Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात पोटावर खाज सुटणे

गरोदरपणात पोटावर खाज सुटणे

गरोदरपणात पोटावर खाज सुटणे

जसजसे गरोदरपणाचे दिवस पुढे सरकतात तसे स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. सर्वात रोमांचक बदलांपैकी एक म्हणजे तुमचे वाढणारे पोट! ‘बेबी बंप’ दाखवणे ही एक आनंददायी भावना आहे, परंतु त्यासोबत तुम्हाला नवीन आव्हानाचा सामना सुद्धा करावा लागू शकतो आणि ते आव्हान म्हणजे  म्हणजे पोटाचा आकार वाढल्यामुळे पोटाला खाज सुटू शकते.

गरोदरपणात पोटात खाज येणे सामान्य आहे का?

होय, गरोदरपणात पोटावर खाज येणे सामान्य आहे. तुमचे गर्भारपणाचे दिवस जसजसे पुढे सरकतात तसे  तुमच्या पोटाची त्वचा ताणली जाते. त्वचा ताणली गेल्यामुळे कोरडी पडते आणि ओलावा नसलेल्या त्वचेला खाज सुटते. तुमच्या शरीरात होणाऱ्या संप्रेरकांमधील बदलांमुळे असे घडते. तुम्हाला शरीराच्या इतर भागांवर, म्हणजेच तुमचे हाताचे तळवे आणि अगदी तुमच्या स्तनांवरही खाज येऊ शकते. खाज सुटणे सहसा दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी सुरू होते. परंतु पहिल्या तिमाहीत देखील तुम्ही हा अनुभव घेऊ शकता. खाज येणे अत्यंत अस्वस्थ करणारे असू शकते. खाज सुटणे वाढत आहे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.

गर्भवती असताना खाज सुटण्याची कारणे

गरोदरपणात पोटावर खाज सुटण्याची सर्वात सामान्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

 • संप्रेरकांमध्ये बदल: इस्ट्रोजेनच्या वाढलेल्या पातळीमुळे गरोदरपणात पोटावर कमी आणि तळव्यांवर अधिक प्रमाणात खाज सुटते.
 • वजन वाढणे: वाढत्या गर्भाशयामुळे पोटाची त्वचा ताणली जाते. ताणलेली त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटते.

पोटावर खाज सुटणे धोकादायक असू शकते का?

पोटाला खाज सुटणे हे जरी सामान्य असले तरी काही वेळा गरोदर असताना पोटावर खाज सुटणे ही गंभीर चिंतेची बाब असू शकते, जसे की

१. प्रुरिटिक अर्टिकेरियल पॅप्युल्स आणि प्लेक्स ऑफ प्रेग्नन्सी

पीयुपीपीपी हे त्वचेवर येणारे पुरळ असतात आणि त्यामुळे गर्भवती महिलेच्या पोटाला खाज सुटते. जरी ही फार धोकादायक स्थिती नसली तरी त्यामुळे खूप अस्वस्थता येऊ शकते.

२. गरोदरपणामधील प्रुरिगो

ह्या समस्येमध्ये त्वचेवर किडा चावल्यासारखे दिसते आणि काही काळानंतर ते कापल्यासारखे दिसते. धड आणि हातपायांना खाज येऊ शकते.  दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी किंवा तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला असे होऊ शकते.

३. इम्पेटिगो हर्पेटिफॉर्मिस

ही दुर्मिळ स्थिती सोरायसिसचा एक प्रकार आह. गरोदरपणात स्त्रीला ही समस्या उद्भवू शकते. स्त्रीला पू असलेले लहान पुरळ येऊ शकतात. ह्या स्थितीमध्ये गरोदर स्त्री आणि तिच्या बाळाचे बारकाईने निरीक्षण केले जाते.

४. पेम्फिगॉइड गेस्टेशनिस

ह्या स्थितीमध्ये सुरुवातीला लहान पुरळ येतात. त्यांना खाज सुटते आणि नंतर हळूहळू त्याचे मोठे फोड तयार होऊन जखमा होतात. सुरुवातीला हे फोड नाभीभोवती येतात आणि नंतर गरोदर स्त्रीच्या शरीरावर इतरत्र पसरतात.

५. कोलेस्टेसिस

कोलेस्टेसिसमुळे गरोदरपणात यकृताचा त्रास होतो आणि गर्भवती स्त्रीला संपूर्ण शरीरावर खाज सुटू शकते. ही स्थिती पोटातील बाळासाठी अत्यंत हानिकारक असू शकते आणि त्वरित उपचारांची आवश्यकता असते.

डॉक्टरांची मदत कधी घ्यावी?

खालील परिस्थितीत तुम्ही त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी:

 • तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीरावर खाज सुटते.
 • तुम्हाला असे वाटते की खाज तीव्र आहे आणि शरीराच्या इतर भागांमध्ये देखील पसरत आहे.
 • त्वचेचा कोरडेपणा हे खाज येण्याचे कारण नाही असे तुम्हाला वाटते.
 • मळमळ, थकवा आणि भूक न लागणे यासोबतच तुम्हाला तुमच्या आतड्यांचा आणि लघवीच्या रंगात बदल झालेला दिसून येतो.
 • पियूपीपी मुळे तुम्हाला पुरळ आणि खाज येण्याचा गंभीर त्रास होतो.

