Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ८ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ८ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ८ वा आठवडा

दुहेरी किंवा एकाधिक गर्भधारणेची पुष्टी तुम्हाला मिळते तेव्हा एकाच वेळी  तुम्ही चिंता आणि आनंद ह्या दोन्ही भावना अनुभवता. तुम्ही तुमच्या बाळांचे संगोपन आणि बाळे आरामात कशी राहतील त्याविषयीच्या तयारीचा विचार करण्यास सुरुवात कराल. ही सर्व तयारी आवश्यक आहे, परंतु तुम्ही स्वत: ला ताण देऊ नये, त्याऐवजी एकावेळी एक पाऊल उचला. जेव्हा तुम्ही तुमच्या गरोदरपणाचे दोन महिने म्हणजेच ८ आठवडे पूर्ण कराल तेव्हा तुमच्या लहान जुळ्या किंवा एकाधिक बाळांचा लक्षणीय विकास होईल. गरोदरपणाच्या आठव्या आठवड्यात तुमच्या बाळांची किती वाढ झाली आहे ते जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

८व्या आठवड्यात बाळाची वाढ

गरोदरपणाच्या ८ व्या आठवड्यात गर्भाच्या अवयवांमध्ये सातत्याने वाढ होण्यास सुरवात होते. मज्जातंतूची वाढ, जी या संदर्भात सर्वात महत्वाची आहे. मेंदूमध्ये भरीव प्रगती होते. मेंदूचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मज्जातंतूच्या पेशी एकमेकांपर्यंत पोहोचू लागतात आणि असंख्य शाखा आणि कनेक्शन तयार करतात. हे मुख्यतः बाळांच्या मेंदूला कार्य करण्यास मदत करते आणि अशा मज्जातंतूंच्या मार्गाचे अस्तित्व त्यात योगदान देते.

डोळ्याची निर्मिती दोन आठवड्यांपूर्वी आधीच सुरू आहे, तथापि, ती स्पष्ट नाही. गरोदरपणाच्या आठव्या आठवड्यात, पापण्या अर्धपारदर्शक ऊतकांसारख्या सामग्रीमध्ये तयार होण्यास सुरवात  होते आणि त्या तुमच्या बाळांच्या डोळ्यांना झाकण्यास सुरवात करतात.

हातपायांची वाढ देखील बरीच आहे. जरी अद्याप हात आणि पाय पूर्णपणे विकसित होणे बाकी असले तरी सुद्धा मनगटाच्या भागात लवचिकपणा वाढतो आणि ते हृदयाच्या जवळ स्थित असतात. बाळांची बोटे देखील वाढत आहेत. ८ व्या आठवड्यापर्यंत त्यांचे हात व पाय विकसित होतात आणि तसेच ते वाकण्यास सुरुवात होते. बहुतेक बाळांमध्ये गुडघा विकसित होतो आणि स्कॅनमध्ये डॉक्टरांद्वारे तो ओळखला जाऊ शकतो.

८ आठवड्यांच्या बाळांचे आकार

मागील आठवडे तुमची जुळी किंवा एकाधिक बाळे केवळ बियाणे अथवा वाटाण्याच्या आकाराची होती परंतु आता ८व्या आठवड्यात ते राजम्याइतके मोठे आहेत. बहुतेक वाढ दररोज फक्त एक मिलिमीटरच्या आसपास असते, जी कदाचित जास्त दिसत नाही, परंतु त्यांच्या एकूण आकाराच्या तुलनेत ही वाढ मोठ्या प्रमाणात असते.

गर्भाशयात जसजशी बाळांची वाढ होते तसतसे तुमचे शरीर देखील बदलांतून जाईल. हे बदल काय आहेत हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदर असलेल्या स्त्रियांमध्ये आढळणारे सामान्य शरीर बदल

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदर असणाऱ्या स्त्रियांमध्ये होणारे बहुतेक बदल आंतरिक असतात, तर त्यांची शारीरिक वाढ हळूहळू वेगात पुढे जात आहे. तथापि, स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतील :

