Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास लहान मुलींच्या उंचीचा आणि वजन वाढीचा तक्ता – 0 ते 12 महिने

लहान मुलींच्या उंचीचा आणि वजन वाढीचा तक्ता – 0 ते 12 महिने

लहान मुलींच्या उंचीचा आणि वजन वाढीचा तक्ता – 0 ते 12 महिने

जर तुम्ही लहान मुलीचे पालक असाल तर पहिल्या वर्षी तिची वाढ कशी होत आहे हे समजून घेण्याबद्दल तुम्ही नक्कीच उत्सुक असाल. पहिल्या महिन्यापासून ते १२ महिन्यांपर्यंतच्या बाळाच्या वाढीचा तक्ता ह्या लेखामध्ये दिलेला आहे. बाळाचे डॉक्टर सामान्यतः तिची उंची आणि वजनातील बदलांचा, वाढीच्या तक्त्याच्या मदतीने मागोवा घेतात. हा तक्ता बाळाची वाढ निश्चित करण्यासाठी, तसेच विकासातील विलंब जाणून घेण्यासाठी एक अंतिम मार्गदर्शक म्हणून काम करतो.

व्हिडिओ: लहान मुलीची उंची आणि वजन वाढीचा तक्ता : 0 ते 12 महिने

लहान मुलीच्या वाढीचा तक्ता (0-12 महिने)

लहान बाळाच्या मुलीच्या वाढीचा तक्ता (0-12 महिने)

लहान मुलीसाठी वेळोवेळी,  तिची उंची, वजन आणि डोक्याचा घेर इत्यादींच्या आधारे वाढीचा तक्ता तयार केला जातो. बाळाच्या जन्मानंतर मापने घेतली जातात. डॉक्टर सामान्यतः, लहान मुलांसाठी असलेल्या वजनाच्या स्केलवर ठेवून तिचे वजन करतात. तिला पाठीवर झोपवून आणि डोक्यापासून पायापर्यंतची लांबी मोजून उंची मोजली जाते. भुवयांच्या पातळीवर टेप लावून डोक्याचा घेर मोजला जातो. त्यानंतरचे मोजमाप डॉक्टरांच्या नियमित भेटी दरम्यान किंवा लसीकरणाच्या वेळी केले जाते. ह्या मापनांच्या आधारे ग्रोथ कर्व्ह तयार केली जाते. आणि ती वाढीचा नमुना दर्शविण्यास मदत करते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यू एच ओ) प्रमाणित वाढ तक्त्याशी तुलना करून मुलीच्या वाढीची टक्केवारी मोजली जाते. टक्केवारी काढण्यासाठी अनेक हजार सुदृढ बाळांकडून (मुलगी) गोळा केलेल्या डेटावर आधारित डब्ल्यूएचओने तक्ता तयार केला आहे. किमान मूल्य 3 पर्सेंटाइलशी संबंधित आहे, तर कमाल मूल्य 97 टक्के आहे. सामान्यतः बाळाच्या वाढीचे मापदंड या किमान ते कमाल मर्यादेत कमी जास्त होऊ शकतात.

वय (महिने) वजन (किलो) उंची (सेंमी) डोक्याचा घेर (सेंमी)
0 2.4 – 4.2 45.6 – 52.7 31.7 – 36.1
1 3.2 – 5.4 50.0 – 57.4 34.3 – 38.8
2 4.0 – 6.5 53.2 – 60.9 36.0 – 40.5
3 4.6-7.4 55.8 – 63.8 37.2 – 41.9
4 5.1-8.1 58.0 – 66.2 38.2 – 43.0
5 5.5-8.7 59.9 – 68.2 39.0 – 43.9
6 5.8-9.2 61.5 – 70.0 39.7 – 44.6
7 6.1-9.6 62.9 – 71.6 40.4 – 45.3
8 6.3-10.00 64.3 – 73.2 40.9 – 45.9
9 6.6-10.4 65.6 – 74.7 41.3 – 46.3
10 6.8-10.7 66.8 – 76.1 41.7 – 46.8
11 7.0-11.0 68.0 – 77.5 42.0 – 47.1
12 7.1-11.3 69.2 – 78.9 42.3 – 47.5

