Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home प्रीस्कूलर (३-५ वर्षे) मोठी मुले (५-८ वर्षे) मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी १५ मजेदार खेळांच्या कल्पना

मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी १५ मजेदार खेळांच्या कल्पना

मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी १५ मजेदार खेळांच्या कल्पना

आपल्या मुलाचा वाढदिवस हा वर्षातला असा एक दिवस आहे की ज्या दिवशी सगळं अगदी छान आणि नीट पार पडलं पाहिजे हो ना? जसे की जेवणाची व्यवस्था, भेटवस्तू, पार्टी मध्ये खेळले जाणारे खेळ इत्यादी.

खेळांचा वाईट क्रम आपल्या सर्व आयोजनावर पाणी फिरवू शकतो. खेळांचे नियोजन जर उत्तम असेल तर अचानक ठरलेली पार्टी सुद्धा यशस्वीरित्या पार पडू शकते.

लहान मुलांचे खेळाच्या माध्यमातून कसे मनोरंजन करावे याबाबत तुम्ही विचारात पडला असाल तर, नेहमी छोट्या छोट्या खेळांनी सुरुवात करा. असे केल्याने मुलांना जास्त मज्जा येईल.
येथे मुलांसाठी वाढदिवसाच्या वेळी खेळण्याजोगे काही मनोरंजक खेळ दिले आहेत, जे लहान मुलांना व्यस्त ठेवू शकतात.

वाढदिवस पार्टी खेळ निवडताना विचारात घ्याव्यात अशा सूचना

लहान मुलांच्या पार्टीसाठी खेळ निवडणे सोपे वाटते. परंतु आपण खेळ निवडण्यापूर्वी, पार्टीला आलेली सगळी मुले खेळात सहभागी होत आहेत ना, ह्याची खात्री करण्यासाठी खालील काही सूचनांचा आपण विचार करू शकता.

१. पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मुलांचे सरासरी वय लक्षात घ्या आणि काही विशिष्ट वयोगटातील नव्हे तर सर्वांना खेळता येतील असे खेळ निवडा.

२. जर एखाद्या खेळात खूप मज्जा येत असेल आणि तो आपण निवडलेल्या विषयाशी सुसंगत नसेल तरीही तो निवडायला घाबरू नका.

३. बौद्धिक खेळ मर्यादित ठेवा आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी भरपूर खेळ ठेवा. मुलांसाठी शाळा आणि घरी दोन्हीकडे पुरेसे बौद्धिक खेळ नेहमीच असतात.

४. मुली आणि मुलांसाठी वेगवेगळे खेळ ठेऊ नका. असे खेळ निवडायचा प्रयत्न करा ज्यामध्ये लिंगभेद नसेल. तसेच प्रत्येक जण खेळात भाग घेऊ शकेल याची खात्री झाल्याशिवाय खेळाची निवड करू नका.

५. चांगली योजना करा आणि तयारी करा. खूप मुलांकडून हे खेळ खेळवून घेणे हे एक आव्हान असू शकते. प्रत्येक खेळादरम्यान कोणताही गोंधळ टाळण्यासाठी आगाऊ योजना करण्याचा प्रयत्न करा.

मुलांच्या वाढदिवसासाठी १५ मजेदार खेळ

१. अंक आणि बक्षीस

हा खेळ दोन ते चार वर्षांच्या मुलांसाठी आदर्श आहे.

खेळ कसा खेळायचा?

चौकोनी तक्त्यावर १ ते ३० मधील संख्या लिहा आणि जमिनीवर एका वर्तुळात चिकटवा. समान संख्या लिहिलेल्या लहान चिठ्ठया बनवा आणि एका टोपलीत ठेऊन एकत्र करा. संगीत सुरु करून मुलांना वर्तुळाभोवती फिरण्यास सांगा आणि त्यांना संगीत बंद झाल्यावर, कोणत्याही नंबरवर जाऊन थांबायला सांगा. आता टोकरीतून एक चिट्टी उचला. ज्या संख्येवर खेळाडू थांबला आहे तीच संख्या चिट्टीत निघाली तर त्या खेळाडूला बक्षीस मिळेल. सर्व मुलांना बक्षिसे मिळेपर्यन्त हा खेळ तुम्ही सुरु ठेऊ शकता.

२. बुडबुडे फोडणे

हा साधा खेळ खूप मजेदार आहे आणि ३ वर्षांच्या मुलांसाठी योग्य आहे आणि हा खेळ खेळण्यासाठी केवळ काही जागा आणि भरपूर बबल रॅप आवश्यक आहे.

खेळ कसा खेळायचा?

