Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास ४९ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

४९ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

४९ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमचे बाळ आता ४९ आठवड्यांचे आहे आणि त्याचा पहिला वाढदिवस अवघ्या काही आठवड्यांवर आहे. आता तो कदाचित खूप बडबड करत असेल. लवकरच तो तुम्हाला समजतील असे शब्द वापरण्यास सुरुवात करेल. बाळामध्ये होणारे काही मोठे शारीरिक बदलही तुमच्या लक्षात आले असतील. बाळ आता रांगत असेल आणि वस्तूंना धरून उभे राहात असेल. लवकरच बाळ उभे राहून चालायला सुरुवात करेल. बाळ आता जास्त वेळ झोपत असेल आणि त्यामुळे जास्त उत्साही असेल.

तुमचे बाळ ह्या आठवड्यात विकासाचे अनेक टप्पे पार करेल. ४९ व्या आठवड्यात तुमच्या बाळाची वाढ आणि विकासाबद्दलची माहिती ह्या लेखाद्वारे जाणून घेऊयात.

तुमच्या ४९ आठवड्यांच्या बाळाचा विकास

४९ व्या आठवड्यापर्यंत, तुमच्या बाळाने आधार घेऊन चालायला सुरुवात केली असेल. वयाच्या ९ ते १८ महिन्यांच्या दरम्यान लहान बाळे चालायला लागतात. जर तुमच्या लहान बाळाने अजून चालायला सुरुवात केली नसेल तर काळजी करण्यासारखे काही नाही. तुमचे बाळ लवकरच हा टप्पा गाठेल. चालताना बाळ त्याच्या पायांचा समन्वय कसा साधावा हे शिकेल. सुरुवातीला बाळ अडखळेल आणि स्वतःचा समन्वय साधण्यासाठी हात वर करेल. परंतु सरावाने बाळ स्वतःचा तोल सांभाळू शकते. ह्या काळात बाळाला खेळण्यासाठी भरपूर खेळणी द्या. खेळणी दिल्यामुळे बाळाकडे पकडण्यासाठी काहीतरी असेल. बाळाचे स्ट्रोलर किंवा पुश टॉय हे प्रोत्साहन म्हणून काम करू शकतात तसेच बाळाला चालण्याचा सुद्धा सराव होऊ शकतो.

आणखी वाचा: तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या ४९ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

तुम्ही तुमच्या ४९ आठवड्यांच्या बाळाच्या विकासाच्या खालील टप्प्यावर लक्ष ठेवले पाहिजे:

 • तुमचे बाळ अस्खलितपणे बडबड करू लागेल. जरी तो काहीही बडबड करीत असेल तरी सुद्धा बोलताना त्याचे स्वर आणि उच्चर योग्य असतील.
 • तुमचे बाळ संतुलन न गमावता खाली वाकून जमिनीवरील वस्तू उचलू शकेल.
 • तुमचे बाळ आत्मविश्वासाने रांगू लागेल आणि कशाला तरी धरून चालू लागेल व त्याचे पहिले पाऊल टाकेल.
 • तुमच्या बाळाला होयआणि नाहीसमजायला सुरुवात होईल आणि तुम्ही त्याला काहीही विचारल्यास दोन्हीपैकी एक उत्तर बाळ देऊ शकेल.
 • तुमचे बाळ मामाआणि पप्पाह्या शब्दांसोबतच आणखी काही शब्द बोलू लागेल.
 • तुमचे बाळ जेव्हा रांगते किंवा चालत असते तेव्हा अधिक वेगाने फिरू शकते.
 • तुमच्या बाळाच्या चेहऱ्यावर लगेच सगळे हावभाव दिसतील आणि तुम्ही ते वाचण्यास सक्षम असाल.

तुमचे बाळ खाली वाकून जमिनीवरील वस्तू उचलू शकेल.