लहान मुलींच्या वाढीच्या तक्त्याची टक्केवारी समजून घेणे

वाढीचे प्रमाण मोजण्याची टक्केवारी पद्धत समजण्यास थोडी गोंधळात टाकणारी असू शकते. परंतु, बाळाच्या वाढीचे प्रमाण मोजण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. ही टक्केवारीची गणना डब्ल्यूएचओने तयार केलेल्या तक्त्याद्वारे प्रदान केलेल्या मानक मूल्यांवरून घेतली जाते.

समजा बाळाचे वजन 75 पर्सेंटाइलमध्ये आहे, याचा अर्थ असा की मुलींच्या सामान्य संचामध्ये, 74% मुलींचे वजन तिच्यापेक्षा कमी आणि 25% मुलींचे वजन तिच्यापेक्षा  जास्त आहे. हे सामान्य मानकांच्या तुलनेत बाळाचे आरोग्य आणि विकासाबद्दल योग्य कल्पना देते. वजन, उंची आणि डोक्याचा घेर या प्रत्येक पॅरामीटर्सची वैयक्तिक टक्केवारी मूल्ये असतात आणि जवळजवळ नेहमीच एकमेकांपासून भिन्न असतात. वाढीच्या एकूण मूल्यमापनात तीनही बाबींचा समावेश होतो

लहान मुलीची उंची आणि वजन वाढीचा तक्ता कसा वाचायचा?

पालक या नात्याने, वजन आणि उंचीच्या वाढीचा तक्ता कसा वाचायचा हे तुम्हाला माहिती असणे महत्वाचे आहे. मुलीच्या वाढीचा तक्ता चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या बाळाच्या डॉक्टरांची मदत घेऊ शकता. बाळाचे वजन, उंची किंवा डोक्याचा घेर इत्यादींची मापने टक्केवारी मोजण्यात मदत करतात. ग्रोथ चार्ट वाचताना लक्षात ठेवण्यासारखे काही मुद्दे आहेत:

  • नेहमी तुलना संबंधित लिंगांमध्ये केली आहे याची खात्री करा. मुलगा आणि मुलगी यांच्या वाढीच्या मूल्यांमध्ये किमान आणि कमाल मर्यादेत थोडा फरक आहे.
  • आजारपणाच्या काळात घेतलेले मोजमाप खरे मूल्य दर्शवत नाही, विशेषत: वजनासाठीहे लागू होते. त्यामुळे, पुनर्प्राप्तीनंतर वजनात स्थिर सुधारणा झाल्यास, अशा परिस्थितीत आलेखातील घट दुर्लक्षित केली जाऊ शकते.
  • दात येणे, भूक न लागणे, आजारपण इत्यादी कारणांमुळे वजनात होणारे चढ-उतार बाळाच्या वजनाच्या तक्त्याचा आलेखथोडा बदलू शकतात. बाळाचे वजन कमी होण्याची कारणे माहिती असतील तर वजन कमी झाल्यास काळजी करण्याची गरज नाही.
  • टक्केवारी चांगली असल्यासवाढीचा दर चांगला आहे असे मानले जाते , परंतु बाळाच्या वाढीची टक्केवारी नेहमीच जास्त असली पाहिजे हे आवश्यक नाही.
  • बाळाची उंची आणि वजन हे बाळाच्या वाढीचे मूल्यांकन करताना महत्त्वाचे मुद्दे आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्या बाळांची उंची आणि वजन सुरुवातीला कमी असते अशी बाळे वाढीच्या वर्षांमध्ये अपेक्षित वजन आणि उंची गाठू शकतात. त्यामुळे प्रत्येक बाळाच्या जन्माच्या वेळेची मूल्ये लक्षात घेऊन बाळाच्या वाढीचे मूल्यमापन करावे.
  • बाळांच्या वाढीच्या पहिल्या वर्षात उंची, वजन आणि डोक्याचा घेर इत्यादी परिमाणे मोजताना चुका होऊ शकतात, कारण बाळे सतत हालचाल करत असतात. परिमाणे चुकीची मोजली गेली आहेत असा तुम्हाला संशय आल्यास तुम्ही डॉक्टरांना पुन्हा मोजमाप करण्यास सांगू शकता.

