In this Article
२६ जानेवारी रोजी साजरा केला जाणारा प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे. ह्याच दिवशी आपली राज्यघटना १९५० साली अस्तित्त्वात आली. उत्सव काळात होणाऱ्या विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून, प्रजासत्ताकदिनाच्या भाषणाला अत्यंत महत्त्व आहे कारण प्रजासत्ताक दिनाच्या भाषणामुळे ह्या कार्यक्रमाची सुरुवात होते आणि त्याबद्दल आवश्यक माहिती आणि आपल्या देशाचा श्रीमंत आणि वैविध्यपूर्ण वारसा सामायिक करण्यास मदत करते. शाळांमध्ये हे प्रेरक भाषण लिहिण्याचे आणि देण्याचे काम बर्याचदा मुलांना दिले जाते. ह्या व्यतिरीक्त ह्या उपक्रमात भाग घेणे त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर असते कारण यामुळे त्यांची स्टेजची भीती व्यवस्थापित करण्यास मदत होते तसेच त्यांचे संशोधन, लेखन आणि वक्तव्य कौशल्य सुधारते.
२६ जानेवारी १९५० रोजी आपली भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली. तेव्हापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. सर्व भारतीय मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात. केवळ सर्व सरकारी कार्यालये हा दिवस साजरा करतात असे नाही तर शाळा, शैक्षणिक संस्था आणि निवासी संस्था देखील हा दिवस साजरा करतात. हे भाषण काळजीपूर्वक प्रस्तुत करणे आवश्यक आहे, तसेच ते प्रेक्षकांना प्रेरित करणारे प्रेरणादायी असले पाहिजे. आपल्या मुलासाठी प्रजासत्ताक दिनाचे भाषण तयार करण्यासाठी येथे तुमच्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत.
परिपूर्ण प्रजासत्ताक दिन भाषण तयार करण्यासाठी आपल्या बाळाला मदत करण्यासाठी टिप्स
१. संशोधन करा आणि एक्सप्लोर करा
प्रजासत्ताकदिनाचे महत्त्व तुम्हाला माहिती असले तरीही भाषण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी त्या विषयावर कसून संशोधन करा. तुम्हाला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला इंटरनेटवर सापडतील आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आपल्या मुलास संगणक कसा वापरायचा हे समजत असेल तर तुम्ही तुमच्या देखरेखीखाली प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती काढण्यास त्याला सांगू शकता.
२. वेळ – एक निर्णायक घटक
वक्त्याला दिलेला कालावधी जाणून घेतल्यानंतरच भाषणाची लांबी निश्चित केली जाऊ शकते. आपण निश्चित केलेली वेळ पाळा आणि त्यानुसार भाषणाची योजना तयार करा.
३. भाषणाचे स्वरूप
ठिकाण आणि प्रेक्षकांच्या अनुषंगाने तुम्हाला भाषणाच्या स्वरूपाची योजना आखण्याची आवश्यकता आहे. खाली काही मुद्दे आहेत जे आपल्याला प्रारूप निश्चित करण्यात मदत करू शकतात:
- जर हा कार्यक्रम शाळेत होत असेल तर अतिथी, प्राचार्य, शिक्षक, पालक आणि सहकारी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी काही ओळींनी भाषण सुरू करा.
- जर हा कार्यक्रम तुमच्या समाजात होत असेल तर अध्यक्ष, सचिव, प्रमुख पाहुणे व त्यानंतर उपस्थितांचे स्वागत करा.
- बोलण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता आणि अभिमान व्यक्त करा.
- घटनेचा अर्थ व ती कशी अस्तित्वात ह्याविषयी स्पष्टीकरण द्या.
- हा दिवस कसा देशभर साजरा केला जातो त्याचे वर्णन करा.
- भारतीय सैन्यातील स्वातंत्र्य सैनिकांना त्यांचे धैर्य व शौर्याबद्दल आदरांजली वहा.
- शेवटी, आभार मानून समारोप करा.
- जय हिंद! किंवा वंदे मातरम्! ने भाषणाचा शेवट करा.
४. तुमच्या मुलाला भाषण लिहू द्या
तुमच्या मुलाला त्याच्या स्वत: च्या हस्ताक्षरात भाषण लिहू द्या, उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण सूचना इत्यादी चिन्हांकित करा. मुलाला सराव करताना किंवा भाषण देताना काय पाहावे हे समजेल आणि त्याच्यासाठी ते अधिक आरामदायक होईल.
५. आपल्या मुलाला भाषण लक्षात ठेवण्यास मदत करा
भाषणामध्ये काही विशेष तथ्ये असतील, तर तुमचे मूल कदाचित ते विसरेल किंवा जेव्हा तो / ती स्टेजवर असेल तेव्हा त्या क्रमात गोंधळ घालू शकेल. म्हणूनच, आपल्या मुलास भाषणातील तथ्ये आणि लोकांची नावे लक्षात ठेवण्यास मदत करा. गोष्टीरूपात संपूर्ण ऐतिहासिक घटकास अचूक तपशीलाने स्पष्ट केल्याने भाषण मनोरंजक होईल आणि लक्षात ठेवणे देखील सुलभ होईल.
