Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २२ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २२ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २२ वा आठवडा

२२ आठवड्यांच्या जुळ्या बाळांसह गरोदर राहिल्यानंतर तुमच्या जबाबदारीत वाढ होईल असे तुम्हाला वाटेल. संपूर्ण गरोदरपणाच्या कालावधीला सुवर्णकाळ बनवणारा तुमचा हा आनंदी काळ अजूनही सुरु आहे आणि तुम्ही त्याबद्दल निश्चित खात्री बाळगू शकता. तुमच्या बाळांच्या हालचाली जाणवत असताना कोणत्या बाळाने केव्हा पाय मारण्याचा प्रयत्न केला हे जाणून घेताना आणि बाळासोबत इतर बर्‍याच क्रियाकलापांनी तुम्ही तुमचा मूड चांगला ठेवू शकता. असे केल्यास तुमच्या बाळासोबत तुमचा चांगला बंध निर्माण होऊ शकतो. तुमच्या बाळाची वेगाने वाढ होत आहे आणि त्यांचे वजन पेलून हालचाल करणे तुम्हाला अवघड जाऊ शकते. जास्तीत जास्त वेळ आरामात घालविण्यासाठी हा चांगला काळ असू शकतो.

२२ व्या आठवड्यात बाळांची वाढ

तुमच्या बाळांचे वजन गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत वाढतच राहते आणि जेव्हा आईला योग्य पोषण दिले जाते तेव्हा स्वतःहून घडणाऱ्या शारीरिक कार्यांपैकी हे एक कार्य आहे.

बाळांमध्ये, मागील आठवड्यात जगण्यावर आणि उर्जा मिळविण्याच्या मुख्य भागावर अधिक लक्ष केंद्रित केले गेले होते, तर ह्या आठवड्यामध्ये आजूबाजूचे वातावरण जाणण्याकडे लक्ष वळविणे सुरू होते. इंद्रियांच्या विकासास उत्तेजन मिळते, कारण डोळ्यांमुळे त्यांची शक्ती वाढू लागते आणि वेगवेगळ्या ध्वनी ओळखण्याची क्षमता देखील वाढू लागते. बाह्य जगाशी तुलना केल्यास गर्भाशयाला असलेले सर्व आच्छादन व संरक्षणामुळे गर्भाशयात शांत वाटते. तथापि, तुमच्या बाळांना शरीरातील वेगवेगळे आवज ऐकू येतात. हृदयाच्या ठोक्यांपासून रक्ताचे वाहणे, तुमचा आवाज आणि तुमच्या गुणगुणण्याचा आवाज तसेच काही बाह्य स्रोतांमुळे देखील तुमच्या शरीरात बरेच आवाज ऐकू येतात. जर आपण यापूर्वी आपल्या मुलांशी बोलत असाल तर नक्कीच ह्या आठवड्यात त्यांना तुमच्या आवाजाबद्दल आत्मीयता वाटू लागेल.

जेव्हा तुम्ही बाळाजवळ जाता तेव्हा बाळ तुमचे बोट घट्ट पकडून ठेवते आणि तुम्हाला जाऊ देत नाही ह्या क्षणाबद्दल प्रत्येक पालक बोलत असतात. तुम्हाला त्या क्षणाचा आनंद एका पेक्षा जास्त बाळांकडून घेता येणार आहे आणि त्या क्षणाचा पाया या आठवड्यापासून सुरू होईल. मेंदू, स्नायूंची शक्ती आणि त्याची क्षमता तपासून घेण्यास सुरुवात करतो, त्यामुळे बाळाच्या हातात काहीही ठेवल्यावर बाळाची मूठ बंद होऊ शकते. बाळ अगदी नाळेला किंवा गर्भाशयाच्या पृष्ठभागाला सुद्धा पकडू शकते आणि हे सर्व नैसर्गिक आहे.

बरीचशी बाळे अजूनही अशक्त दिसतात, कारण त्यांची त्वचा पातळ आणि अगदी अर्धपारदर्शक आहे. परंतु येत्या काही महिन्यांत, त्यांच्या शरीरावर चरबीचे प्रमाण वाढू लागते आणि त्वचा योग्य प्रकारे पसरते आणि त्यामुळे तुमच्या बाळाला गोंडस रूप येते.

बाळांचे आकार केवढा असतो?

२२ व्या आठवड्यात बाळांचा आकार नारळाएवढा होतो. ह्या आठवड्यात बऱ्याचशा बाळांची लांबी ९११ इंच होते आणि त्यांचे वजन ४०० ग्रॅम पर्यंत पोहोचते. जुळी किंवा एकाधिक बाळे तुलनेने छोटी असतात परंतु डॉक्टरांच्या मतानुसार जोपर्यंत कुठली समस्या येत नाही तोपर्यंत काळजी करण्याचे काहीही कारण नसते.