खुल्या जागेत जमिनीवर बबल रॅप ची चादर पसरून ठेवा. आता मुलांना बुडबुडा न फोडता चादर ओलांडण्यास सांगा. जो खेळाडू आवाज न करता ती चादर ओलांडेल तो विजयी ठरेल.

३. फोटो स्कॅव्हेंजर हंट

हा खेळ सर्व वयोगटातील मुले खेळू शकतात आणि तो कुठेही खेळला जाऊ शकतो. मुलाच्या वयानुसार खेळाच्या काठिण्य पातळीत बदल करणे आवश्यक आहे. लहान मुलांमध्ये खेळाची सोपी आवृत्ती असू शकते तर मोठ्या मुलांमध्ये खेळाची किंचित जास्त आव्हानात्मक आवृत्ती असू शकते.

खेळ कसा खेळायचा?

यासाठी नकाशाचे चित्र तयार करा. मुलांना कुठे जाण्याची आवश्यकता आहे हे दर्शविण्यासाठी आणि त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी शोधण्यासाठी चित्र सूचना द्या. ह्या प्रत्येक चिन्हावर छोटं बक्षीस आणि चॉकलेट ठेवा. आपण सार्वजनिक ठिकाणी या खेळाचे आयोजन करीत असल्यास, मोठी मंडळी मुलासोबत असायला हवीत.

४. फुगे हवेत उडवून फोडणे

हा खेळ ४ वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी छान आहे आणि या खेळादरम्यान आपली हसून हसून पुरेवाट होते.

खेळ कसा खेळायचा?

कागदाच्या तुकड्यावर काही आव्हाने लिहा आणि फुगे फुगवण्याआधी लिहिलेली आव्हाने वेगवेगळ्या फुग्यांमध्ये घाला. जोपर्यंत संगीत चालू आहे तोपर्यंत मुलांना हवेत फुगे उडवणे आवश्यक आहे. संगीत जेव्हा थांबते, तेव्हा फुग्याला स्पर्श करणारा शेवटचा कोण होता, त्याने आपला फुगा फोडून आणि त्यामधील आव्हान पार करावे.

उदा : नाच करणे

आव्हाने निवडताना सर्जनशील व्हा.

फुगे-हवेत-उडवून-फोडणे

५. कागदी होड्यांची शर्यत

हा मनोरंजक खेळ ५ वर्षापेक्षा लहान मुलांसाठी आदर्श आहे आणि ह्यासाठी केवळ काही कागदी होड्या ( पेपर बोट) आणि पाण्याचे टब आवश्यक आहे.

खेळ कसा खेळायचा?

काही कागदी होड्या बनवा आणि त्या मुलांना देताना सोबत एक पेंढा (straw) द्या. मुलांना होड्यांवर पेंढ्याच्या साहाय्याने हवा उडवून प्लास्टिकच्या टब मध्ये होडी पुढे ढकलण्यास सांगा. पहिला खेळाडू जो टबच्या दुसऱ्या बाजूला होडी पोहोचवण्यास यशस्वी होईल तो खेळ जिंकेल.

६. गाढवाला शेपटी लावणे

हा एक क्लासिक गेम आहे जो भिन्न वयोगटातील मुलांद्वारे खेळला जाऊ शकतो.

खेळ कसा खेळायचा?

शेपटी नसलेल्या गाढवाचा एक फोटो ठेवा. चित्रांपासून काही अंतरावर मुलांना रांगेत उभे राहायला सांगा आणि प्रत्येकाला एक शेपटी द्या. त्यावर त्या मुलाचे नाव घालायला विसरू नका. त्या खेळाडूच्या डोळ्यांना पट्टी बांधा.

आणि जिथे गाढवाचे चित्र लावले आहे ती दिशा त्याला दाखवा आणि हातातील शेपटी त्या चित्रावर लावण्यास सांगा. जो खेळाडू योग्य ठिकाणी शेपटी लावेल त्याला विजेता म्हणून घोषित करा.

७. संगीत खुर्ची

हा असा खेळ आहे जो कधीही जुना झाला नाही आणि आणि सगळ्या छोट्या मुलांना आणि मोठ्यांनाही हा खेळ खेळता येतो.

खेळ कसा खेळायचा?

खुर्चीचे आसन बाहेरच्या बाजूस येईल अशा पद्धतीने खुर्च्या गोलाकार मांडा. खुर्च्यांची संख्या खेळात सहभाग घेतलेल्या एकूण सदस्यांपेक्षा एक ने कमी असावी. आता काही संगीत चालू करा आणि मुलांना वर्तुळाभोवती जाण्यास सांगा. ह्या खेळात जेव्हा संगीत थांबते, तेव्हा प्रत्येक मुलाला बसण्यासाठी खुर्ची शोधून काढावी लागते. ज्या खेळाडूला खुर्ची मिळत नाही तो खेळातून बाहेर पडतो. हा खेळ रोमांचक बनवण्यासाठी खुर्च्यांभोवती फिरताना मुलांना नाच करण्यास सांगा.

