Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: २४वा आठवडा

गर्भधारणा: २४वा आठवडा

गर्भधारणा: २४वा आठवडा

गर्भारपणाची दुसरी तिमाही आता संपत आली आहे आणि तुम्ही तिसऱ्या तिमाहीच्या अगदी जवळ आहात. बाळाची वाढ योग्यरितीने होत आहे आणि तुमच्या पोटाचा वाढता घेर हा तुमच्या आणि तुमच्या बाळामध्ये होणाऱ्या बदलांचा एक पुरावा आहे, त्यामुळे हे बदल आपण सविस्तरपणे समजून घेऊयात.

गर्भारपणाच्या २४व्या आठवड्यातील तुमचे बाळ

२४ व्या आठवड्यात तुमच्या  बाळाचे वजन प्रत्येक आठवड्याला ६ औंस इतके वाढत आहे आणि आता बाळाचे वजन १. ३२ पौंड्स इतके आहे, आणि आता बाळाची लांबी पावला इतकी झाली आहे. बाळाचे वजन त्याचे मांस, हाडे आणि चरबी व अवयवांच्या विकासामुळे वाढते. बाळाचा चेहरा खूप छोटा आहे आणि लवकरच डोक्यावरचे केस, भुवया, पापण्या ह्यामुळे बाळाचे रूप सुंदर दिसणार आहे. बाळाच्या केसांचा अजून विशिष्ट रंग विकसित झालेला नाही आणि कारण अजून रंगद्रव्याची निर्मिती अजून झालेली नाही.

तुमच्या बाळाची त्वचा अजून खूप नाजूक आणि पारदर्शक आहे आणि नीट पाहिल्यास तुम्हाला बाळाची हाडे, रक्तवाहिन्या आणि अवयव सुद्धा दिसतील.

बाळाचा आकार केवढा असतो?

तुमच्या बाळाची वाढ कशी होत आहे ह्या बाबत तुम्ही खूप उत्सुक असाल ना? गर्भारपणाच्या २४व्या आठवड्यात बाळाचा आकार डोक्यापासून पायापर्यंत मोजल्यास मक्याच्या कणसाएवढा असतो, म्हणजे अंदाजे ११. ८ इंच इतका असतो. तुमचे बाळ स्वतःच्या नाकपुड्यांद्वारे श्वासोछवासाचा सराव करीत आहे आणि बाहेरच्या जगात जगण्याची तयारी करत आहे. तसेच हवेऐवजी, गर्भजल आत घेत आहे.

सामान्यपणे शरीरात होणारे बदल

गर्भारपणातील २४व्या आठवड्यातील अनेक बदलांमुळे तुम्हाला चिंता वाटणे साहजिक आहे परंतु काळजीचे कारण नाही, ही सुद्धा वेळ निघून जाणार आहे. पोटाभोवतीचा भाग आणि स्तन कोरडे पडल्यामुळे त्यांना खाज सुटेल कारण त्यांच्या भोवतालची त्वचा ताणली जाते. ह्या कालावधीत सराव कळांमुळे (Braxton Hicks Contractions) गर्भाशयाच्या भागात सुद्धा तुम्हाला घट्टपणा जाणवेल.

२४व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

जेव्हा तुम्ही गर्भारपणाच्या २४व्या आठवड्यात पदार्पण कराल तेव्हा तुम्ही खालील लक्षणे तुम्ही अनुभवण्याची शक्यता आहे.

पाठदुखी

 

हे लक्षण आधीपासूनच आढळते पण दिवसागणिक त्यात अजून वाढ होते. बाळाच्या वाढीबरोबर तुमच्या गर्भाशयामध्ये सुद्धा वाढ होते आणि त्यामुळे पाठीच्या मणक्यावर दाब येतो आणि तो ताणला जातो आणि वक्राकार होतो तसेच  हे सुद्धा लक्षात असुद्या की वाढणाऱ्या बाळाचा भार उचलण्यासाठी तुमची पाठ सुद्धा तितकीच कार्यरत असते, आणि त्यामुळे वेदना होतात.