बाळाचा आहार

ह्या काळात, तुम्ही तुमच्या बाळाचे दूध सोडण्याचा विचार करत असाल, परंतु तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच तसे करावे. खरे तर, तुम्ही तुमच्या बाळाला फक्त झोपेच्या वेळी किंवा झोपेच्या वेळेपूर्वी बाटलीने दूध द्यावे. बाळ उठल्यावर बाळाला कपमधून दूध प्यायला द्यावे. या टप्प्यावर बाळाला घन पदार्थ देणे महत्वाचे आहे. दूध सोडण्याचा सर्वात कठीण भाग म्हणजे बाटलीतून दूध दिल्यानंतरच बाळाला झोप लागण्याची सवय मोडणे हा आहे. हि सवय मोडण्यासाठी बाळाला दिवसा दूध देण्यास सुरुवात करा. तुम्ही बाळाला देत असलेल्या दुधाचे प्रमाण हळूहळू कमी करा आणि तुमच्या बाळाला अंथरुणावर झोपवण्यापूर्वी दूध संपवण्याचे लक्षात ठेवा. जर तुम्ही बाळाला कपमधून दूध देत असाल, तर बाळाला दररोज दुग्धजन्य पदार्थांचे ४६ साविंग्ज लागतात, त्यामुळे तुम्ही बाळाला दूधाऐवजी इतर दुग्धजन्य पदार्थ देऊ शकता. रात्री हळूहळू दूध देणे थांबवण्यासाठी, झोपेच्या आधी हळुवार संगीत लावा किंवा बाळाला मिठी मारून त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करा. लवकरच, तुमचे बाळ विचलित होईल आणि बाटलीकडे कमी लक्ष देईल. दूध सोडणे क्रमप्राप्त आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या बाळाला या नवीन बदलांशी जुळवून घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल. बाळाच्या वयाच्या १२ महिन्यांच्या आसपास बाळाची बाटली बंद करणे आणि फॉर्म्युलाऐवजी बाळाला गाईचे दूध देणे हे उद्दिष्ट असावे.

आणखी वाचा: ११ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे पर्याय

बाळाची झोप

स्तनपान आणि फॉर्म्युला घेणाऱ्या बाळांसाठी झोपण्याची प्रक्रिया सारखीच आहे. स्तनपानाशिवाय इतर वेगळ्या पद्धतीने बाळाला झोपवण्याचे उद्धिष्ट आहे. आईशिवाय इतर प्रौढ व्यक्तीने बाळाला झोपवल्यास ही प्रक्रिया सोपी होईल. ह्याचे कारण म्हणजे जर आई स्तनपान करणारी असेल तर बाळ सहजपणे तिच्या स्तनांचा शोध घेईल. वडील किंवा विश्वासू आजी आजोबा घरात असतील तर, ते बाळाला झोपवण्यासाठी मिठी मारणे, बाळाला झुलवणे, थोपटणे आणि अंगाई गीत गाणे ह्यासारख्या तंत्रांचा वापर करू शकतात. आई म्हणून बाळाची हाक ऐकणे कठीण झाल्यास बाळाला झोपवताना तुम्ही इतरत्र असल्याचे सुनिश्चित करा. बाळ १२ ते १८ महिन्यांचे झाल्यावर त्याला बाटलीतून दूध देणे थांबवू शकता. जसजसे तुम्ही बाळाला झोपताना मिठी माराल आणि अंगाई गीत म्हणाल तसे बाळाला झोपण्याच्या वेळेची सवय होईल. बाळ हळूहळू हा बदल स्वीकारेल आणि बाळाला झोपण्यासाठी बाटलीची किंवा स्तनपानाची आवश्यकता भासणार नाही. आजारपण किंवा बाळाला दात येत असतील तर बाळाला झोपण्याची सवय लागण्यासाठी काही आठवडे प्रतीक्षा करा आणि पुन्हा प्रयत्न करा.

बाळाची झोप

तुमच्या४९ आठवड्याच्या बाळाची काळजी घेण्याविषयी काही टिप्स

तुमच्या ४९ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याचे काही उपाय खाली दिलेले आहेत

 • तुमच्या बाळाचा पहिला दात फुटल्यानंतर त्याचे दात स्वच्छ करण्यासाठी फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट वापरा, परंतु तुमच्या बाळाच्या बालरोगतज्ञांनी सांगितले असेल तरच हा उपाय करा. बाळासाठी ही टूथपेस्ट थोड्या प्रमाणात वापरा. त्यामुळे आपल्या बाळाचे दात किडण्यापासून रोखण्यासाठी ह्याची मदत होऊ शकते.
 • तुमच्या बाळाशी जास्तीत जास्त संवाद साधा, त्याच्याशी सतत बोला, बाळाला गोष्टी वाचून दाखवा. असे केल्याने बाळ नवीन शब्द शिकेल आणि बोलताना वापरण्यास ह्या शब्दांची मदत होईल.
 • जेव्हा तुमच्या बाळाचा पहिला वाढदिवस जवळ येईल तेव्हा बाळाला बाटलीऐवजी सिपिकप मधून दूध द्या.
 • बाळाशी बोलताना बोबडे बोलणे टाळा. आपल्या बाळाशी बोलताना नेहमी योग्य शब्द वापरा. त्यामुळे बाळ शब्दांचा योग्यपद्धतीने वापर करण्यास शिकेल.
 • तुमच्या बाळाच्या आहारात अधिक प्रथिनांचा समावेश करा उदा: चिकन (त्वचेशिवाय), अंडी (फक्त अंड्यातील पिवळ बलक), बीन्स आणि मटारसारख्या भाज्या इत्यादी. हे सर्व पदार्थ चांगले आहेत कारण त्यात चरबी आणि कोलेस्ट्रॉल देखील कमी आहे.