संगीत-खुर्ची

८. फुगे फोडणे

हा खेळ पार्टीमध्ये उपस्थित असलेली मुले तसेच प्रौढ खेळू शकतात.

खेळ कसा खेळायचा?

फुगवलेले फुगे दोऱ्याच्या सहाय्याने प्रत्येक खेळाडूच्या पायाच्या घोट्याला बांधा. आता संगीत सुरु करा आणि पार्टीसाठी आलेल्या सगळ्यांना नृत्य करण्यास सांगा. ह्या खेळामध्ये जेव्हा संगीत थांबते तेव्हा त्यांना त्यांच्या पुढे असलेल्या व्यक्तीचा फुगा फुगा फोडण्यास सांगा आणि त्याच वेळी त्यांना स्वतःचा फुगा मात्र त्यांना सुरक्षीत ठेवावा लागतो. ज्या व्यक्तीचा फुगा फुटतो तो खेळातून बाद होतो. ज्या खेळाडूचा फुगा तसाच राहतो तो विजेता ठरतो.

९. वस्तू पुढे पाठवणे

पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ह्या खेळाइतका चांगला खेळ नाही. हा असा एक खेळ आहे जो आपण कधी ना कधी खेळला असेल आणि आनंद घेतला असेल. आपण आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या मेजवानी पार्टीसाठी घरात खेळण्याजोगे खेळ शोधत असल्यास, हा खेळ अगदी योग्य आहे.

खेळ कसा खेळायचा?

मुलांना गोलाकार बसायला सांगा. उशी किंवा मऊ चेंडू ह्यासारखी एखादी वस्तू पुढे पास करण्यासाठी निवडा. ह्या खेळाचे उद्दिष्ट म्हणजे शक्य तितक्या लवकर आपल्या शेजारच्या व्यक्तीकडे ती वस्तू देणे हा आहे. काही संगीत वाजवा आणि जोपर्यंत संगीत चालू आहे तोपर्यंत मुलांना खेळायला सांगा. ज्या व्यक्तीकडे वस्तू असताना संगीत थांबते तो खेळातून बाद होतो. या व्यक्तीस नृत्य किंवा गायन करून ग्रुपचे मनोरंजन करावे लागते.

१०. चमचा लिंबू

लिंबू आणि चमचा ह्या खेळाची ही आवृत्ती खूपच मजेदार होऊ शकते आणि स्पर्धात्मक देखील होऊ शकते.

खेळ कसा खेळायचा?

दोन टेबल काही अंतरावर ठेवा. एका टेबलवर काही गोट्या असलेल्या वाट्या ठेवा व दुसऱ्या टेबल वर रिकाम्या वाट्या ठेवा. मुलांना गोट्या दुसऱ्या टेबल वरील रिकाम्या वाट्यांमध्ये हस्तांतरित करण्यास सांगा. आणि हे करण्यासाठी त्यांना तोंडात चमचा धरून त्या चमचामधील गोटी खाली न पडू देता, दुसऱ्या टेबल पर्यंत चालत जाऊन रिकाम्या वाटीत ठेवण्यास सांगा. जो खेळाडू सर्वात जास्त गोट्या हस्तांतरित करेल तो विजयी घोषित होईल.

चमचा-लिंबू

११. बॉलिंग ऍली

वस्तूंना चेंडूने मारून पाडण्याचा गेम कुणाला आवडणार नाही? घरातील वस्तूंचा वापर करून ह्या खेळाची साधी आवृत्ती खेळली जाऊ शकते किंवा तुम्ही बाजारातूनही हा खेळ विकत आणू शकता.

खेळ कसा खेळायचा ?

बॉलिंग लेन तयार करण्यासाठी टेपचा वापर करा आणि २ फूट रूंद आणि ५ फूट लांबीची लेन तयार करा. आपण आपल्या पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या मुलांच्या वयावर आधारित मापन बदलू शकता. आपण तयार केलेल्या लेनच्या एका बाजूला रिकामे डबे ठेवा आणि दुसऱ्या बाजूला काही चेंडू ठेवा, मुलांना सूचना द्या की चेंडू रिकाम्या डब्यांच्या दिशेने असा फेका की डबे जमिनीवर पडतील. जो मुलगा जास्तीत जास्त डबे पाडेल तो विजेता होईल.