 • जर तुम्ही जुळी मुले किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असाल तर, तुमच्या कंबरेकडीलभागाचा विस्तार होऊ शकतो. हे नेहमीच स्पष्ट होऊ शकत नाही, परंतु पूर्वी तुम्हाला आरामात बसणारे कपडे आता तुम्हाला घट्ट होऊ लागतील
 • बाळांच्या वाढीनुसार गर्भाशयाचा आकार वाढू लागतो. बाळाचा आकार संत्र्यापेक्षा मोठा असतो आणि ते ओटीपोटाकडील भागात सरकू लागते त्यामुळे पोटाकडील भागात पेटके येऊ लागतात आणि त्यामुळे स्त्रियांना वेदना होऊ शकते
 • २ महिने पूर्ण झाल्यावर, एक प्रकारे, स्तनांना देखील संदेश जातो की जेव्हा प्रसूती होईल तेव्हा ते बाळांसाठी तयार असावेत. यावेळी, तुमच्या स्तनांना देखील सूज येते आणि स्तनाग्रांभोवतीच्या भागावर लहान पुरळ येतात आणि ते बाळाला स्तनपान करण्यासाठी तयार होऊ लागतात
 • शरीरातील रक्ताची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणूनच विविध हार्मोन्सची पातळी विशेषत: प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते. या वाढीव संप्रेरकांमुळे गर्भारपणाची लक्षणे, विशेषत: मॉर्निंग सिकनेसची तीव्रता वाढू लागते

मॉर्निंग सिकनेस सोबत आता तुमचे शरीर गर्भारपणाची आणखी काही चिन्हे दर्शवेल. खाली आपल्या गरोदरपणाच्या ८ व्या आठवड्यात दिसणारी लक्षणे खाली दिली आहेत.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ८ व्या आठवड्यातील लक्षणे

८व्या आठवड्यात जुळे किंवा तिळे होण्याची चिन्हे फारच स्पष्ट दिसतात आणि जर तुम्ही जुळे किंवा एकाधिक बाळे असल्याचे सेलिब्रेट केले नसल्यास तुम्ही दोन महिने पूर्ण झाल्यावर आनंद साजरा करू शकता. त्या व्यतिरिक्त, इतर बरीच लक्षणे आहेत जी आपल्या प्रवासाच्या या टप्प्यावर स्पष्ट दिसतात.

 • सतत मळमळ हे गर्भारपणातील एक सामान्य लक्षण आहे आणि तुम्ही बहुधा तुमच्या गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीत त्याचा अनुभव घ्याल. परंतु जुळी मुले किंवा एकाधिक बाळांची अपेक्षा करताना, तुम्हाला हे आणखी काही काळ सहन करावे लागेल. तुमचे संप्रेरक उच्च पातळीवर असतील आणि त्याचा परिणाम एकाधिक बाळांमुळे जास्त असेल. जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात मळमळ होत असेल तर तीव्र गंध किंवा स्वाद नसलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने मळमळ नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते
 • वर नमूद केल्याप्रमाणे, सुगंध सहसा आपल्या फायद्यासाठी कार्य करतात, परंतु कधीकधी ते मळमळ होण्याचे कारण देखील असू शकते. हे प्रामुख्याने आपल्या घाणेंद्रियाची संवेदना पातळी वाढल्यामुळे होते. आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात वास येऊ लागतात
 • आपल्याला उर्जा कमी वाटू शकते आणि रक्ताचे वाढलेले प्रमाण, हृद्याद्वारे होणारे रक्ताचे अतिरिक्त पंपिंग, डोकेदुखी आणि बाळाकडून पोषकद्रव्ये जास्त प्रमाणात शोषून घेतली जात असल्यामुळे तुम्हाला थकल्यासारखे वाटेल. जुळे किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती राहिल्याने असे होणे साहजिक आहे
 • जर आपल्या डॉक्टरांनी लैंगिक संभोग सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली असेल तर योनीतून तुम्हाला थोडासा रक्तस्त्राव आढळू शकतो. गर्भाशयाच्या मुखाची संवेदनशीलता वाढल्यामुळे असे होते
 • गरोदरपणाच्या ह्या टप्प्यावर बऱ्याच स्त्रियांनी उल्लेख केलेले आणखी एक विचित्र लक्षण म्हणजे विचित्र स्वप्न पडण्याच्या घटना. काही जणींना खूप आनंद होऊ शकतो तर काहींना घाम फुटून जाग येऊ शकते. हा मुळात आपल्या शरीरात होणार्‍या बदलांचा परिणाम आहे आणि जरी आपणास वाईट स्वप्न पडले असेल तरीसुद्धा त्याबद्दल चिंता करण्याचे किंवा ताणतणाव बाळगण्याचे कोणतेही कारण नाही