गरोदरपणात पोटात खाज येण्यासाठी घरगुती उपाय

खाली काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय खाज सुटण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात:

१. कोरफड

कोरफड

कोरफड दिवसातून दोनदा प्रभावित भागाला लावा. ही वनस्पती औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते आणि त्यामुळे कोरडी आणि खाज सुटणारी त्वचा शांत होण्यास मदत होते.

२. ओटमील बाथ

आंघोळीच्या पाण्यात ओटमील घालून आंघोळ करा. ओटमीलचे सुखदायक गुणधर्म खाज सुटण्यापासून आराम देतात.

३. बेकिंग सोडा बाथ

बेकिंग सोडा आणि पाण्यापासून तयार केलेली पेस्ट प्रभावित भागावर लावा आणि कोरडे होऊ द्या. बेकिंग सोडा लालसरपणा आणि खाज सुटण्यावर प्रभावी आहे

४. कोल्ड कॉम्प्रेशन

प्रभावित भागावर कोल्ड कॉम्प्रेस ठेवल्यास त्वचेची जळजळ आणि खाज कमी होऊ शकते.

५. जुनिपर बेरी तेल

जुनिपर बेरी तेल

ज्युनिपर बेरी शोधणे कठीण असले तरी, त्यांच्यापासून बनवलेले तेल खाज सुटलेल्या त्वचेवर आश्चर्यकारकरित्या कार्य करते.

६. लिंबाचा रस

लिंबाचा रस पाण्यात मिसळून पृष्ठभागावर लावल्यास त्वचेच्या खाज सुटण्यापासून आराम मिळतो.

७. बेसन पेस्ट

पाण्यात तयार केलेली बेसनाची पेस्ट बाधित भागावर लावल्याने त्वचा गुळगुळीत आणि मऊ होते आणि त्यामुळे कोरड्या त्वचेपासून आराम मिळतो.

८. खोबरेल तेल

खोबरेल तेल

पोटाला एक्स्ट्रा व्हर्जिन नारळ तेल लावा. कोरड्या त्वचेसाठी खोबरेल तेल एक उत्कृष्ट मॉइश्चरायझर आहे.

खाज सुटण्यावर उपाय

खाज सुटण्यापासून मुक्त होण्यासाठी खालील उपाय केले जाऊ शकतात:

 • तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या, कारण हायड्रेटेड त्वचेला खाज कमी येते.
 • एअर कंडिशनर पासून दूर रहा, कारण एसीच्या दीर्घकाळ संपर्कामुळे त्वचा कोरडी होते.
 • आपल्या त्वचेला वारंवार मॉइश्चरायझर लावा.
 • उष्ण हवामानात जास्त काळ बाहेर राहणे टाळा, कारण उष्ण हवामानामुळे कोरडेपणा होतो आणि खाज सुटते.
 • सैल, आरामदायक कपडे घाला कारण घट्ट कपडे त्वचेवर घासतात त्यामुळे त्वचेला कोरडेपणा येतो आणि खाज सुटते.
 • सौम्य साबण वापरा, कारण तीव्र वासाचे साबण त्वचेला कोरडे बनवतात.
 • गरम पाण्याने अंघोळ करू नका कारण गरम पाण्याने त्वचेचा नैसर्गिक ओलावा नाहीसा होतो.
 • मिठाचे सेवन कमी करा.

खाज कमी करण्यासाठी ओव्हर-द-काउंटर उत्पादने

गरोदरपणात पोटाला खाज सुटणे सामान्य आहे आणि त्यावर उपाय म्हणून अनेक औषधे उपलब्ध आहेत:

खाज कमी करण्यासाठी ओव्हर-द-काउंटर उत्पादने

१. व्हिटॅमिन ई लोशन

व्हिटॅमिन ई लोशन किंवा कॅप्सूलचा मध्यम प्रमाणात वापर केल्यास गरोदरपणात त्वचेवरची खाज कमी होण्यास मदत होते.

२. कॅलामाइन लोशन

खाज कमी करण्यासाठी दिवसातून काही वेळा कॅलामाईन लोशन लावा.

३. तेल-आधारित मॉइश्चरायझर्स

तेलावर आधारित मॉइश्चरायझर कोणत्याही औषधाच्या दुकानात सहज उपलब्ध असतात. खाज सुटण्यावर हे खूप प्रभावी आहेत.

गरोदरपणात पोटावर खाज सुटल्याने बहुतेक वेळा काही गंभीर समस्या निर्माण होत नाहीत. खाज सुटण्यावर उपचार करण्यासाठी, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन,  तुम्ही कोणतेही घरगुती उपाय किंवा औषधांचा वापर करू शकता. गरोदरपणात असामान्य खाज येत असल्याचे आढळल्यास तुम्ही तात्काळ वैद्यकीय मदत देखील घ्यावी.

आणखी वाचा:

गरोदरपणातील चाचण्या: आरएच घटक आणि प्रतिपिंड तपासणी
गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत करता येतील असे ७ सोपे आणि सुरक्षित व्यायामप्रकार
RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article