Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण “माझ्या गरोदरपणात मी किती आहार घेतला पाहिजे?”- गरोदरपणातील आहाराविषयी अशाच काही प्रश्नांची उत्तरे!

“माझ्या गरोदरपणात मी किती आहार घेतला पाहिजे?”- गरोदरपणातील आहाराविषयी अशाच काही प्रश्नांची उत्तरे!

“माझ्या गरोदरपणात मी किती आहार घेतला पाहिजे?”- गरोदरपणातील आहाराविषयी अशाच काही प्रश्नांची उत्तरे!

गरोदरपणात तुमच्या बाळाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी गरोदरपणातील तुमचा आहार काय असावा ह्याविषयी अनेक सल्ले मिळतात. परंतु ह्यापैकी काही सल्ले अगदी विरोधाभासी असू शकतात आणि आपल्याला आहाराच्या निवडीबद्दल काळजी वाटू शकते. गरोदरपणातील आहाराविषयीच्या प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी ह्या लेखाद्वारे मिळवा!

गरोदरपणातील आहाराबद्दल सामान्य प्रश्न

गर्भधारणा झाल्यानंतर चिंता आणि समस्या असतातच. काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल विचार करण्यापासून ते मॉर्निंग सिकनेस आणि वेगाने वजन वाढण्यापर्यंत, गरोदरपण ही एक रोलर कोस्टर राईड आहे. आम्हाला खात्री आहे कि गरोदरपणातील योग्य आहाराबद्दल तुम्हाला बरेच प्रश्न असतील. तुमच्या बाळाला सर्वोत्तम पोषण मिळण्यासाठी ह्या काळात तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही येथे गरोदरपणतील आहाराविषयी काही सामान्यतः विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देत आहोत.

गरोदरपणातील आहाराविषयी सामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न

१. मला मॉर्निंग सिकनेसचा त्रास होत असल्यास काय खावे आणि प्यावे?

मॉर्निंग सिकनेस, किंवा मळमळ आणि उलटीची भावना  गरोदरपणातील खूप सामान्य भावना आहे. मानवी कोरिओनिक गोनाडोट्रोपिन (एचसीजी) वर शरीराच्या प्रतिक्रियेमुळे असे होते, असे मानले जाते.  एचसीजी हे गरोदरपणात तयार होणारे संप्रेरक आहे. मॉर्निंग सिकनेस कमी करण्यासाठी स्निग्ध किंवा मसालेदार अन्न टाळण्याची शिफारस आहारतज्ञ करतात. म्हणून, मऊ आणि कोरडे अन्न निवडा. कमी चरबीयुक्त पण कर्बोदकांचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ चांगले काम करतात. ह्यामध्ये ब्रेड आणि पास्ता इत्यादींचा  समावेश आहे.

ह्याव्यतिरिक्त, जेवल्यानंतर झोपणे टाळा कारण त्यामुळे पचन मंदावते. पचनास मदत करण्यासाठी पचायला जड अन्नाऐवजी थोडे थोडे आणि वारंवार खा. मॉर्निंग सिकनेसचा सामना करण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि दिवसाऐवजी रात्री जीवनसत्त्वे घ्या.

२. मी शाकाहारी असल्यास काय?

जर तुम्ही शाकाहारी असाल आणि गरोदर असाल, तर तुम्हाला फक्त मसूर, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या इत्यादी शाकाहारी स्रोतांमधून पुरेसे प्रथिने मिळत आहेत ना ह्याकडे लक्ष ठेवा.

३. गरोदरपणात मी किती खावे?

