Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे १ आठवड्याचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे १ आठवड्याचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे १ आठवड्याचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

गर्भारपणाचे सगळे महिने पार पडल्यावर, तुमची यशस्वीरीत्या प्रसूती झालेली आहे आणि शेवटी तुमच्या बाळाने ह्या जगात प्रवेश केलेला आहे. आता पालक म्हणून तुमच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या आहेत कारण बाह्य जग आईच्या पोटाइतके सुरक्षित नाही. बाळासाठी आणि तुमच्यासाठी ह्या सगळ्याच भावना नवीन आहेत. एक प्रकारे, हे तुमच्या दोघांचेही एक नवीन जीवन आहे बरंच काही शिकत आणि प्रगती पथावर नेणारं, प्रेमाने भरलेलं हे आयुष्य आहे.

१ आठवड्याच्या बाळाचा विकास

जर तुमची नैसर्गिक प्रसूती झालेली असेल तर आपल्या बाळाच्या डोक्याचा आकार किंचित वाढलेला असेल. कारण जेव्हा तुमचे बाळ जन्म कालव्यातून खाली सरकते तेव्हा त्याचे डोके थोडेसे दाबले जाते. परंतु काळजी करण्याचे कारण नाही आणि काही दिवसातच त्याचे डोके त्याच्या नैसर्गिक आकारात परत येईल.

आकारातील ह्या बदलासोबतच डोक्यावर दोन मऊ भाग असतात, एक शीर्षस्थानी आणि एक मागे. यास फॉन्टॅनेल्स असे म्हणतात. त्यावर संरक्षक आच्छादन असते, तथापि, हा भाग पुढील दोन वर्षात भरून निघतो आणि त्यावर कवटीची वाढ होऊ लागते.

कधीकधी, सुरुवातीच्या आठवड्यात, बाळाच्या त्वचेवर लाल रंगाचे ठिपके किंवा वेगवेगळे फोड असू शकतात. बाहेरील वातावरणाबाबत त्वचा अत्यंत संवेदनशील असल्यामुळे असे होते आणि लवकरच त्वचा पुन्हा सामान्य होते. ह्या काळात हाताचे तळवे किंवा पायाच्या टाचांची सुद्धा त्वचा सोलवटून निघते.

प्रसूती दरम्यान नाळ कापल्यानंतर, डॉक्टर त्याची एक गाठ बांधतात. हा नाळेचा भाग कोरडा होतो आणि सहसा एक किंवा दोन आठवड्यात पडून जातो. त्या कालावधीत, नाळेभोवतालच्या भागाची काळजी घेणे आवश्यक आहे आणि गरज भासल्यास बाळाला आंघोळ करण्यासाठी स्पंज वापरणे चांगले.

जेव्हा काही वेळा त्यांच्या छोट्या बाळाचे जननेंद्रिय सूजलेले दिसते तेव्हा काही पालक खूप चिंता करतात. काळजी करण्याचे काही कारण नाही कारण आईची संप्रेरके काही काळ बाळामध्ये आलेली असतात.

या कालावधीत, लहान बाळे अनियमित श्वास घेतात, श्वास घेत असताना काही लहान श्वासोच्छ्वास, किंवा दीर्घ श्वासोच्छवास घेतात तर काही वेळा कमी मुदतीमध्ये अनियमितपणे श्वास घेतात. आपले बाळ श्वास घेत असताना काही आवाज सुद्धा येऊ शकतात. हे फक्त त्यांच्या नवीन क्रियाकलापाशी संबंधित आहे आणि ते सहसा ४६ आठवड्यात होते.