तुमच्या४९ आठवड्याच्या बाळाची काळजी घेण्याविषयी काही टिप्स

चाचण्या आणि लसीकरण

तुमचे बाळ १ वर्षाचे झाल्यावर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्याची शिफारस केली जाते.

. चाचण्या

डॉक्टर तुमच्या बाळाची उंची, वजन आणि डोक्याचा घेर मोजतील जेणेकरून ते तुमच्या बाळाच्या वाढीच्या प्रगतीचे मूल्यांकन करू शकतील. डॉक्टर तुम्हाला तुमच्या बाळाबद्दल अनेक प्रश्न विचारेल जेणेकरुन बाळाच्या झोपेच्या सवयी, दृष्टी, शारीरिक आणि वर्तणुकीच्या विकासाचे मूल्यांकन डॉक्टर करू शकतील. तुमच्या बाळाच्या रक्तात शिशाच्या विषबाधेची काही चिन्हे आहेत का हे तपासण्यासाठी सुद्धा डॉक्टर रक्त तपासणी करू शकतात.

. लसीकरण

बाळ ४९ आठवड्यांचे झाल्यावर, तुमच्या बाळाला हिब लस, हिपॅटायटीस ए लसीचा पहिला डोस, गोवर गालगुंड रुबेला लसीचा पहिला डोस आणि न्युमोकोकल (पीसीव्ही) लस दिली जाऊ शकते. बाळाला हिपॅटायटीस बी लसीचा अंतिम डोस आणि आधी दिलेला नसल्यास दिल्यास पोलिओ (आयपीव्ही) लसीचा तिसरा डोस देखील दिला जाऊ शकतो.

खेळ आणि उपक्रम

तुम्ही तुमच्या बाळासोबत खालील खेळ आणि क्रियाकलाप खेळू शकता:

 • हळूवारपणे बाळाचे हात तुमच्या हातात घेऊन बाळाला उभे राहण्यास प्रोत्साहित करा. उभे राहताना त्याला आरामात उभे राहता यावे त्यासाठी हि ऍक्टिव्हिटी आहे
 • वेगवेगळ्या खेळण्यांसह खेळा, उदा: नळीमधून सरकणाऱ्या रंगीबेरंगी रिंग्स किंवा आवाज करणारी बटणे असलेले रंगीबेरंगी पुस्तक. हे सर्व खेळ तुमच्या बाळाला शब्द आणि आवाज शिकण्यास किंवा कौशल्य सुधारण्यास मदत करण्यासाठी आहेत.
 • फोनवर बोलणे किंवा खेळणी उचलणे तसेच ही खेळणी बॉक्समध्ये परत ठेवणे यासारखे क्रियाकलाप करा. ह्या क्रियाकलापांची तुमचे बाळ नक्कल करेल आणि शिकेल
 • प्लेग्रुपमध्ये सामील व्हा आणि तुमच्या बाळाला त्याच्या वयाच्या बाळांमध्ये खेळूद्या.

तुमच्या बाळासोबत वेगवेगळ्या खेळण्यांसह खेळा

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

तुमच्या ४९आठवड्याच्या बाळामध्ये खालील गोष्टी आढळल्यास त्याच्या विकासाबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 • जर तुमचे बाळ १२ महिन्यांपर्यंत त्याच्या नावाला प्रतिसाद देत नसेल, तर त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा.
 • जर तुमच्या बाळाला त्वचेवर काही पुरळ येऊन खाज सुटत असेल किंवा अस्वस्थ होत असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण ती ऍलर्जीची चिन्हे असू शकतात.
 • जर तुमचे बाळ नीट दिसण्यासाठी डोके झुकवत असेल किंवा वारंवार डोळे चोळत असेल आणि त्याला दिसायला त्रास होत असेल तर, तुमच्या बाळाला दिसण्याची समस्या आहे का हे पाहण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. बाळाच्या डोळ्यातील लालसरपणा, वेदना, जास्त अश्रू येणे आणि कवच असणे ही पिंक आयची लक्षणे असू शकतात.

तुमचा लहान बाळ आता लवकरच १ वर्षांचे होईल. बाळासोबतच्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या. जेव्हा बाळ विकासाचे लहान मोठे टप्पे गाठेल तेव्हा तुम्हाला आनंद होईल!

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article