Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे ४२ आठवड्यांचे बाळ: विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमचे ४२ आठवड्यांचे बाळ: विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमचे ४२ आठवड्यांचे बाळ: विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमचे बाळ ४२ आठवड्यांचे झाल्यावर आता शिशुवस्थेमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे त्याने मागितलेल्या गोष्टी त्याला दिल्या नाहीत तर त्याला राग येईल आणि तो खायला सुद्धा त्रास देईल. तुमचे बाळ आता त्याला येणाऱ्या समस्या सुद्धा सोडवू शकेल. काही बाळे शांतपणे प्रयत्न करतील आणि समस्या सोडवतील (उदा: आवाक्याबाहेरचे खेळणे स्वतःचे स्वतः काढून घेणे), आणि सर्वोतोपरी प्रयत्न करून त्यांना काय हवे ते मिळवतील. तुमच्या बाळाचा संज्ञानात्मक विकास ४२ आठवड्यांपर्यंत उच्च पातळीवर असेल आणि त्याला त्याच्या जगाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल.

तुमच्या ४२ आठवड्यांच्या बाळाचा विकास

हता वयात, विभक्त होण्याची चिंता ही अनेक बाळांसाठी अजूनही एक समस्या असू शकते, आणि त्यामुळे बऱ्याचदा रात्रीच्या वेळी बाळ जागे राहील. परंतु ह्या वयातील बाळांना त्यांच्या क्षमतेनुसार सभोतालच्या परिसराचे निरीक्षण करण्यात खूप आनंद मिळतो. बॉक्स आणि कंटेनरमधील भरपूर खेळणी जमिनीवर इतस्ततः पसरलेली बघण्यासाठी तुम्ही तयार रहा. तुमचे बाळ सतत इकडेतिकडे पळत असल्याने, जेवत असताना मधूनच त्याचे जागेवरून उठून धावणे, तसेच कपडे बदलताना किंवा अंघोळ करताना एकाजागी न थांबणे ह्यासाठी सुद्धा तुम्ही तयार रहा. ह्या टप्प्यावर, तुमचे बाळ आत्मविश्वासाने बसू शकेल, वस्तू धरून वेगाने चालेल आणि शक्यतो कोणत्याही आधाराशिवाय उभे राहू शकेल. तो उभा असताना खाली वाकून खेळणी उचलण्याचाही प्रयत्न करू शकतो. जर तुमचे बाळ अजून चालत नसेल तर काळजी करू नका. बरीच बाळे एक वर्षाची झाल्यानंतर पहिले पाऊल टाकतात. ४२ आठवड्यात, तुमचे बाळ अधिक हुशार होईल. लवकरच त्याला अंतर, खोली, वेळ आणि कारण आणि परिणाम ह्या संकल्पना समजू लागतील. ब्लॉक्स स्टॅकिंग आणि रिस्टॅकिंग, बॉल फेकणे किंवा त्याच्या प्लेटवरील कापलेल्या फळांपासून कॉर्नफ्लेक्स वेगळे करणे इत्यादी गोष्टी करताना तो ह्या गोष्टींचा वापर करेल.

आणखी वाचा: तुमच्या १० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या ४२आठवड्याच्या बाळाचे विकासात्मक टप्पे

तुम्ही तुमच्या ४२ आठवड्यांच्या बाळामध्ये विकासाचे खालील टप्पे पाहू शकता.

 • तुमचे बाळ पोटावर झोपलेले असताना उठून बसू शकेल.
 • तुमचे बाळ फर्निचरला धरून आता वेगाने चालू लागेल.
 • तुम्ही नाहीम्हणलेले बाळाला आता समजू लागेल. तो त्याचे पालन करेलच असे नाही.
 • तुमचे बाळ आता टाळ्या वाजवू लागेल आणि तुम्हाला हात करेल.
 • तुमचे बाळ उभे असताना खाली वाकेल आणि बोटांनी एखादी वस्तू धरेल.
 • तुमचे बाळ जमिनीवर फिरू लागेल.
 • जर तुम्ही हातवारे करत असाल तर तुमचे बाळ मामाकडे याकिंवा बॉल बॉक्समध्ये ठेवायासारख्या सूचना बाळाला आता समजू लागतील.
 • तुमचे बाळ त्याच्या आवाक्याबाहेर असलेले काहीतरी मिळवण्यासाठी उपाय शोधेल.

आणखी वाचा: १० महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

तुमचे बाळ आता टाळ्या वाजवू लागेल.