गरोदरपणात दैनंदिन कॅलरीजचे प्रमाण तुमच्या वजनावर अवलंबून असते. जर तुमचा बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) सामान्य असेल, तर तुम्हाला पहिल्या दोन तिमाह्यांमध्ये दररोज २००० कॅलरीजचे सेवन करणे आवश्यक आहे आणि तिसऱ्या तिमाहीत ते २२०० कॅलरीज पर्यंत प्रतिदिन वाढवणे आवश्यक आहे. गर्भधारणेच्या वेळी तुमचे वजन जास्त होते की कमी होते त्यानुसार कॅलरीजचे प्रमाण बदलेल. तुम्हाला जुळी किंवा एकाधिक बाळे होणार असतील तर त्यानुसार सुद्धा हे प्रमाण बदलू शकते. आपल्या शरीरासाठी योग्य असे सर्वकाही समजून घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला हे माहीत आहे का: बहुतेक गरोदर स्त्रिया जेव्हा गर्भवती होतात तेव्हा त्यांना ‘दोघांसाठी खाणे’ सुरू करण्यासाठी सांगितले जाते, परंतु ते खरे नाही. तुम्हाला तुमच्या नेहमीच्या आहारात आणखी २०० कॅलरी जास्त घ्याव्या लागतील आणि तेही फक्त तिसऱ्या तिमाहीमध्ये. दोघांसाठी खाल्ल्याने गरोदरपणात  वजन वाढेल आणि ते तुम्हाला प्रसूतीनंतर कमी करावे लागेल.

४. गरोदरपणात वाढलेले वजन कसे व्यवस्थापित करावे?

गरोदरपणात वजन वाढणे अगदी सामान्य आणि अपेक्षित आहे हे आधी समजून घेणे आवश्यक आहे, परंतु तरीही खूप जास्त प्रमाणात वजन वाढणे अपेक्षित नाही. सर्वात आधी तुम्ही दोघांसाठी खात नाही ना हे लक्षात ठेवा. (तुमचे बाळ प्रौढाचा एक अंश आहे). तुमच्या तृष्णेसाठी आरोग्यदायी पर्याय शोधा (उदा: दह्यासोबत आइस्क्रीमचा पर्याय घ्या), ‘लवकर झोपून लवकर उठा’ आणि स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. तुम्ही दिवसभरात काही प्रमाणात शारीरिक हालचाल केली पाहिजे हे सांगण्याची गरज नाही- प्रसवपूर्व योगवर्गात नोंदणी करा किंवा संध्याकाळी फिरायला जा. मुख्य म्हणजे स्वतःला सक्रिय आणि हालचाल ठेवणे महत्वाचे आहे. सर्वात शेवटी, वेळोवेळी आनंद घ्या परंतु आपण काय खात आहोत  ह्याचा नेहमी मागोवा ठेवा कारण त्याचा परिणाम तुमच्या आत वाढणाऱ्या लहान बाळावर होईल.

५. अन्नाच्या विषबाधेचा माझ्या गरोदरपणावर कसा परिणाम करू शकते?

सौम्य अन्न विषबाधेमुळे तुमच्या बाळाला जास्त हानी होणार नाही, परंतु साल्मोनेला आणि इ. कोलाय ह्या सारख्या विशिष्ट प्रकारच्या अन्न विषबाधा तुमच्या बाळासाठी धोकादायक असू असतात आणि अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये गर्भपात किंवा मुदतपूर्व जन्म देखील होऊ शकतो. म्हणून, अन्न विषबाधा झाल्याचा संशय येताच लगेच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्न विषबाधेच्या काही सामान्य लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या आणि अतिसार, डोकेदुखी, ताप, ओटीपोटात दुखणे किंवा अस्वस्थता, डिहायड्रेशन इत्यादींचा समावेश होतो. तसेच तुम्ही खाल्लेल्या अन्नाची काळजी घ्या कारण ह्या टप्प्यावर तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे.

तुम्हाला हे माहीत आहे का?: लिस्टेरिया हा एक जीवाणू आहे आणि तो न शिजवलेले मांस आणि भाज्या, पाश्चराइझ न केलेले दूध आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांच्यामध्ये आढळतो. हे जिवाणू लिस्टेरिओसिसचे कारण बनतात. हा अन्नाच्या विषबाधेचा  एक प्रकार आहे आणि त्यामुळे बाळाला संसर्ग, गर्भपात, मुदतपूर्व जन्म इ. समस्या उद्भवतात. गर्भवती महिलांना लिस्टेरिओसिसचा धोका जास्त असतो. पाश्चरायझेशन आणि स्वयंपाक करून लिस्टेरिया मारला जाऊ शकतो.

