Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात शीतपेये पिणे हानिकारक आहे का?

गरोदरपणात शीतपेये पिणे हानिकारक आहे का?

गरोदरपणात शीतपेये पिणे हानिकारक आहे का?

बहुतेक स्त्रियांना याची जाणीव असते की अल्कोहोल बाळाच्या वाढीसाठी हानिकारक आहे आणि म्हणूनच,अल्कोहोल ऐवजी त्या स्त्रिया स्वादयुक्त पेय, सोडा, डाएट सोडा, साधा सोडा किंवा अगदी कोल्ड ड्रिंकसुद्धा घेतात.

गरोदरपणात शीतपेये किंवा कार्बोनेटेड पेये पिणे सुरक्षित आहे काय?

खरं तर, गर्भवती महिलांनी दूध, फळांचे रस, मिल्कशेक्स इत्यादींचे सेवन केले पाहिजे आणि या टप्प्यात सर्व प्रकारचे सोडा, कोल्ड्रिंक, कॅफिनेटेड पेये आणि एनर्जी ड्रिंक्स टाळले पाहिजेत. जरी हा पर्याय चांगला नसला तरी शीतपेये प्रमाणात घेतल्यास सुरक्षित आहेत. “मी गरोदरपणात शीतपेये किंवा कोल्ड ड्रिंक्स पिऊ शकते काअसा विचार करणार्‍या महिलांसाठी आपण हे का करू नये ह्याचे उत्तर येथे आहे.

गरोदरपणात शीतपेये पिण्याचे हानिकारक परिणाम

गरोदरपणात नियमितपणे शीतपेये पिण्याचे काही दुष्परिणाम येथे आहेत

. कॅफिनचे दुष्परिणाम

बर्‍याच पेयांमध्ये कॅफिन असते, ज्याचे व्यसन लागू शकते आणि त्याचे अनेक हानिकारक दुष्परिणाम सुद्धा आहेत. रक्तामध्ये कॅफिनचे सेवन जलद होते आणि नाळेद्वारे ते त्वरीत बाळापर्यंत पोहोचते. आपल्या रक्ताभिसरणात कॅफिन सुमारे ११ तास राहिल्यास कॅफिन आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्था आणि एड्रेनल ग्रंथीवर परिणाम करते आणि बाळ या विषारी पदार्थाचा नाश करण्यासाठी संघर्ष करते. कॅफिन लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे आणि यामुळे डिहायड्रेशन होते

गर्भवती स्त्रियांसाठी सर्वोच्चशिफारस केलेली मर्यादा दररोज २०० मिलीग्राम कॅफिनपेक्षा जास्त नसावी. ३०० मिग्रॅ कॅफिन घेतल्यास त्याचा आपल्या झोपेवर परिणाम होतोच शिवाय जास्त प्रमाणात घेतल्यास गर्भपात होऊ शकतो. ५०० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफेन घेतल्यास, हृदयाचे ठोके जलद पडून श्वासोच्छवासाची पातळी वाढते आणि बाळामध्ये छातीत जळजळ होते. म्हणूनच कोक, कॉफी, चॉकलेट्स, ब्राउनिज आणि कॅफिन असलेली कोणतीही गोष्ट टाळण्याचे सल्ला देण्यात येतो.

. कृत्रिम स्वीटनर्स आणि संरक्षकांचे दुष्परिणाम

रंगीबेरंगी एजंट, संरक्षक, गोडी आणि स्वाद वाढवणारे पदार्थ गरोदरपणात योग्य नसतात त्याचे दुष्परिणाम पुढीलप्रमाणे, साखरेचे सेवन केल्याने तुमचे वजन वाढू शकते आणि गरोदरपणात गुंतागुंत होऊ शकते. तुमच्या बाळाच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो. रंग वाढवणाऱ्या पदार्थांमध्ये डाय असतो, ज्यामुळे बाळाला एलर्जी होऊ शकते. सॉफ्ट ड्रिंकमध्ये बंदी घातलेला पदार्थ सॅकरीन असतो ते बाळापर्यंत पोहचू शकते आणि ब्लॅडरमध्ये जमा होऊ शकते.

. बर्फशीत पेयांचे दुष्परिणाम

गर्भवती महिलेचे पोट तापमानास अत्यंत संवेदनशील असते. बर्फ घातलेले थंडगार पेय घेतल्यामुळे पोट आणि रक्तवाहिन्या अचानक संकुचित होतात आणि बाळासाठी ते चांगले नसते. याचा दुष्परिणाम म्हणजे भूक, अपचन, पोटदुखी, गर्भपात तसेच बाळाला अन्नाचा आहार पुरवठा कमी होणे आणि जन्मजात अपंगत्व वाढणे हे आहेत.

. स्वीटनर्स आणि जास्त कॅलरीजचे दुष्परिणाम

जेव्हा आपण गर्भवती आहात तेव्हा आपण दोन जीवांसाठी खात असता आणि म्हणूनच अतिरिक्त आहार, पोषण आणि काळजी घेणे आवश्यक आहे. फक्त कॅलरीज वाढवणारी आणि पोषणमूल्ये नसलेली शीतपेये घेणे कमी करा. जास्तीच्या कॅलरीमुळे बाळ जास्त वजनाचे असू शकते.

