Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाने तोंडात हात घालण्याची कारणे आणि उपाय

बाळाने तोंडात हात घालण्याची कारणे आणि उपाय

बाळाने तोंडात हात घालण्याची कारणे आणि उपाय

बऱ्याच मुलांमध्ये तोंडात बोटे घालण्याची प्रवृत्ती असते आणि ती दीर्घकाळ टिकून राहते. जर त्यांनी तोंडात घातलेला अंगठा किंवा बोटे आपण दूर खेचली तर ते आपल्याकडे रागाने बघतात आणि जबरदस्तीने पुन्हा बोटे तोंडात ठेवण्याचा प्रयत्न करतात किंवा रडत बसतात.

तुमचे बाळ तोंडात बोटे का घालत आहे?

तुमचे-बाळ-तोंडात-बोटे-का-घालत-आहे

 • बाळाने तोंडात बोटे घालण्याची खूप कारणे आहेत. उदा: विशिष्ट वातावरणात, त्यांच्या सभोवताली असणारे वेगवेगळे लोक, वेगवेगळे आवाज ज्यांच्यामुळे उत्तेजित होऊन बाळ तोंडात बोटे घालते. बोटे तोंडात घातल्याने बाळांना सुरक्षित वाटते. तोंडात बोटे घालताना बाळ आरडा ओरडा करते. किंवा डोके एका बाजूकडून दुसऱ्या बाजूस हलवित रहाते.
 • बाळांनी तोंडात बोटे घालून ती चोखण्याचे एक लोकप्रिय कारण म्हणजे भूक. भुकेले असताना सर्व बाळे रडत नाहीत त्यांना हे समजत नाही की फक्त आईकडून स्तनपानाद्वारे दूध मिळते आणि त्यांना असे वाटत राहते की बोट चोखले तर बोटांमधून पण दूध मिळेल. कधी कधी “मला भूक लागली आहे” असा आईशी संवाद साधण्याचा देखील हा एक मार्ग आहे. वाढीच्या वयात, आहार दिल्यानंतर देखील, स्तनपान करण्याची प्रवृत्ती टिकू शकते आणि मग बोटे चोखून ती बाळे समाधान मानतात.
 • बोटे तोंडात घालणे हा बाळासाठी स्वत: ला व्यस्त ठेवण्याचा शेवटचा उपाय असू शकतो. कदाचित दुपारी जेव्हा घरातील सगळे झोपलेले असतील, तेव्हा बाळ मात्र जागे होऊन गप्पा मारायला तयार असते आणि मग कंटाळा आल्यामुळे बोटे तोंडात घालते. इतर वेळी, आपण काय करत आहात ह्याचे बाळ शांतपणे निरीक्षण करीत असते किंवा पाळण्यावर टांगलेल्या कोणत्याही खेळण्याबरोबर खेळण्याचा प्रयत्न करत असते. आणि हे करताना सहज तोंडात बोटे घातली जातात.
 • जर बाळास कोणतीही अस्वस्थता वाटत असेल, जसे की आई वेगळ्या खोलीत असेल किंवा त्यांना शू झाली असेल तर तेव्हा सर्व बाळे रडत नाहीत. काही बाळे शांतपणे पडून राहतात. आणि तेव्हा आपल्या लक्षात येईल की बाळाचे सगळं लक्ष बोटे चोखण्याकडे लागून राहिलेलं असते.
 • झोपी जाण्याचा प्रयत्न करीत असताना आपल्या बाळाला सुरक्षित वातावरणाची आवश्यकता भासू शकते. काही वेळा, बाळ इतका थकलेला असतो की त्याला झोपेत अडचण येते. बऱ्याच वेळा झोपताना बाळांना तोंडात निपल धरण्याची सवय लागते. आणि मग बाळ स्वतःला झोप लागावी म्हणून तोंडात बोटे घालून ठेवते आणि कुठल्याही आवाजाला आणि हाकेला प्रतिसाद देत नाही.
 • जसजसे तुमचे बाळ मोठे होते, दात येण्याची प्रक्रिया सुरू होते. यामुळे हिरड्यांमध्ये थोड्या वेदना जाणवतात. पहिला दात प्रत्यक्षात हिरडी मधून बाहेर येण्याची प्रक्रिया बाळाला जाणवते. यामुळे हिरड्यांना अस्वस्थता जाणवते आणि खूप लाळ गळू लागते. बाळाला काहीतरी चावण्याची इच्छा होते. त्यामुळे हिरड्यांवर दाब पडून हिरड्यांच्या दुखण्यापासून आराम मिळतो. तोंडात बोट घालणे आणि हिरड्यांवर दाब देणे हा, दात येतानाचे दुखणे हाताळण्याचा सर्वात जलद मार्ग आहे आणि बाळ हा मार्ग चटकन निवडते.

