Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील पिवळा स्त्राव

गरोदरपणातील पिवळा स्त्राव

गरोदरपणातील पिवळा स्त्राव

गरोदरपणात काही आश्चर्यकारक आणि भयानक अनुभव सुद्धा येऊ शकतात. तुमच्या शरीरात वेगाने बदल होत असतात आणि संप्रेरके संतुलनाचे कार्य करत असतात. तसेच तुम्हाला शरीराकडून होणाऱ्या अप्रिय प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो. त्यातीलच एक म्हणजे योनीमार्गातून शरीराबाहेर पडणारे द्रव किंवा स्त्राव होय. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात योनीमार्गातून होणारा पिवळा स्त्राव हे त्यापैकीच एक कारण असू शकते. ह्यावर उपचार न केल्यास हा संसर्ग गर्भाशयाच्या मुखातून नाळेपर्यंत पोहोचतो आणि गर्भजलाला संसर्ग होऊ शकतो.

पिवळा स्त्राव म्हणजे काय?

गरोदरपणात तुमच्या संप्रेरकांच्या पातळीत होणाऱ्या वाढीमुळे शरीरात एस्ट्रोजेनच्या पातळीत वाढ होते. यामुळे योनिमार्गाकडील भागात रक्ताचा अतिरिक्त प्रवाह होतो (गरोदरपणात योनीतून दिसणारा स्त्राव). या स्त्रावमध्ये गर्भाशयाच्या मुखातून होणार स्त्राव तसेच योनीमार्गातून होणार स्त्राव, जीवाणू आणि योनीच्या जुन्या पेशी ह्यांचा समावेश असतो. स्रावाची मात्रा आणि वारंवारता प्रत्येक स्त्रीमध्ये भिन्न असते.

गरोदरपणात योनीमार्गातून होणारा पिवळसर स्त्राव सामान्य आहे का?

योनी स्वच्छ आणि निरोगी राहण्यासाठी मृत पेशी आणि जीवाणू काढून टाकून योनी स्वच्छ करण्याची शरीराची स्वतःची यंत्रणा योनिमार्गात असते. ल्युकोरिया, म्हणजेच योनीच्या श्लेष्माचे वाढलेले प्रमाण, हे गरोदरपणाचे एक सामान्य लक्षण आहे. योनीमार्गातील स्रावाचे प्रमाण तिसऱ्या तिमाहीत वाढेल. जर ह्या स्रावास वास येत असेल आणि हा स्त्राव गडद रंगाचा असेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे.

गर्भवती महिलांमध्ये पिवळ्या स्रावाची काय कारणे आहेत?

उच्च एस्ट्रोजेन पातळी व्यतिरिक्त, पिवळा स्त्राव होण्याची काही इतर कारणे आहेत आणि ती खालीलप्रमाणे

. इस्ट्रोजेनचे वर्चस्व

इस्ट्रोजेनची उच्च पातळी म्हणजे मोठ्या प्रमाणात योनीतून स्त्राव होणे. इस्ट्रोजेनच्या पातळीत वाढ होण्याचे इतर घटक म्हणजे शरीरातील जादा चरबी हे होय. ताणतणाव, कमी फायबर आहार किंवा अगदी कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती ही सुद्धा आणखी काही कारणे आहेत. जर स्त्राव होण्यामागे इस्ट्रोजेनचे वर्चस्व हे कारण असेल तर त्यासाठी डॉक्टर काही औषधे लिहून देऊ शकतात.

. यीस्टचा संसर्ग

गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये यीस्टचा संसर्ग सामान्य आहे कारण संप्रेरके योनीच्या पीएच पातळीवर परिणाम करतात. त्यामुळे कँडिडा अल्बिकन्स नावाचे यीस्ट वाढू शकतात. त्यामुळे घट्ट, पांढरा, वाईट वास येणारा स्त्राव योनीमार्गातून येतो आणि योनीमार्गाला सूज येऊन योनिकडील भागात लालसरपणा दिसू लागतो. स्त्रावाचा रंग प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळा असू शकतो. तुमचे डॉक्टर औषधे लिहून देऊ शकतात त्यामुळे संसर्ग लवकरच नाहीसा होतो आणि त्यामुळे बाळाला कुठलेही नुकसान होत नाही.

