा आठवडा

आहार नाश्ता

सकाळी

दुपारी

संध्याकाळी

रात्री

दिवस १ ला गव्हाचा पॅनकेक मधासोबत किंवा साखर व दूध फ्लॉवर बटाटा कुस्करून चीझ सोबत

संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही तुकडे

पनीर सफरचंद कुस्करून

जिरेभात दाल फ्राय सोबत

दिवस २ रा १ कप पोहे + १ छोटा ग्लास संत्र्याचा रस

रताळे + पोहे

पोळी + डाळ + तुमच्या आवडीची भाजी + गाजराचे काप

पोहे पुडिंग

पोळी + डाळ + तुमच्याआवडीची भाजी+उकडलेल्या बीटरुटचे तुकडे
दिवस ३ रा थालीपीठ + दूध मध घातलेले पुदिना आणि लिंबू सरबत संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीच्या काही फोडी मँगो किंवा स्ट्रॉबेरी योगर्ट आणि ओट्स किंवा दही पोहे आणि कुस्करलेले केळं पालक खिचडी + दही
दिवस ४ था

केळ्याचे पॅनकेक्स किंवा अंड्याचा पांढरा बलक घातलेला मऊ पॅनकेक

मोसंबीच्या फोडी पोळी +डाळ + आवडीची भाजी + गाजराचे काही तुकडे शेवयांचा उपमा + केशर विलायची घातलेले दूध मेथीचे ठेपले + दुधी भोपळ्याचा हलवा
दिवस ५ वा शेवयांचा उपमा+ आंबा किंवा केळ्याचा मिल्कशेक काकडीच्या फोडी दह्यात बुडवून संपूर्ण धान्य रोटी +डाळ + आवडीची भाजी + काकडीच्या काही फोडी मधाबरोबर किंवा चाट मसाल्याबरोबर पनीरचे तुकडे पराठा + पनीर भुर्जी
दिवस ६ वा १ टी स्पून बदामाची पावडर घालून नाचणी सत्व उकडलेले गाजर आणि रताळे चाट पोळी+ डाळ + आवडीची भाजी + बीटरुटचे काही तुकडे

बटाटा दही चाट

पोळी +भाजी +वरण +भात
दिवस ७ वा पीच/ स्ट्रॉबेरी किंवा किसलेले सफरचंद घालून केलेले दूध पोहे पेअरच्या फोडी संपूर्णधान्य रोटी +डाळ +आवडीची भाजी +काकडीच्या काही फोडी मँगो मिल्कशेक भाज्या मसूर डाळ घालून केलेला पुलाव

१४ महिन्यांच्या बाळासाठी आहाराचा तक्ता ४था आठवडा

आहार नाश्ता

सकाळी

दुपारी

संध्याकाळी

रात्री

दिवस १ला ब्रोकोली घालून केलेला मऊ उपमा + वेलची केशर दूध पेरूच्या फोडी संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीच्या काही फोडी

मेथीचे ठेपले + दुधी भोपळ्याचा कोफ्ता

फ्रेंच बीन्स आणि मटार घालून केलेला दलिया दह्यासोबत
दिवस २ रा केळी व्हॅनिला मिल्कशेक उकडलेले छोले चाट पोळी + डाळ + आवडीची भाजी + गाजराचे काही तुकडे बेसनपालक ढोकळा बेसनज्वारीकोथिंबीरीचे धिरडे दह्यासोबत
दिवस ३ रा अंड्याचा पराठा किंवा पनीर पराठा हिरव्या चटणीसोबत पोहे पुडिंग संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही तुकडे ताकातली भगर राजमाभात टोमॅटो सूप सोबत
दिवस ४ था नाचणीचा डोसा + चॉकलेट मिल्क पेअर / सफरचंदाच्या फोडी पोळी + डाळ+ आवडीची भाजी + गाजराचे तुकडे पोहे + दूध

पराठा आणि वाटाणा बटाट्याची भाजी

दिवस ५ वा

बेदाणे, बदाम घालून शेवयांची खीर

आंबा/केळ्याच्या फोडी

संपूर्णधान्य रोटी +डाळ +आवडीची भाजी + काकडीच्या फोडी

गव्हाची बिस्किटे दहीपालक सोबत १ छोटा कप छोले + २ छोट्या पुऱ्या + १ छोटा ग्लास लस्सी
दिवस ६ वा दूध आणि खजूर घालून राजगिरा लाडू मोड आलेल्या मुगाची भेळ पोळी + डाळ +तुमच्या आवडीची भाजी +बीटरुटचे काप योगर्ट

मुगडाळ खिचडी

दिवस ७ वा ब्रेड ऑम्लेट किंवा पनीर सँडविच लस्सी संपूर्णाधान्य रोटी +डाळ + तुमच्या आवडीची भाजी + काकडीचे काप

मुरमुरे शेव

व्हेजिटेबल सँडविच आणि डाळ सूप

१४ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांच्या पाककृती

इथे काही चांगल्या पाककृती दिल्या आहेत त्या तुम्ही दिवसभरात वेगवेगळ्या जेवणाच्या वेळांसाठी वापरू शकता.

