Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे ११ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे ११ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे ११ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

११ वा आठवडा म्हणजे ३ महिने पूर्ण होण्यासाठी एक आठवडा कमी आहे. तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा हे एक मोठे यश आहे. बरेच नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य आपल्याला सांगू लागतील की आपले बाळ एकतर तुमच्यासारखे किंवा तुमच्या जोडीदारासारखे दिसते कारण त्याच्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये (फीचर्स) आतापर्यंत स्पष्ट होऊ लागतील. बाळासोबत घालवण्यासाठी हा खूप चांगला काळ आहे.

११ आठवड्यांच्या बाळाचा विकास

जन्मापासून सुमारे ३ महिन्यांच्या प्रवासात तुमच्या बाळाची खूप वाढ झालेली आहे, तेव्हापासून बाळाचे वजन बरेच वाढलेले आहे. ११ आठवड्यांच्या बाळाचे वजन जन्मापासून आतापर्यंत अर्ध्या किलोपेक्षा जास्त आहे आणि त्यांना आता क्रिब किंवा पाळण्यात झोपण्यापेक्षा बिछान्यावर झोपायला आवडेल.

बर्‍याच बाळांच्या अंगात ताकद येण्यास सुरुवात होते आणि त्यांचे गाल चरबीमुळे गुबगुबीत आणि अत्यंत मोहक बनतात. पोटावर झोपवले असताना, तुमचे बाळ त्याच्या हातांचा उपयोग स्वतःला वर ढकलू शकते. वस्तूंपर्यंत पोहोचणे आणि आकलन करणे सुरूच आहे. हात आणि डोळ्यांच्या समन्वयासाठी अद्याप थोडासा विकास आवश्यक आहे. ध्वनी आणि जागेबद्दलची त्यांची धारणा अधिक तीव्र होईल आणि बासरी आणि खुळखुळ्यासारख्या खेळण्यांचा उपयोग करून ती वाढवता येऊ शकेल. ऐकण्याचे कौशल्य वाढल्यामुळे, अगदी दारातून आपला आवाज ऐकल्यामुळे त्यांना आपल्यास सकारात्मक प्रतिसाद मिळेल.

अकरा आठवड्यांच्या बाळांचे विकासाचे टप्पे

बाळाच्या शरीराच्या वरच्या भागाची शक्ती वाढल्यामुळे, पोटावर झोपवल्यावर तुमचे बाळ स्वतःचे हात वापरून स्वतःला आधार देण्याचा प्रयत्न करेल. बाळ रांगण्यास केव्हा सुरुवात करू शकते हे त्यावरून समजू शकते. बाळाला क्रिबमध्ये झोपवल्यावर, क्रिबच्या वर किंवा त्याच्या बार वर खेळणी लावली तर तो त्यांच्याकडे बघण्यात व्यस्त राहील आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न करण्यात बराच वेळ घालवेल.

अकरा आठवड्यांच्या बाळांचे विकासाचे टप्पे

याचा अर्थ असा आहे की आपल्या बाळासाठी हानिकारक असलेल्या कोणत्याही वस्तू दूर ठेवणे महत्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या बाळाच्या क्रिबमध्ये अचानक वस्तू दिसतील आणि त्या त्याच्या हातात कशा पडल्या असे आश्चर्यचकित व्हायला फार काळ लागणार नाही. काही क्षणांसाठी तुमच्या बाळाजवळ काहीही असुरक्षित असल्यास बाळ कदाचित ते उचलून तोंडात घालू शकतो. वस्तूंना बाळे आधी हात लावून स्पर्श करून पाहतात आणि मग ती तोंडात घालतात आणि ते खूप नैसर्गिक आहे. असे केल्याने ते घन आहार चघळण्यासाठी आवश्यक स्नायूंची शक्ती विकसित करण्यास मदत करते. बाळाला घेतल्यावर ते थोडी मान धरू लागते.

दूध देणे

जवळजवळ ३ महिने पूर्ण झाल्यावर, बाळ कदाचित नेहमीच असमाधानी असेल आणि वेळो वेळी सतत भूक लागणाऱ्या बाळांपैकी ते एक असेल. तुमच्या बाळाला कदाचित काही ना काही सतत चोखायला हवे असते आणि दूध पाजल्यानंतर लगेच पुन्हा भूक लागली म्हणून ते रडू शकते. परंतु, काळजी करण्याचे कारण नाही कारण प्रत्येक बाळ वेगवेगळ्या पद्धतीने वागते. बाळाच्या वजनात वाढ होते आहे की नाही हे पाहणे सर्वात महत्वाचे आहे. जर ते ठीक असेल तर बाकी सर्व काही ठीक आहे. काही पालकांना बाळाचे पोट भरावे म्हणून त्यास हलका घन आहार द्यावासा वाटतो. असे करण्याचा प्रयत्न करू नका कारण आपल्या बाळाचे पोट अद्याप घनपदार्थ पचवण्यासाठी पुरेसे मजबूत नसते आणि ऍलर्जीच्या बाबतीतही वैद्यकीय गुंतागुंत दिसून येते. जर आपल्या स्तनपानातून बाळाला पुरेसा दूधपुरवठा होत नसेल तर नेहमी फॉर्म्युला निवडा आणि त्याऐवजी बाळाला खायला द्या.