. बॅक्टेरियल व्हजायनोसिस

जेव्हा योनीच्या भागातील चांगल्या आणि वाईट जिवाणूंचा समतोल बिघडतो तेव्हा बॅक्टेरियल व्हजायनोसिस होतो. असे झाल्यास पिवळसर हिरव्या रंगाचा घट्ट स्त्राव तयार होतो आणि त्यास दुर्गंधी येते तसेच योनीकडे भागात सूज येऊन खाज सुटते. ह्या स्थितीमुळे अकाली प्रसूती होऊ शकते आणि त्यामुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याची शक्यता असते तसेच गरोदरपणात जर वेळीच उपचार झाले नाहीत तर मूत्रमार्गाचा संसर्ग सुद्धा होऊ शकतो.

. लैंगिक संबंधांद्वारे पसरणारे आजार (एसटीडी)

असामान्य स्त्राव होण्याचे सर्वात सामान्य कारण एसटीडी हे आहे आणि त्यामुळे आई आणि बाळ दोघांनाही जास्त धोका असतो. एसटीडीवर वेळेवर उपचार न घेतल्यास पडदा अकाली फुटणे, अकाली प्रसूती आणि अगदी कमी वजन असलेल्या बाळाचा जन्म होऊ शकतो. मुख्य एसटीडी ज्यामुळे असामान्य स्त्राव होतो ती म्हणजे ट्रायकोमोनियासिस, क्लॅमिडीया आणि गोनोऱ्हिया हे होत.

लैंगिक संबंधांद्वारे पसरणारे आजार (एसटीडी)

आपल्याला काळजी करण्याची केव्हा गरज नसते?

वर नमूद केलेल्या कारणांव्यतिरिक्त, तुम्ही काही इतर एसटीडींमुळे बाधित झाल्यास आणि जळजळ, खाज सुटणे किंवा चिडचिड होणे ह्यापैकी कुठलीही लक्षणे दिसली नाहीत तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नसते. दुर्गंधीयुक्त राखाडी, हिरवा, पिवळा स्त्राव असल्यास नक्कीच काळजी करण्याचे कारण आहे.

पिवळ्या स्त्रावचा उपचार कसा केला जातो?

असे बरेच उपाय आहेत जे स्त्रावमुळे उद्भवणार्‍या अस्वस्थतेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. आपण प्रयत्न करू शकता असे काही घरगुती उपचार उपाय खालीलप्रमाणे आहेत

  • आपण पँटी लाइनर वापरू शकता, स्त्राव संसर्गामुळे झालेला नसल्यास पॅंटी लायनर्स ते शोषून घेण्यास मदत करतात.
  • योनिमार्गाचे क्षेत्र स्वच्छ, निरोगी आणि नीटनेटके ठेवा. हे सुनिश्चित करा की तुम्ही नेहमी पुढून मागच्या बाजूच्या दिशेने तो भाग पुसा. इतर मार्गाने पुसण्यामुळे आपल्या योनीमध्ये जंतू पोहोचू शकतात.
  • योनिमार्गाकडील भागात हवा खेळती राहण्यासाठी सूती विजार घाला. आपल्याला संसर्ग झाल्यास सिंथेटिक कपडे घालण्यापासून दूर रहा.
  • सुगंधित साबण, पॅड आणि टॉयलेट पेपर, हायजीन स्प्रे आणि घट्ट फिटिंग पॅंट टाळा.
  • डचिंगपासून दूर रहा कारण त्यामुळे योनीमार्गातील चांगले जिवाणू नष्ट होतात आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

गर्भवती असताना आपण पिवळा स्त्राव कसा रोखू शकता?