पावलांना सूज येणे

 

गर्भधारणेच्या ह्या कालावधीत हे लक्षण सामान्यपणे बऱ्याच स्त्रियांमध्ये आढळते, आणि शरीरातील जास्तीच्या पाण्यामुळे पावलांना सूज येते. ही सूज सहसा पायाचे घोटे, पावले, तसेच हातावर आढळते तथापि तुम्ही ही सूज शरीराच्या इतर भागांवर जसे की चेहरा, हात आणि बोटे ह्यावर सुद्धा आहे का यावर लक्ष ठेवा. तसेच दोन्हीपैकी एकाच पायावर खूप सूज आणि दुसऱ्यावर नसल्यास ते preeclampsia चे लक्षण असू शकते. preeclampsia म्हणजे गर्भारपणातील गंभीर गुंतागुंत आहे.

पेटके

पायांमध्ये पेटके येणे हे निर्जलीकरणाचे (dehyadration) लक्षण आहे, त्यामुळे दिवसभरात भरपूर पाणी प्या, थोड्या थोड्या वेळाने पाय ताणून ठेवा आणि बाहेर चालायला जा. पोषणमुल्यांच्या कमतरतेमुळे सुद्धा पायांना पेटके येऊ शकतात त्यामुळे हे लक्षण आढळल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांच्या निदर्शनास आणून द्या.

गर्भधारणेच्या २४व्या आठवड्यात पोटाचा आकार

गर्भावस्थेच्या २४व्या आठवड्यात तुम्हाला अनुभव येईल की तुमचे बाळ आधीपेक्षा थोडे जोरात पाय मारत आहे. तसेच तुमच्या पतीला सुद्धा तुमच्या पोटावर हात ठेवल्यास बाळ पोटात हालचाल करीत आहे आणि पाय मारत आहे ह्याचा अनुभव घेता येईल. निरोगी गर्भारपणासाठी तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवले पाहिजे परंतु २४व्या आठवड्यापर्यंत वजनात ६-७ किलो वाढ झाल्यास ते सामान्य आहे आणि काळजी करण्याचे काहीही कारण नाही. जर दोन आठवड्यात अचानक वजन वाढत असेल तर मात्र ते आपल्या डॉक्टरांच्या निदर्शनास आणून द्या.

गर्भधारणेच्या २४व्या आठवड्यातील सोनोग्राफी

ह्या दरम्यान तुमचे डॉक्टर तुम्हाला अल्ट्रासाऊंड करण्याचा सल्ला देतील आणि तुम्हाला दिसेल की बाळाच्या शरीरात चरबीची निर्मिती सुरु झाली असून त्यामुळे बाळाची त्वचा अपारदर्शक झाली आहे त्यामुळे आता बाळाच्या शरीरातील अवयव आणि रक्तवाहिन्या दिसणार नाहीत. त्यासोबतच ओरल ग्लुकोज टॉलरन्स चाचणी किंवा ग्लुकोज स्क्रिनिंग चाचणी करायला सांगितली जाते. ही चाचणी गर्भारपणातील मधुमेह आहे का हे तपासण्यासाठी सांगितली जाते कारण संप्रेरकांच्या वाढत्या पातळीमुळे रक्तातील साखर वाढू शकते.

आहार कसा असावा?

गर्भारपणाच्या २४ व्या आठवड्यात कुठला आहार घ्यावा ह्याविषयी विविध सिद्धांत आणि चुकीचे समज आहेत त्यामुळे तुम्हाला नक्की काय खावे ह्याविषयी तुमचा गोंधळ उडू शकतो त्यामुळे ते स्पष्ट होण्यासाठी वाचा.

