Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ३२वा आठवडा

गर्भधारणा: ३२वा आठवडा

गर्भधारणा: ३२वा आठवडा

तुम्ही प्रसूती तारखेच्या जसेजसे जवळ जाता तसे तुम्हाला खूप रोमांचक वाटेल, परंतु त्यास अजून वेळ आहे कारण प्रसूतीच्या तारखेस अजून २ महिने बाकी आहेत, त्यामुळे ३२व्या आठवड्यात तुम्हाला काही गोष्टींची माहिती हवीच.

गर्भारपणाच्या ३२व्या आठवड्यातील तुमचे बाळ

३२वा आठवडा तुमच्यासाठी खूप नवीन अनुभव घेऊन येणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या पोटात तुमचे बाळ खूप जास्त इकडून तिकडे हालचाल करणार नाही. तुमचे बाळ आता फक्त थोडी वळवळ करणार आहे. तुमच्या बाळाची वाढ वेगाने होत असल्यामुळे तुमच्या गर्भाशयात कमी जागा राहिली आहे. जन्माच्या तयारीसाठी तुमचे बाळ आता ओटीपोटाकडे सरकू लागेल. काही वेळा बाळ पायाळू स्थितीत असते. परंतु बऱ्याच प्रकरणांमध्ये ते जन्माच्या आधी सामान्य स्थितीत येते आता बाळाच्या वाढीचा वेग इतका जास्त आहे की बाळाच्या आत्ताच्या वजनाच्या ५०% वजन बाळाच्या जन्माच्या वेळी जास्त असणार आहे. नखे, केस आणि त्वचा हे नवजात शिशु प्रमाणेच आहेत.

फुप्फुसांची वाढ आणि विकास पूर्ण झाला असून जर तुमची अकाली प्रसूती झाल्यास बाळाची जगण्याची शक्यता खूप जास्त असते.

बाळाचा आकार केवढा असतो?

गर्भारपणाच्या ३२व्या आठवड्यात बाळाचा आकार हा २ किलो इतका असतो आणि डोक्यापासून ते पायापर्यंत बाळाची लांबी ३५सेंमी इतकी असते. गर्भाशयातील जागा पूर्णपणे व्यापली गेली असल्यामुळे बाळ जास्त हालचाल करू शकत नाही, परंतु लवकरच बाळ बाहेरच्या जगात प्रवेश करणार असून बाळाला भरपूर जागा मिळणार आहे. बाळाचा विकास आता पूर्ण झालेला असतो आणि ते नुकत्याच जन्मलेल्या बाळासारखे दिसू लागते.

शरीरात होणारे बदल

तुम्हाला गर्भारपणाच्या ३२व्या आठवड्यात खूप शारीरिक बदल जाणवतील परंतु तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही ते आटोक्यात आणता येऊ शकतात.

  • वाढलेला रक्ताचा प्रवाह: दोन जीवांना रक्ताचा पुरवठा करणे हे सोपे नाही, त्यामुळे तुमचे शरीर हे ५०% जास्त रक्त तयार करते.
  • पायांना सूज येणे: जास्त पाण्यामुळे तुमच्या पावलांमध्ये आणि घोट्यांमध्ये सूज (oedema) आढळते. तुमच्या पायांसाठी आरामदायी शूज आणा.

  • स्तनाग्रांच्या रंगामध्ये बदल: तुमच्या स्तनाग्रांचा रंग लक्षणीय रित्या गडद होईल कारण तुमचे स्तन नवजात बाळाला स्तनपान करण्यासाठी तयार होत असतात. स्तनाग्रे आणि आजूबाजूचा भाग निर्जंतुक होण्याआधी अँटीबॅक्टरील तेलाची निर्मिती होत असते त्यामुळे स्तनाग्रांचा रंग गडद होतो.
  • स्तनांमधून दूध गळणे: तुमचे स्तन हे बाळाला भरवण्यासाठी तयार असतात. कोलोस्ट्रम (colostrum) तुमच्या स्तनांमधून गळणार आहे. त्यामुळे पॅडेड आणि स्त्राव शोषून घेणाऱ्या ब्रा वापरा.
  • खूप जास्त योनीमार्गातील स्त्राव: तुमची योनी बाळाच्या जन्माची तयारी करत असते आणि योनीच्या भित्तिकांभोवती चिकट स्त्रावाचा जाड थर तयार करते त्यामुळे ते वंगण म्हणून काम करते, कधी कधी हा स्त्राव जास्त असतो तेव्हा सॅनिटरी नॅपकिन जवळ ठेवा,

३२व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणची लक्षणे:

इथे ३२व्या आठवड्यात आढळणारी काही लक्षणे देत आहोत.