. झटपट रवा इडली

हा एक पोषक आहार असून, ही पाककृती संध्याकाळी लवकर करता येण्याजोगा नाश्ता आहे. वेगवेगळ्या प्रकारे ही रवा इडली करता येते आणि त्यामुळे ती चविष्ट होते.

झटपट रवा इडली

घटक

 • तूप
 • गरम मसाला
 • काळे मिरी
 • मीठ
 • ढोबळी मिरची
 • गाजर
 • कांदा
 • दही
 • रवा

कृती

 1. मीठ आणि दह्याव्यतिरिक सगळे घटक एका भांड्यात व्यवस्थित मिक्स करा
 2. इडलीच्या भांड्याला तूप लावा आणि त्यामध्ये इडलीचे पीठ घाला आणि वरती थोडी जागा ठेवा
 3. वरून भाज्या घालून १०१५ मिनिटे इडलीच्या भांड्यात उकडायला ठेवा

. भाज्या घालून केला पास्ता

जर तुमचे बाळ तेच तेच खाऊन कंटाळले असेल तर बाळाला भाज्या घालून केलेला पास्ता देऊन सरप्राईस द्या आणि तो पटापट संपवताना त्याला पहा.

भाज्या घालून केला पास्ता

घटक

 • ऑलिव्ह ऑइल
 • काळे मिरे
 • वनौषधींचे मिश्रण
 • मेयॉनीज
 • केचप
 • पास्ता
 • मीठ
 • फ्रेंच बीन्स
 • भोपळी मिरची
 • गाजर
 • टोमॅटो कांदा

कृती

 1. एक भांडे घेऊन त्यात पाणी घाला, त्यामध्ये मीठ आणि तेल घालून उकळायला ठेवा
 2. पाणी उकळल्यावर त्यामध्ये पास्ता घाला आणि मंद आचेवर शिजवत ठेवा
 3. नंतर पाणी काढून टाका आणि थंड पाण्याने धुवा
 4. मोठ्या भांड्यात ऑलिव्ह ऑइल टाका आणि त्यात कांदा घालून चांगले परतून घ्या
 5. नंतर त्यामध्ये टोमॅटो, बीन्स, भोपळी मिरची घालून एकत्र चांगले शिजू द्या. नंतर गाजर घाला आणि ते सुद्धा मऊ होऊ द्या
 6. शेवटी वनौषधींचे मिश्रण, केचप आणि मायोनीस आणि वरती सगळे मसाले घाला. हे सगळे मिश्रण काही मिनिटांसाठी शिजवा
 7. त्यामध्ये शिजवलेला पास्ता घाला आणि वाढा

. गाजर भात

साधा भात बाळासाठी खूप सपक होऊ शकतो म्हणून चव वाढवण्यासाठी खाली काही पोषक पर्याय तुम्ही निवडू शकता

गाजर भात

घटक

 • पाणी
 • तूप
 • काजू
 • बदाम
 • दालचिनी
 • साखर
 • तांदूळ
 • गाजर

कृती

 1. बदाम आणि काजू तुपामध्ये चांगले परतून घ्या आणि बाजूला ठेवा.
 2. त्यांच भांड्यात गाजर शिजवून घ्या आणि पाणी घालून उकळून घ्या .
 3. उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदूळ घालून झाकण ठेवा आणि चांगले शिजू द्या. थोडी साखर वरून घाला .
 4. चांगले हलवा आणि वरून सुकामेवा घाला.

.शेवयांचा पुलाव

मुलांना शेवया आवडत असो किंवा नको परंतु शेवयांचा पुलाव केल्यास नक्कीच त्यांच्या तोंडाला पाणी सुटेल

शेवयांचा पुलावघटक

 • मोहरी
 • काळे मिरे
 • हळद
 • मीठ
 • फ्रेंच बीन्स
 • भोपळी मिरची
 • गाजर
 • आले
 • टोमॅटो
 • कांदा
 • शेवया

कृती

 1. एक खोलगट भांडे घ्या त्यामध्ये पाणी, मीठ आणि तूप घाला आणि ते उकळू द्या
 2. त्यामध्ये शेवया घालून ते शिजू द्या
 3. दुसऱ्या भांड्यात तूप घालून मोहरीची फोडणी द्या आणि त्यानंतर कांदा आणि टोमॅटो घाला आणि नंतर भाज्या घालून थोडा वेळ शिजू द्या
 4. शेवटी मसाले आणि मीठ घालून त्या मिश्रणात शेवया घाला