गरोदरपणात काय खावे आणि काय खाऊ नये

६. गरोदरपणात कृत्रिम स्वीटनर्स घेणे ठीक असते का?

जवळपास सहा प्रकारचे स्वीटनर्स आहेत आणि त्यामध्ये सर्वात सामान्य एस्पार्टम, सुक्रॅलोज आणि सॅकरिन आहेत. हे कृत्रिम स्वीटनर बहुतेक वेळा गरोदरपणात सुरक्षित असतात. परंतु, काही प्रकरणांमध्ये जेव्हा आईला फिनाइलकेटोन्युरिया (पीकेयु) नावाची अनुवांशिक समस्या असते तेव्हा गरोदरपणात एस्पार्टम टाळणे आवश्यक आहे कारण पीकेयु ह्या गोड पदार्थात सापडलेल्या एन्झाईमवर प्रक्रिया करण्याच्या शरीराच्या क्षमतेवर परिणाम करते. त्यामुळे बाळामध्ये जन्म दोष निर्माण होऊ शकतात. कोणतेही धोके टाळण्यासाठी आणि कोणत्याही कृत्रिम स्वीटनरची निवड करण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

७. मी गरोदर असताना आंबवलेले अन्न खाऊ शकते का?

होय, गरोदरपणात आंबवलेले अन्न (उदाहरणार्थ: घरगुती दही, लोणचे) तुम्ही खाऊ शकता. खरं तर, आंबवलेले पदार्थ तुमच्या शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असताना तुमचे आणि तुमच्या बाळाचे संरक्षण करण्यास मदत करतात! हे पदार्थ गरोदरपणात सामान्य असलेल्या कोणत्याही प्रकारच्या यीस्ट संसर्गापासून देखील तुमचे संरक्षण करतील.

८. गरोदरपणात कोणते चीज टाळावे?

साच्यात पिकलेले चीज ज्यामध्ये ब्री, कॅमेम्बर्टन (मऊ शेळ्यांचे चीज) आणि शेव्हरे सारखे प्रकार असतात असे चीज टाळावे. परंतु, मोझारेला, फेटा, क्रीम चीज, पनीर, रिकोटा ह्यासारखे पाश्चराइझ केलेल्या दुधापासून बनवलेले चीज आणि चीज स्प्रेडसारखे प्रक्रिया केलेल्या चीजचे सुरक्षितपणे सेवन केले जाऊ शकते.

९. गरोदरपणात मी पॅक केलेले सॅलड खाऊ शकते का?

शक्यतोवर, पॅकेज केलेले सॅलड टाळा. जरी हे सॅलेड धुतलेल्या भाज्या आणि शिजवलेले मांस वापरून तयार केले असले तरीही ते टाळणे आवश्यक आहे कारण सॅलड तयार होऊन ते खाईपर्यंत त्यामध्ये विषाणूंची वाढ होऊ शते. तसेच ह्याव्यतिरिक्त, सीझर सॅलडसाठी कच्च्या अंडयाचे ड्रेसिंग बनवले जाते ते सुद्धा टाळणे आवश्यक आहे. घरी तयार केलेल्या पदार्थांसह ताजे सॅलड बनवणे चांगले. तसेच, रांच आणि इटालियन ड्रेसिंग सारख्या घटकांचा वापर करा. गरोदरपणात खाण्यास परवानगी असलेल्या घटकांपासून ते बनवलेले असतात.

१०. गरोदरपणात किती कॅफीन घेण्याची परवानगी आहे?

