Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ खेळ आणि क्रियाकलाप पार्टी न करता तुमच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे ५ मजेशीर मार्ग

पार्टी न करता तुमच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे ५ मजेशीर मार्ग

पार्टी न करता तुमच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे ५ मजेशीर मार्ग

आपल्या छोट्या बाळाचा पहिला वाढदिवस हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. हा दिवस अफाट आनंद घेऊन येतो आणि तुम्ही तो आनंद तुमच्या प्रियजनांसोबत सामायिक करू इच्छित आहात. तुम्ही एखाद्या संध्याकाळी फुग्यांची सजावट करून त्याचा वाढदिवसाचे नियोजन करत असाल. हो ना?

परंतु तुम्हाला खरंच अशी मोठी पार्टी करायची आहे का जी तुमच्या बाळाला आठवणार देखील नाही? खरं तर हा दिवस कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याचा दिवस आहे. बाळाला आवडणाऱ्या आणि त्याला आनंदित करणाऱ्या गोष्टी करणे हे फार महत्वाचे आहे.

पहिल्या वाढदिवसाची पार्टी न करण्याची कारणे

जेव्हा तुमच्या बाळाला चांगले समजू लागेल आणि तो पार्टीचा आनंद घेऊ लागेल तेव्हा नक्कीच तुम्ही त्याच्या वाढदिवसाची पार्टी देऊ शकता. तुमच्या बाळाला पहिल्या वाढदिवसाची पार्टी न देण्याची कारणे खालीलप्रमाणे.

. तुमच्या बाळाला सगळ्या गोष्टी आठवतील, अशा टप्प्यावर बाळ अद्याप पोहोचलेले नाही. ते क्षण फक्त आपल्या कॅमेर्‍यामध्ये टिपण्यासाठी इतका खर्च करणे आवश्यक आहे का? ते सर्व फोटो पाहिल्यानंतरही, तुमच्या मुलाला काहीच आठवणार नाही.

. वाढदिवसाच्या पार्टीसाठी खूप रोख रकमेची आवश्यकता असते. आपण भविष्यातील वाढदिवसासाठी किंवा तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी पैसे वाचवू शकता. असे केल्याने त्यांच्या शिक्षणासाठीचा पाया भक्कम होऊ शकतो.

. ही पार्टी खरेतर मुलासाठी नसतेच. ज्याच्या साठी ही पार्टी केली त्याला ते नंतर आठवणार सुद्धा नाही. त्याला जेव्हा समजायला लागेल तेव्हा त्याला सगळ्या पाहुण्यांची पुन्हा एकदा ओळख करून द्यावी लागेल.

. बहुतेक वेळा असे घडते कि अनोळखी चेहरे असलेली पार्टी तुमच्या मुलासाठी आनंद घेण्यासाठी खरोखर योग्य नाही. त्यामुळे त्याचा मूड बिघडू शकतो.

. तुमचे बाळ तुमच्या आयुष्यात येणे हे किती भाग्याचे आहे आणि त्याच्या आयुष्यातील हा क्षण अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या कुटुंबियांसह आणि जवळच्या लोकांसह ह्या दिवसाचा आनंद घ्या.

. सर्व भेटवस्तू आणि कार्ड, नोट्स तुमच्यासाठी असतील आणि त्याला ते वाचता येणार नाही.

. आपल्याला सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकण्याची गरज नाही. अधिक पसंती मिळवण्यासाठी फक्त काही फोटो अपलोड करणे फायदेशीर नाही.

पार्टीशिवाय आपल्या बाळाचा पहिला वाढदिवस कसा साजरा करावा?

आपण नेहमीच बाळासोबत दर्जेदार वेळ घालविण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. येथे काही कल्पना आहेत ज्या आपण नेहमी वापरू शकता.

पार्टीशिवाय आपल्या बाळाचा पहिला वाढदिवस कसा साजरा करावा?

