गर्भधारणेचे दोन प्रकार आहेत. काही गर्भधारणा नियोजित असतात आणि काही नसतात. नियोजित नसताना, गर्भधारणा केव्हा झाली ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. नियोजित नसताना गर्भधारणा झाल्यानंतर त्याचे आरोग्याशी संबंधित इतर परिणाम आहेत. उदाहरणार्थ, काही वेळा डॉक्टरांनी अनावश्यकपणे प्रसूती प्रेरित केलेली असते कारण गर्भ किती महिन्यांचा आहे याबद्दल अनिश्चितता असते. ह्याचा परिणाम म्हणून बाळाचा जन्म अकाली होऊ शकतो. […]
गर्भारपण म्हणजे तुम्हाला मिळालेला एक आशीर्वाद आहे. तुम्ही तुमच्यापेक्षा तुमच्या बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोतोपरी काळजी घेत असता. नववा महिना म्हणजे तिसऱ्या तिमाहीचे, प्रसूतीच्या आधीचे काही दिवस होय. त्यामुळे ह्या कालावधीत तुम्हाला जितके जास्त निवांत राहून आराम करता येईल तितका करा. तुम्हाला हालचाल करताना जड आणि अस्वस्थ वाटेल, परंतु तुमच्या बाळाला भेटण्याची ओढ आणि उत्साह […]
हे सर्वज्ञात आहे की तुम्ही निरोगी असल्यास आणि तुमची जीवनशैली निरोगी असेल तर गर्भधारणेची शक्यता खूप जास्त असते. वजन जास्त असल्यास गर्भधारणेची शक्यता कमी होते कारण संप्रेरकांची पातळी वर खाली होत असते. ओव्यूलेशन वर त्याचा परिणाम होतो आणि स्त्रीबीजाची गुणवत्ता सुद्धा कमी होते. जास्त वजनामुळे ओव्यूलेशन वर परिणाम होऊन मासिक पाळी अनियमित होते. लठ्ठ असूनही […]
गरोदरपणात तुम्ही स्वतःची काळजी घेता आणि चांगल्या आरोग्यासाठी निरोगी सवयीचे पालन करता. त्यामुळे, गरोदरपणात तुम्हाला सर्दी आणि फ्लू किंवा इतर काही किरकोळ आजार झाल्यास तुम्हाला औषधे घेण्याची भीती वाटू शकते. गरोदरपणात, सामान्य आजारांसाठी बहुतेक औषधे वापरण्यास सुरक्षित असतात परंतु औषधे घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. गरोदरपणात सुरक्षित औषधे कशी निवडावीत? तुम्ही गर्भवती नसताना सुद्धा औषधांशी संबंधित […]