बाळाला आहार देणे

या टप्प्यावर तुमच्या बाळाच्या जेवणाच्या वेळा अनियमित झालेल्या तुमच्या लक्षात येईल कारण त्याच्या जेवणाच्या सवयी अनेकदा बदलतात. ह्याचे कारण म्हणजे तो अजूनही स्तनपान घेत आहे आणि घन पदार्थांशी जुळवून घेत आहे त्यामुळे एखाद्या दिवशी फक्त जेवण, नाश्ता खाणे आणि दुसऱ्या दिवशी फक्त स्तनपान घेणे हे त्याच्यासाठी सामान्य आहे. सहसा, रात्रीच्या वेळी, बाळ दातदुखीमुळे उठते आणि पुन्हा शांत होऊन झोप लागण्यासाठी बाळ स्तनपान घेते. ४२ व्या आठवड्यात सुद्धा, आईच्या दुधाने बाळाच्या दैनंदिन पोषणविषयक गरज भागतात आणि घनपदार्थ दुय्यम ठरतात. त्यामुळे तुम्ही दूर असताना बाळासाठी दूध काढून ठेवणे आणि बाळ सरासरी किती स्तनपान घेते ह्याचा अंदाज घेणे उत्तम असते. ४२ व्या आठवड्यात, तुमच्या बाळाला बाटलीची गरज भासणार नाही. तो कप वापरू शकतो. म्हणून जर तुम्ही तुमच्या बाळापासून दूर असाल तर तुम्ही तुमच्या बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला बाळाला आईचे दूध किती लागेल ह्याचा अंदाज देऊ शकता आणि त्यांना ते दूध तुमच्या बाळाला थोड्या प्रमाणात देण्यास सांगू शकता. बाळ दिवसभरात किती दूध घेते ह्याची नोंद बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीस ठेवण्यास सांगा नोंद ठेवण्यास सांगा जेणेकरून तुम्ही त्याप्रमाणे दूध पंप करू शकाल.

आणखी वाचा: १० महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय

बाळाची झोप

तुमचे बाळ ४२ आठवड्यांच्या वयात आता खूप रांगत असेल. अभ्यासात असे दिसून आले आहे की बाळ रांगू लागल्यावर झोपेत व्यत्यय येतात आणि तुमच्या बाळाने रांगणे सुरू केल्यानंतर सुमारे तीन महिन्यांपर्यंत बाळाची झोप विस्कळीत राहते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की रांगल्यामुळे बाळाचे शरीर क्रियाशील राहते आणि त्याच्या हालचाली नियंत्रित करण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे बाळ अस्थिर राहते आणि रात्रीचे जागे राहते. हा कालावधी विशेषतः पालकांसाठी कठीण असू शकतो, कारण बाळाची वाढलेली हालचाल आणि दात येण्यामुळे त्याला झोपेचा त्रास होऊ शकतो. त्याच्या झोपेची परिपक्वता पुढील काही वर्षात वाढेल.

बाळ ४२ आठवड्यांच्या वयात आता खूप रांगत असेल

तुमच्या ४२ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

तुमच्या ४२ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याचे काही मार्ग येथे आहेत:

 • तुमच्या बाळाला दररोज प्लास्टिकच्या मोठ्या टबमध्ये आंघोळ घाला. तुम्ही त्याला मोठ्या टबमध्ये आंघोळ घालणार असाल, तर बाळाच्या सुरक्षिततेसाठी बाजूंना संरक्षक बंपर आणि नॉनस्लिप मॅट वापरा.
 • तुमच्या बाळाच्या केसांसाठी क्लिप आणि बो वापरू नका. त्यांना गुदमरल्यासारखे वाटू शकते. तुमच्या बाळाच्या केसांसाठी वेगळे कंडिशनर वापरण्याची गरज नाही, टीअर फ्री डीटॅंगलिंग शैम्पू त्याच्यासाठी पुरेसा आहे.
 • जर तुम्ही तुमच्या बाळाचा पहिला हेअरकट करणार असाल, तर केसांची काळजी घेणारा आणि बाळाचे केस कसे कापायचे हे माहिती असलेला व्यावसायिक निवडा. तुमचे बाळ थकलेले किंवा भुकेले नसताना त्याला केस कापायला न्या. केस कापताना लक्ष विचलित करण्यासाठी बाळाला त्याची आवडती खेळणी द्या.
 • तुमच्या बाळाचे दात घासताना, दाण्याएवढी टूथपेस्ट वापरा. खूप जास्त फ्लोराईड त्याच्यासाठी विषारी असू शकते.
 • जेव्हा तुमचे बाळ झोपलेले असेल तेव्हा त्याचे नखे कापा. त्यामुळे त्याच्या कोमल नखांना होणारी कोणतीही दुखापत कमी होईल.
 • तुमच्या बाळाला सिप्पी कपची सवय लावा आणि त्याला बाटलीपासून दूर करण्यासाठी हँडल कसे पकडायचे आणि ते कसे प्यावे ते दाखवा.
 • द्राक्ष किंवा कच्चे गाजर ह्यासारखे अन्नपदार्थ बाळाला खाऊ घालणे टाळा. अश्या अन्नपदार्थांमुळे बाळ गुदमरण्याची शक्यता असते. बाळाला सोललेली आणि शिजवलेली फळे, चीज आणि भाज्या नेहमी खायला द्या.