एक आठवड्याच्या बाळाचे विकासाचे टप्पे

एक आठवड्याच्या बाळाचे विकासाचे टप्पे

बाळाची एक प्रमुख तपासणी म्हणजे एपीजीएआर चाचणी. एपीजीएआर हे नाव ऍपिअरन्स, प्लस,ग्रीमेस ऍक्टिव्हिटी आणि रेस्पिरेशन ह्या शब्दांच्या आद्याक्षराद्वारे बनवले जाते. बाळाच्या प्रसूतीनंतर हे ५ पॅरामीटर्स ताबडतोब तपासले जातात. त्वचेचा रंग,हृदयाच्या ठोक्यांचा वेग सामान्य आहे का, रिफ्लक्स आणि स्नायूंचा टोन चांगला आहे का आणि सामान्य परिस्थितीत श्वास घेता येत आहे का हे सगळे बघून डॉक्टर प्रक्रिया करू शकतात किंवा बाळाला मदत करण्यासाठी वैद्यकीय हस्तक्षेप करू शकतात.

बहुतेक बाळे गर्भाशयात जशी असतात तसेच बाह्य जगात स्वतःला गुंडाळून घेतात. तुमचे बाळ काहीच पाहू शकणार नाही, फक्त काही सेकंदासाठी डोळे उघडून बघेल आणि १५ से. मी. किंवा त्याहून अधिक अंतरावरील काही गोष्टी पाहण्यास सक्षम होणार नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला आपल्या कवेत घेता तेव्हा त्याला तुमची उपस्थिती जाणवते आणि बाळा तुमचा चेहरा बराच काळ पहात राहील.

जवळजवळ १५१९ तासांचा झोपेचा कालावधी सामान्य मानला जातो कारण बाळाची झोप सततच्या भुकेने आणि दूध पाजताना मोडते. जवळजवळ प्रत्येक दोन तासांनी एकदा, तुमचे बाळ दूध पिते, नंतर झोपते आणि शी करते. बाळाचे सुरवातीचे शौच घट्ट आणि हिरव्या रंगाचे असेल. गर्भाशयात असताना बाळाच्या आतड्यात असणाऱ्या पदार्थांमुळे असे मल तयार होते, ज्यास मेकोनियम म्हणतात. बाळ जसजसे स्तनपान घेईल तसे ते पिवळ्या रंगाचे होईल.

तुम्ही तुमचे बोट बाळाच्या हाताच्या तळव्यावर ठेवल्यास बाळ मुठीत ते घट्ट धरेल आणि तुम्हाला दूर जाऊ देणार नाही. जर तुम्ही बाळाच्या गालावर किंवा ओठांना स्पर्श केला तर बाळ त्वरित त्या दिशेने वळेल आणि तोंडाने शोषक हालचाली करण्यास सुरवात करेल. हे सर्व रीफ्लेक्स बाळांमध्ये असतात, ज्याला रूटिंग रिफ्लेक्स म्हणतात, त्यामुळे त्यांना स्तन शोधण्यास आणि स्वतःची देखभाल करण्यासाठी दूध पिण्यास मदत होते.

दूध पाजणे

भूक आणि स्तनपानाची गरज बाळाला लगेच भासते. १ आठवड्यांच्या बाळाचा आहार बाळ स्तनपान घेते कि बाटलीने दूध पिते ह्यावर अवलंबून आहे.

त्या लहान बाळाला भूक लागेल तेव्हा जे काही मिळेल ते चोखण्यास ते सुरुवात करेल. तो तुमच्या स्तनाभोवती नजर ठेवेल, स्तनाग्र शोधून काढेल, यशस्वीरित्या लॅच होईल आणि पोट भरेपर्यंत दूध घेईल. इतर वेळी, हे दिसते तितके सोपे नाही. जर आपल्याला स्तनपान देण्याच्या कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर, आपल्या बाळाचे तोंड स्तनाजवळ आणून स्तनाग्रे चोखणे सुरु केल्याने शरीर दुधाचे उत्पादन करण्यास सुरुवात करेल.