कॅफीन सेवन आणि त्यामुळे होणारे गर्भपात किंवा अकाली जन्म ह्यावर यावर वेगवेगळी मते आहेत. अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की जोपर्यंत कॅफिनचा वापर दररोज जास्तीत जास्त २०० मिलीग्रामपर्यंत मर्यादित असतो तोपर्यंत गर्भपात किंवा मुदतपूर्व जन्म होण्याची शक्यता नाही. परंतु, लक्षात ठेवा की १८०-२०० मिली कॉफीच्या कपमध्ये सुमारे ७० ते १४० मिलिग्रॅम कॅफिन असते आणि अशा प्रकारे तुम्ही दिवसभरात एक कप कॉफी पिऊ शकता. कॅफिनच्या इतर स्त्रोतांमध्ये चॉकलेट, चहा आणि थंड कॅफिनयुक्त पेये यांचा समावेश होतो.

११. गरोदरपणात तुम्ही पौष्टिक आहाराचे नियोजन करू शकता का?

तुम्ही तुमच्या गरोदरपणाचा किती टप्पा पार केलेला आहे तसेच दिवसभरात तुम्हाला किती शारीरिक हालचाल करता ह्यावर ते अवलंबून असते. तुम्ही दररोज तुमच्या एकूण कॅलरींचे प्रमाण ठरवू शकता. ह्या कॅलरीज तुम्ही विविध अन्न गटांमध्ये विभाजित करा आणि धान्य, भाज्या आणि फळे, प्रथिने/मांस उत्पादने आणि दुग्धजन्य पदार्थ ह्यांचे निश्चित प्रमाण ठरवा. तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला तुमच्या आहाराच्या गरजांबद्दल काही सल्ला दिलेला असेल तर त्याचे पालन तुम्ही केले पाहिजे. गरोदरपणासाठी पौष्टिक जेवण योजना तयार करण्यासाठी तुम्ही त्यांचा सल्ला घेऊ शकता.

पहा: तुमच्या गरोदरपणाच्या आहारात १०  सुपर फूड्स असणे आवश्यक आहे:

१२. गरोदरपणात तेले आणि चरबी हे निरोगी आहाराचे भाग आहेत का?

विशेषत: गरोदरपणात, काही प्रकारची चरबी आणि तेले तुमच्या शरीरासाठी चांगले असतात आणि जेव्हा धान्य, भाज्या, फळे आणि मांस किंवा दुधाचे पदार्थ यांसारख्या पदार्थांसह हे घटक खाल्ले जाते तेव्हा ते पौष्टिक आहाराचा भाग असतात. परंतु, प्रक्रिया केलेले लोणी, अंडयातील बलक इत्यादी खाद्यपदार्थांमध्ये आढळणारी चरबी म्हणजे ‘रिक्त कॅलरीज’ असतात आणि त्या आरोग्यासाठी चांगल्या असतात.  त्या कमी प्रमाणात खाणे आवश्यक आहे.

१३. गरोदरपणात मांसाहार सुरक्षित आहे का?

होय,सावधगिरी बाळगली असेल तर गरोदरपणात मांसाहारी पदार्थ सुरक्षित असतात. चिकन आणि अंड्याचा पांढरा भाग ह्यासारखे अन्न हे प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत, तर मासे ओमेगा ३ फॅटी ऍसिड प्रदान करतात आणि ते गर्भवती महिलांसाठी अत्यंत महत्वाचे असतात. परंतु, जिवाणूंचा संसर्गाचा धोका  टाळण्यासाठी चांगले शिजवलेले आणि घरी बनवलेले मांस खाण्याचे लक्षात ठेवा. ह्याशिवाय, सुशी, कच्ची अंडी आणि मासे ह्यामध्ये पाऱ्याचे प्रमाण भरपूर असते उदा: मॅकरेल, स्वॉर्ड फिश, टाईलफिश इत्यादि खाणे टाळा कारण त्यामुळे तुमच्या बाळाच्या विकासाला हानी पोहचू शकते.

१४. मी गरोदरपणात सीफूड खाऊ शकते का?

