Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे ३३ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे ३३ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे ३३ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

३३ आठवड्यांच्या अखेरीस, तुम्हाला तुमच्या मुलाची शारीरिक आणि मानसिक विकासाच्या दृष्टीने चांगली प्रगती झालेली दिसेल. या काळाचे वैशिष्ट्य म्हणजे बाळाचे मूड सविंग्ज होय तुमचे मूल एका क्षणास बोबड्या बोलांमध्ये बडबड करीत असेल आणि अचानक जोरजोरात रडू लागेल.

अगदी खाण्याच्या बाबतीतही, तुमचे बाळ विसंगत वागेल. एक दिवस, तो पौष्टिक अन्न, घनपदार्थ, कौटुंबिक भोजन घेईल आणि दुसर्‍या दिवशी त्याला कदाचित दुधाशिवाय इतर काहीच आवडणार नाही. आईवडिलांसाठी हे सगळे गोंधळात टाकणारे असू शकते.

३३ आठवड्यांच्या बाळाचा विकास

३३ व्या आठवड्यात बाळाची वाढ वेगाने होणे सामान्य आहे. काही महिन्यांच्या कालावधीत, तुमच्या बाळाने रांगायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर उभे राहणे व चालणे देखील सुरू होईल. बाळाचे वजन देखील पटकन वाढते आणि त्याचे स्नायूही बळकट होतात. आपले बाळ नक्कीच वस्तू उचलू शकेल आणि नवीन स्नायूंमुळे त्या वस्तू फेकू सुद्धा शकेल.

कधीकधी, बाळाचा वेगवान विकास स्वतः बाळासाठी थोडासा त्रासदायक ठरू शकतो. बाळाला काही दिवस एकटे राहण्याची इच्छा असू शकते परंतु इतर वेळी तो दिवसभर तुम्हाला चिकटून राहू शकेल. तथापि, हे कितीही गोंधळात टाकणारे असले तरीही, हे सर्व चांगल्यासाठी होईल या कालावधीच्या शेवटी, नवीन कौशल्ये आणि क्षमता प्राप्त होऊन तुमचे बाळ पूर्णपणे बदलेल.

या वयातील मुले बहुधा खूप भरभर रांगत असतील. आदर्श परिस्थितीत, तुमचे बाळ कदाचित फर्निचरला धरून उभे सुद्धा राहत असेल आणि हातानी आधार घेऊन थोडे चालत पण असेल. परंतु, अशावेळी तुम्ही बाळावर लक्ष ठेवले पाहिजे कारण एखाद्या वेळेला बाळ पडू सुद्धा शकते. बाळ बऱ्याचदा पडण्याची शक्यता असते त्यामुळे बाळाच्या आसपास कोणतेही धारदार किंवा तीष्ण पृष्ठभाग नाहीत ह्याची खात्री करा जेणेकरून बाळाला इजा होणार नाही.

संवादाच्या बाबतीत बोलायचे झाले तर बाळाने बडबड करण्यास सुरुवात केलेली असेल. यावेळी, त्याने कदाचित आपले पहिले शब्द उच्चारले पाहिजेत – ‘मामायाचा अर्थ या काळात आई असा असू शकतो! या वयापर्यंत त्याने कदाचित काही विशिष्ट वस्तूंशी संबंधित आवाज जोडले असतील, तर आपल्या बाळाच्या पहिल्या शब्दांचा आनंद घ्या.

बाळाची वस्तू पकडण्याची आणि धरून ठेवण्याची कौशल्ये देखील चांगल्या प्रकारे विकसित होतात, अशा प्रकारे की तो आपली दुधाची बाटली धरून ठेवण्यास सुद्धा सक्षम असेल. जरी त्याने बाटली जास्त प्रमाणात धरुन ठेवली नाही, तर काळजी करू नका कारण बाळाला स्वतःलाच बाटली धरून ठेवायची नसते.

या काळात डायपर बदलणे देखील पूर्वीपेक्षा कठिण होते. पूर्वी, जेव्हा तुम्ही बाळाचे डायपर बदलत होतात तेव्हा बाळ थोडा प्रतिकार करत होते, परंतु आता, त्याच कामाला बराच वेळ लागतो आणि घाण व गोंधळ होतो! त्यामुळे डायपर बदलताना बाळाच्या हातात काहीतरी द्या जेणे करून बाळ त्यामध्ये गुंतून राहील

३३ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

३३ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

या पैकी काही टप्पे तुमच्या मुलामध्ये यापूर्वीही कदाचित विकसित झालेले असतील परंतु काहींच्या बाबतीत तसे नसेल. हे कोणत्याही प्रकारे आपल्या मुलाच्या क्षमता दर्शवित नाहीत. विकासाचे टप्पे हे फक्त एक मार्गदर्शक तत्त्वे आहेत ज्यामुळे पालकांना त्यांचे मूल कसे विकसित होईल याची कल्पना येते आणि त्याबाबतचे काही कठोर नियम नाहीत.