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ८ व्या आठवड्यातील लक्षणे

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ८ व्या आठवड्यातील पोटाचा आकार

८ व्या आठवड्यात पोट अजिबात स्पष्ट दिसत नाही. तुम्हाला तुमच्या कंबरेच्या आकारात कोणतेही बदल दिसणार नाहीत आणि तुम्हाला बेबी बंप देखील दिसणार नाही. गरोदरपणाच्या नंतरच्या काळात पोटाचा आकार वाढतो.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड

आत्तापर्यंत,अल्ट्रासाऊण्ड दरम्यान डॉक्टरांनी दाखवलेले काळे ठिपके म्हणजे बाळे असे तुम्हाला विश्वास होता परंतु,  आपल्या गरोदरपणाच्या आठव्या आठवड्यात तुम्ही तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांचे  स्पष्टचित्र पाहू शकाल. या टप्प्यावर अल्ट्रासाऊंड स्कॅन केल्याने तुमच्या बाळाचे अवयव पूर्वीपेक्षा अधिक चांगले तयार झालेले असतील आणि ते स्पष्टपणे दिसू शकतील

गरोदरपणात गर्भवती आईच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि जुळ्या बाळांसह गर्भवती असलेल्या स्त्रीची काळजी अधिक प्रमाणात घेतली पाहिजे. गर्भारपणाच्या मुदत संपेपर्यंत बाळांना सहन करण्यायोग्य कोणता आहार असावा हे तुम्हाला माहित असले पाहिजे. दुहेरी/एकाधिक गरोदरपणात तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही काय खावे हे जाणून घ्या

८ व्या आठवड्यात जुळ्या किंवा एकाधिक गर्भधारणेस समर्थन देण्यासाठी काय खावे?

तुमच्या आहारात गरोदरपणाच्या ८व्या आठवड्यात आणि खरं तर, संपूर्ण गरोदरपणात निरोगी खाद्यपदार्थ असावेत. संतुलित आहार आपल्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांच्या सर्वांगीण विकासास समर्थन देईल. प्रथिने आणि कॅल्शियमचे सेवन हे प्रमाणित असणे आवश्यक आहे कारण मुलांच्या हाडांमध्ये आणि स्नायूंच्या विकासामध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. लोहाबरोबरच इतर जीवनसत्त्वे आणि भरपूर प्रमाणात फॉलिक ऍसिड्स देखील आवश्यक आहेत. पौष्टिक आहार आणि भरपूर पाणी प्यायल्यास बद्धकोष्ठतेची शक्यता कमी होण्यास मदत होते.

या आठवड्यात तुम्हाला आणि तुमच्या बाळास  आवश्यक असलेले सर्व पोषण मिळावे यासाठी आपल्या आहारात खालील गोष्टी समाविष्ट कराः

 • दररोजशिजवलेल्या ताज्या भाज्यांचे ३ भाग मध्यम प्रमाणात, आणि ताज्या फळांचे किमान दोन भाग ह्यांचा समावेश आपल्या आहारात असणे आवश्यक आहे
 • आपल्या प्रोटीनच्या सेवनात अंडी, मांस, तेलकट मासे किंवा डाळींचा समावेश असू शकतो.  कडधान्य दररोज खाल्ले जाऊ शकते, परंतु आपण मांस आणि माशाचे सेवन आठवड्यातून २ ते ३ वेळा इतके मर्यादित करू शकता
 • मध्यम प्रमाणात धान्य, तांदूळ, बटाटे इत्यादी पदार्थ आहारात घालून तुम्ही तुमच्या आहारात कर्बोदकांचा समावेश करू शकता
 • आपल्या शरीराच्या सहन करण्याच्या क्षमतेनुसार दुग्धजन्य पदार्थांची निवड केली जाऊ शकते. आपल्या शरीरास आवश्यक कॅल्शियम मिळण्यासाठी तुम्ही दूध, चीज आणि दही हे पर्याय निवडू शकता

आपला आहार पौष्टिक आणि सेवन करण्यास सुरक्षित आहे याची खात्री करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे घरगुती अन्न. तथापि, तुम्ही फळे, भाज्या आणि मांस पूर्णपणे स्वच्छ धुवा आणि ८व्या आठवड्यात संवेदनशील बनलेल्या तुमच्या पचनसंस्थेस मदत करण्यासाठी ते योग्य प्रकारे शिजवलेले आहेत याची खात्री करुन घ्या.