जर तुम्ही फॉर्मुल्याचा पर्याय स्वीकारला तर, डॉक्टरांनी सूचविलेले प्रमाण अचूक असणे आवश्यक आहे आणि पॅकेजवर नमूद केल्याप्रमाणे सूत्र तयार केले पाहिजे. हे ठरविण्यामध्ये बाळाचे वय आणि वजन महत्वाचे असते.

झोप

१ आठवड्याच्या बाळाची झोपेची आवश्यकता खूप जास्त असते. प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया बाळासाठी सुद्धा थकवणारी आहे, त्यानंतर नवीन जगाशी जुळवून घेणे आणि त्यापूर्वी कधीही न अनुभवल्या गेलेल्या संवेदना हाताळणे बाळासाठी सुद्धा अवघड असते

सुरुवातीच्या आठवड्यात, तुमच्या बाळाला पाठीवर झोपू द्या, कारण त्याच्यासाठी ही सर्वात सुरक्षित आणि आरामदायक स्थिती आहे. खोलीचे तापमान योग्य असले पाहिजे आणि खोलीत धुम्रपान किंवा प्रदूषक पदार्थ टाळावे. बाळाची झोप अत्यंत सामर्थ्यवान आहे आणि त्या लहान बाळाला त्यावर मात करता येत नाही. ह्याचा परिणाम म्हणजे स्तनपान घेताना स्तनाग्रे तोंडात असताना बाळाला झोप लागू शकते. स्तनपानादरम्यान दूध ओढण्याची क्रिया देखील त्याच्यासाठी ऊर्जा घेणारी क्रिया आहे आणि त्यामुळे त्वरित त्याला थकवा आणि झोप येऊ शकते.

वागणूक

नंतरच्या आयुष्याच्या तुलनेत ह्या काळात बहुतेक बाळे सहसा शांत असतात. भूक लागली की दुधासाठी किंवा नॅपी ओली झाली तरच बाळ रडते. बाकीच्या वेळेला एकतर बाळ झोपलेले असते किंवा त्यांच्या आजूबाजूच्या जगाशी जुळवून घेत असते. १ आठवड्याचे बाळ रात्रभर झोपणे दुर्मिळ आहे, कारण त्यांच्यापैकी बरेच जण थोडावेळ जागे असतात, त्यांच्या आईकडे पाहत असतात किंवा आवाज ऐकत असतात, दूध पितात आणि डुलकी घेत असतात.

सुरुवातीच्या आठवड्यात अनेक पालक आणि नातेवाईक त्यांच्या निरीक्षणाच्या आधारे बाळाचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्याबद्दलचा अंदाज काढण्यास उत्सुक असतात. ते कदाचित त्याला त्रास देणारा किंवा शांत व्यक्ती समजू शकतात. बर्‍याच बाळांना योग्य प्रकारे आहार दिल्यास, तुमचा बाळाला स्पर्श होईल असे जवळ घेतल्यास आणि पुरेसे झोपू दिल्यास बाळे समाधानी असतात. ते सहजपणे आसपास पहात आणि नवीन आवाज ऐकत राहतील. जर आपल्या मुलाची दिनचर्या बिघडली आणि त्याने त्याला हवे ते मिळाले नाही तर बाळ खूप रडून दमून जाण्याची शक्यता असते.

१ आठवड्याच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

आपल्या नवजात मुलाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स येथे देत आहोत.

. रात्रीचे जागरण

रात्री जागे राहण्याच्या भीतीमुळे तुम्हाला खूप चिंता वाटू शकते. अशीही एक वेळ येईल जेव्हा आपले बाळ रात्रभर झोपेल आणि तुम्हाला सुद्धा रात्रभर झोप मिळेल. तोपर्यंत बाळाला वेळेतील फरक समजण्यासाठी रात्रीच्या वेळी शांतता ठेवा आणि प्रकाश कमी ठेवा.

