Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील प्रवास

गरोदरपणातील प्रवास

गरोदरपणातील प्रवास

गरोदरपणात प्रवास केल्यास तुम्हाला जबरदस्त थकवा येऊ शकतो. गरोदरपणात प्रवास न करणे चांगले आहे असे बऱ्याच लोकांना वाटत असते. परंतु, आयुष्यात पुढच्या क्षणी काय होईल ते सांगता येत नाही. काही वेळा परिस्थितीमुळे तुम्हाला प्रवास करणे अपरिहार्य असते. उदा: दुसऱ्या शहरात बदली होणे. अश्या परिस्थितीत प्रवास करावा की करू नये असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

बहुतेक गर्भवती स्त्रिया बाळाच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित असतात, विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान गर्भवती स्त्रियांना बाळाच्या सुरक्षिततेविषयी जास्त काळजी वाटत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या पोटातील बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तुमच्या गरोदरपणात कोणतीही अनावश्यक गुंतागुंत टाळण्यासाठी काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. परंतु जर काही महत्वाच्या कारणामुळे तुम्हाला प्रवास करणे आवश्यक असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी त्याबाबतच्या पर्यायांबद्दल चर्चा करू शकता आणि ते पर्याय शक्य तितके सुरक्षित आहेत ना ह्याची खात्री करू शकता.

परंतु, जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलण्याआधी, गरोदरपणातील प्रवासाविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर ह्या लेखात तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती दिलेली आहे. प्रत्येक तिमाहीत रस्ता, रेल्वे आणि हवाई मार्गाने प्रवास करण्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

गरोदरपणात प्रवास करणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात प्रवास करणे सुरक्षित असते परंतु जर गरोदरपणात काही गुंतागुंत असेल आणि विशेष लक्ष देण्याची गरज असेल तर मात्र प्रवास टाळणे आवश्यक आहे. नाही तर, जेव्हा तुमचा मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी होतो अश्या दुसऱ्या तिमाहीमध्ये तुम्ही प्रवास करू शकता. तिसऱ्या तिमाहीत प्रवास करणे देखील शक्य आहे, परंतु तुम्हाला थकवा आणि अस्वस्थता येण्याची शक्यता आहे. प्रसूती कळा सुरु होण्याची जोखीम असल्यामुळे, ३४ व्या आठवड्यानंतर विमान आणि जहाजाने प्रवास करण्याची शिफारस केली जात नाही.

पहिल्या तिमाहीतील प्रवास

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात प्रवास करणे, शक्य असले तरी, प्रवासाची जोखीम असल्यामुळे प्रवासाचा सल्ला दिला जात नाही. पहिल्या तिमाहीमध्ये तुम्ही गरोदरपणाच्या बहुतेक लक्षणांचा म्हणजेच मॉर्निंग सिकनेस, मळमळ, उलट्या इत्यादींचा अनुभव घेता. तसेच, पहिल्या तिमाहीत तुम्हाला गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो. गरोदरपणात होणाऱ्या आघातामुळे बाळावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, रस्ते आणि हवाई मार्गाने लांबच्या पल्ल्याचा प्रवास करू नये. परंतु, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुमचे गर्भारपण निरोगी असल्यास तुमचे डॉक्टर प्रवासाला परवानगी देऊ शकतात.

दुसऱ्या तिमाहीतील प्रवास

जर तुम्हाला प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी दुसरी तिमाही चांगली आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये गर्भपात होण्याचा धोका खूपच कमी असतो. मॉर्निंग सिकनेस किंवा मळमळ कमी झालेली आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे प्रवास करणे अधिक आरामदायक होऊ शकते. परंतु, जर तुमच्यामध्ये प्लेसेंटा प्रिव्हिया सारखी कोणतीही गंभीर समस्या असेल, तर तुम्ही प्रवास टाळला पाहिजे. अगदी दुसऱ्या तिमाहीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन गरोदरपणातील प्रवासाविषयी चर्चा केली पाहिजे.