. ओट्स पॅनकेक

तुमच्या सुट्टीचा दिवस हे पॅनकेक करून नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणात करून मजेदार बनवा

ओट्स पॅनकेक

घटक

 • तूप
 • पाणी
 • काळे मिरे
 • धने पूड
 • मीठ
 • हळद
 • कांदा
 • बेसन
 • ओट्स

कृती

 1. गाजर, कांदे, मसाले, बेसन आणि ओट्स भांड्यात घेऊन मिक्स करा आणि त्याचे बॅटर करा
 2. पॅन वर तूप लावा आणि बॅटरचे गोलाकार पॅनकेक घाला
 3. दोन्ही बाजूनी चांगले तांबूस होईपर्यंत शिजवा आणि केचप, मध आणि जॅम सोबत खायला द्या

भरवण्याच्या काही टिप्स

इथे काही टिप्स दिल्या आहेत ज्या तुम्ही बाळाला भरवण्याच्या आधी लक्षात घेतल्या पाहिजेत

 • जर तुम्हाला शक्य असेल तर स्तनपान सुरूच ठेवा
 • तुम्ही बाळाला फळांचे किंवा इतर अन्नपदार्थांचे छोटे तुकडे देत आहात ना ह्याची खात्री करा
 • बाळाला छोटे घास घेऊन नीट चावण्यास सांगा
 • जेव्हा बाळ बसलेले असेल तेव्हाच बाळाला खाऊ द्या
 • झोपताना बाळाला फळांचा रस किंवा दूध देऊ नका
 • बाळाला कपाने कसे दूध प्यावे हे शिकवा

तुमच्या १४ महिन्यांच्या बाळासाठी ह्या पाककृती करून पहा आणि बाळ कुठलाही त्रास न देता ते खाईल. तुम्ही बाळाच्या गरजेनुसार किंवा त्याच्या प्राधान्यक्रमानुसार बाळाच्या जेवणात बदल करू शकता.

अस्वीकरण:

 1. प्रत्येक मूल भिन्न आहे आणि म्हणून आपल्या विवेकबुद्धीनुसार या जेवणाच्या योजनांचा विश्वासार्ह मार्गदर्शक म्हणून वापर करा. आपण आपल्या मुलाच्या आवडी / आवडीनुसार जेवणात बदल करू शकता
 2. बाळाला जबरदस्तीने भरवू नका
 3. फॉर्मुला तयार करताना बॉक्स वरील सूचना नीट पाळा आणि त्याबरोबर दिलेला मापाचा चमचा वापरा बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना सुरुवातीला तुम्हाला सूप तयार करावे लागतील. जसजसे बाळ मोठे होते तसे बाळाची काळजी घेणारी व्यक्ती किंवा आईला बाळाला गिळता येईल इतपत हळूहळू त्या द्रवपदार्थांचा घट्टपणा वाढवावा लागेल. खूप घट्ट पदार्थांमुळे बाळाचे पोट बिघडू शकते/ किंवा जड होऊ शकते किंवा खूप पातळ पदार्थांमुळे बाळाची भूक भागणार नाही
 4. काही मुले कधी कधी कमी खातात आणि ते नॉर्मल आहे. परंतु जर बाळ सलग ३४ दिवस कमी खात असेल तर कृपया तुमच्या डॉक्टरांशी मार्गदर्शनासाठी संपर्क साधा
 5. दात येताना किंवा बाळाला बरे वाटत नसल्यास बाळ कमी खाऊ शकते. ह्या दिवसांमध्ये तुम्ही बाळाला स्तनपान किंवा फॉर्मुला दूध देऊ शकता. बाळ बरे झाल्यानंतर पुन्हा बाळाला अन्नपदार्थ देऊ शकता.
 6. जर बाळाला जुलाब होत असतील तर भरवणे थांबवू नका
 7. जर बाळ सुरुवातीला पदार्थ खात नसेल तर दालचिनी, जिरे पावडर, लिंबाचा रस, कढीपत्ता अश्या नैसर्गिक गोष्टी वापरून तुम्ही अन्नपदार्थांची चव वाढवू शकता
 8. जर बाळाला सुकामेवा, ग्लूटेन किंवा अंड्यांची ऍलर्जी असेल तर बाळाला कुठलाही पदार्थ भरवण्याआधी डॉक्टरांशी संपर्क साधा, कारण त्यामध्ये बाळाला ऍलर्जी होईल असे घटक असू शकतात
RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article