. चक्कर येणे

हे वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकते, विशेषतः रक्तामध्ये पुरेशी साखर नसल्यामुळे असे होऊ शकते. त्यामुळे  काही तरी गोड़ सतत सोबत ठेवा.

. मूळव्याध

Rectal vericose veins बद्धकोष्ठतेमुळे होतात आणि ते खूप संवेदनशील आणि वेदनादायी असतात. आराम पडावा म्हणून बर्फ लावा, परंतु खूप जास्त त्रास होत असेल तर वैद्यकीय मदतीची गरज भासते.

. बद्धकोष्ठता

बाळाची वाढ वेगाने होत असल्याने आतील अवयवांवर दाब पडतो आणि शौचास त्रास होतो. त्या दाबामुळे रोजचे शौचास होणे अवघड होते.

. त्वचेला खाज सुटणे

जसजसे बाळ मोठे होत जाते, तुमच्या पोटाची त्वचा ताणली जाते. ह्यामुळे त्वचेला कोरडेपणा येतो आणि तडे जातात. अस्वस्थता कमी होण्यासाठी मॉइश्चराझर्स लावावे.

. जळजळ

सर्वात प्रामुख्याने आढळणारे लक्षण असून जसजशी  बाळाची वाढ होते तशी  अस्वस्थता वाढत जाते  आणि पचनसंस्थेवर दाब पडतो. थोड्या थोड्या वेळच्या अंतराने थोडे खात राहा. पचनास मदत होणारे पदार्थ जसे की ताक आणि दही दररोज खा.

गर्भधारणेच्या ३२व्या आठवड्यात पोटाचा आकार

३२व्या आठवड्यात तुमच्या पोटाचा आकार २८-३६सेंमी इतका असतो. ह्या वेळेच्या आसपास तुमचे बाळ ओटीपोटाकडे खाली सरकते आणि बाळाच्या जन्माची तयारी होते, त्यामुळे आधी उंचावलेले पोट आता कमी दिसते. काही वेळा प्रसूतीच्या दरम्यान असे झालेले आढळते.

गर्भधारणेच्या ३२व्या आठवड्यातील सोनोग्राफी

३२व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड महत्वाचे आहे कारण त्यामध्ये विविध तपशील दिसतात.

  • बाळाची वाढ: बाळाची वाढ नीट होत आहे ना ह्याविषयी डॉक्टर्स तुम्हाला सांगू शकतात.
  • अंत:रक्तस्त्राव: कधी कधी नाळ फाटून आतमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो.
  • बाळाची स्थिती: सामान्यपणे तुमच्या बाळाचे डोके गर्भाशयाच्या मुखाच्या दिशेने हवे परंतु काही वेळा ते विरुद्ध दिशेला असल्यास ते समजू शकते.

तुमच्या बाळाच्या चेहरा आणि शरीरावरचे तपशील जाणून घ्यायचे असल्यास थ्री डी अल्ट्रासाऊंड करून घ्या. ह्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड करायलाच हवे असे नाही. परंतु जर मधुमेह, लठ्ठपणा, ओटीपोटात दुखणे इत्यादी मुळे गर्भारपणात काही गुंतागुंत असेल तर सोनोग्राफी करून घेण्यास सांगितली जाऊ शकते.

आहार कसा असावा?

गर्भारपणाच्या ३२व्या आठवड्यातील अन्नामध्ये खालील काही महत्वाच्या पोषणमूल्यांचा समावेश होतो.