बाळाची झोप

११ आठवड्यांच्या बाळाच्या झोपेची चिन्हे खूप स्पष्ट आहेत आणि सहजपणे लक्षात येऊ शकतात. जर आपले बाळ थकले असेल तर तो जांभया देण्यास सुरुवात करते किंवा बराच काळ कोणत्याही गोष्टीकडे पाहत राहणार नाही आणि त्याचे डोळे देखील लाल होतील. खूप थकवा आल्यामुळे त्याची चिडचिड होऊ शकते म्हणून जेव्हा आपल्याला ही चिन्हे लक्षात येतील तेव्हा त्याला झोपवायला घेणे महत्वाचे आहे.

या वयातच, जेव्हा तुमचे बाळ सहज झोप घेण्यास सक्षम असेल तेव्हा तुमचे बाळ एका निश्चित वेळेला झोपू लागेल. ही सगळी बाळाला झोप आल्याची चिन्हे आहेत आणि त्यांना त्वरित झोपायला लावणे चांगले. जर झोपेची चौकट चुकली तर आपले बाळ जागे राहते आणि संपूर्ण दिवस चिडचिड करते. सुदैवाने, कदाचित आपल्या बाळाला रात्री आणि दिवसाचा फरक समजण्यास सुरवात होईल आणि ते रात्रीं थोडे जास्त झोपू लागते. त्यामुळे तुम्हाला आवश्यक झोप मिळेल.

जर तुमचे बाळ स्वतःचे स्वतः झोपी गेले तर अर्ध्या तासात ते जागे होईल परंतु तरीही त्याच्या डोळ्यावर झोप असेल. अशावेळी त्याला जवळ घेऊन थोडा वेळ थोपटत रहा जेणेकरून ते पुन्हा झोपेल.

वागणूक

मागच्या आठवड्यापेक्षा बाळाचे, सर्व आवाज काढणे आणि स्मितहास्य देणे आणि कुतूहल वाढते आणि तुमचे बाळ आत्मविश्वासाने प्रतिसाद देणे सुरू करते. शेवटी तुमचा चेहरा जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याला डोकावून पाहण्याची आणि हसताना आनंद देण्याची संकल्पना देखील समजेल. संगीत ऐकणे किंवा बाळासाठी बालगीते म्हणणे महत्वाचे आहे कारण बाळाला नंतर ती गाणी आठवतील आणि त्यामुळे बाळाचे शिकण्याचे कौशल्य वाढीस लागण्यास मदत होईल. कृतीची नक्कल करणे किंवा यमकांच्या मध्यभागी बूकिंवा यासारख्या साध्या ध्वनीची पुनरावृत्ती करणे हा खेळ म्हणजे शैक्षणिक अनुभव रोमांचक बनविण्याचे सोपे मार्ग आहेत. काही विशिष्ट आवाजांना प्रतिसाद म्हणून तुमचे बाळ छान आवाज काढू शकते शकते आणि मान डोलावते.

वागणूक

तुमचे बाळ संवादासाठी उत्सुक असले तरी सुद्धा, काही वेळा तुमच्या बाळास स्वतःमध्ये रमू द्या आणि तुम्ही इतर कार्यात व्यस्त रहा. त्याचे मन कुतूहल आणि कल्पनेचे क्रीडांगण आहे आणि खेळण्यांसोबत खेळताना त्याच्या मनात काय चालू आहे हे कुणाला माहित!. त्यालाही स्वत: चा वेळ द्या.

रडणे

वाढत्या वयानुसार, आपल्या बाळाच्या रडण्याचे प्रमाण आणि तीव्रता देखील वाढू लागते. त्याच्या मागण्या अधिक तीव्र आणि विशिष्ट बनण्यास सुरवात होईल आणि काहीतरी वेगळं सांगण्यासाठी तो मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न करेल. या वयातच, आपल्या बाळाचे व्यक्तिमत्त्व अधिक स्पष्ट होईल आणि तुम्हाला बाळाचा हट्टीपणा किंवा शांत राहण्यासारख्या काही वर्तणूकात्मक पद्धती समजण्यास सुरूवात होईल. आणि त्यामुळे बाळाला खरोखर काय हवे आहे हे जाणून घेणे सोपे होऊ शकते. तुमचे बाळ जवळ घेतल्यावर किंवा थोडेसे झुलवल्यावर त्वरेने शांत होत असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. काही बाळे विनाकारण बराच वेळ रडत राहतात.