मागील प्रश्नात चर्चा केल्याप्रमाणे, काही सीफूड प्रकारांमध्ये उच्च पारा असू शकतो त्यामुळे बाळाच्या विकासास हानी पोहोचू शकते. परंतु मॅकेरल, शार्क आणि स्वॉर्ड फिश यांसारखे काही प्रकारचे मासे वगळले पाहिजेत. समुद्री अन्न खाताना ते चांगले शिजवलेले आहे ना ते पहा. आपल्याला त्याचा स्रोत माहित असावा- व्यावसायिक सीफूड तपासले जाते आणि नियंत्रित केले जाते, परंतु जर आपण ताजे सीफूड वापरत असाल तर मासे खाणे सुरक्षित असल्याची खात्री करा. मासे आणि शेलफिश हे ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् आणि प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत म्हणून, जर तुम्ही मासे खात असाल तर तुम्ही आहारातून ते पूर्णपणे वगळू नका.

गरोदरपणातील पोषण आणि पूरक आहार

१५. गरोदरपणात मल्टीविटामिन आणि इतर पूरक आहार का आवश्यक आहे?

तुमच्या गर्भाशयातील बाळाला सर्व पोषक तत्वे मिळत असल्याची खात्री करण्यासाठी, तुम्ही संतुलित आहार राखणे आवश्यक आहे. ह्या संवेदनशील काळात कोणतीही कमतरता टाळण्यासाठी योग्य-संतुलित आहाराव्यतिरिक्त, काही प्रसूतीपूर्व जीवनसत्त्वे आणि पूरक आहार घेणे देखील महत्त्वाचे आहे. तुम्हाला आवश्यक पोषकतत्वे पुरेशा प्रमाणात अन्नातून मिळत नाहीत आणि इथेच पूरक आहार तुम्हाला मदत करेल. सर्व स्त्रियांसाठी व्हिटॅमिन डी आणि फॉलिक अ‍ॅसिड यांसारखी काही पूरक औषधे आवश्यक असली तरी, इतर सप्लिमेंट्स महिलांसाठी विविध कारणांमुळे बदलतात. तुमचे डॉक्टर त्यासाठी तुम्हाला चांगले मार्गदर्शन करतील.

१६. संपूर्ण गरोदरपणात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची आवश्यकता का असते?

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे गरोदरपणाच्या आहारात अत्यंत महत्वाचे पोषक घटक आहेत. कॅल्शियम शोषण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे आणि ते एकत्रितपणे तुमच्या बाळाच्या हाडांच्या विकासासाठी आणि तुमच्या हाडांच्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. ह्याशिवाय, व्हिटॅमिनडी चा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही प्रभाव पडतो. दुसरीकडे कॅल्शियम तुमच्या बाळाची हाडे, दात, निरोगी हृदय, नसा आणि स्नायूंच्या विकासासाठी आवश्यक आहे आणि ते गर्भवती महिलांमध्ये उच्च रक्तदाब आणि प्रीक्लेम्पसियाचा धोका देखील कमी करते.

१७. गरोदरपणात आवश्यक असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे मी अतिरिक्त प्रमाणात कशी मिळवू शकते ?

गरोदरपणात तुम्ही संतुलित आणि निरोगी आहाराचे पालन केल्यास तुमच्या बहुतेक पौष्टिक गरजा पूर्ण केल्या जातील, परंतु विशिष्ट जीवनसत्त्वे आणि खनिजे अतिरिक्त प्रमाणात आवश्यक असतील आणि ती तुम्हाला फक्त आहारातून मिळणे कठीण जाईल. यामध्ये लोह, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी इत्यादींचा समावेश आहे. तुमचा आहार आणि आरोग्य यावर आधारित, तुमचे डॉक्टर गरोदरपणात तुमच्या जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मल्टीविटामिन आणि पूरक आहाराची शिफारस करतील.

१८. सर्वाधिक पोषक द्रव्ये मिळविण्यासाठी मी संपूर्ण दूध प्यावे का?

होय, कमी चरबीयुक्त किंवा स्किम दुधापेक्षा संपूर्ण दूध हा एक चांगला पर्याय आहे कारण ह्या दुधातून तुमच्या बाळाला विकासास आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे मिळतात, तसेच आईच्या आरोग्यासाठी सुद्धा ते फायदेशीर असते.

