Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य २०२३ – नवीन वर्षाच्या शुभेच्छा: तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रमैत्रिणीसाठी १०० पेक्षा जास्त शुभेच्छा संदेश, मेसेजेस आणि कोट्स

२०२३ – नवीन वर्षाच्या शुभेच्छा: तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रमैत्रिणीसाठी १०० पेक्षा जास्त शुभेच्छा संदेश, मेसेजेस आणि कोट्स

२०२३ – नवीन वर्षाच्या शुभेच्छा: तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रमैत्रिणीसाठी १०० पेक्षा जास्त शुभेच्छा संदेश, मेसेजेस आणि कोट्स

२०२३ ह्या नवीन वर्षाची सुरुवात आता लवकरच होणार आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सेलिब्रेशन हवेच! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची आपल्यापैकी बहुतेकजण उत्सुकतेने वाट पाहत असतात कारण त्यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते. तसेच गेलेल्या वर्षावर चिंतन करण्याची आणि पुढील वर्ष किती छान असेल याबद्दल स्वतःला आणि तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देण्याची वेळ आहे. नवीन वर्षाचे कोणतेही सेलिब्रेशन शुभेच्छांशिवाय पूर्ण होत नाही म्हणून आम्ही तुमच्या प्रियजनांना देण्यासाठी नवीन वर्ष २०२३ च्या काही आनंददायी शुभेच्छा देत आहोत. त्यांना शुभेच्छा द्या आणि त्यांचे चेहरे आनंदाने उजळलेले पहा!

मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि संदेश

सरत्या वर्षाला आनंदाने निरोप देणे योग्य आहे आणि हे नवीन वर्षाचे संदेश आणि शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी मदत करू शकतात.

पतीसाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा

तुमच्या नवर्‍यासाठी हे नवीन वर्षाचे मेसेज त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवतील.

 1. तू माझ्यासाठी २०२३ खूप खास बनवले आहेस – मी तुझ्यासाठी २०२३ खास बनवणार आहे हे एक वचन आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 2. 2. आपण ह्या नवीन वर्षात पाऊल ठेवत असताना, माझ्या आयुष्याचा तू इतका महत्त्वाचा भाग असल्याबद्दल मी तुमचे कसे आभार मानू. मी तुमची सदैव ऋणी राहीन. पुढचे वर्ष आपल्यासाठी काय घेऊन आले आहे ह्याची आपण वाट पाहू शकत नाही! माझ्या प्रिय नवऱ्याला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा!
 3. माझ्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या माणसाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
 4. आपल्या कुटुंबात प्रत्येक वर्ष आनंद घेऊन येते आणि २०२३ हे आणखी एक वर्ष असेच असू शकते. माझ्या प्रिय पतीस नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 5. माझा नवरा, माझा जिवलग मित्र, सर्व परिस्थितीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेला माझा जीवनाचा साथीदार – या वर्षी, मला तुमचे सर्व आशीर्वाद मिळतील अशी मला आशा आहे. नवीन वर्ष २०२३ च्या शुभेच्छा!

पतीसाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा

 1. मी नवीन वर्षाची वाट पाहत असताना, तुम्ही मला भेट दिलेल्या सर्व आठवणी आणि क्षणांचा मी विचार करत आहे. मला आशा आहे की 2023 सुद्धा असेच आनंदमयी क्षणांनी भरलेले असेल. माझ्या प्रिय पतीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 2. नवीन वर्षाचे संकल्प करण्याचा सर्वोत्तम भाग म्हणजे केलेले संकल्प मोडणे आणि ते तुमच्याशिवाय कोणीही करू शकत नाही. माझ्या प्रिय पतीस नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 3. आपल्या सर्वांना समान ३६५ दिवस मिळत असतात, परंतु फरक इतकाच आहे की आपण ते कसे वापरतो. हे सगळे दिवस मला तुमच्यासोबत घालवायचे आहेत! नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 4. तुम्ही माझ्या जीवनात आल्यामुळे माझे आयुष्य उजळले आहे. प्रिय आहो, मी तुम्हाला नवीन वर्षाच्या उज्ज्वल शुभेच्छा देते!
 5. नवीन वर्ष हे कोऱ्या पुस्तकासारखे आहे, मला आशा आहे की आपण मिळून हे वर्ष रंगीबेरंगी आणि सुंदर बनवू शकू. माझ्या प्रिय पतीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

पत्नीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या पत्नीसाठी हे मोहक, मजेदार आणि भावनिक असे नवीन वर्षाचे संदेश तुमच्या पत्नीच्या चेहऱ्यावर हसू आणतील.