तिसऱ्या तिमाहीतील प्रवास

तिसर्‍या तिमाहीत प्रवास करताना समस्या येत नाही, परंतु बाळाच्या वाढत्या वजनामुळे तुम्हाला थकवा येण्याची शक्यता असते. त्यामुळे अस्वस्थता वाढू शकते. हा प्रवास तुमच्यासाठी शारीरिकदृष्ट्या तणावपूर्ण होऊ शकतो. तसेच, तुम्हाला ऑलिगो ह्यङ्मिनॉस किंवा पॉलीह्याड्रॉमिनॉस सारख्या समस्या असतील तर तुम्ही प्रवास करू नका. गुंतागुंत टाळण्याची शिफारस अशावेळी केली जाते. जर तुम्हाला प्रवास करायचा असेल, तर तुम्ही तिकीट बुक करण्यापूर्वी तुम्हाला एअरलाइन्सचीही तपासणी करावी लागेल. प्रसूतीच्या शक्यतेमुळे बहुतेक विमान कंपन्या ३५ आठवड्यांनंतरच्या महिलांना प्रवास करण्याची परवानगी देत ​​नाहीत.

आता जर तुम्ही गरोदरपणात प्रवास करत असाल तर प्रवासाच्या विविध पर्यायांचा तुमच्यावर कसा परिणाम होऊ शकतो ते पाहू. आम्ही काही टिप्स देखील दिल्या आहेत, ह्या टिप्स वापरल्यास तुमचा प्रवास सुलभ होऊ शकेल. अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

गरोदरपणात रस्त्याने प्रवास

विशेषतः कमी अंतरासाठी, गरोदरपणात रस्त्याने प्रवास करणे सोयीचे असते. कार मधून प्रवास करताना तुम्ही अंग मोकळे करण्यासाठी किंवा चालण्यासाठी थांबू शकता. विमानाने प्रवास करताना जास्त उंचीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या तुम्ही टाळू शकता.

गरोदरपणात रस्त्याने प्रवास

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

जर तुम्हाला रस्त्याने प्रवास करायचा असेल तर तुम्ही खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

. प्रवास करण्यापूर्वी

 • वैद्यकीय आणि जन्मपूर्व नोंदी कारमध्ये ठेवा.
 • आणीबाणीसाठी मोबाईल फोन सोबत ठेवा.
 • बाहेरचे खाणे टाळण्यासाठी कारमध्ये काही घरगुती स्नॅक्स ठेवा.
 • हायड्रेटेड राहण्यासाठी कारमध्ये पुरेश्या पाण्याच्या बाटल्या ठेवा.
 • तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुमच्या प्रवासाची माहिती कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या मित्रांना द्या. कुटुंबातील सदस्य किंवा मित्रमॆत्रिणीकडून सारखे फोन येऊ नयेत म्हणून लोकेशन शेअर करणे ही चांगली कल्पना आहे.
 • तुम्ही ज्या मार्गावर जाणार आहात त्याबाबत संशोधन करा. आपल्याला आवश्यकतेनुसार प्रवास मार्गावरील शौचालये शोधून ठेवा.

. प्रवासादरम्यान

 • तुमचा सीट बेल्ट नेहमी पोटाच्या खाली बांधून ठेवा.
 • तुम्ही पॅसेंजर सीटवर असाल तर, तुमची सीट पूर्णपणे मागे ढकलून द्या जेणेकरून तुमच्याकडे हात पाय ताणण्यासाठी पुरेशी जागा असेल.
 • तुम्ही गाडी चालवत असाल, तर आरामात बसण्यासाठी सीट शक्य तितकी मागे ढकलून द्या.
 • भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड रहा.
 • मळमळ टाळण्यासाठी निरोगी स्नॅक्स खा.
 • पाठदुखी टाळण्यासाठी आसन आणि पाठीच्या मध्ये उशी किंवा छोटी उशी ठेवा.
 • रक्ताभिसरण चालू ठेवण्यासाठी शक्य तितक्या वेळा स्ट्रेचिंग करा आणि चालत रहा.

. काय टाळावे

 • लांब पल्ल्याच्या सहली टाळण्याचा प्रयत्न करा.
 • स्ट्रीट फूड खाणे टाळा.
 • खूप घट्ट कपडे घालणे टाळा.
 • खडबडीत रस्ते असलेले मार्ग टाळा.
 • शक्यतोवर एकट्याने प्रवास करणे टाळा.

. खाली उतरल्यावर काय कराल?

 • भरपूर आराम करा.
 • पुन्हा सजलीत व्हा आणि खा.
 • पुरेशी विश्रांती घेतल्याशिवाय दुसऱ्या लांबच्या प्रवासाला जाऊ नका.
 • आवश्यक असल्यास, स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमची प्रवास योजना सुरू ठेवण्यासाठी तुम्ही चांगले फिट आहात ह्याची खात्री करा.