  • तुमच्या आहारात भरपूर तंतुमय पदार्थांचा समावेश करा जसे की गव्हाच्या पोळ्या, दलिया, संपूर्णधान्य ब्रेड, ताजी फळे आणि सुकामेवा.
  • भरपूर पाणी पिण्यास विसरू नका कारण ते तंतुमय पदार्थांमध्ये शोषले जाऊन बद्धकोष्ठता होण्याची शक्यता कमी होते.
  • गाजर, मोसंबी, रताळे आणि पालक हे व्हिटॅमिन ए चे बीटा कॅरोटीन च्या स्वरूपात स्रोत आहेत.  ह्या कालावधीत आपल्या आहारात त्यांचा समावेश करणे गरजेचे आहे.

  • हॉटेल मध्ये खाताना खूप गोड, चरबीयुक्त अन्नपदार्थांवर लक्ष ठेवा. सर्वात चांगला मार्ग म्हणजे घरातून थोडे खाऊन निघा त्यामुळे तुम्हाला हॉटेल मध्ये गेल्यावर खूप भूक लागलेली नसेल. तुम्हाला जो पदार्थ आवडतो तो  तुम्हाला खाता येईल. हॉटेल मध्ये जेवायला निघण्याआधी थोडासा सुकामेवा किंवा तुमच्या आवडीचे एखादे फळ खाणे हा पर्याय उत्तम आहे.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

हे करा

  • पायाची सूज कमी करण्यासाठी बसलेले असताना पाय उंचावर ठेवा.
  • दररोज थोडा वेळ चालण्यासारखा हलका व्यायाम करा, त्यामुळे तुमच्या शरीराची ठेवण चांगली राहील आणि पाठदुखी होणार नाही.
  • डोळ्यांना खाज सुटून ते कोरडे पडू नयेत म्हणून तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आय ड्रॉप्स घाला.

हे करू नका

  • तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही स्ट्रेच मार्क क्रीम, केसांचा रंग किंवा मॉइश्चरायझर वापरू नका.
  • तुमच्या पाठीवर खूप जास्त वेळ झोपू नका, त्यामुळे तुमच्या नाळेकडील रक्तप्रवाह मर्यादित राहील.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

गर्भारपणाच्या २४ व्या आठवड्यात पदार्पण केल्यावर अशा खूप गोष्टी आहेत ज्यांच्या खरेदीस तुम्ही सुरुवात करू शकता. गरोदरपणात घालावयाचे कपडे हे तुमच्या खरेदी यादीत असलेच पाहिजेत कारण तुमच्या पोटाचा घेर वाढल्यामुळे तुमचे जुने गाऊन्स आणि पँट्स आता तुम्हाला बसणार नाहीत. रॅप अप ड्रेसेस किंवा सैलसर  टॉप्स तुम्ही घालू शकता ज्यामुळे तुम्हाला आरामदायी वाटेल तसेच ते कपडे स्टायलिश सुद्धा दिसतील. हेड फोन आणि आय पॅचेस सुद्धा आणून ठेवा ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल आणि आराम मिळाल्याने सकाळी उठताना उत्साही  वाटेल. जर तुम्ही बाळाची खोली सजवण्याचा विचार करीत असाल तर त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी गळू हळू जशा जमतील तशा आणून ठेवा आणि बाळाची खोली बाळ येण्याच्या आधी सजवून ठेवा.

निष्कर्ष

प्रत्येक जाणारा दिवस आणि आठवडा हा होणाऱ्या आईसाठी वेगळा असतो आणि २४वा आठवडा सोबत आव्हाने आणि थोड्या काळज्या घेऊन येतो. परंतु  थोडा आत्मविश्वास आणि स्वतःवर विश्वास ठेवल्यास तुम्हाला ह्या थोड्या तात्पुरत्या प्रश्नांना सहज सामोरे जाता येईल.

मागील आठवडा: गर्भधारणा: २३वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: २५वा आठवडा

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article