हॅलो, न्यू मॉम टू बी! तुमच्या शरीरात होणारे आश्चर्यकारक बदल तुम्ही अनुभवत असाल – तसेच तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या लक्षणांचा सामना तुम्ही करत असाल. अश्यावेळी घरगुती उपचार आणि नैसर्गिक उपाय आपल्या बचावासाठी येतात, बरोबर? आपल्या समस्यांवर नैसर्गिक उपाय शोधण्यासाठी आपण स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींचा वापर करतो आणि ते खूप सामान्य आहे. अशीच एक सामान्य औषधी वनस्पती म्हणजे बडीशेप […]
अकाली प्रसूती झाल्यास नवजात बाळामध्ये हृदय, फुफ्फुसे आणि मेंदूच्या समस्या उद्भवू शकतात. परंतु आजकाल, प्रसूतीस विलंब करणारी काही औषधे उपलब्ध आहेत. बाळाच्या अवयवांची योग्य वाढ होण्यासाठी गर्भवती स्त्रीला ही औषधे दिली जातात. बाळाच्या फुफ्फुसाची चांगली वाढ होण्यासाठी अनेक डॉक्टर गर्भवती स्त्रीला बेटनेसॉल इंजेक्शन देण्याचा विचार करतात. परंतु जेंव्हा ह्या इंजेक्शनचे फायदे जोखमीपेक्षा जास्त असतात तेव्हाच […]
मुलांची वाढ होत असताना त्वचेच्या समस्या होणे सामान्य आहे कारण त्यांची त्वचा अजूनही संवेदनशील असते आणि आजूबाजूच्या जीवाणूंपासून स्वतःचे संरक्षण करते. बहुतेक त्वचेच्या समस्यांमुळे अस्वस्थता येते. कुठल्या भागाच्या त्वचेची समस्या आहे त्यावर हा त्रास अवलंबून असतो. डोक्यातील कोंड्याची समस्या आपल्या मुलाच्या टाळूवर परिणाम करते. मुलांना होणारा हा सर्वात सामान्य आणि व्यापक संसर्ग आहे. कोंडा म्हणजे […]
अभिनंदन! आता तुमचा गरोदरपणाचा तिसरा महिना सुरु आहे. गरोदरपणाचे दोन महिने उलटून गेले आहेत आणि आता तुम्हाला गरोदरपणाची सवय झाली पाहिजे. आता तुमच्या पोटात बाळ असल्याचे तुम्हाला जाणवणार नाही, परंतु हे छोटंसं बाळ लवकरच छोट्या हालचाली करू लागेल (तुम्हाला त्या जाणवत नसल्या तरीही). तुम्ही तुमच्या बाळाविषयी सर्व काही जाणून घेण्यात उत्सुक असाल ह्यात काही शंका […]