Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे १० आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे १० आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे १० आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

आपले बाळ अधिकृतपणे १० आठवड्यांचे आहे आणि तुम्हाला आता मातृत्वाची सवय होत आहे. तुमचे बाळ आता २ महिन्याचे आहे, आणि आम्हाला माहित आहे की त्याच्याबरोबरचे पहिले काही आठवडे (आणि आपल्या नवीन दिनक्रमात समायोजित करणे) सोपे नव्हते. पण तुम्ही अगदी योग्य प्रकारे ही आईची भूमिका निभावलेली आहे! १० आठवड्यांत, तुम्ही तुमच्या बाळामध्ये होणारे काही बदल लक्षात घेतले पाहिजेत. आतापासून, तुमच्या बाळाच्या हालचाली वाढतील, तो वेगवेगळे आवाज काढण्यास सुरुवात करेल. तुमच्या बाळामध्ये तुम्हाला इतर प्रगती देखील झालेली दिसेल. १० आठवड्यांत तुमच्या बाळाचा विकास कसा होतो ते पहा.

तुमच्या १० आठवड्यांच्या बाळाचा विकास

१० व्या आठवड्यात, तुमच्या बाळाचे वजन कदाचित ४ किंवा ६ आठवड्यांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असेल. खूप वेळ जागे राहण्याच्या टप्प्यानंतर, तुमच्या लक्षात येईल की तुमचे बाळ शांत आणि गाढ झोपेल. तो एका वेळी ४५ तास झोपू शकतो, ज्यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळू शकेल. आपल्या बाळाला सुद्धा थोडासा आराम मिळेल, परंतु तुम्ही त्याच्यासाठी काळजीपूर्वक पोटावर झोपण्याची वेळ सुरू करणे महत्वाचे आहे कारण यामुळे त्याच्या शरीराच्या वरच्या भागाची शक्ती वाढेल. जर कंटाळा आला तर आपण देखील झोपू शकता आणि तुमचे डोके त्याच्या सारख्याच पातळीवर आणू शकता. असे केल्याने बाळ आपल्याजवळ येण्याचा प्रयत्न करेल. काही वेळा, जर त्याने ह्या स्थितीत स्वत: ला टिकवून ठेवण्याचा खरोखर प्रयत्न केला तर तो थकल्यासारखे होईल आणि त्याचा चेहरा पलंगावर पडेल अशा वेळी तुम्ही बाळाला पुन्हा पाठीवर झोपण्यास मदत करा.

तुमच्या १० आठवड्यांच्या बाळाचे वाढीचे टप्पे

जेव्हा तुम्ही तुमच्या देखरेखीखाली बाळाला पोटावर झोपवता तेव्हा त्याचे हात आणि छाती कसे विकसित होतात याची नोंद घेणे आवश्यक आहे. जर तुमच्या बाळाने मान चांगली धरली असेल तर तुम्ही त्याचे पाय देखील किंचित हलवू शकता, जेणेकरून रांगण्यासाठी आपण त्याला पुढे ढकलू शकाल. आता बाळ रंगण्यासाठी सक्षम नाही परंतु हे कसे करावे हे लक्षात येण्यासाठी बाळ उत्तेजित होईल. दररोज ह्या व्यायामाची काही मिनिटे संपूर्ण दिवसभर हळूहळू अर्ध्या तासाच्या संचयित वेळेपर्यंत वाढवावीत.

शरीराचा वरचा भाग बळकट झालेला असताना, त्याचे पायही बळकट होत आहेत का ते तपासून पाहणे आवश्यक आहे. कारण बाळाचा बहुतेक वेळ एकतर पाठीवर किंवा पोटावर घालविला जात असल्याने त्याच्या पायांना स्वतःचे वजन उचलण्याची संधी मिळणार नाही. सुमारे १० आठवड्यांच्या वयापर्यंत, त्याचे पाय चांगले बळकट होऊ लागतील. आपण आपल्या मुलाच्या पायांवर हळूवारपणे मालिश करू शकता आणि पाय मजबूत करण्यासाठी सायकलच्या हालचालीत त्याचे पाय हलवू शकता.