. कार्बोनेटेड पाण्याचे दुष्परिणाम

कोला आणि सॉफ्ट ड्रिंक्समध्ये कार्बनडायऑक्साइड बुडबुडे असतात. गरोदरपणाच्या शेवटी, आपण अत्यंत संवेदनशील असता आणि कार्बनिक ऍसिडमुळे छातीत तीव्र जळजळ होते आणि अपचन येऊ शकते, जेणेकरून आम्लाची पातळी जवळजवळ एक तासासाठी वाढते. कॅफेनमुळे बाळाच्या आणि तुमच्या छातीत जळजळ होऊ शकते.

. फ्लेवरिंगचे दुष्परिणाम

फ्लेवरिंगमध्ये फॉस्फोरिक ऍसिड असते, ज्यामुळे हाडांमधून कॅल्शियम कमी होते. कॅल्शियमची कमतरता हाडे ठिसूळ करते, जे खासकरुन गरोदरपणात अनिष्ट आहे.

. बाळाच्या मेंदूवर दुष्परिणाम

अभ्यासावरून असे दिसून येते की विशेषतः गोड पेयांमधून जेव्हा आईच्या शरीरात जास्तीत जास्त साखर जाते, तेव्हा त्यांच्या मुलांची समस्या सोडवण्याची क्षमता आणि तोंडी स्मरणशक्ती कमी असते. गरोदरपणात ते प्यायल्याने बाळाची हालचालकौशल्य कमी होतात तसेच व्हिज्युअल, अवकाशीय क्षमता सुद्धा कमी होतात.

गरोदरपणात शीतपेयांना पर्याय

होय नक्कीच! गरोदरपणात निर्माण होणारी थंड पदार्थांची लालसा कमी साखर, उच्च पोषण पातळी आणि कॅफेन नसलेल्या पेयांनी भागवली जाऊ शकते.

फक्त हे लक्षात ठेवा की पाणी नेहमीच एक उत्तम आधार आहे आणि बद्धकोष्ठता, खाज सुटणे, पोटदुखी होणे, डोकेदुखी इत्यादी सारखी लक्षणे कमी होण्यास ते मदत करते. आपल्याला दिवसातून किमान आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी असलेल्या खालील निरोगी पाककृती कोल्ड्रिंकची तल्लफ पूर्ण करतात. सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम पर्याय नसला तरी, शीतपेयांचे एकच सर्व्हिंग ठीक आहे. त्या इच्छा आणि लालसास मदत करण्याचे काही मार्ग येथे आहेत. त्याऐवजी एक ग्लास दूध, ताजे फळांचा रस, लस्सी किंवा नारळाचे पाणी प्या. व्यायाम करून खालील पेयांचे सेवन करा

. ताक

आले, कांदा, कोथिंबीर आणि मीठ यांच्या तुकड्यांसह ताक एक उत्कृष्ट आरोग्य पेय बनते. आपण ते स्मूदीमध्ये किंवा नुसते तसेच पिऊ शकता. जास्त शीतपेये घेतली जाणार नाही याची काळजी घ्या

. घरी केलेले स्मूथी

सफरचंद, केळी, चिकू, कस्तुरीखरबूज, टरबूज, द्राक्षे आणि तुम्हाला हव्या त्या फळांचा वापर करा. अर्धा कप पाणी किंवा दुधात मिसळा आणि एक चवदार स्मूदी बनवा.

. फ्रुट व्हेजी कॉम्बोज

फळ आणि भाजी एकत्र करण्यासाठी ज्यूसर वापरा. स्वीटनर टाळा. सफरचंद, संत्री, अननस तसेच गाजर एकत्र घालून पेय करण्याचा प्रयत्न करा

. लिंबू घातलेले मस्त पेय

साध्या पाण्यात लिंबाचे तुकडे किंवा लिंबाचा रस घाला. तुम्ही चवीसाठी कुठल्याही फळांचा रस घालू शकता. लिंबू हे मॉर्निंग सिकनेस आणि मळमळ मर्यादित ठेवण्यासाठी ओळखले जातात. याव्यतिरिक्त, ते फायदेशीर खनिजे आणि जीवनसत्त्वे प्रदान करतात

. मिनरल वॉटर मध्ये फळे

तुमच्या आवडीच्या फळांच्या तुकड्यांसह म्हणजेच टरबूज, लिंबू, केशरी,पेअर , किवी, लीची, आंबे, चेरी किंवा केळ्याचे तुकडे घ्या. त्यावर मिनरल वॉटर घालून खा.

अशी बरीच स्वादयुक्त पेये आहेत जी तुम्ही सॉफ्ट ड्रिंक्सच्या जागी वापरुन पाहू शकता, ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि ह्या पेयांमुळे पोषणमूल्ये आणि इतर फायदे देखील मिळतील.

आणखी वाचा: गरोदरपणात खाऊ नयेत असे २४ अन्नपदार्थ

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article