Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास ६ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

६ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

६ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

बाळांची वाढ झपाट्याने होत असते, जेव्हा तुमचे बाळ ६ महिन्याचे होते तेव्हा तूम्हाला बाळामध्ये खूप शारीरिक आणि बौद्धिक बदल दिसून येतात. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो आणि बाळामधील हे बदल बघताना तुम्हाला छान वाटेल. तुमचे बाळ जेव्हा ६ महिन्याचे होईल तेव्हा कुठले विकासाचे टप्पे पार करेल ह्याचा परिचय आम्ही तुम्हाला ह्या लेखात करून देत आहोत.

महिन्याच्या बाळासाठी विकासाच्या टप्प्यांचा तक्ता

खालील तक्त्याद्वारे तुम्हाला बाळाने पार केलेले आणि पुढे विकसित होणारे टप्पे समजण्यास मदत होईल.

तुमच्या बाळाने पार केलेले विकासाचे टप्पे तुमच्या बाळाचे विकासाचे पुढील टप्पे
पकड घट्ट होईल सगळ्या बोटांचा पकडण्यासाठी वापर करेल तर्जनी आणि अंगठा ह्यांचा वापर वस्तू पकडण्यासाठी करेल
आधाराशिवाय बसेल स्वतःचे स्वतः पुन्हा बसण्याच्या स्थितीत येईल
निवडक फळे आणि भाज्या खाईल वेगवेगळ्या फळे आणि भाज्या खाईल
रंगांची ओळख आणि दृष्टी सुधारेल वेगवेगळ्या रांगांमधील फरक कळेल आणि दृष्टी सुधारेल
रात्रीच्या वेळी सलग काही तास झोप लागेल रात्रीची झोप सुधारेल , दूध पिण्यासाठी कमी वेळा उठेल
वस्तू घेण्यासाठी प्रयत्न करेल वस्तू घेण्यासाठी रांगत जाईल
दोन्ही बाजूला वळू शकेल बसलेले असताना किंवा रंगताना कुठल्याही दिशेला वळेल
सध्या स्वर आणि व्यंजनांचा आवाज काढू शकेल कुठलेही जटिल आवाज काढेल
ओळखीचे चेहरे लक्षात येतील वेगवेगळ्या हावभावांद्वारे ओळखीच्या लोकांबरोबर संवाद साधेल

Source: http://www.momjunction.com/articles/babys-6th-month-a-development-guide_00103340/

तुमच्या ६ महिन्यांच्या बाळाने पार केले पाहिजेत असे विकासाचे काही प्रमुख टप्पे

आम्ही प्रमुख विकासाच्या टप्प्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले आहे

आकलनविषयक विकासाचे टप्पे

आकलनविषयक विकास म्हणजे तुमच्या बाळाच्या मेंदूचा सर्वांगीण विकास होय. ह्यामध्ये तुमच्या बाळाची बुद्धिमत्ता आणि वैचारिक क्षमता ह्यांचा समावेश होतो.

 • उत्सुकता वाढते: तुमचे बाळ छोटा शोधक बनेल आणि आजूबाजूच्या गोष्टींचा शोध घेऊ लागेल. बाळ त्याच्या आवडत्या गोष्टींना स्पर्श करेल, त्या पकडेल आणि स्पर्शानुभव घेईल.
 • आवाजाची नक्कल: आतापर्यंत तुमचे बाळ आवाजांचा अर्थ लावू शकेल आणि त्या आवाजाचे अनुकरण करेल. आणि जे आवाज ऐकेल त्याचे अनुकरण करेल.
 • स्वतःच्या नावाला प्रतिसाद देईल: आतापर्यंत तुमच्या बाळाला तिचे नाव समजले असेल आणि ते त्याचा अर्थ लावू लागेल, त्यामुळे जेव्हा तुम्ही हाक माराल तेव्हा बाळ प्रतिसाद देईल.
 • मूलभूत आवाज काढेल: तुमचे बाळ स्वर आणि व्यंजने बोलू लागेल आणि त्यांच्या साहाय्याने ते तुम्हाला प्रतिसाद देईल.

शारीरिक विकासाचे टप्पे

आतापर्यंत तुमचे बाळ ६ महिन्यांचे झाले आहे. आणि बाळ खालीलप्रमाणे शारीरिक विकासाचे टप्पे आणि हालचाल कौशल्य गाठेल.