लहान मुलीच्या वाढीवर परिणाम करणारे घटक

आनुवंशिकता, आरोग्य आणि बाहेरील वातावरण यांचा बाळाच्या वाढीवर परिणाम होतो. त्यापैकी काही घटक येथे दिलेले आहेत.

1. आनुवंशिकता

बाळाच्या वाढीमध्ये जनुकांची मोठी भूमिका असते. जे पालक सरासरी उंचीपेक्षा उंच आहेत त्यांची बाळे सुद्धा आनुवंशिक कारणामुळे उंच होतात.

2. पोषण

लहान मुलांना वाढण्यासाठी विशिष्ट प्रमाणात कॅलरी आणि पोषक तत्वांची आवश्यकता असते. या वयोगटातील बाळांना आवश्यक पोषक तत्वे सामान्यतः आईच्या दुधातून किंवा फॉर्म्युलामधून मिळतात, दुधाची गुणवत्ता आणि स्तनपानाच्या कालावधीचा स्तनपानावर परिणाम होतो.

3. आजार

सामान्य आजार जसे की सर्दी, कानाचा संसर्ग इ.मुळे बाळाच्या वाढीमध्ये किरकोळ अडथळे येतात, कारण बाळ कमी आहार घेते आणि गोंधळलेले असते. बरे झाल्यावर वाढीचा वेग पूर्वपदावर येतो.

4. गरोदरपणातील आरोग्य

जर तुमचे गर्भारपण निरोगी असेल तर तुमच्या बाळाची सामान्य वाढ होण्याची शक्यता जास्त असते. गरोदरपणात बाळाला प्रामुख्याने तुमच्याकडून पोषण मिळत असल्याने, तुमच्या शरीराने तुम्हाला आणि बाळाला दोन्हीसाठी पुरेशी पोषक द्रव्ये तयार करणे आवश्यक आहे.

तुम्हाला केव्हा काळजी वाटू शकते?

वाढीचे परीक्षण करताना कोणत्याही पॅरामीटर्समध्ये अचानक घट झाल्यास त्यामागचे कारण एखादी समस्या असू शकते. जर वाढीचा आलेख सातत्याने खाली घसरत असेल, तर कदाचित विकासात्मक समस्या असू शकते. तसेच, कोणत्याही पॅरामीटर्सची टक्केवारी कमी असल्यास, तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करू शकता. त्यामागे कुपोषणाची शक्यता असू शकते.  म्हणूनच, बाळाच्या वाढीला पूरक अश्या उपायांबाबत तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता.

गुलाबी ब्लँकेटमध्ये झोपलेली नवजात मुलगी

बाळाचे आरोग्य चांगले आहे ना हे सुनिश्चित करण्यासाठी बाळाच्या जन्मानंतर पहिल्या वर्षी बाळाच्या वाढीचा मागोवा घेणे महत्वाचे आहे. तसेच त्याद्वारे बाळाला विकासात्मक समस्या नाहीत ना हे सुद्धा जाणून घेता येते.

आम्ही दिलेल्या बाळाच्या वाढीच्या तक्त्याद्वारे तुम्ही तुमच्या मुलीची उंची, वजन आणि एकूण वाढ तपासून पाहू शकता आणि तिच्या विकासावर लक्ष ठेऊ शकता.

आणखी वाचा:

बाळाच्या विकासाचा तक्ता – १ ते १२ महिने
५२ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article