बाळांचे आकार केवढा असतो?

सामान्य शारीरिक बदल

तुमच्या पोटात जुळी किंवा एकाधिक बाळे अगदी अद्भुतरित्या विकसित होत जातात. तेव्हा होणारे काही शारीरिक बदल खालीलप्रमाणे

आपण मोठे झाल्यानंतर आपली नाभी काही वेगळी दिसेल याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल कारण ती बालपणातच अंतिम रूप धारण करते. तथापि, गर्भधारणेनंतर तुमचे गर्भाशय पोटाच्या खालच्या भागात सरकू लागते तसेच बाळांच्या विकासासाठी ते जागा करू लागते त्यामुळे पोटावर दाब पडून त्याचा आकार बदलू लागतो. तुम्ही इंटरनेट किंवा सोशल ग्रुपवर ह्याविषयी बघितले असेल किंवा ऐकले असेल की गरोदरपणात तुमची नाभी बाहेर येते. हे ऐकून तुम्हाला थोडे विचित्र वाटू शकते परंतु नंतर ते ठीक होते. तुमच्या पोटात होणाऱ्या बदलामुळे तुमची नाभी बाहेर येते. जर तुम्हाला हे बघून चिंता वाटत असेल तर तुम्ही काळजी करण्याचे अजिबात कारण नाही प्रसूतीनंतर ते सामान्य होईल.

  • संप्रेरकांची पातळी वर खाली होत असल्याने गर्भवती स्त्रियांना खूप त्रास होतो. कधी कधी त्याचा चांगला परिणाम सुद्धा होतो. जसे की गरोदरपणात त्वचेला चमक येते. कारण गरोदरपणात त्वचेतून नैसर्गिक तेले स्रवतात आणि त्यामुळे त्वचा आधीपेक्षा जास्त गुळगुळीत होते. तसेच केसांच्या वाढीला सुद्धा उत्तेजन मिळते. ज्या स्त्रियांना लांबसडक आणि दाट केसांची आवड असते त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे एक पर्वणी असते कारण घनदाट केस त्यांच्या डोक्यावर असतात. फक्त डोक्यावरील नाही तर शरीराच्या इतर भागावरील केस सुद्धा वाढू लागतात. काही ठिकाणी केसांची वाढ झाल्यामुळे तुम्हाला अस्वस्थता वाटू शकेल. अशा वेळी तुम्ही ते प्रसूती होईपर्यंत तसेच ठेवू शकता किंवा गरोदरपणात सुरक्षित असणाऱ्या तंत्रांचा वापर करून ते केस काढून टाकू शकता.
  • आनंदी काळात तुमचा मूड चांगला असतो आणि तो वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होतो तुम्हाला तुमच्या पतीसोबत लैंगिंक संबंध ठेवावेसे वाटतात. हा हॉर्मोन्सचा परिणाम असू शकतो किंवा तुमची स्वतःची तशी इच्छा असू शकते. दुसऱ्या तिमाहीमध्ये लैंगिक संबंध ठेवण्याची पातळी जास्त असू शकते परंतु २२ व्या आठवड्यात ती सर्वोच्च असू शकते आणि ती संपूर्ण प्रक्रिया तुमच्यासाठी आनंददायी असू शकते. ह्या काळात लैंगिक संबंध ठेवणे संपूर्णतः सुरक्षित आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या स्थिती घ्याव्या लागतील.

सामान्य शारीरिक बदल

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या २२ व्या आठवड्यातील लक्षणे

या काळात तुम्हाला आढळणारी बहुतेक लक्षणे ह्या सर्व काळात तुम्ही अनुभवत असलेल्या गोष्टींपेक्षा भिन्न नाहीत. काही कदाचित तीव्र असतील तर काही आधीपेक्षा सौम्य असतील.

