Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात होणाऱ्या उलट्यांसाठी १५ सर्वोत्तम घरगुती उपाय

गरोदरपणात होणाऱ्या उलट्यांसाठी १५ सर्वोत्तम घरगुती उपाय

गरोदरपणात होणाऱ्या उलट्यांसाठी १५ सर्वोत्तम घरगुती उपाय

मळमळ आणि उलट्या ही गरोदरपणाची सामान्य लक्षणे आहेत परंतु ही लक्षणे वारंवार अनुभवल्यास ती त्रासदायक ठरू शकतात. साधारणपणे गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात उलट्या होताना दिसून येतात. उलट्यांचा त्रास सुमारे तीन महिने होऊ शकतो. उलट्या होणे हे जरी गरोदरपणाचे सामान्य लक्षण असले तरी सुद्धा वारंवार उलट्या झाल्यास तुम्ही डिहायड्रेट होऊ शकता आणि तुम्हाला थकवा जाणवू शकतो. परंतु त्यावर उपाय आहेत आणि हे उपाय केल्यास तुम्हाला बरे वाटण्यास मदत होऊ शकते.

गरोदरपणात होणाऱ्या उलट्यांवर १५ परिणामकारक घरगुती उपाय

गरोदरपणात होणाऱ्या उलट्यांवर १५ परिणामकारक घरगुती उपाय

संप्रेरकांमध्ये होणारे बदल, मनःस्थिती बदलणे आणि थकवा ह्या सगळ्या गरोदरपणातील लक्षणांमुळे तुमच्या दिनचर्येवर परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला मळमळ आणि वारंवार उलट्या होऊ शकतात. परंतु गरोदरपणातील मॉर्निंग सिकनेस किंवा उलट्या टाळण्यासाठी त्यावर तुम्ही काही उपाय करू शकता.

. पाणी प्या

मॉर्निंग सिकनेस आणि उलट्या तुम्हाला डिहायड्रेट करू शकतात (आणि तुम्हाला थकवा जाणवू शकतो). त्यामुळे स्वतःला सजलीत ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. जर तुम्हाला वारंवार उलट्या होत असतील तर पाणी पिण्यामुळे तुमच्या शरीरातील आवश्यक लवण आणि खनिजे टिकून राहण्यास मदत होईल. स्वतःला सजलीत ठेवण्यासाठी आणि आपली पाचन प्रणाली सुरळीत चालू ठेवण्यासाठी दिवसातून किमान ८१२ ग्लास पाणी प्या. मळमळ आणि उलट्या टाळण्यासाठी तुम्ही बर्फाचे तुकडे देखील चोखू शकता.

. आल्याचा चहा प्या

गरोदरपणातील उलटीसाठी आल्याचे सेवन करणे हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. आल्याचा वास आणि चव ह्यामुळे मळमळ आणि उलट्यांचा समस्येवर मात करण्यास मदत होते. आल्यामुळे पचन सुधारते आणि ऍसिडिटी कमी होते. उलट्या रोखण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आल्याचा समावेश करू शकता. आले पुढे दिलेल्या स्वरूपात तुम्ही आले घेऊ शकता. तुम्ही आल्याचे छोटे तुकडे चघळू शकता, आले किसून एक चमचा मधासोबत घेऊ शकता. आले कँडी किंवा कुकीज खाऊ शकता किंवा आल्याचा चहा पिऊ शकता.

आल्याचा चहा अनेकांसाठी उत्तम काम करतो म्हणून हे आरोग्यदायी पेय बनवण्याची कृती येथे दिलेली आहे!

  • २ कप पाणी उकळा आणि नंतर त्यात १ टीस्पून किसलेले आले घाला
  • थोडा वेळ उकळू द्या, नंतर एका कपात गाळून घ्या
  • त्यात १ चमचा मध घाला, हलवा आणि गरम प्या

. पुदिना वापरून पहा

ह्या औषधी वनस्पतीमुळे पोट शांत होते तसेच उलटीपासूनही आराम मिळू शकतो. पुदिना देखील तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता. तुम्ही फक्त पुदिन्याची पाने चघळू शकता किंवा पेपरमिंट कँडी खाऊ शकता. तुम्ही रुमालवर पेपरमिंट तेलाचे काही थेंब देखील शिंपडू शकता आणि जेव्हा अस्वस्थ वाटेल तेव्हा त्याचा वास घेऊ शकता. आल्याच्या चहा प्रमाणेच तुम्ही पुदिन्याचा चहा देखील पिऊ शकता पुदिन्याचा चहा बनवण्याची कृती येथे आहे. तथापि, हा चहा पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • सॉसपॅनमध्ये २ कप पाणी घ्या आणि ते उकळू द्या
  • वाळलेल्या पुदिन्याची पाने उकळत्या पाण्यात घाला आणि नंतर त्यात एक चमचा मध घाला
  • मळमळ होऊ नये म्ह्णून सकाळी हे मिश्रण प्या