आपण गरोदरपणात पिवळा स्त्राव कसा रोखू शकता ते इथे दिलेले आहे

  • जननेंद्रियाचे क्षेत्र नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवा.
  • आपल्या त्वचेला त्रास न देणारे आतील आणि बाहेरील कपडे सैलसर कपडे घाला.
  • संसर्ग कमी करण्यासाठी योनीतून डचिंग टाळा.
  • निरोगी आहार घ्या आणि त्यामध्ये दह्याचे प्रमाण जास्त असुद्या.
  • भावनिक ताणामुळे देखील जास्त प्रमाणात डिस्चार्ज देखील होतो. योग, ध्यान, व्यायाम, योग्य आहार इ. अशा विविध पद्धतींद्वारे तणावातून मुक्त व्हा.

सामान्य प्रश्न

काही लोकांना खालीलप्रमाणे प्रश्न असू शकतात:

. पिवळा स्त्राव गर्भधारणेचे लक्षण असू शकते?

जेव्हा योनीतून येणारा स्त्राव पिवळा असतो, तेव्हा तो सहसा दोन प्रकारचे असू शकतो जाड, किंवा पातळ आणि पाणचट. स्त्रीची मासिक पाळी सुरु होणार असल्याचे ते सूचित करते. मासिक पाळी सुरु होताना पिवळसर रंगाची छटा असलेले रक्त सुरुवातीला असते. तसेच जर पाळी दरम्यान स्त्रीला कुठलेही लक्षण दिसले नाही तर ते संसर्गाचे लक्षण असू शकते.

जेव्हा स्त्राव घट्ट असतो तेव्हा ते मासिक पाळी सुरु असल्याचे लक्षण असते किंवा गरोदरपणाचे पूर्व लक्षण असू शकते. स्रावातील पिवळसर छटा रोपण होत असल्याचे लक्षण आहे. गरोदर चाचणी करून खात्री करून घेणे चांगले.

. गरोदरपणात पिवळसरपांढरा स्त्राव सामान्य आहे का?

वास नसलेला आणि अंड्याच्या पांढऱ्या बालकासारखा असलेला पिवळसर पांढरा स्त्राव गर्भावस्थेदरम्यान सामान्य असतो.

. गर्भवती असताना पिवळ्या गंधहीन स्त्राव आहे?

साधारणपणे, स्त्राव पांढर्‍या किंवा हलक्या पिवळ्या रंगाचा असतो. परंतु जर तो स्त्राव गडद असेल आणि काळानुसार आणखी गडद होत तर डॉक्टरांचे मत घेणे आवश्यक आहे. स्रावाच्या रंगाचे परीक्षण करणे चांगले जेणेकरून वास्तविक समस्येचे निदान करण्यासाठी डॉक्टरकडे जाण्यासाठी अधिक माहिती असू शकेल.

. दुर्गंधयुक्त पिवळ्या रंगाचा स्त्राव हा रोगाचे लक्षण असू शकतो?

बहुतेक प्रकरणांमध्ये, होय, दुर्गंधी असलेला घट्ट पिवळ्या रंगाचा स्त्राव हे संसर्ग किंवा आजाराचे लक्षण असू शकते आणि त्याला वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता असते.

जेव्हा तुम्ही तुमच्या योनीतून येणारा अप्रिय स्त्राव पाहता तेव्हा निश्चितच चिंता वाटू शकते आणि आपल्या डॉक्टरांशी याबद्दल चर्चा करणे देखील लाजिरवाणे असू शकते. अंड्याच्या पांढऱ्या बालकासारखा मलईदार किंवा फिकट पिवळ्या रंगाचा स्त्राव पूर्णपणे सामान्य आहे. परंतु जर हा स्त्राव विचित्र रंगाचा झाला आणि त्याची दुर्गंधी वाढत असेल तर त्यासाठी तुम्हाला वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल.

आणखी वाचा:

गरोदर असताना छातीत दुखणे – कारणे आणि उपचार
गरोदरपणातील सर्दीवर परिणामकारक घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article