१९.. फॉलिक ऍसिड घेण्यास सुद्धा खूप उशीर झाला आहे का?

गरोदरपणात, तुमच्या फोलेटची पातळी वाढणे आवश्यक आहे आणि त्या गरजा फक्त आहाराद्वारे पूर्ण करणे कठीण होते. फोलेट तुमच्या बाळाच्या न्यूरल ट्यूबच्या विकासात योगदान देते. न्यूट्रल ट्यूब नंतर  मेंदू आणि मणक्यामध्ये विकसित होते. पहिल्या बारा आठवड्यांमध्ये न्यूरल ट्यूब तयार होते, त्यामुळे ह्या काळात तुम्ही फॉलिक ऍसिड सप्लिमेंट्स घेणे महत्त्वाचे आहे. परंतु,  बारा आठवड्यांनंतर फॉलिक ऍसिड घेतल्याने न्यूरल ट्यूबवर फारसा परिणाम होणार नाही – परंतु तुम्हाला हानी पोहोचणार नाही आणि तुमच्या गरोदरपणात ते घेणे सुरक्षित आहे.

२०. काही हर्बल सप्लिमेंट्स मदत करू शकतात का?

काही हर्बल सप्लिमेंट्स गर्भवती महिलांसाठी चांगली मानली जातात त्यात आले, कॅमोमाइल, नेटल लिव्ज   इत्यादीसारख्या शक्तिवर्धक औषधी वनस्पतींचा समावेश होतो. ही सप्लिमेंट्स सेवनासाठी सुरक्षित असतात आणि ती चहामधून किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात घेतली जाऊ शकतात. परंतु,  केवळ औषधी वनस्पती नैसर्गिक असल्यामुळे ते आपले नुकसान करू शकत नाहीत हा एक सामान्य गैरसमज आहे. हे खरे नाही. गरोदरपणात काही औषधी वनस्पतींचे सेवन केल्यास ते प्राणघातक ठरू शकतात आणि त्यामध्ये कोरफड, तुळस तेल, कडू संत्रा इ. यांचा समावेश आहे. तसेच, या औषधी वनस्पतींचा परिणाम नियमित पूरक आहारांच्या संयोजनात करता येत नाही. म्हणून, कोणत्याही हर्बल सप्लिमेंट्सची निवड करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२१. आता मी गरोदर आहे माझ्या लोहाची पातळी वाढवण्यासाठी मी काय खाऊ शकते?

गरोदरपणात, तुमच्या शरीराला नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात लोहाची आवश्यकता असते आणि ती गरज  पूर्ण करण्यासाठी तुम्ही लोहयुक्त पदार्थ जसे की हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, मजबूत तृणधान्ये आणि धान्ये इत्यादींचे सेवन केले पाहिजे. तुमच्या शरीरात लोह शोषून घेण्यास मदत करण्यासाठी, व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचा समावेश करा. उदा: लिंबूवर्गीय फळे, ताज्या भाज्या इ. याव्यतिरिक्त तुम्ही घेऊ शकता अशा लोह सप्लिमेंटसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आम्ही तुमच्या गरोदरपणाच्या समस्यांचे संक्षिप्तपणे निराकरण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे. आम्हाला आशा आहे की तुम्ही शोधत असलेली उत्तरे तुम्हाला मिळाली आहेत. परंतु प्रत्येक स्त्रीचे शरीर आणि गरोदरपण वेगवेगळे असते. ह्या काळात तुमच्या शरीरात होत असलेल्या बदलांचे मार्गदर्शन करण्यासाठी तुमचे डॉक्टर हे सर्वोत्तम व्यक्ती आहेत. निरोगी खा, सकारात्मक रहा. तुम्हाला आनंदी गरोदरपणासाठी शुभेच्छा!

आणखी वाचा:

गरोदरपणात सुकामेवा खाणे: सुरक्षित आहे का? फायदे आणि बरंच काही
गरोदरपणात नारळपाणी घेणे: फायदे, दंतकथा आणि बरेच काही
RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article