६. प्रात्यक्षिक
जर तुमचे मूल योग्य पद्धतीने भाषण प्रस्तुत करण्यात अक्षम असेल तर तुम्ही स्वतः भाषण कसे करावे हे दर्शवून त्याला / तिला मदत करा. भाषण देताना कुठे थांबावे, उत्स्फूर्तपणे कुठे बोलावे, कुठे आवाज आणि स्वर बदलावा इत्यादीचे प्रशिक्षण द्या.
७. सराव
आपल्या मुलाने प्रेक्षकांसमोर भाषण सादर करण्यापूर्वी त्याने बर्याच वेळा सराव करण्याची आवश्यकता आहे. तुमचे मूल भाषणाची तालीम देत असेल तर तुम्ही कुटुंबास तेथे जाण्यास सांगू शकता. भाषणाची तालीम केल्याने तुमच्या मुलाला स्टेजची भीती वाटणार नाही आणि त्याचा आत्मविश्वास वाढविण्यात मदत होऊ शकते.
प्रजासत्ताक दिनाचे भाषण देण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला कसे तयार करू शकता हे तुम्हाला आता माहित आहे. प्रजासत्ताक दिनाचे भाषण लिहिण्यास मदत करण्यासाठी आपल्यासाठी इथे भाषणाचा एक नमुना देत आहोत.
मुलांसाठी प्रजासत्ताकदिन भाषण
सर्वांना शुभ प्रभात / शुभ संध्याकाळ!
या शुभ प्रसंगी आदरणीय मुख्य अतिथी, मुख्याध्यापक, आमचे प्रिय शिक्षक आणि माझ्या सहकारी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना मला आनंद वाटतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आदरणीय शिक्षकांचा मी आभारी आहे. आज आपण आपल्या महान राष्ट्राच्या – प्रजासत्ताक दिनाच्या इतिहासाच्या सर्वात महत्वाच्या दिवसाच्या स्मरणार्थ येथे जमलो आहोत.
डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना अधिकृत उपयोगात आली तेव्हा २६ जानेवारी १९५० रोजी भारताने प्रजासत्ताक दिन सर्वप्रथम साजरा केला. आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी हजारो रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील राजपथ येथे तिरंगा फडकावला.
तेव्हापासून, भारत राजपथवर प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहे आणि देशाचे कार्यवाह अध्यक्ष राष्ट्रध्वज फडकावत आहेत. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण सोहळा आणि राष्ट्रगीतानंतर भारतीय राज्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाने रंगलेल्या फ्लोट्सनी सजलेली परेड होते.
तथापि, मुख्य आकर्षण म्हणजे भारतीय सैन्यदलाचे धैर्य आणि सक्षम प्रदर्शन हे होय , ज्याचा मला खरोखर अभिमान वाटतो.
परमवीर चक्र, वीर चक्र आणि महावीर चक्र यासारख्या शौर्य पदकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या वीर सैनिकांना राष्ट्रीय धैर्य पुरस्कार देऊन सर्वोच्च पदवी आणि निस्वार्थ त्यागासाठी गौरविले जाते. ह्या समारंभाने माझे अंतःकरण जड होते.
मुलांच्या शौर्याचा देखील गौरव केला जातो आणि त्यांना प्रोत्साहित केले जाते.
आपण ज्यांच्यामुळे आज ह्या दिवशी इथे आहोत त्या स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि त्याग आणि वेदनांचा आदर राखूयात. मी त्या शूर वीरांना सलाम करतो!
शेवटी, पुन्हा एकदा माझ्या प्रिय देशाबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि प्रेक्षकांनी सुद्धा माझे भाषण धीराने ऐकल्याबद्दल धन्यवाद देतो.
जय हिंद! जय भारत!
आम्हाला आशा आहे कि ह्या लेखात दिलेल्या टिप्स तुमच्या लहान मुलासाठी एक परिपूर्ण भाषण तयार करण्यात मदत करतील आणि आत्मविश्वासाने भाषण देण्यास त्याची मदत होईल. योग्य लिहिलेले भाषण जेव्हा योग्य प्रकारे दिले जाते तेव्हा देशप्रेमाची भावना निर्माण होऊ शकते आणि श्रोत्यांनाही प्रेरणा मिळते. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलास भाषणाची तयारी करण्यास मनापासून मदत करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा प्रेक्षक मोठ्याने टाळ्यांच्या गजरात भाषणाचे कौतुक करतील आणि त्याचा तुम्ही अभिमान बाळगू शकता.
आणखी वाचा:
तुमच्या मुलांना प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती द्या
१ ली, २ री आणि ३ री च्या मुलांसाठी प्रजासत्ताक दिनाविषयी निबंध