 1. आणखी एक वर्ष उलटून गेले आहे, बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत – परंतु माझे तुझ्यावरील प्रेम अधिकच वाढत आहे. माझ्या बायकोला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा!
 2. जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहेस, तेव्हापासून माझे आयुष्य सुंदर झालेले आहे. तुझ्या अद्भुत प्रेमाचे हे आणखी एक वर्ष आहे. नवीन वर्ष २०२३ च्या शुभेच्छा!
 3. या वर्षी, मला माझे आशीर्वाद मोजायचे आहेत आणि ते करताना मला तुला दोनदा मोजावे लागेल! तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हे वर्ष आपल्यासाठी खूप आनंद घेऊन येवो!
 4. आयुष्य बदलते, पण एक गोष्ट तशीच राहते – आणि ते म्हणजे तुझ्यासाठी असणाऱ्या माझ्या शुभेच्छा!. तुला नेहमी चांगले आरोग्य, आनंद लाभो मी तुझ्यासोबत सुंदर, आरामदायी जीवनाची इच्छा करतो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

पत्नीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 1. आता, नवीन वर्षात, मागे वळून पाहताना प्रत्येक आनंदी क्षणांमध्ये तुझा मोठा वाटा होता. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 2. तुझ्याशिवाय मी नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करू शकत नाही. माझ्या प्रिय पत्नीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 3. दरवर्षी, मी नवीन संकल्प करण्याचा विचार करत असतो. या वर्षी, माझा एकच संकल्प आहे आणि तो म्हणजे तुझ्याबरोबरच्या सुंदर आठवणी मनात जपून ठेवण्याचा ! माझ्या प्रिय बायकोला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 4. आपण दोघेजण मिळून २०२३ हे आतापर्यंतचे सर्वोत्तम वर्ष बनवूया. नवीन वर्षाच्या शुभेच्छा,बायको !
 5. साहस, प्रेम आणि मजा यांनी भरलेल्या आणखी एका संस्मरणीय वर्षासाठी शुभेच्छा. माझ्या प्रिय बायकोला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 6. जेव्हा जेव्हा मला गरज असते तेव्हा सदैव माझ्या पाठीशी असतेस. मला आशा आहे की २०२३ आपल्यासाठी आनंद घेऊन येईल. माझ्या प्रिय बायकोस नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

मुलीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 1. आमचे कुटुंब एक बाग आहे, आणि तू, त्या बागेतील सुंदर फूल आहेस. माझ्या सुंदर मुलीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 2. असा एकही क्षण नाही जेव्हा आम्हाला तुझा अभिमान वाटला नसेल. माझ्या लाडक्या लेकीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 3. तुझं वय कितीही असलं तरी तू नेहमी स्वर्गातून आम्हाला पाठवलेली देवाची भेट असशील. मी तुम्हाला पुढील वर्षासाठी शुभेच्छा देतो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 4. या वर्षी, मला आशा आहे की तुझी सर्व स्वप्ने आणि आशा पूर्ण होतील. तुझ्या महत्वाकांक्षा आणि इच्छा पूर्ण कर. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 5. तुमच्याशिवाय आमचे कुटुंब कधीही पूर्ण होणार नाही. तुम्ही आमच्या आयुष्यात आनंद आणला आहे आणि आम्हाला आशा आहे की या वर्षी आम्ही तुमच्यासाठी तेवढाच आनंद आणू शकू. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 6. तुझी सगळी स्वप्ने सत्यात उतरो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 7. तुमचे हसणे हेच आमचे जीवन – आम्हाला आशा आहे की ३६५ हे वर्ष तुझ्यासाठी सर्वोत्तम असेल. आमच्या प्रिय मुलीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 8. तू होईपर्यंत प्रेम किती सुंदर असू शकते हे आम्हाला माहित नव्हते. माझ्या लाडक्या लेकीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 9. हे वर्ष तुझ्यासाठी भरपूर प्रेम आणि प्रकाश घेऊन येवो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
 10. पालक या नात्याने, तुझ्या सुंदर चेहऱ्यावर नेहमी आनंदी हास्य असावे हीच देवाकडे प्रार्थना. आम्‍हाला आशा आहे की २०२३ तुम्हाला चांगले जाईल आणि तुम्हाला भरपूर यश मिळेल!
 11. आपल्या लाडक्या मुलीचे आरोग्य आणि यशापेक्षा अधिक मौल्यवान काहीही नाही. आम्ही तुम्हाला आनंदी आणि यशस्वी नवीन वर्षाची शुभेच्छा देतो!

मुलासाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा

 1. तुला एक संवेदनशील, बलवान, हुशार माणूस बनताना पाहणे माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. मला आशा आहे की हे वर्ष तुझ्यासाठी आनंद आणि प्रेम घेऊन येईल. माझ्या प्रिय लेकास नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा!
 2. तुला आयुष्यात जे हवे ते मिळवण्यासाठी तू सक्षम आहेस, शेवटी तू माझा मुलगा आहेस. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 3. मला सर्वोत्तम पिता बनवल्याबद्दल धन्यवाद. या आगामी वर्षात मी तुम्हाला प्रेम आणि शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय मुलाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 4. पालक म्हणून, आम्हाला खात्री आहे की तू मोठा होऊन एक चांगला नागरिक होशील. तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो.
 5. तुझे वय कितीही असले तरी तू नेहमीच माझा लहान मुलगा राहशील आणि माझा शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबत असतील. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

मुलासाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा

 1. तू आमच्या जीवनाला आकार दिला आहेस आणि आम्हाला आनंदी केले आहेस. तुझ्यासाठी हे नवीन वर्ष खूप आनंद घेऊन येईल! नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 2. आयुष्यात तुला सर्व क्षेत्रात यश मिळो. तुझ्यासोबत परमेश्वराचे आशीर्वाद सतत असूदेत. तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा प्रिय मुला!
 3. माझा प्रिय मुलाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा! तुझा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो. आमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 4. तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य असेच राहो. माझ्या मुलाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 5. आम्हाला तुमच्यासारखा तेजस्वी आणि सुंदर मुलगा दिल्याबद्दल आम्ही दररोज देवाचे आभार मानतो. तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 6. आम्‍हाला आशा आहे की २०२३ तुझ्यासाठी प्रचंड आनंद आणि समृद्धी घेऊन येईल. आमच्या प्रिय मुलाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि मित्रांसाठी संदेश

जोपर्यंत तुम्ही तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना शुभेच्छा देत नाही तोपर्यंत नवीन वर्षाचे सेलिब्रेशन पूर्ण होत नाही. मित्र आणि कुटुंबियांना नवीन वर्षाच्या काही आनंददायी शुभेच्छा खाली दिलेल्या आहेत त्यामुळे तुमचा दिवस अधिक आनंदात राहील.

 1. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की गेल्या वर्षभरात माझ्या कुटुंबाने मला माझ्या चढ-उतारांमध्ये साथ दिली. पुढील अनेक वर्षांसाठी आहोत आपण असेच एकमेकांसाठी राहणार आहोत! नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 2. तुमच्यासोबत घालवलेल्या आनंदी क्षणांसाठी धन्यवाद. ही परंपरा पुढच्या वर्षी आणि आणखी अनेक वर्ष चालू ठेवूया. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि मित्रांसाठी संदेश

 1. जिवलग मित्रांसोबत कसे वागावे हे तू ह्या वर्षी शिकशील अशी मला आशा आहे आणि हो मला भेटवस्तू आवडतात. नवीन वर्षाच्या शुभेच्छा, मित्रा!
 2. मित्र हे तार्‍यांसारखे असतात – तुम्ही त्यांना पाहू शकत नाही, परंतु ते तुमच्यावर नेहमी लक्ष ठेवून असतात. माझ्या सर्वात आवडत्या मित्राला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
 3. पुढचे वर्ष आपल्या दोघांसाठी आनंददायी असेल अशी आशा करूया! नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 4. तुझी माझी मैत्री खास आहे आणि ह्या मैत्रीची अनेक वर्षे आपल्याला सोबत घालवायची आहेत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा, मित्रा.
 5. मी तुझ्यासोबत नवीन आठवणींचा साठा करण्यासाठी उत्सुक आहे. माझ्या जिवलग मित्राला आणि त्याच्या सोबतीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 6. वर्षाचा हा काळ तुझ्यासारख्या दर्जेदार मित्रासोबत वेळ घालवण्यासाठी योग्य आहे – म्हणून, मित्रा, आपण कायमस्वरूपी आठवणी बनवूया! नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 7. दरवर्षी आपण एकत्र व्यायाम करण्याचा संकल्प करतो. या वर्षी, मला आशा आहे की तो टिकेल! नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 8. तुम्ही हे वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय वर्ष बनवले आहे आणि त्यासाठी मी नेहमीच आभारी राहीन. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
 9. असा एकही दिवस जात नाही जेव्हा मला माझ्या प्रेमळ आणि उत्साही मित्राची आठवण होत नाही. तू मला नेहमीच सर्व चढ-उतारांमध्ये साथ दिली. तुला खूप यश आणि प्रेम मिळो!. नवीन वर्षाच्या शुभेच्छा प्रिय मित्रा!

14 . खूप साहस, खूप हशा, कितीतरी जास्त वेडेपणा घेऊन येणाऱ्या नवीन वर्षासाठी तुला खूप शुभेच्छा मित्रा!.

मित्र आणि कुटुंबियांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवा. त्यामुळे त्यांना आनंद होईल आणि तुम्ही तो दिवस एकमेकांच्या सहवासात घालवू शकता. आम्ही तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो!

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article