११ आठवड्यांच्या बाळासाठी काळजीविषयक टिप्स

  • तुमच्या बाळाची वाढलेली भूक भागवण्यासाठी त्याला पुरेसे अन्न मिळाले आहे याची खात्री करा. जर आपल्या स्तनांमध्ये पुरेसे दुधाचे उत्पादन होत नसेल तर पूरक साधन म्हणून फॉर्म्युला दुधाचा वापर करा
  • बाळावर रात्री झोपण्याच्या वेळापत्रकांची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी रात्री लाईट बंद करा आणि बाळासाठी उत्तेजक असणाऱ्या सर्व गोष्टी दूर ठेवा
  • तुमच्या बाळाशी संवाद साधण्यासाठी आणि त्याच्या विकासास मदत करण्यासाठी भरपूर आवाज आणि रंगांचा वापर करा

चाचण्या आणि लसीकरण

एकदा आठव्या आठवड्यातील महत्त्वपूर्ण लसी योग्यप्रकारे दिल्या गेल्या की या आठवड्यात लसीची अजिबात गरज नाही.

खेळ आणि क्रियाकलाप

तुमच्या बाळाला आता आकार आणि रंग जास्त समजू लागले आहेत आणि तुम्हाला सुद्धा बाळ ओळखू लागते. पी का बू सारखे खेळ खेळून तुम्ही ही बाळाची क्षमता वाढवू शकता. पिवळसर किंवा लाल रंगाची, चमकदार हिरव्या रंगाची काही पाने मिळवा. त्यानंतर आपण ती बाळाच्या प्रॅमवर ​​बांधू शकता आणि आपण बागेत फिरत असताना त्याला त्यांचे निरीक्षण करू द्या. मोठ्या पानांनी तुम्ही तुमचे डोळे आणि चेहरा झाकू शकता आणि चेहऱ्याचे मजेदार हावभाव करू शकता.

ह्या वयात बाळे पालथी पडत नाहीत परंतु त्यासाठी प्रयत्न करू लागतात. पालथे कसे पडायचे हे पहिल्यांदा बाळाला समजण्यासाठी तुम्ही त्याला थोडेसे ढकलू शकता. मऊ ब्लँकेट घ्या आणि आपल्या बाळाला त्याच्या पाठीवर झोपवा. बाळ डोके उचलून पालथे पडेपर्यंत टाळ्या वाजवून बाळाचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळे आवाज काढा. एकदा असे झाल्यावर, ब्लँकेट हळूवारपणे वर घ्या किंवा त्याला पालथे पडण्यास मदत करण्यासाठी किंचित दाबा. जेव्हा तो पहिल्यांदा पालथा पडेल तेव्हा त्याच्यासाठी हा एक अनुभव असेल. जर तो उत्साहित असेल आणि आनंदी आवाज काढत असेल तर पुन्हा त्याला त्याच्या पाठीवर येण्यासाठी ब्लँकेटचा वापर करा. आणखी काही वेळा असे करत रहा आणि वेगवेगळ्या आवाजाद्वारे बाळाला प्रोत्साहन देत रहा.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल?

आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात दूध पिण्यामुळे किंवा कदाचित तुम्ही वायू निर्माण करणारे असे काहीतरी खाल्ल्यामुळे कदाचित आपल्या बाळाला गॅस होत असेल. परंतु ढेकर काढल्यानंतर किंवा वायू बाहेर जाण्यासाठी बाळाला मदत केल्यानंतर सुद्धा तुमचे बाळ रडत असेल तर ते पोटदुखीचे लक्षण असू शकते, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना याबद्दल सांगू शकता.

जर तुमच्या बाळाने जास्त दुधाची मागणी सुरु ठेवली आणि तुम्ही स्तनपानाद्वारे ती मागणी पुरवू शकला नाहीत तर तुमचे डॉक्टर तुम्हाला बाळासाठी सर्वोत्तम फॉर्मुला सुचवतील.

या वयातील बहुतेक बाळे आधीच शारीरिकदृष्ट्या सक्रिय आणि संवाद साधणारी असतात. तुमचे बाळ अद्यापही ध्वनीस आणि हलणाऱ्या वस्तूना प्रतिसाद देत नसेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे चांगले.

बाळ ३ महिन्यांचे झाल्यावर, आता तुम्ही स्वतःकडे लक्ष देण्यास सुरुवात करू शकता आणि तुमचे शरीर पूर्ववत होण्यासाठी व्यायामास सुरुवात करू शकता. बाळाच्या मागे तुम्हाला आता धावावे लागणार आहे त्यामुळे तुम्ही निरोगी असणे गरजेचे आहे.

मागील आठवडा: तुमचे १० आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे १२ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article