. बाळ सजलीत असणे आवश्यक आहे

कधीकधी, कदाचित बाळ पोटभर दूध घेत नाही. इतर वेळी, जर बाळ आजारी असेल आणि ताप आलेला असेल, उलट्या झालेल्या असतील किंवा सतत जुलाब होत असतील तर ह्या सर्वांमुळे बाळाचे डिहायड्रेशन होते आणि ते त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकते. हे आपल्या डॉक्टरांच्या लक्षात आणून द्या.

. नाभीजवळील नाळेची काळजी घ्या

होय, तो नाळेचा तुकडा चांगला दिसत नाही. परंतु तो सुकविण्यासाठी आणि स्वतःचे स्वतः पडून जाण्यासाठी त्याला स्वत: चा वेळ आवश्यक आहे. प्रयत्न करुन तुम्ही तो दूर करण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याला हात लावू नका. त्याला दोन आठवडे द्या आणि तो नाळेचा भाग काळ्या रंगाचा होईल आणि नंतर पडून जाईल.

. बाळाला हिरव्या रंगाची शी झाल्यास घाबरू नका

जेव्हा बाळाला हिरव्या रंगाची शी होते तेव्हा प्रथमच पालक झालेल्या मंडळींना नेहमीच धक्का बसतो. गर्भाशयातून बाहेर पडण्याचे हे अंतिम परिणाम आहेत. बाळाची सुरुवातीचे शौच बहुतेक हिरवे, काळे आणि चिकट असते, कालांतराने ते पिवळे होते.

. बाळाच्या पायांचा स्पर्श कॉटला होऊ द्यात

जेव्हा आपले बाळ त्याच्या पाठीवर झोपत असेल तर त्याला अशा स्थितीत झोपवा की त्याच्या पायाचा स्पर्श खाटेला किंवा पाळण्याला होईल. बाळ खाली सरकणार नाही ह्याची काळजी घ्या. ब्लॅंकेट त्याच्या चेहऱ्यावर येणार नाही ह्याची दक्षता घ्या.

. आपल्या बाळाला नीट गुंडाळा

बाळाला लपेटण्यासाठी हलका कपड्याचा वापर केल्याने त्याचे शरीर सुरक्षित राहण्यास मदत होते कारण ते सहसा खूप फिरत असतात आणि चेहऱ्यावर स्वत: ला मारतात आणि झोपण्यासाठी त्रास देतात. बाळाला गुंडाळल्याने त्यांना सुरक्षित वाटण्यास देखील मदत करते आणि ते शांततेत विश्रांती घेऊ शकतात.

. चाचणीसाठी थोडेसे रक्त देण्यास हरकत नाही

काही डॉक्टर बाळाच्या काही रक्त चाचण्या करून घेण्याची शिफारस करतात आणि हळू हळू त्याच्या टाचेतुन रक्ताचे नमुने गोळा करतात. त्यामुळे आपले बाळ रडू शकते आणि फक्त काही थेंब रक्त संकलित केल्यामुळे हे ठीक आहे आणि तसे नुकसान नाही.

चाचण्या आणि लसी

प्रसूतीच्या पहिल्या आठवड्यात तीन मोठ्या लसी दिल्या जातात, त्यापैकी एक मूल जन्मल्यानंतर १२ तासांत दिली जाते. ही लस हेपेटायटीस बीची लस आहे, जी यकृतातील कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी प्रथम दिली जाते.

इतर लसी म्हणजे पोलिओ, आयपीव्ही लस आणि क्षयरोग बीसीजी लस ह्या आहेत. आपल्याकडे किंवा कोणत्याही नातेवाईकास आधीपासूनच टीबी असल्यास किंवा त्यास लक्षणे आढळल्यास डॉक्टर बीसीजी देणे टाळतील.