गरोदरपणात विमानाने प्रवास

अनेक गरोदर महिलांसाठी विमान प्रवास हा एक सुरक्षित पर्याय असू शकतो, कारण त्यात अचानक हालचाली होत नाहीत. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी हे विशेषतः सोयीचे आहे. तथापि, विमान प्रवासात बसण्याची अडचण होऊन गैरसोय होऊ शकते, विशेषत: जेव्हा स्ट्रेचिंग आवश्यक असते तेव्हा ते करता येत नाही.

गरोदरपणात विमानाने प्रवास

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

योग्य खबरदारी घेऊन, अस्वस्थता टाळण्यासाठी विमानाने प्रवास करणे शक्य तितके त्रासमुक्त करता येईल.

. प्रवास करण्यापूर्वी

 • आवश्यक तितकेच सामान घ्या आणि तुमची सर्व औषधे घेऊन जा.
 • आरामदायक आणि सैल कपडे घाला.
 • पायांना सूज येऊ शकते त्यामुळे कोणतीही अस्वस्थता टाळण्यासाठी मोठ्या आकाराचे शूज घाला.
 • पाय ताणण्यासाठी जागा मिळण्यासाठी एक्झिट जवळच्या सीटची मागणी करा.
 • स्कॅनिंग मशिनऐवजी कांडीने किंवा मॅन्युअली शोधण्याची विनंती.

. प्रवासादरम्यान

 • तुमचा सीट बेल्ट नेहमी लावा.
 • स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे द्रवपदार्थ घ्या.
 • उच्च केबिन प्रेशरमुळे सूज येणे किंवा रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी तुमचे घोटे आणि पाय नियमितपणे ताणा, विशेषत: लांबच्या प्रवासात हे नक्की करा.
 • रक्ताभिसरण चालू ठेवण्यासाठी अनेकदा फिरण्याचा प्रयत्न करा.
 • तुम्हाला काही अस्वस्थता वाटत असल्यास विमानातील स्टाफची मदत घ्या.

. काय टाळावे

 • लहान खाजगी विमाने टाळा आणि दाबाच्या केबिनसह मोठ्या एअरलाईन्सने प्रवास करा.
 • जर तुम्ही छोट्या विमानांमध्ये प्रवास करत असाल तर 7000 फुटांपेक्षा जास्त उंची टाळा.
 • गरोदरपणाच्या 36 आठवड्यांनंतर प्रसूतिपूर्व प्रसूती टाळण्यासाठी विमानाने प्रवास करणे टाळा.

. खाली उतरल्यावर काय कराल?

 • आपले स्नायू सैल करण्यासाठी आपले पाय आणि घोटे ताणा.
 • लँडिंग करताना तुम्हाला काही अस्वस्थता वाटत असल्यास, सल्ल्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
 • विश्रांती घ्या आणि भरपूर झोप घ्या.

गरोदरपणात समुद्र प्रवास

जोपर्यंत तुम्हाला जहाजातून प्रवासाचा त्रास होत नाही किंवा गरोदरपणातची इतर गुंतागुंत होत नाही तोपर्यंत, गरोदरपणातील समुद्र प्रवास तुमच्यासाठी सुरक्षित असावा. तुम्ही गरोदरपणात समुद्रातून प्रवास करण्याची योजना आखत असाल तर तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत अश्या काही गोष्टी खाली दिलेल्या आहेत.

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

. प्रवास करण्यापूर्वी

 • तुमचे औषध पॅक करा आणि ते तुमच्या संपूर्ण प्रवासात टिकेल याची खात्री करा.
 • तुमच्या वैद्यकीय आणि प्रसूतीपूर्व नोंदी ठेवा.
 • तुम्ही खाऊ शकता आणि खाऊ शकत नाही अशा गोष्टींसह तुमच्या डॉक्टरांकडून डाएट चार्ट मिळवा.
 • क्रूझवरील सुरक्षा उपायांचा मागोवा ठेवा.
 • वेळापत्रक तपासा आणि प्रत्येक पोर्टवर तुमचा किती वेळ आहे ते जाणून घ्या.
 • जहाजाने सर्व तपासण्या पूर्ण केल्या आहेत याची खात्री करण्यासाठी संबंधित कार्यालयांशी संपर्क साधून पडताळणी करा. त्यामुळे तुम्हाला कोणताही विलंब होणार नाही याची खात्री होईल आणि तुम्ही वेळापत्रकानुसार तुमच्या हव्या त्या ठिकाणापर्यंत तुम्ही पोहोचाल.