  • नाभी बाहेर येते आणि तुमचे गरोदरपण अधिक स्पष्ट होऊ लागते. तुमच्या गोलाकार पोटाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जाऊ शकते. त्यामुळे स्ट्रेच मार्क्स पोटावर दिसू लागतात आणि काही स्त्रियांमध्ये ते स्पष्ट दिसू लागतात. जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदर असलेल्या स्त्रियांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते कारण नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात त्वचा ताणली जाते त्यामुळे तुमच्या शरीरावर खूप स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात. तुमच्या पोटात जुळी किंवा एकाधिक बाळे असल्याचा तुम्ही गर्व बाळगू शकता किंवा तुम्ही स्ट्रेच मार्क्स साठी क्रीम्स वापरू शकता जेणेकरून ते तेवढे स्पष्ट दिसणार नाहीत.
  • योनीमार्गातून येणाऱ्या स्त्रावाचा लाइनरचा वापर करुनही डिस्चार्ज जास्त होत असला की तुम्ही अंतर्वस्त्रे बदलून थकून जात असाल. परंतु दुर्दैवाने स्रावावर नियंत्रण ठेवण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही आणि त्यामध्ये हस्तक्षेप न करणे चांगले. कोणत्याही परिस्थितीत तुमच्या जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी त्याचा अढथळा होऊ नये. परंतु सतत रक्तस्त्राव होत असल्यास तुम्ही ते डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे.
  • नाभी बाहेर येणे हा वाढलेल्या गर्भाशयाचा परिणाम आहे. रक्ताभिसरण वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि त्यामुळे हातापायांवर सूज येते. ही प्रक्रिया सहसा हळूहळू होते आणि काही वेळात नाहीशी होते. तसेच अशीही उदाहरणे आहेत जेव्हा थोडी चक्कर येऊ शकते किंवा दीर्घ श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि थकल्यासारखे वाटू शकते. ही सगळी लक्षणे फुप्फुसांवर आणि डायफ्रॅमवर दाब आल्यामुळे दिसू शकतात. तुम्ही तुमचे संतुलन राखू शकता तोपर्यंत हे ठीक आहे.

जुळ्या बाळांसह गरोदरपण २२ वा आठवडा पोटाचा आकार

गरोदरपणात २२ आठवड्यांच्या जुळ्या बाळांच्या विकासामुळे तुमचे पोट ह्या टप्प्यावर नेहमीपेक्षा खूप मोठे होईल. ह्या कालावधीत तुम्हाला अस्वस्थता जाणवू शकते तसेच पाठदुखी सुद्धा वाढून सामान्यपणे चालणे कठीण होईल.

जुळ्या बाळांसह गरोदरपण २२ वा आठवडा अल्ट्रासाऊंड

गरोदरपणाच्या मध्यावर असतानां आता ह्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड केला जाईल. अल्ट्रासाऊंड दरम्यान काही मातांना बाळे पोटात फिरताना आनंद होईल तर काहींना बाळे शांतपणे झोपलेली दिसतील. परंतु काळजी करू नका कारण तुमची बाळे जास्त झोपायला लागतात आणि तुम्हाला त्यांच्या हृदयाचे ठोके जास्त मजबूत ऐकू येतील.

काय खावे?

जास्त प्रमाणात सेल्युलोज, कॅल्शियम तसेच भिन्न दुग्धजन्य पदार्थ असतात अशा खाद्यपदार्थावर लक्ष द्या. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी शक्य तितके जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ आणि फळांचा समावेश असावा. व्हिटॅमिन कॉम्प्लेक्स कॅप्सूलसह लोह पूरक आहार आपल्या आहारास समर्थन देण्याचा एक चांगला मार्ग आहे.

काय खावे?

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

गरोदरपणाच्या २२व्या आठवड्यात स्वत: ची काळजी घेण्यासाठी तुम्हाला काही विशेष करावे लागत नाही

हे करा

  • हलका व्यायामामध्ये व्यस्त रहा ज्यामुळे तुमची पाठ बळकट होईल आणि आपली उर्जा पातळी उच्च ठेवण्यास मदत होईल.
  • आपली नखे नियमितपणे कापून हात स्वच्छ ठेवा.

काय टाळावे?

  • मसालेदार खाद्यपदार्थांपासून दूर रहा कारण ते आपल्या बाळावर थेट परिणाम करतात.
  • गर्भाशयाच्या जवळ असलेल्या भागात हीटिंग पॅड वापरणे टाळा.

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे

बाळाचा विकास आणि वाढ होत असताना, खालील गोष्टींची खरेदी करा.

  • बेबी वाईप्स तसेच एक चांगला प्रथमोपचार किट
  • स्तनांची गळती नियंत्रित करण्यासाठी ब्रा पॅड किंवा प्रसूती ब्रा

जेव्हा तुम्ही जुळ्या बाळांसह २२ आठवड्यांच्या गर्भवती असता तेव्हा गर्भाचा विकास विजेच्या वेगाने होत असतो. ही एक पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे हे जाणून घ्या आणि तुम्ही लवकरच योग्य प्रकारे आईसाठी आवश्यक असणारी कौशल्ये विकसित कराल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article