८ व्या आठवड्यात जुळ्या किंवा एकाधिक गर्भधारणेस समर्थन देण्यासाठी काय खावे?

गरोदरपणात काळजी घेण्याविषयक टिप्स

एकापेक्षा जास्त बाळांसह गरोदर असलेल्या स्त्रियांसाठी गरोदरपणाचा आठवा आठवडा कठीण असतो कारण मुलांना निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांची वाढ निरंतर ठेवण्यासाठी  शरीरातून भरपूर पोषणमूल्ये घेतली जातात. परंतु येथे काही टिप्स आहेत ज्याद्वारे तुमच्या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील.

हे करा

 • विविध पुस्तके आणि विश्वसनीय वेबसाइटवरून गर्भधारणेबद्दल वाचा. आपली जुळी किंवा एकाधिक बाळे कशी वाढत आहेत ह्याविषयी तुम्हाला कल्पना येऊ शकेल
 • संपूर्ण रक्त आणि मूत्र तपासणी करा
 • आपले शरीर कदाचित मॉर्निग सिकनेस आणि मळमळ ह्यांचा सामना करू शकत नाही. परंतु, तुम्ही आहार सोडू नये, कारण आपल्या मुलांच्या वाढीसाठी पोषक तत्त्वे आवश्यक असतात. म्हणून, तुम्हाला जे योग्य वाटेल ते खा आणि तुमच्यासाठी जे योग्य वाटत नाही ते सोडून द्या तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये तुमच्या आहारात ते पदार्थ जोडू शकता
 • तुमच्या आहार घेण्यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असल्यास तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ञाला पूरक पदार्थांबद्दल विचारू शकता

काय टाळावे?

 • आपले वजन कायम ठेवण्याच्या प्रयत्नात कठोर व्यायाम करण्यापासून दूर रहा. निरोगी पदार्थ खाणे आणि हलके व्यायाम करणे आपल्यासाठी सर्वात सुरक्षित उपाय आहे
 • तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय डोकेदुखी किंवा शारीरिक दुखण्यासाठी कोणतेही औषध घेऊ नका
 • आपल्या मानसिक आरोग्यावर ताण येऊ देऊ नका. बाळांना जन्म देण्याने तुमच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर ताण येतो. दररोज शांत आणि सकारात्मक राहण्यासाठी ध्यान करण्याचा सराव करा

तुम्ही तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांच्या आगमनाची तयारी करत असताना, तुमच्यात होणाऱ्या शारीरिक बदलांसाठी सज्ज होण्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी काही खरेदी करणे आवश्यक आहे. तुमच्या गर्भावस्थेच्या ८ व्या आठवड्यात तुम्ही काय खरेदी केले पाहिजे ह्यावर एक नजर टाकूया.

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या आठव्या आठवड्यात तुमचे शरीर ज्या शारीरिक बदलांमधून जाते त्यापैकी एक म्हणजे स्तनांना येणारी सूज. तुमच्या कप साईझ मध्ये अधिक वाढ होईल. म्हणूनच, तुम्ही चांगल्या मॅटर्निटी ब्रा खरेदी करणे आवश्यक आहे ज्या तुमच्या आवश्यकतेपेक्षा आकाराने मोठ्या असतील जेणेकरून त्या आपल्या गरोदरपणाच्या शेवटपर्यंत सहजपणे वापरता येतील.

तुम्हाला तुमचा सध्याचा वॉर्डरोब १ किंवा २ साईझ लहान देखील वाटू शकेल. म्हणूनच, येत्या काही महिन्यांत वापरण्यासाठी काही सोयीस्कर कपडे खरेदी करा. सध्याच्या आकारापेक्षा ते एक किंवा दोन साईझ मोठे असतील ह्याची खात्री करा

आरामदायक पादत्राणे वापरण्यास सुरुवात करा. चांगले शूज तुम्हाला दिवसभर चांगला पावित्रा आणि उर्जा पातळी राखण्यास मदत करतात

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह आठ आठवडे गरोदर असलेल्या स्त्रीसाठी पहिले काही महिने खडतर असू शकतात आणि येणाऱ्या काही महिन्यांविषयी तुम्हाला काळजी वाटू शकते. तथापि, स्वत: वर ताण येऊ देऊ नका, काळाबरोबर सर्व काही ठीक होईल.

मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ७वा आठवडा
पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ९ वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article