एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना किती काम असते नाही का! बाळांची दिवसभरातील हालचाल बघता गमतीने असे म्हणावेसे वाटते. सर्व नवीन गोष्टी पहिल्यांदाच बघत असल्याने त्यांच्यासाठी तो खूप रोमांचक अनुभव असतो. खूप हालचाल झाल्यामुळे बाळे थकून जातात. त्यामुळेच बाळांना मोठ्या माणसांपेक्षा जास्त झोपेची गरज असते कारण ह्या त्यांच्या वाढीच्या महिन्यांमध्ये, बाळे बऱ्याच गोष्टींचे निरीक्षण करून त्यावर […]
जर एखाद्या गर्भवती महिलेला काही वैद्यकीय समस्या असतील किंवा नैसर्गिक प्रसूतीसाठी बाळ योग्य स्थितीत नसेल तर बहुतेक डॉक्टर बाळाला जन्म देण्यासाठी सिझेरियन शस्त्रक्रिया करतात. सी-सेक्शन मुळे बाळ सुरक्षित राहते परंतु, बऱ्याच स्त्रियांना सी-सेक्शन नंतर कंबरदुखीचा त्रास होतो. त्यासोबतच टाके दुखत असतात आणि नेहेमीच्या शस्त्रक्रियेच्या वेदना सुद्धा असतातच. जरी ह्या वेदना बाळाच्या जन्मामुळे आणि गरोदरपण संपत […]
गर्भधारणा चाचणीविषयी पहिला प्रश्न मनात येतो की गर्भधारणा चाचणीचा निकाल नकारात्मक येऊ शकतो का ? तुमची पाळी चुकली आहे, काही लक्षणे सुद्धा जाणवत असतात. परंतु आपण गरोदर तर नाही ना म्हणून तुम्ही गर्भधारणा चाचणी करून बघता. आणि चाचणीचा नकारात्मक निकाल बघून तुम्ही सुटकेचा निःश्वास सोडता. परंतु त्यानंतरही मासिक पाळी आली नाही तर तुम्ही गरोदर असण्याची […]
गर्भारपण हा आयुष्यातील असा एक टप्पा असतो जेव्हा शरीरात खूप बदल होत असतात. बाळाच्या जन्मानंतर शरीर पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागतो. गर्भधारणेनंतर शरीर पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी आईने स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्या क्रिया करण्यासाठी शरीरावर ताण येतो किंवा खूप ऊर्जा लागते अशा क्रिया डॉक्टरांशी संपर्क साधून चर्चा केल्यानंतरच कराव्यात. आणि अशीच एक क्रिया म्हणजे […]