लोह ही आहारातील सर्वात महत्वाची गरज आहे. कारण तुमच्या रक्ताच्या पातळीमध्ये ५०% वाढ झालेली असते. लोह हे हिमोग्लोबिनचा महत्वाचा घटक आहे. ऑक्सिजनचे वहन करण्यासाठी आवश्यक असणारा हा महत्वाचा घटक आहे. तुम्ही लोहाने समृद्ध असे अन्नपदार्थ जसे कि पालक, ब्रोकोली, लाल मांस आणि शेंगा इत्यादींचा समावेश तुमच्या आहारात केला पाहिजे किंवा तुमचे डॉक्टर तुम्हाला व्हिटॅमिन्स च्या पूरक गोळ्या सुद्धा लिहून देऊ शकतात.

बाळाची नखे, दात, केस आणि हाडे तयार झाली असून नाजूक आहेत. त्यांना बळकटी आणणे हे महत्वाचे आहे आणि त्यासाठी दिवसाकाठी पुरेसे कॅल्शिअम लागते. अन्नपदार्थ जसे की दूध, हिरव्या पालेभाज्या आणि सिरिअल हे त्याचे उत्तम स्रोत आहेत.

आहारामध्ये विविध अन्नपदार्थांचा समावेश करण्याबरोबरच चरबीयुक्त आणि गोड पदार्थ वर्ज्य करा. खूप जास्त प्रमाणात एकदाच खाणे टाळा, त्याऐवजी थोडे थोडे खा. मांस कमी खा आणि खूप जास्त हिरव्या पालेभाज्या,फळे, संपूर्ण धान्य आणि सुकामेवा खा. मद्यपान करू नका.

काय काळजी घ्याल आणि त्याविषयी काही टिप्स

इथे काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे तुम्ही गर्भारपणाचा हा टप्पा पार करू शकाल,

हे करा

  • ह्या टप्प्यावर बाळाचा जन्म झाला तरी बाळ जगू शकते, तुम्हाला जर बाळाच्या जन्माची तयारी करून ठेवायची असेल तर तुम्ही करून ठेवू शकता. तसेच तुम्हाला वेदनाविरहित प्रसूती चा पर्याय निवडायचा आहे किंवा नाही ह्याविषयीचा विचार करून ठेवा. त्याविषयी खूप पर्याय उपलब्ध आहेत, जर तुम्हाला नैसर्गिक प्रसूती हवी असेल तर तुम्ही ते सगळे पर्याय नाकारू शकता.
  • तुमच्या बाळासाठी नॅपी, ब्लँकेट्स आणि उशा तयार ठेवा.

हे करू नका

  • जेव्हा तुम्ही तुमची हॉस्पिटल बॅग तयार ठेवता तेव्हा स्वतःसाठी काही गोष्टी पॅक करण्यास विसरू नका. थोडे सॅनिटरी नॅपकिन्स जवळ ठेवा कारण बाळाच्या जन्मानंतर ते तुम्हाला वापरावे लागतील.
  • तुमचे व्यायाम, विशेषतः पोहणे किंवा योग चुकवू नका कारण ते पाठीच्या आणि ओटीपोटाच्या दुखण्यापासून आराम मिळावा म्हणून अगदी योग्य आहेत.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

तुमच्या बाळाची खोली कशी सजवायची ह्याविषयीची योजना तयार करून ठेवा. मॅटर्निटी ड्रेसेस, ब्रा तसेच बाळाच्या जन्मानंतर तुम्हाला लागणारे कपडे आणून ठेवा. बाटल्या, लंगोट, पावडर आणि छोटी मऊ खेळणी आणून ठेवा. तसेच तुम्ही बाळासाठी छोटी बाबागाडी आणून ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला घराच्या बाहेर वॉक घेता येईल.

तुमची आणि बाळाची भेट अगदी जवळ अली आहे आणि त्यासाठी लागणारी तयारी सुद्धा छान झाली आहे. तुम्ही लवकरच एका निरोगी बाळाच्या आई होणार आहात!

मागील आठवडा: गर्भधारणा: ३१वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: ३३वा आठवडा

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article