वैज्ञानिक विकासामुळे बाळाच्या जन्मापूर्वीच बाळामध्ये असलेल्या वैद्यकीय समस्यांचा शोध घेणे शक्य झाले आहे. बाळाला कोणताही आजार किंवा वैद्यकीय समस्या आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी गरोदरपणात अनेक चाचण्या केल्या जातात. बाळामध्ये असलेल्या वैद्यकीय समस्येचे लवकर निदान झाल्यास डॉक्टरांना योग्य ते उपाय करता येतात आणि निरोगी बाळाचा जन्म होऊन जीवघेण्या परिस्थितीपासून बाळ मुक्त होऊ शकते. कोरिओनिक […]
मळमळ आणि उलट्या ही गरोदरपणाची सामान्य लक्षणे आहेत परंतु ही लक्षणे वारंवार अनुभवल्यास ती त्रासदायक ठरू शकतात. साधारणपणे गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात उलट्या होताना दिसून येतात. उलट्यांचा त्रास सुमारे तीन महिने होऊ शकतो. उलट्या होणे हे जरी गरोदरपणाचे सामान्य लक्षण असले तरी सुद्धा वारंवार उलट्या झाल्यास तुम्ही डिहायड्रेट होऊ शकता आणि तुम्हाला थकवा जाणवू शकतो. परंतु […]
गर्भारपण आयुष्यभरासाठी आठवणी देऊन जाते, परंतु त्यासोबतच अनेक शंका, भीती आणि अनिश्चितता सुद्धा असते. विशेषकरून पहिल्यांदा आई होणाऱ्या स्त्रीच्या बाबतीत हे जास्त खरे असते. गर्भवती स्त्रीच्या मनात अजून एक शंका असते आणि ती म्हणजे गर्भधारणेदरम्यान ती तिचे लैंगिक आयुष्य चालू ठेवू शकते का. गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यावर स्त्रीला थकव्यामुळे शारीरिक संबंध नकोसे वाटू शकतील, परंतु गर्भधारणेच्या […]
लहान मुलांची वाढ खूप वेगाने होत असते. तुम्हाला त्यांच्या विकासाचा कुठलाही टप्पा चुकवायचा नसतो. तुमच्या बाळाच्या जन्मापासून, प्रत्येक आठवड्यात त्याच्यामध्ये एक नवीन छोटासा बदल होतो आणि एक नवीन विकासाचा टप्पा आढळून येतो. लहान बाळे जन्मानंतर जेव्हा डोळे उघडतात तेव्हापासून, जवळजवळ प्रत्येक आठवड्यात ते विकासाचे नवीन टप्पे गाठतात. उदाहरणार्थ, लहान बाळे आपल्या हातापायांची हालचाल करू लागतात […]