आपण आपल्या मुलांना तोंडात बोटे घालण्यापासून कसे थांबवू शकता ?

 • बाळाने तोंडात घालण्याचे सर्वात स्पष्ट कारण विशेषत: ते वाढीच्या अवस्थेत असेल तर, ते म्हणजे बाळ भुकेलेलं असेल, शक्य असल्यास लगेच त्याला स्तनपान द्या किंवा आपल्या स्तनांना विश्रांतीची आवश्यकता असल्यास बाटलीतल्या फॉर्म्युलाचा वापर करा. बाळाला नेहमीपेक्षा जास्त स्तनपानाची गरज आहे किंवा पूर्वीपेक्षा जास्त फॉर्मुला-आधारित आहाराची आवश्यक आहे हे आपल्याला समजण्यासाठी हे एक चांगले चिन्ह असू शकते. आपण आपल्या वैद्यांशी आपल्या बाळाच्या प्रगतीबद्दल संपर्कात रहा.
 • जर आपल्या बाळाच्या तोंडात त्याची संपूर्ण मूठ असेल, तर आपण बाळाला एक खेळणे देऊन त्याला खेळण्यामध्ये गुंग करून हात काढून टाकण्यास प्रवृत्त करू शकता. बाळाला खेळणे दिले तर ते त्याला धरावेसे वाटेल ज्यामुळे बाळ आपोआप तोंडातील हात काढेल. बाळ खेळण्यायोग्य गोष्टी तोंडात घालू शकेल ह्याची खूप शक्यता आहे.
 • म्हणून मऊ,स्वच्छ आणि चावण्यासारखे काहीतरी बाळाला खेळायला देण्यासाठी निवडा. काही हुशार बाळे एका हाताची बोटे तोंडात घालतात आणि दुसरा हात खेळणे खेळण्यासाठी वापरतात.
 • हा सल्ला अवास्तविक असू शकतो परंतु बाळ तोंडात बोटे घालून शांत पडून राहिले असेल तर आपल्याला मिळालेला हा शांत वेळ आनंदात घालवा कारण हा खूप अल्पकाळ टिकून राहणार आहे. जर तुमचे बाळ स्वत: ला शांत करू शकत असेल तर प्रत्यक्षात विकास प्रक्रियेसाठी ते एक चांगले चिन्ह आहे. कारण तुमचे बाळ हळूहळू स्वतंत्र होत आहे. बाळाची नॅपी ओली नाही ना हे तपासा किंवा बाळाची कोणत्याही प्रकारची गैरसोय होत नाही ना हे ही तपासून पहा.
 • दात येताना बाळाला खूप त्रास होतो. थोडासा आराम मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे थंड केलेली दंत चकती (teething rings ) वापरणे. कमी तापमानामुळे बाळाचा त्रास कमी होतो. जर आपले बाळ थंड तापमानाचा प्रतिकार करत असेल तर त्याच्यावर दबाव आणू नका.
 • बऱ्याच बाळांना त्यांचे पोट भरले असेल तरी बोटे चोखायला आवडतात. अशा परिस्थितीत, बोटे चोखण्याची सवय तोडण्यासाठी, आपण बाळासाठी एक चांगला चोखणी निवडू शकता आणि स्तनपानानंतर त्याला देऊ शकता. अशी शक्यता असू शकते की आपले बाळ शांततेने एका हाताने चोखणी खेळत बसेल आणि दुसऱ्या हाताची बोटे तोंडात घालणे पुढे चालू ठेवेल.
 • लहान मुलांबरोबर व्यस्त रहा. त्यांच्याशी बोला, गाणे गा किंवा त्यांच्या आवडत्या खेळण्याबरोबर खेळा. यामुळे सतत बोटे तोंडात घालण्यापासून ते विचलित होऊ शकतात आणि त्यांच्या विकासात मदतही होऊ शकते.

बाळ तोंडात हात घालण्याची काही कारणे स्पष्ट तर काही पूर्णपणे निराधार असतात. हातांचे चोखणे हे स्वतःचे तळवे चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा मार्ग आहे. अशा गोष्टी कधी झाल्या आहेत याची नोंद ठेवा. त्यास थांबविण्याकरिता नियमितपणे विविध मार्ग निवडत असताना, आपले मुल एकतर वेगवेगळ्या प्रकारे विचलित होण्यास शिकू शकेल किंवा ह्या सवयीला पूर्णपणे सोडून देऊ शकेल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article