  • बाळ त्याला हव्या असलेल्या गोष्टींकडे बोट दाखवण्याइतके सक्षम होईल आणि खेळणी व बाटल्यांसारख्या गोष्टी पकडून ठेवेल
  • तुमचे बाळ आता काही महिन्यांपासून बडबड करीत असेल, परंतु आतापर्यंत त्या बडबडीला काही अर्थ नव्हता. तथापि, त्याचे पहिले शब्द लवकरच बोलले जातील, सामान्यत: सर्वात आधी बोलल्या जाणाऱ्या काही शब्दांपैकी नाही“, “मामाकिंवा दादाहे शब्द आहेत.
  • आता बाळाला दात येण्यास देखील सुरुवात होईल. तुमच्या बाळाला आता एकापेक्षा जास्त दात असतील. त्यामुळे हातात येणारी प्रत्येक गोष्ट बाळ तोंडात घालू लागेल त्यामुळे बाळावर सतत लक्ष ठेवा.

बाळाचा आहार

आतापर्यंत, तुमचे बाळ बऱ्याच प्रमाणात घन पदार्थ घेत असेल. जरी काही दिवस बाळ स्तनपानाला प्राधान्य देत असेल तरीसुद्धा बऱ्याचदा घरातील लोक जे खातात त्याला बाळ प्राधान्य देईल. तुम्ही बाळाला प्युरी करून किंवा मॅश करून चमच्याने थोड्या प्रमाणात अन्न भरवू शकता.

जरी बाळाच्या दाढांची वाढ झालेली नसली, तरीही बाळाच्या मजबूत हिरड्यांनी चावणे शक्य आहे. तो कठीण खाद्यपदार्थ वगळता बहुतेक खाद्यपदार्थ चावण्यास सक्षम असेल. जेव्हा जेव्हा आपण बाहेर जाता तेव्हा आपल्यासाठी काही खाद्यपदार्थ आपल्याबरोबर नेहमी ठेवा. कारण काही वेळा तुम्ही जे खाता ते तुमच्या बाळासाठी योग्य नसते (जसे की फास्ट फूड). ज्या माता आपल्या बाळासोबत बराच प्रवास करतात त्यांच्यासाठी हे जास्त लागू आहे.

जर आपल्या मुलाने घन पदार्थ खाण्याकडे जास्त कल दाखविला नसेल तर त्याच्यावर जबरदस्ती न करणे चांगले. कारण त्यामुळे बाळामध्ये अन्नपदार्थ आणि खाणे ह्याविषयी नकारात्मकता निर्माण होऊ शकते. जरी नऊ महिन्यांच्या अखेरीस बाळाने घन पदार्थ खाणे जरुरीचे असले तरीसुद्धा आईचे दूध हे पौष्टिकतेचे प्रमुख स्रोत आहे.

बाळाची झोप

३३ आठवड्यांच्या बाळासाठी, रात्री होणार्‍या स्नायूंच्या विकासामुळे झोपेचा त्रास होतो. तसेच या कालावधीत, बाळ दिवसासुद्धा फक्त दोन वेळा झोपते, त्यामुळे तुमच्या दोन्ही झोपांमध्ये अडथळा येऊ शकतो. या संक्रमण कालावधीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, कदाचित तुमचे बाळ आधीपेक्षा जास्त चिडचिड करेल किंवा थकेल.

तो कदाचित रात्रीच्या वेळी रडून तुमचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेईल, म्हणून तुम्ही बाळासोबत झोपणे हा एक उत्तम पर्याय आहे. आपल्या बाळासाठी झोपण्यासाठी सुरक्षित जागा असल्याची खात्री करुन घ्या आणि बाळाकडे लक्ष देण्यापूर्वी त्याला काही मिनिटे रडू द्या बहुतेक वेळा, काही मिनिटांनंतर तुमचे बाळ आपोआप झोपी जाईल. रात्री बाळाला चांगली झोप लागण्यासाठी तुम्ही बाळाची दिवसाची झोप कमी करू शकता.