. संत्री खा

संत्र्यामध्ये सायट्रिक ऍसिड असते आणि ते मळमळ दूर करण्यास मदत करते. तसेच, गरोदरपणात बऱ्याच स्त्रियांना संत्रे खावेसे वाटते. उलट्यांची संवेदना दूर करण्यासाठी तुम्ही फक्त संत्र्यांचा वास घेऊ शकता किंवा संत्र्याचा रस घेऊ शकता.

. दालचिनी

भारतात प्रत्येक घरात मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा हा मसाल्याचा पदार्थ आहे. गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस दूर करण्यासाठी तो अत्यंत प्रभावी मानला जातो. तुम्ही एक ग्लास उकळत्या पाण्यात १ इंच दालचिनीची काडी घालून १० मिनिटे उकळवून दालचिनी चहा बनवू शकता. १० मिनिटांनंतर, हा चहा थंड होऊ द्या आणि त्यात एक चमचा मध घाला. उलटी झाल्यासारखे वाटल्यास हा दालचिनीचा चहा प्या. ह्यामुळे तुमचे पचन सुधारेल.

. लिंबू पाणी घेतल्यास फायदा होतो!

लिंबूवर्गीय फळांच्या चवीमुळे ही फळे गरोदरपणात मळमळ होण्यापासून त्वरित आराम देतात. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात खनिजद्रव्ये असतात आणि त्यामुळे तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. फक्त एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. हे लिंबू पाणी रोज सकाळी प्या. तसेच, पटकन बरे वाटण्यासाठी तुम्ही रुमालावर लेमन ऑईलचे काही थेंब शिंपडून त्याचा वास घेऊ शकता.

. ऍपल सायडर व्हिनेगर वापरून पहा

ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असतात तसेच त्यामध्ये भरपूर प्रमाणात इसेन्शिअल ऑईल्स असतात. त्यामुळे पोटातील ऍसिडिटी दूर होते आणि शरीराचा पीएच नियमित ठेवली जाते. त्यामुळे मळमळ आणि उलट्या होण्याची भावना कमी होते. ऍपल सायडर व्हिनेगर गरोदरपणातील तीव्र उलट्यांची समस्या दूर करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगर आणि मध कोमट पाण्यात मिसळून तुम्ही सकाळी त्याचे सेवन करू शकता.

. लवंगा खाल्ल्यास मदत होऊ शकते!

लवंग गर्भवती महिलांमध्ये अतिसार, अपचन आणि मळमळ यापासून आराम देऊ शकते आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लवंग सहज उपलब्ध होऊ शकते. जेव्हा तुम्हाला उलटी झाल्यासारखं वाटेल तेव्हा तुम्ही लवंग चावून खाऊ शकता. तसेच, मॉर्निंग सिकनेस पासून त्वरित आराम मिळवण्यासाठी तुम्ही उकळत्या पाण्यात २३ लवंगा घालून चहा तयार करू शकता.

९. दही खा ते निरोगी आणि चवदार आहे!

उलट्या किंवा मळमळ होत असेल तर दही खाल्ल्यास खूप फायदा होतो. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात आणि हे चांगले जीवाणू पचन सुधारतात. त्यामुळे उलट्या होण्याची भावना कमी होण्यास मदत होते. तुम्ही दिवसातून दोनदा एक वाटी दही खाऊ शकता. साधे दही आवडत नसेल तर चवीसाठी तुम्ही स्ट्रॉबेरी किंवा तुमच्या आवडीचे फळ त्यामध्ये घालू शकता.

१०. किवी खा!

किवी चवदार असते तसेच त्यात खनिजे आणि जीवनसत्त्वे देखील असतात. किवी हा फोलेट, पोटॅशियम, जीवनसत्त्वे सी, के आणि ई यांचे नैसर्गिकरित्या समृद्ध स्त्रोत आहे. त्यात पाण्याचे प्रमाण देखील जास्त आहे त्यामुळे उलट्या झाल्यानंतरही हायड्रेटेड राहण्यास मदत करू शकते. तुम्ही ते फ्रुट सॅलड मध्ये वापरू शकता. किवी आणि एक कप पाणी ह्यांचे मिश्रण ब्लेंडर मधून काढून त्यामध्ये थोडे मध घाला. तुमचे किवी पेय तयार होईल.