तुमच्या १० आठवड्यांच्या बाळाचे वाढीचे टप्पे

दूध देणे

आपल्या बाळाचे वाढते वजन आणि भूक लक्षात घेतल्यास, स्तनपान पुरेसे नसल्यास आपण स्तनपानासह बाटलीने दूध पाजण्याची निवड करू शकता. आपल्या बाळाचे पोट भरलेले आहे का तसेच तो समाधानी असल्याची खात्री करण्यासाठी बराच वेळ खर्च केला जाईल. तुम्ही तुमचे आयुष्य गर्भारपणाआधी होते तसे करण्यासाठी, वेळेत कोणत्याही ठिकाणी बाळाला स्तनपान करणे शिकू शकत असाल तर चांगले आहे. हे निश्चितपणे काही मातांना अस्वस्थ वाटू शकते परंतु त्या मानसिकतेपासून दूर जाणे आवश्यक आहे. एकदा तुम्हाला बाळाला चांगले स्तनपान करण्याचा आत्मविश्वास वाढला आणि योग्य स्थिती घेऊन बाळाला त्वरेने पाजता आले तर तुम्ही ठीक आहात. जरी नाही जमले, तरीही प्रयत्न करणे चांगले आहे जेणेकरून त्याचा तुम्हाला आणि बाळासाठी फायदा होईल.

बाळाची झोप

आपल्या १०आठवड्यांच्या बाळाची झोपेची पद्धत आणि झोपेची शैली ह्याचा अंदाज तुम्हाला येऊ लागला असेल. आता बाळाचे झोपेचे वेळापत्रक तयार होण्यास थोडी सुरुवात होईल आणि बाळ एका विशिष्ट वेळेला न चुकता झोपू लागेल. जर तुमच्या बाळाची पहाटे लवकर उठण्याची प्रवृत्ती असेल तर, उठल्यावर पहिल्यांदा दूध घेतल्यानंतर लगेच बाळ झोपी जाऊ शकते. इतर वेळी, दूध पाजून छान अंघोळ घातल्यास त्याला उर्जा मिळेल आणि सकाळी त्याला आनंदी आणि उत्साही वाटेल. जवळजवळ सर्व मातांना भेडसावणाऱ्या मुख्य समस्यांपैकी एक म्हणजे दुपारच्या वेळी आपल्या मुलांना झोपायला लावणे. स्वतःला एक लहान डुलकी मिळण्यासाठी आई बाळांच्या झोपेसाठी सर्व तंत्र वापरण्याचा प्रयत्न करते. काही वेळा, आपल्या बाळाला जवळ घेतल्यावर किंवा त्याच्याशी खेळल्यानंतरच झोप येते.

वागणूक

जागे झाल्यानंतर तुमचे बाळ अधिक उत्साही असेल. तो जमेल त्या सर्व गोष्टींकडे पोहोचण्याचा प्रयत्न करेल, बरेच वेगवेगळे आवाज काढेल आणि पोटावर झोपवले असताना डोके सरळ ठेवण्यास सक्षम होईल. या सर्वांमुळे त्याला समजेल की तो मोठा होत आहे.

तुमचे बाळ वेगवेगळे आवाज करेल आणि मजेदार मार्गाने त्याची लाळ वापरण्यास सुरवात करेल. कदाचित तो तोंडातून बुडबुडे काढणे देखील सुरू करू शकेल त्याच्यासाठी ही एक नैसर्गिक क्रिया असेल आणि तो त्यामध्ये व्यस्त राहील. लाळेच्या वाढलेल्या प्रमाणामुळे बाळाला दात तर येत नाहीयेत ना? असा तुम्हाला प्रश्न पडेल. तथापि, तसे नाही आणि आपल्या बाळाला फक्त तसे केल्याने मजा येते.

बाळाचे रडणे

या वयात आपल्या बाळाचे रडणे हाताबाहेर जाऊ शकते. आपल्या लहान बाळाला झोपवायला घेतल्यानंतर लहान बाळाचे हळू हळू रडणे ऐकू येईल. बाळाला गाढ झोप लागण्याचे ते चिन्ह आहे. जर मध्यरात्री बाळ भूक लागली म्हणून उठले असेल तर रडून ते घरातील प्रत्येक सदस्याला जागे करेल. जर तुम्ही तुमच्या बाळास एका क्षणासाठी एकटे सोडल्यास, तो आपले लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे रडेल आणि तुम्हाला परत बोलावेल. हे सर्व रडण्याचे प्रकार भिन्न आहेत आणि कालांतराने ओळखले जाऊ शकतात.

बाळाचे रडणे

कोणत्याही प्रकारच्या बाळाच्या रडण्याकडे, शक्य तितक्या लवकर प्रतिसाद देणे महत्वाचे आहे की आपण बाळाला खूप वेळ रडण्याची सवय लागण्याची जोखीम घेऊ नये. तरीही पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला यशस्वीरीत्या सांगण्यासाठी बाळाकडे रडणे हाच एकमेव मार्ग आहे.

१० आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याविषयक टिप्स

आपल्या १०आठवड्यांच्या बाळाची काळजी घेताना आपण अनुसरण करायला पाहिजे अशा काही टिप्स इथे दिलेल्या आहेत.

  • योग्य वेळी योग्य वेळी योग्य आहार
  • रडण्याच्या वेगवेगळ्या शैलींची नोंद घेत शक्य तितक्या लवकर बाळाकडे लक्ष द्या
  • आपल्या बाळाच्या वेळापत्रकाचा मागोवा ठेवून आणि त्याने विचारण्यापूर्वी त्याला काय हवे असेल ते समजून घ्या.
  • आपल्या बाळाबरोबर खेळत रहा आणि त्याला बाहेर पार्क किंवा जवळच्या बागेत काही वेळ घेऊन जा

चाचण्या आणि लसीकरण

जर पीसीव्ही, रोटाव्हायरस आणि इतर आठव्या आठवड्याच्या सर्व महत्वाच्या लसी यशस्वीरित्या दिल्या गेल्या तर या टप्प्यावर कोणतीही लसी देण्याची गरज नाही

खेळ आणि क्रियाकलाप

१० व्या आठवड्यांत, आपल्या बाळास थोडी शक्ती प्राप्त होईल आणि त्याला थ्री डी स्पेस आणि त्याच्या आजूबाजूची हालचाल समजण्यास सुरुवात होईल. आपण याचा फायदा घेऊ शकता आणि शक्यतो सर्वात रोमांचक पद्धतीने हवेत उड्डाण करण्यास त्याला मदत करू शकता. त्यासाठी तुम्ही जमिनीवर झोपा आणि तुमच्या बाळाचे हात तुमच्या हातात घट्ट धरून ठेवा. तुमच्या मांड्यांचा बाळाला आधार द्या कारण तो त्यावर झोपलेला असतो. नंतर, आपल्या हातांनी त्याला स्थिर ठेवण्यासाठी हळूवारपणे आपले पाय हवेमध्ये न्या आणि बाळाला उडायला लावा. उत्साहपूर्ण आवाज करा आणि उत्साहाने त्याच्याकडे पहा. शक्यता अशी आहे की आपल्या बाळास हे आवडेल आणि बाळ हसू लागेल. काही बाळांना अत्यंत भीती वाटू शकते आणि ते रडण्यास सुरवात करतात. आणि ते खरोखर दुर्दैवी आहे कारण हा खेळ खूप मजेदार आहे आणि आपल्यासाठी एक व्यायाम म्हणून काम करू शकतो.

आपल्या बाळाची दृष्टी आता चांगली होईल, आपण त्यांच्यासमोर भिंतीवर प्रतिबिंब टाकण्यासाठी, शक्तिशाली टॉर्च किंवा सूर्यप्रकाशाच्या विरूद्ध एखादा चमकदार तुकडा वापरु शकता. जर आपले बाळ झोपलेले असेल तर त्यास छतावर प्रतिबिंब करा आणि आश्चर्य वाटल्यासारखा आवाज करा. हे प्रतिबिंब कधीकधी दिसू द्या आणि कधी अदृश्य होऊ द्या आणि आपल्या बाळाला आनंदात पहा.

खेळ आणि क्रियाकलाप

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

इतर लोकांशी वाढलेला संवाद कदाचित आपल्या बाळाला इतरांकडून संक्रमण घेण्यास बळी पाडू शकतो आणि बाळाला सर्दी किंवा खोकला होऊ शकतो. आपण त्याचे नाक अजून साफ ​​करण्यासाठी घरगुती उपचार करून पहा, डॉक्टरांचा सल्ला घ्या

जर संक्रमण आणखी वाढत गेले आणि बाळाला बद्धकोष्ठता होत असेल आणि कानात खाज करण्याचा प्रयत्न करीत असेल असे वाटत असेल आणि त्याला थोडासा ताप आला असेल तर ते काहीतरी गंभीर लक्षणांचे लक्षण आहे आणि यासाठी त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी लागेल

केवळ १० आठवड्यांच्या गोंडस बाळाकडे तुम्हाला सतत पाहावेसे वाटेल. आपले छोटे बाळ २ महिन्यांचे होताना अनेक आनंदाच्या प्रसंगांनी परिपूर्ण असा हा काळ खूप दिलासा देणारा असू शकतो. स्वतःची चांगली काळजी घ्या आणि तुमच्या पतीसोबत कामाची विभागणी करा जेणेकरून तुम्ही पुन्हा आधीसारखे सामान्य आयुष्य जगण्यास सुरुवात करू शकता.

मागील आठवडा: तुमचे ९ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे ११ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article