. सुट्टीवर जा

तुम्ही कदाचित बरेच दिवस सुट्टीवर जाण्याची वाट पहात आहात. मागील वर्ष कदाचित खूपच व्यस्त असेल आणि तुम्हाला त्याच रुटीनचा कंटाळा आला असेल. बाळासाठी अनुकूल अशा ठिकाणी म्हणजेच हिल स्टेशन आणि बीच रिसॉर्टला भेट द्या. आपले मुल संवेदनाक्षम अवस्थेतून जात आहे आणि त्यामुळे त्याला निसर्ग रोमांचक वाटेल. आपल्या मुलास त्याच्या हातावरून वाहणारे पाणी किंवा पायांचे चुंबन घेणारे गवत ह्यांचा अनुभव घेऊ द्या किंवा त्यांना समुद्राच्या किनारी फक्त वाळूवर खेळू द्या.

सुट्टीवर जा

. प्राणीसंग्रहालयाला भेट द्या

आपल्या प्रियजनांबरोबर घालवण्यासाठी हा चांगला वेळ आहे. आपल्या मुलाला प्राणी पाहून आनंद घेऊ द्या. त्याला घराबाहेर काढण्यासाठी आणि त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी ही योग्य वेळ आहे. आपल्या मुलास हे नंतर लक्षात राहणार नाही पण त्याच्यासाठी तो एक मजेदार अनुभव असेल. एखाद्या प्राण्यासह वाढदिवसाचे चित्र घ्या आणि भविष्यातील संदर्भांसाठी स्मरणिका म्हणून ठेवा.

प्राणीसंग्रहालयाला भेट द्या

. खास फोटो सेशनची व्यवस्था करा

प्रत्येकाला चांगले फोटो आवडतात. आपल्या मुलास कदाचित आता आवडत नाही परंतु नंतर कौटुंबिक अल्बम बघताना तो त्यांना नक्कीच त्यामध्ये रममाण होईल. हे सर्व आठवणींविषयी आहे आणि आपले मूल जास्त काळ बाळ राहणार नाही. भविष्यासाठी असे स्पष्ट फोटो आपल्याकडे ठेवणे मजेदार आहे. बाळांचे फोटो काढणारे तज्ञ फोटोग्राफर आहेत ज्यांना आपल्या मुलाला आरामदायक कसे करावे हे माहित असते. काही दिवे आणि सोयीस्कर प्रॉप्ससह, आपण बरीच मजा करू शकता. प्रसंग लक्षात राहावा म्हणून बाळाबरोबरही पोझ देऊ शकता. छायाचित्रकार कोणतेही थेट फ्लॅश वापरत नाही याची खात्री करुन घ्या. प्रकाश आपल्या मुलाच्या डोळ्यांसाठी संवेदनशील असू शकतो.

खास फोटो सेशनची व्यवस्था करा

. अनाथाश्रमात साजरा करा

जर आपण खरोखर पार्टीशिवाय पहिला वाढदिवस कसा साजरा करावा याबद्दल विचार करत असाल तर अनाथाश्रमात साजरा करणे ही एक चांगली कल्पना आहे. या देशात बऱ्याच मुलांना पालक नसतात. त्यापैकी बरेच लोक कुटुंबाचा आनंद घेऊ शकत नाहीत. अशा मुलांससोबत तुम्ही केक शेअर करून आनंद घेऊ शकता तसेच तुमच्या मुलास त्याच्या वयाच्या मुलांसोबत वेळ घालवता येईल.

अनाथाश्रमात साजरा करा

. एक खास केक आणा

केक आणायला काही विशेष पार्टीची आवश्यकता नाही. तुम्हाला हवा तसा केक तुम्ही तयार करून घेऊ शकता. एक छोटासा केक आणला तरी चालेल. फक्त वाढदिवसाचे गाणे प्ले करा, वाढदिवसाचा केक कापा आणि आपल्या मुलाने मेणबत्त्या कशा फुंकल्या ते पहा. हे सगळे खूप मजेदार असेल आणि आपण हे सर्व आपल्या फोनवर रेकॉर्ड करू शकता. ह्या गाण्यावर तुमचे मूल नाचू लागेल आणि गोड केक त्यांना खायला आवडेल.

एक खास केक आणा

दिवसाच्या शेवटी, तुम्हाला समजेल की तुमच्या बाळासाठी तुम्ही केलेल्या ह्या सर्व गोष्टी त्याच्यासाठी अगदीच योग्य होत्या. प्रिय व्यक्तींबरोबर एक छान आणि आरामदायक दिवस घालवणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. तसेच तुमच्या बाळाला ह्या दिवसाचा आनंद घेताना बघणे म्हणजे मोठे समाधान असते.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article