. प्रवासादरम्यान

 • सकस आणि पौष्टिक आहार घ्या. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आहार तक्त्याप्रमाणे आहार घ्या.
 • भरपूर पाणी प्या आणि सजलीत रहा.
 • चालण्याच्या जागेचा वापर करा आणि नियमित चालत जा.

. काय टाळावे

 • सूर्य प्रकाशाने होणारा त्वचेचा होणारा क्षोभ आणि अतिउष्णता टाळण्यासाठी डेकवर बराच वेळ घालवणे टाळा.
 • तुम्ही खात असलेले सीफूड आणि माशांचा मागोवा ठेवा. त्यापैकी काही माशांमध्ये पारा असतो त्यामुळे गर्भाच्या मेंदूच्या विकासात अडथळा येतो. तुम्ही काय खाऊ शकता आणि काय नाही याबद्दल आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • पडणे टाळण्यासाठी निसरड्या पृष्ठभागावर चालू नका.
 • बंदरांवर स्थानिक अन्न खाणे टाळा.
 • संक्रमण टाळण्यासाठी कॉमन पूल क्षेत्र टाळा. त्याऐवजी, खाजगी पूल किंवा जकूझी निवडा.
 • पाणी आणि साहसी खेळ टाळा.

. खाली उतरल्यावर काय कराल?

 • तुम्ही हाताळू शकत नाही अशी कोणतीही अस्वस्थता तुम्हाला आढळली, तर मध्येच उतरून ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधणे चांगले.
 • पौष्टिक आहार घ्या, हायड्रेटेड राहा आणि चांगली विश्रांती घ्या.

गरोदरपणात ट्रेन प्रवास

गरोदरपणात ट्रेनने प्रवास करणे अधिक सोयीस्कर असू शकते. गरोदरपणात इतर प्रकारच्या प्रवासात मळमळ होण्याची शक्यता कमी असते. तुम्हाला पाय ठेवण्यासाठी अधिक जागा मिळते. तसेच संपूर्ण प्रवासात फिरण्यासाठी आणि हात पाय ताणण्यासाठी पुरेशी जागा देखील मिळते. परंतु, प्रत्येक गर्भवती महिलेला समान अनुभव येत नाही. प्रवासाचा ताण तुमच्यावर येऊ शकतो. तुमच्या गरोदरपणात तुम्ही ट्रेन प्रवासाची तयारी कशी करू शकता त्याविषयी माहिती इथे दिलेली आहे.

गरोदरपणात ट्रेन प्रवास

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

. प्रवास करण्यापूर्वी

 • कमीत कमी थांब्यांसह थेट रेल्वे तिकीट बुक करा.
 • पाठीला आधार देण्यासाठी उशी ठेवा.
 • सोयीसाठी खालचा बर्थ राखून ठेवा.
 • तुमचे सामान ट्रेनमध्ये नेण्यासाठी पोर्टर मिळवा.
 • वॉशरूमजवळ बसण्याची विनंती करा.
 • आरामदायक कपडे आणि शूज घाला.
 • तुमच्या सहलीसाठी पुरेसे आरोग्यदायी, घरगुती स्नॅक्स आणि पाणी पॅक करा.

. प्रवासादरम्यान

 • पायांना विश्रांती द्या आणि शक्य तितक्या वेळ तुमचे पाय वरती ठेवा.
 • ट्रेनमध्ये योग्य आधार घेऊन नियमितपणे चालत जा.

. काय टाळावे?

 • विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ खरेदी करणे टाळा. त्याऐवजी घरचे अन्न घेऊन जा.
 • ट्रेन पुढे जात असताना डब्यांमधून फिरणे टाळण्याचा प्रयत्न करा किंवा वॉशरूम वापरणे टाळा.
 • एकट्याने प्रवास करणे टाळा आणि तुम्हाला आधार देण्यासाठी किमान एका व्यक्तीसोबत प्रवास करा.
 • धावत्या ट्रेनमध्ये चढू नका.