खेळ आणि क्रियाकलाप

आपल्या बाळाला ह्या कालावधीत अत्यंत उत्सुकता आहे. तुम्ही तुमची बोटं वापरुन आणि आवाज आणि हालचाली करुन त्याला व्यस्त ठेवू शकता. तुमच्याकडे लहान हातमोजे असल्यास, ते कठपुतली म्हणून वापरले जाऊ शकतात आणि भिन्न आवाज आणि हालचालींसह आपल्या बाळाला ते दाखवू शकता. हळू हळू आणि स्थिरपणे, तो हालचाली आणि आवाज ह्यांचा संबंध लावण्यास सुरवात करेल.

आपल्या बाळासाठी आणखी एक उत्सुक गोष्ट म्हणजे आपला चेहरा. म्हणूनच बाळ बऱ्यापैकी वेळा तो बघत आहे ना ह्याची खात्री करा. निरनिराळ्या अभिव्यक्ती करणे जसे की चेहऱ्यावरचे हावभाव दुःखी करून लगेच मजेदार चेहरा केल्याने, एकाच व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे बदलता येतात हे बाळाच्या लक्षात येईल.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

आपल्याला बाळामध्ये खालील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

. बद्धकोष्ठता

जर आपल्या बाळाच्या आतड्यांची पाहिजे त्या प्रमाणात हालचाल होत नसेल किंवा शौचास कोरडे व कडक असेल तर ही बद्धकोष्ठताची चिन्हे असू शकतात.

. उचकी

लहान मुलांमध्ये उचकी खूप सामान्य आहे. परंतु जर बाळाला त्यामुळे अस्वस्थ वाटत असेल, किंवा न संपणारी उचकी लागत असेल तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

. रिफ्लक्स

बाळाने थोडेसे अन्न थुंकणे सामान्य गोष्ट आहे. जर हे जास्त प्रमाणात चालू राहिले तर तो एक रिफ्लक्स आहे असे समजावे.

. त्वचेची साल काढून टाकणे

हे सामान्य आहे आणि प्रत्येक बाळानुसार ते बदलते. जर हे त्वचेचे सोलणे वेगळे दिसत असेल किंवा त्वचेवर त्याचे डाग पडले तर ती पूर्णपणे त्वचेची समस्या असू शकते.

. तिरळे डोळे

बाळ लक्ष केंद्रित करण्यासाठी संघर्ष करतात आणि बाळाचे डोळे तिरळे वाटू शकतात. जर हे अधूनमधून होत नसले आणि तुमच्या बाळासाठी ती समस्या दिसत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

. गडबड

बाळ नवीन जगाशी जुळवून घेत असते. परंतु जर ते दिवसभर नेहमीपेक्षा खूपच गोंधळलेले दिसत असेल तर कदाचित काही अडचण असू शकेल.

. कावीळ

सुरुवातीच्या काळात डोळे आणि त्वचा पिवळ्या रंगाची असू शकते, जर ती तशीच राहिली आणि मजबूत होत गेली तर आपल्या डॉक्टरांना सांगा.

. डोळे फिरवणे

झोपेच्या वेळी, मुले तंद्रीत डोळे फिरवतात. ते जागे असताना असे डोळे फिरवल्यास डॉक्टरांची तपासणी आवश्यक असू शकते.

. डोळ्यातून चिकट स्त्राव येणे

थोडेसे चिकट डोळे बाळासाठी ठीक आहेत कारण अश्रु नलिका अद्याप विकसित झालेल्या नसतात परंतु जर पाणीदार स्त्राव जास्त झाला असेल आणि डोळे सुजलेले दिसले तर संसर्ग झालेला असू शकतो.

तुमचे बाळ तुमच्या कुशीत असणे ही एक अद्भुत भावना आहे जी पूर्णपणे अतुलनीय आहे. स्वत: ला आनंदी आणि सकारात्मक ठेवून आणि आवश्यक खबरदारी घेतल्यास नवजात बाळापासून ते बाळाच्या बालपणापर्यंतचा प्रवास अप्रतिम होईल

पुढील आठवडा: तुमचे २ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article