 • डोळे आणि हातांचे समन्वय कौशल्य: तुमचे बाळ दृष्टी सुधारल्यामुळे खूप अचूक हातांच्या हालचाली करेल. बाळ कुठलीही वस्तू धरून त्याकडे काळजीपूर्वक बघेल.
 • दृष्टी सुधारेल आणि रंगांची ओळख जास्त होईल: जन्मापासून तुमच्या बाळाचे दृष्टी खूप जास्त वाढते आणि ह्या वेळेपर्यंत तुमचे बाळ वेगवेगळ्या रंगातील फरक ओळखू शकेल आणि ते वस्तूंपर्यंतचा अंतराचा अंदाज लावून त्याचा मागोवा घेऊ शकेल.
 • घट्ट पकडण्यासाठी सगळ्या बोटांचा वापर करणे: छोट्या वस्तू पकडण्यासाठी तुमचे बाळ सगळ्या बोटांचा वापर करेल त्याला इंग्रजीमध्ये रॅकिंग ग्रास्प असे म्हणतात
 • कुठल्याही आधाराशिवाय बसणे: तुमच्या बाळाचे पाठीचे स्नायू बळकट असतात आणि म्हणून जरी ते स्वतःचे स्वतः बसत नसले तरी बसण्याच्या स्थितीत असताना सगळ्या शरीराचे वजन पेलू शकते.

शारीरिक विकासाचे टप्पेसंभाषण कौशल्य

तुमचे बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर खालील संभाषणकौशल्ये आत्मसात करेल

 • तुमचे बाळ त्याच्या नावाला प्रतिसाद देण्यास सुरुवात करेल.
 • तुमचे बाळ आनंदी असताना आणि दु:खी असताना वेगवेगळे आवाज करेल.
 • तुमचे बाळ वेगवेगळ्या आवाजांना आवाज काढून प्रतिसाद देईल.
 • तुमचे बाळ बडबड करू लागेल आणि वेगवेगळे आवाज करताना आई बाबांकडे किंवा भावंडांकडे जाईल.

झोपेचा नमुना

तुमचे बाळ ६ महिन्यांचे होईपर्यंत बाळाचा झोपेचा नमुना विकसित होईल आणि खालील विकासाचे टप्पे पार पडतील.

 • तुमच्या बाळ बराच वेळ मध्ये न उठता झोपेल
 • तुमचे बाळ ६८ तास सलग झोपेल
 • तुमचे बाळ स्वतःचे स्वतः पालथे पडू शकेल
 • तुमचे बाळ दूध पिण्यासाठी उठणार नाही

संवेदना

संवेदनाविषयक विकासाचे टप्पे तुमचे ६ महिन्यांचे बाळ पार करेल:

 • तुमच्या बाळाला वेगवेगळ्या पोतांना स्पर्श करून स्पर्शानुभव घ्यावासा वाटेल. बाळाला तिचे अन्नपदार्थ, खेळणी, पाणी आणि वेगवेगळ्या वस्तुंना स्पर्श करून त्याचा अनुभव घ्यावासा वाटतो.
 • तुमच्या बाळाची दृष्टी सुधारते आणि म्हणून मोठ्या, गडद आणि धाडसी खेळण्यांकडे बाळ आकर्षित होते.
 • तुमचे बाळ स्पर्शाने, थोडेसे झुलवल्यावर आणि हळुवार आवाजाने शांत होते
 • दररोजच्या आवाजांनी बाळ त्रस्त होत नाही
 • तुमचे बाळ वस्तू किंवा खेळणी दोन्ही हातांनी पकडते आणि प्रयत्न करून तोंडाजवळ आणते.

सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे

सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे

इथे काही सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे दिले आहेत जे तुमचे ६ महिन्यांचे बाळ पार पाडेल

 • परिचित चेहरे ओळखते: तुमच्या बाळाला ओळखीच्या लोकांमध्ये म्हणजेच जे लोक नियमितपणे बाळाला भेटतात त्यांच्यासोबत आरामदायी वाटते. आणि दुसरीकडे अनोळखी किंवा नवीन लोक भेटल्यास बाळ रडू लागते.
 • खेळण्याचा आनंद: तुमचे बाळ खेळण्यात रस घेते आणि आई बाबा, भावंडे आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांसोबत खेळण्याचा आनंद घेते.
 • वेगवेगळे हावभाव: आतापर्यंत तुमचे बाळ वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळे हावभाव करण्यास शिकेल. तुमच्या लक्षात येईल की भुकेले असताना, झोप आली असेल तर, अस्वस्थता किंवा काही दुखत असेल तर बाळ वेगवेगळे हावभाव करते.
 • भावनांना प्रतिसाद: तुम्हाला लक्षात येईल की बाळ ओळखीच्या लोकांना प्रतिसाद देईल. वेगवेगळ्या परिस्थितीनुसार बाळ आनंदी किंवा दुःखी चेहरे करेल.

काळजी केव्हा करावी?

प्रत्येक बाळ वर नमूद केलेले विकासाचे टप्पे लवकर किंवा उशिरा पार पाडेल परंतु काही संकेत पालकांना भयभीत करतील आणि ते म्हणजे

 • तुमचे बाळ आधाराशिवाय बसेल: तुमच्या बाळाचे पाठीचे स्नायू बळकट होतील आणि त्यामुळे त्यांना बसण्यास मदत होईल. परंतु जर तुमचे बाळ आधार देऊन सुद्धा बसले नाही तर बाळाच्या शारीरिक विकासात उशीर होत आहे असे समजावे.
 • तुमचे बाळ आवाज करत नाही किंवा आवाजास प्रतिसाद देत नाही: जरी ह्या वयात बाळे बोलत नसली तरी ते आवाज काढतात आणि आवाजाला प्रतिसाद देतात. जर तुमचे बाळ ह्यापैकी काहीच करीत नसेल तर बाळाच्या स्वरतंतू मध्ये काही तरी समस्या आहे किंवा ऐकू येण्याच्या काही समस्या आहेत असे निर्देशित करते.
 • बाळ ओळखीचे चेहरे ओळखत नसेल तर: जर तुमचे बाळ नेहमीचे चेहरे सुद्धा ओळखत नसेल तर बाळाच्या दृष्टी मध्ये किंवा आकलन विषयक विकासामध्ये काही तरी समस्या आहे.
 • तुमचे बाळ निष्क्रिय दिसते किंवा मोटार कौशल्य खराब असते: बऱ्याच बाळांना ह्या वयात खेळणी खेळायला आवडतात. जर बाळ निष्क्रिय भासले किंवा बाळाला खेळण्यात काही रस वाटत नसेल तर तुमच्या बाळाला विकासामध्ये अडथळे येत आहेत.

तुमच्या ६ महिन्यांच्या बाळाला विकासाचे टप्पे पार करण्यासाठी मदतीचे काही मार्ग

पालक म्हणून तुम्ही बाळाची वाढ आणि विकासासाठी खालील टिप्स:

 • पोटावर झोपवणे: बाळाला पोटावर झोपवणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे बाळाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते तसेच बाळ चपळ होते.
 • तुमच्या बाळाला संवादामध्ये आणि खेळांमध्ये गुंतवून ठेवा: बाळाशी बोलल्याने आणि खेळल्याने बाळाचे ऐकण्याचे कौशल्य वाढते.
 • क्रियाकलाप आणि वाचन: बाळाला बागेत किंवा घराबाहेरील ठिकाणांवर नेल्यास बाळाची दृष्टी सुधारण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या बाळासाठी रंगीबेरंगी पुस्तके वाचली पाहिजेत.
 • सामाजिक सुसंवाद: तुमच्या बाळाने नवीन लोकांना आणि चेहऱ्यांना भेटणे हे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे बाळाचे सामाजिक आणि संवाद कौशल्य विकसित होईल.

वयाच्या ६ व्या महिन्यापर्यंत बाळाचे नीट पालनपोषण केल्यास वर नमूद केलेले विकासाचे टप्पे बाळ पार पाडेल. तथापि, पालक म्हणून तुम्ही बाळावर लक्ष ठेवले पाहिजे आणि विकासाच्या टप्प्यांवर उशीर झाल्यास नोंद ठेवली पाहिजे. विकासास उशीर होत आहे असे लक्षात आल्यास लगेच तुमच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article