. खाली उतरल्यावर काय कराल ?

 • ट्रेनमधून उतरताना निसरड्या पायऱ्यांची काळजी घ्या.
 • गर्दी टाळण्यासाठी इतर प्रवासी उतरेपर्यंत थांबा.
 • तुमचे सामान घेऊन जाण्यासाठी एक हमाल भाड्याने घ्या.

गरोदरपणातील वाहतुकीचा प्रत्येक पद्धतीचा तुमच्यावर कसा परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही जास्त गैरसोय न होता इच्छित स्थळी पोहोचू शकता ह्याची माहिती आपण आतापर्यंत घेतलेली आहे. येथे, आपण प्रवास करणे पूर्णपणे कधी टाळावे याबद्दल बोलूयात. अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

गर्भवती महिलांनी प्रवास कधी टाळावा?

खालील प्रकरणांमध्ये तुम्ही गरोदरपणात प्रवास करणे टाळावे:

 • गर्भपात किंवा मुदतपूर्व जन्माचा इतिहास: जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचाही आधी गर्भपात झाला असेल किंवा मुदतपूर्व प्रसूती झाली असेल, तर प्रवास टाळणे चांगले.
 • एकाधिक गर्भधारणा: जर तुम्ही जुळी मुले किंवा त्याहून अधिक बाळांसह गर्भवती असाल, तर तुमचे डॉक्टर प्रवास टाळण्यास सांगू शकतात. एकाधिक बाळांसह गर्भधारणेमुळे तुमची मुदतपूर्व प्रसूती होण्याची शक्यता जास्त असते.
 • प्लेसेंटासंबंधी विकृती: प्लेसेंटा प्रिव्हिया आणि प्लेसेंटल अप्रेशन सारख्या परिस्थितीमुळे तुम्हाला आणि बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. जर तुम्हाला या परिस्थितींचा त्रास असेल तर रक्तस्त्राव देखील सामान्य असू शकतो. या स्थितीत प्रवास करण्याचा सल्ला दिला जात नाही कारण त्यामुळे गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो.
 • गर्भावस्थेतील मधुमेह: गर्भावस्थेतील मधुमेह असलेल्या स्त्रियांनी पुरेशी विश्रांती आणि काळजी घेणे आवश्यक असते कारण गंभीर प्रकरणांमुळे बाळाच्या जन्मादरम्यान गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे गरोदरपणातील मधुमेह असल्यास प्रवास टाळावा.
 • गर्भाशयाचे मुख नाजूक असल्यास: गर्भाशयाचे मुख नाजूक असल्यास तुमची मुदतपूर्व प्रसूती होण्याचा धोका वाढतो आणि जड हालचालीमुळे पडदा तुटतो, त्यामुळे प्रसूती होऊ शकते. ही गुंतागुंत टाळण्यासाठी भरपूर विश्रांती घेण्याची शिफारस केली जाते.
 • गरोदरपणातील जास्त रक्तस्त्राव: गरोदरपणात हलका रक्तस्त्राव होणे सामान्य आहे. परंतु, जर तुम्हाला जास्त रक्तस्त्राव झाला असेल, तर कोणतीही गुंतागुंत आणि अस्वस्थता टाळण्यासाठी तुमची प्रवास योजना रद्द करणे चांगले आहे.
 • एक्टोपिक गर्भधारणा: एक्टोपिक गर्भधारणा म्हणजे आईसाठी एक गंभीर धोका आहे. जर एक्टोपिक गर्भधारणा प्रीक्लेम्पसियासह असेल तर गुंतागुंत कमी करण्यासाठी प्रवास टाळणे चांगले.