३३ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

  • बाळासोबत झोपणे हा एक उत्तम पर्याय आहे, जेणेकरून तुम्हाला रात्रीची थोडीशी झोप मिळेल
  • जर तुमच्या बाळाने मध्यरात्री रडण्यास सुरुवात केली तर रडणे काही मिनिटे सुरू राहिल्यासच त्याच्याकडे जा. बहुतेक वेळा, तुमचे बाळ पटकन गाढ झोपी जाईल
  • दात येतानाच्या खेळण्यामुळे बाळाला दात येताना वेदना कमी होण्यास मदत होते, म्हणून दिवसा त्याला थोडा वेळ थंडगार वस्तू चावायला द्या

चाचण्या आणि लसीकरण

तुमच्या बाळाच्या ६महिन्यांच्या तपासणी दरम्यान त्याला अनेक लसी देण्यात आल्या आहेत, आणि पुढच्या लसींचे वेळापत्रक तो एक वर्षांचा झाल्यावरच तयार केले जाईल. तथापि, लसीकरणाच्या वेळापत्रकांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या बालरोगतज्ञाशी संपर्क साधा डॉक्टरांना असे वाटले की आपल्या बाळाला फ्लू किंवा मेंदूज्वराचा धोका आहे तर डॉक्टर त्याची लस लिहून देऊ शकतात.

खेळ आणि क्रियाकलाप

ह्या काळात बाळाच्या हालचाली नियंत्रित असतात, म्हणून आपल्या मुलास शक्य तितके हात हलवणे आणि टाळी देण्यास प्रोत्साहित करा. त्यामुळे बाळाचे मोटार कौशल्य विकसित होण्यास आणि बाळाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. तुम्ही मजा म्हणून तसेच बाळाशी बंध घट्ट व्हावा म्हणून एखाद्या गोष्टीकडे बोट दाखवणे किंवा हात हलवणे ह्यासारखे सोपे खेळ खेळू शकता.

हा काळ असा आहे की जेव्हा तुमचे बाळ एक उत्साही श्रोता बनते: आवाज आणि ध्वनी बाळाला अपेक्षेपेक्षा जास्त आनंदित करतात! तुम्ही त्याच्याशी भांड्यांचा आवाज करून किंवा जमिनीवर हलकी खेळणी टाकून सोपा आवाजाचा खेळू शकता. त्याला त्याच्या सभोवतालच्या विविध आवाजांचा शोध घेऊ द्या. तसेच, तुम्ही त्याच्याशी शक्य तितके जास्त बोलावे. त्याचे पहिले शब्द बहुधा जास्त उच्चारलेले शब्द असतील आणि बहुतेक वेळा तो शब्द ‘नाही’ असा असेल. ‘मामा’ आणि ‘दादा’ हेदेखील संभाव्य पर्याय आहेत.

सुरुवातीला नियंत्रित हालचाली दिसत नसल्या तरीही, उत्कृष्ट मोटर कौशल्यांचा अधिकाधिक विकास करण्यास प्रोत्साहित करा. वर म्हटल्याप्रमाणे हात हलवणे आणि टाळ्या वाजवणे या सर्वांसाठी उत्तम पर्याय आहेत.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

जर तुमच्याकडून कोणतीही लस द्यायची राहिली असेल तर तुम्ही डॉक्टरांना नक्कीच भेट द्यावी. लस न दिल्यास होणारी जोखीम, आपल्या मुलास लस दिल्यानंतर येणाया ताप किंवा पुरळ कमी होण्याच्या तुलनेने खूपच जास्त असते. तुमच्या बाळाच्या वागण्याच्या पद्धतीत काहीतरी चुकीचे आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, त्याविषयी बालरोगतज्ज्ञांकडे जावे अशी शिफारस केली जाते. आई म्हणून, आपल्या मुलासाठी काय चांगले आहे हे जाणून घेण्यासाठी तर्कशक्तीपेक्षा आपल्या अंतःप्रेरणावर विश्वास ठेवा.

या वयातच तुमच्या बाळाचे व्यक्तिमत्व तयार होण्यास सुरुवात होते आणि बाळ खूपच चंचल होते. तुम्हाला नीट झोप मिळत नसली तरीसुद्धा तुमच्या बाळाला पाहून तुम्हाला आनंद होईल. त्याच्या पहिल्या शब्दांकडे लक्ष ठेवा आणि एक कॅमेरा सतत सोबत असू द्या, जेणेकरून तुम्ही त्याची कोणतीही कृत्ये किंवा मजेदार क्रियांना चुकवणार नाही!

मागील आठवडा: तुमचे ३२ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे ३४ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article