१२. तीन पायांची शर्यत

आपल्याकडे मजेदार खेळ खेळण्यासाठी भरपूर जागा आहे की जी वापरली जाऊ शकते? येथे मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये खेळण्यासाठी एक खेळ आहे, जो पाहुण्यांसाठी मनोरंजक आणि आनंददायक असू शकतो.

खेळ कसा खेळायचा?

या खेळामध्ये मध्ये प्रत्येकी दोन सदस्यांचा एक संघ आहे. या खेळामध्ये एका संघातील दोन मुलांचे पाय बांधतात, जेणेकरून ते एकमेकांशी समक्रमित झाले तरच केवळ पुढे जाऊ शकतात. आता ह्या मुलांना इतर संघांच्या विरूद्ध स्पर्धा करावी लागते. आणि जो संघ शेवटच्या ओळीपर्यंत पोहोचतो त्यास विजेता म्हणून घोषित केले जाते.

१३. अडथळ्यांची शर्यत

हा खेळ विविध वयोगटातील मुलांसाठी छान आहे आणि घरगुती वस्तू वापरून सहजपणे खेळला जाऊ शकतो. ह्या खेळासाठी फक्त पुरेशा जागेची आवश्यकता असते.

खेळ कसा खेळायचा?

ह्या खेळात जमीन नदी आहे अशी कल्पना केली जाते आणि आपल्या घरातील उश्या, चटया, खुर्चा वापरून नदी पार करण्यासाठी वाट करून देऊ शकता. मुलांनी नदीत पाऊल पडत नाहीये ना हे सुनिश्चित केले पाहिजे. जो खेळाडू नदीत पाऊल न ठेवता अडथळे पार करतो, तो हा खेळ जिंकतो. जर मुले मोठी असतील तर आव्हान वाढविण्यासाठी आपण अधिक जटिल अडथळे ठेऊ शकता.

१४. राक्षसा पळून जा

हा खेळ ३ वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी उत्साही असू शकतो आणि प्रत्येक खेळाडूचा खेळाच्या शेवटपर्यंत खेळात सहभाग असतो.

खेळ कसा खेळायचा?

आपल्याला ह्या खेळासाठी मोठ्या जागेची गरज असते. पार्टीसाठी आलेल्या मुलांमधून एका मुलाला खेळातील राक्षस करा आणि बाकीच्यांना मैदानात पळायला सांगा, जर ह्या राक्षसाने कुणाला पकडले तर तेही राक्षस बनतात. ज्या मुलांना पकडले जाते तीच मुलं आता बाकीच्या मुलांना पकडू शकतात. जो पर्यंत सगळी मुलं पकडली जात नाहीत तोपर्यंत हा खेळ सुरु राहतो.

राक्षसा-पळून-जा

१५. सायमन म्हणतो

सायमन म्हणतो की हा एक क्लासिक खेळ आहे जो आपल्याला आपल्या पार्टीमध्ये बरीच रंगत आणू शकेल. हा खेळ सर्व वयोगटातील मुले आणि अगदी प्रौढसुद्धा खेळू शकतात.

खेळ कसा खेळायचा?

सायमन होण्यासाठी प्रौढ किंवा मुलाची निवड करा. मुलांना सांगून ठेवा की “सायमन म्हणतो” असे म्हणून सायमन जी आज्ञा करेल ते कार्य त्यांनी केले पाहिजे. या खेळामध्ये सायमनला जास्त मजा येऊ शकते. कारण संपूर्ण पार्टी मधील लोकांना तो काहीही मजेदार कार्य करण्यास सांगू शकतो. “सायमन म्हणतो” असे न म्हणता तो कृती करण्यास सांगू शकतो, “सायमन म्हणतो” असा आदेश दिला नसताना कृती केली म्हणून अशा मुलांना खेळाच्या बाहेर काढू शकतो. अशा प्रकारे प्रत्येक मुलाला सायमन बनण्याची संधी देऊन आपण खेळाची अधिक मजा घेऊ शकता.

लहान मुलांच्या वाढदिवसाची पार्टी हा एक मजेदार कार्यक्रम असू शकतो, जिथे आपण आपल्या मुलाच्या मित्रांशी संवाद साधू शकता. तसेच इतर मुलांच्या पालकांना भेटून संवाद साधू शकता. तथापि, आपल्या लहान मुलासाठी वाढदिवसाच्या पार्टीची योजना बनवणे ही एक दीर्घ आणि थकवणारी प्रक्रिया असू शकते. ह्यावर उपाय म्हणजे पार्टीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची तयारी करून ठेवावी आणि ह्या मजेदार खेळांचा पार्टीत समावेश करावा, जेणेकरुन मुलांना संपूर्ण पार्टीत व्यस्त आणि उत्साहित ठेवता येईल.

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article