गरोदरपणात प्रवास करण्यासाठी सुरक्षितता टिप्स

 • तुमचे स्नायू ताणून घ्या: प्रवासादरम्यान तुमच्या शरीरात योग्य प्रकारे रक्ताभिसरण होणे गरजेचे आहे. म्हणून, जेव्हा शक्य असेल तेव्हा व्यायाम करा किंवा विश्रांती घ्या, चालत रहा आणि पाय लांब करा. असे केल्यानं डीप वेन थ्रोम्बोसिस (DVT) चा धोका राहणार नाही. ह्या विकारामध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात.
 • ट्रॅव्हल किट पॅक करा: कॉम्प्रेशन सॉक्स, प्रसूतीपूर्व जीवनसत्त्वे, हेमोरायॉइड क्रीम, वैद्यकीय कागदपत्रे, तुमच्या डॉक्टरांचे संपर्क तपशील, आरोग्यदायी स्नॅक्स, हॅन्ड सॅनिटायझर, औषधोपचार (गरोदरपणात योग्य असेलेले) . सह ट्रॅव्हल किट ठेवा.
 • सजलीत रहा: संपूर्ण प्रवासात हायड्रेट राहण्याचे लक्षात ठेवा. कॅफिन आणि जास्त साखर असलेले पेय टाळा.
 • तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या: तुम्ही कुठे प्रवास करणार आहात यासह तुमच्या डॉक्टरांशी तुमच्या प्रवासाच्या योजनांची चर्चा करा. तुमचे डॉक्टर तुम्हाला आवश्यक ते मार्गदर्शन करतील आणि आवश्यक वैद्यकीय खबरदारी सुचवू शकतील. प्रवासासाठी तुमची तब्येत उत्तम असल्याची खात्री करण्यासाठी तुम्हाला नियमित तपासणीसाठी देखील जावे लागेल.
 • हुशारीने खा आणि प्या: शक्यतो बाहेरचे अन्न खाणे टाळा, परंतु जर तुम्हाला बाहेरचे खावे लागले तर फक्त बाटलीबंद पाणी प्या. अन्न योग्य प्रकारे शिजले आहे याची खात्री करा. तुम्हाला थोडे दूध प्यायचे असल्यास, ते पाश्चराइज्ड किंवा उकळलेले असल्याची खात्री करा.
 • ट्रॅव्हल इन्शुरन्स मिळवा: प्रसूती झाल्यानंतर तुमचा प्रवास विमा तुमचे गर्भारपण आणि वैद्यकीय बिले कव्हर करतो आहे ना हे पहा.
 • एअरलाइनकडे चौकशी करा: जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल, तर तुम्ही गर्भवती असताना एअरलाइनने प्रवासाला परवानगी दिली आहे याची खात्री करा, कारण बहुतेक एअरलाइन्स 36 आठवड्यांपेक्षा जास्त वयाच्या गर्भवती महिलांना प्रवास करण्याची परवानगी देत ​​नाहीत. तुम्ही तिकीट बुक केल्यानंतर, तुमचे पाय ताणण्यासाठी अधिक लेगरूम असलेल्या सीटसाठी विनंती करा.
 • आरामदायी रहा: आरामदायक कपडे घाला, सूर्यापासून स्वतःचे संरक्षण करा आणि तुम्ही तुमच्या शरीराचे संकेत ऐकत आहात याची खात्री करा. तुम्हाला अस्वस्थ वाटत असल्यास, जवळच्या वैद्यांशी संपर्क साधा आणि भरपूर विश्रांती घ्या.
 • घाई करू नका: उतरताना घाई करू नका. तुम्हाला धक्का लागू नये म्हणून इतर प्रवाशांना पुढे जाऊ द्या
 • व्यायाम करताना स्वच्छता: वॉशरूम आणि टॉयलेट वापरताना योग्य स्वच्छता राखा. तुमच्याकडे पर्याय असल्यास, संसर्ग होऊ नये म्हणून वेस्टर्न टॉयलेटऐवजी स्क्वॅट टॉयलेट वापरा. जर तुम्ही पतीसह प्रवास करीत असाल तर त्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव वॉशरूमच्या बाहेर तुमची वाट पाहण्यास सांगा.

गरोदरपणात शक्यतो प्रवास टाळण्यास सांगितले जात असले तरी योग्य खबरदारी आणि काळजी घेतल्यास गरोदरपणात प्रवास करणे शक्य आहे. कोणत्याही लांब पल्ल्याच्या प्रवासात सहभागी होण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच, तुम्हाला प्रवास करण्यापासून रोखू शकतील अशी कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी नियमित तपासणीसाठी जा. सुरक्षित प्रवासासाठी नियोजन आणि खबरदारी घेणे आवश्यक असते. गरोदरपणात तुमच्या आणि तुमच्या वाढत्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी हे आवश्यक आहे.

स्रोत: Webmd, Mayoclinic.org

Also Read:

गरोदरपणात चालणे: फायदे, सुरक्षा आणि धोके
गरोदरपणातील ‘मोशन सिकनेस’: कारणे आणि उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article