११. बदाम

बदामांमध्ये उच्च प्रथिने असतात आणि तसेच बदामांमध्ये शरीरास आवश्यक असे पोषक घटक समृद्ध प्रमाणात असतात. बदाम पचनास मदत करते आणि मॉर्निंग सिकनेस सुद्धा कमी करते. मॉर्निंग सिकनेस टाळण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दिवसा १०१२ भिजवलेले बदाम खाऊ शकता किंवा दिवसा २३ बदाम खाऊ शकता.

१२. अरोमाथेरपी वापरून पहा

अरोमाथेरपी देखील मळमळ कमी करण्यासाठी उपयोगी होऊ शकते. तुम्ही रुमालवर पेपरमिंट आणि लैव्हेंडर इसेन्शिअल ऑईलचे काही थेंब शिंपडू शकता आणि वास घेऊ शकता. लैव्हेंडर तेल हे संवेदना शांत करण्यासाठी ओळखले जाते. तसेच तुम्ही लेमनग्रास आणि ऑरेंज इसेन्शिअल ऑइल देखील वापरू शकता.

१३. बडीशेप खा

बडीशेप खाल्ल्यावर ताजेतवाने वाटते. बडीशेप मॉर्निंग सिकनेस दूर ठेवण्यासाठी उत्तम आहे. जेव्हा तुम्हाला मळमळ होईल तेव्हा तुम्ही बडीशेप खाऊ शकता.

१४. जिरे

उलट्या आणि मळमळ यावर जिरे हा एक प्रभावी उपाय असल्याचे सिद्ध होऊ शकते. उकळत्या पाण्यात थोडे जिरे घाला आणि काही मिनिटे उकळवा. मॉर्निंग सिकनेस आणि मळमळ दूर करण्यासाठी दिवसातून २३ वेळा हे मिश्रण प्या.

१५. एक्यूप्रेशर वापरून पहा

एक्यूप्रेशर हा मॉर्निंग सिकनेसला आळा घालण्याचा एक प्रभावी आणि नैसर्गिक मार्ग आहे. तुम्ही दोन्ही मनगटांवर एक्यूप्रेशर रिस्टबँड घालू शकता. जेव्हा तुम्हाला उलटी आल्यासारखे किंवा मळमळल्यासारखे वाटेल तेव्हा फक्त एका सेकंदाच्या अंतराने मनगटावरील बटण २० वेळा दाबा. मळमळ आणि उलट्यापासून बरे वाटण्यासाठी दोन्ही मनगटांवर समान प्रक्रिया करा.

तसेच, तुम्ही प्रेशर पॉइंट्सची मालिश देखील करू शकता.

  • मनगटावर तीन बोटे ठेवा आणि आपला अंगठा मनगटावर तर्जनीच्या खाली ठेवा
  • काही मिनिटांसाठी गोलाकार हालचालीमध्ये या बिंदूला मालिश करा
  • मॉर्निंग सिकनेस आणि मळमळ ह्यापासून आराम मिळण्यासाठी दुसऱ्या मनगटावर पुन्हा हीच प्रक्रिया करा

गरोदरपणात होणारी मळमळ आणि उलट्या ह्या सोप्या घरगुती उपायांमुळे कमी होऊ शकतात आणि तुम्हाला आराम मिळू शकतो. जर तुमचे उलट्या होण्याचे प्रमाण अत्यंत तीव्र असेल तर तुम्ही जे खाल किंवा प्याल ते बाहेर पडेल. अन्नपदार्थांची ऍलर्जी किंवा संक्रमणामुळे असे होऊ शकते. म्हणून, योग्य औषोधोपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. स्वतःचे स्वतः औषोधोपचार करू नका. कारण कधी कधी, त्यामुळे गर्भपात किंवा बाळाला दीर्घकालीन हानी पोहोचू शकते.

पहिल्या तिमाहीत बहुतेक गर्भवती महिलांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो. परंतु काही वेळा गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत हा त्रास होतो. जर तुम्हाला वारंवार मळमळ किंवा उलट्या होत असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून ह्या लेखात दिलेले उपाय करून बघू शकता.

आणखी वाचा:

गरोदरपणात होणारा टॉन्सिलायटिस: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचार
गरोदरपणातील बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी १० सर्वोत्तम घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article