बाळाला दररोज प्लास्टिकच्या मोठ्या टबमध्ये आंघोळ घाला

चाचण्या आणि लसीकरण

बहुतेक डॉक्टर दहा महिन्यांच्या वयात कोणतीही नियमित तपासणी करत नाहीत.

. चाचण्या

तुमच्या बाळाच्या वाढीचा मागोवा घेण्यासाठी डॉक्टर तुमच्या बाळाची उंची आणि वजन तपासतील. जर डॉक्टरांना ऍनिमियाची लक्षणे दिसली तर डॉक्टर तुमच्या बाळाच्या रक्तातील लोह, हिमोग्लोबिन किंवा शिसे यांची पातळी तपासतील.

. लसीकरण

तुमच्या मुलाला हिपॅटायटीस बी लसीचा अंतिम डोस (४ डोसपैकी) आणि इन्फ्लूएंझा लसीचा एक डोस (डॉक्टरांनी शिफारस केल्यानुसार) वयाच्या ४२ व्या वर्षी घ्यावा लागेल. त्याला ६१८ महिन्यांच्या दरम्यान आयपीव्ही (पोलिओ) लसीचा तिसरा डोस देखील आवश्यक असू शकतो.

खेळ आणि उपक्रम

तुम्ही तुमच्या ४२ आठवड्यांच्या बाळासोबत खालील खेळ आणि क्रियाकलाप तुम्ही खेळू शकता:

 • बाळ तुम्ही दिलेल्या सध्या सूचना ऐकेल असा एखादा खेळ खेळा. उदाहरणार्थ, त्याला बॉक्ससह एक चेंडू द्या आणि त्याला बॉक्समध्ये चेंडू ठेवण्यास सांगा. किंवा त्याचा टेडी बियर कुठेतरी ठेवा आणि त्याला विचारा, ‘तुझा टेडी कुठे आहे?’. अशा खेळामुळे तुमच्या बाळामध्ये समस्या सोडवण्याचे कौशल्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
 • तुमच्या बाळासोबत खेळणी परत बॉक्समध्ये ठेवण्याचा खेळ खेळा. जेणेकरून त्याला लहान वयापासून स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टी शिकण्यास मदत होऊ शकते.
 • एखाद्या खोलीमध्ये तुमच्या बाळापासून दूर बसा आणि त्याला तुमच्याकडे येण्यास सांगा. ह्या खेळामुळे जेव्हा बाळ कशाला तरी धरून चालू लागते किंवा तुमच्या कडे रांगत येते तेव्हा त्याची मोटार कौशल्ये विकसित होतात.

खेळ आणि उपक्रम

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

तुमच्या बाळामध्ये खालील गोष्टी आढळल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:

. किडा चावणे

ह्या टप्प्यावर किडा चावणे बाळासाठी हानिकारक असू शकते. तुम्हाला तुमच्या बाळावर डंक दिसला तर, स्टिंगर खरवडून काढून टाकातो भाग पाण्याने आणि तो भाग साबणाने धुवा. वेदना कमी करण्यासाठी डंकावर आइसपॅक/बेकिंग सोडा आणि पाणी वापरा. २४ तासांनंतरही ती जागा लाल आणि सुजलेली असेल किंवा तुमच्या बाळाला उलट्या होऊ लागल्या किंवा ताप आला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

. ऍलर्जीक प्रतिक्रिया

जर तुमच्या बाळाला घरघर होत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, पुरळ येत असेल किंवा जीभेवर, हातावर किंवा चेहऱ्यावर सूज येत असेल किंवा बाळाला शॉक बसल्यासारखे वाटत असेल, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण तुमच्या बाळाला एखाद्या गोष्टीची ऍलर्जी किंवा अॅनाफिलेक्टिक शॉक असू शकतो.

४२आठवड्याच्या बाळाचा विकास होताना तो खूप आश्चर्ये, मजा, निद्रानाश, पसारा आणि गोंधळाने भरलेला असतो. ह्या सगळ्यामुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो परंतु बाळाच्या वाढीच्या ह्या टप्प्याचा आनंद घ्या.तुमच्या बाळासोबत मजा करा!

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article