Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) बालदिनाच्या सर्वोत्तम शुभेच्छा, कोट्स, मेसेजेस आणि स्लोगन

बालदिनाच्या सर्वोत्तम शुभेच्छा, कोट्स, मेसेजेस आणि स्लोगन

बालदिनाच्या सर्वोत्तम शुभेच्छा, कोट्स, मेसेजेस आणि स्लोगन

ज्या घरात लहान मुले असतात तिथे आनंद, प्रेम असते. मुलांमुळे आपल्याला आपल्या लहानपणाची आठवण येते. ह्या बालदिनी, तुमची स्वतःची मुलं असोत, भाचीपुतणी असोत किंवा अगदी लहान शेजारी असोत, त्यांच्यासाठी काहीतरी खास करा आणि तुम्हाला ते किती प्रिय आहात हे त्यांना कळू द्या. बालदिनाच्या शुभेच्छा लिहिलेले एखादे सुंदर कार्ड त्यांच्यासाठी बनवा. तुम्हाला स्वतःहून काही शुभेच्छा लिहिता आल्या नाहीत तर काळजी करू नका. बालदिनाच्या सुंदर शुभेच्छांची यादी आम्ही इथे देत आहोत.

बालदिनाच्या १५ शुभेच्छा आणि संदेश

खाली काही गोड आणि मजेदार बालदिनाच्या शुभेच्छा आणि संदेश आहेत. ह्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी वापरू शकता. त्यांना वैयक्तिक स्पर्श देण्यासाठी तुम्ही यामध्ये बदल करू शकता आणि अगदी चित्रांसह पूर्ण केलेल्या छोट्या स्क्रॅपबुकमध्ये देखील ह्या शुभेच्छा तुम्ही लिहू शकता . मुले मोठी झाल्यावर त्यांना खरोखरच ह्या शुभेच्छा आवडतील!

  • माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही आमच्यासाठी सर्वात मौल्यवान आहात आणि मी तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण जपतो. बालदिनाच्या शुभेच्छा!
  • बालदिनाच्या शुभेच्छा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वप्ने बघा आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, तुमच्यावर माझे आज आणि कायमचे प्रेम आहे!
  • तुला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा, तू नेहमी मला माझ्या बालपणीच्या चांगल्या दिवसांची आठवण करून देतोस. तू माझ्यासारखाच खोडकर आहेस!
  • तू माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहेस. तू खूपच गोड आणि खोडकर आहेस आणि तू आयुष्यात नक्कीच एक चांगली व्यक्ती बनशील! बालदिनाच्या शुभेच्छा!
  • बालपणाचा आनंद घ्या आणि चांगल्या आठवणी जपून ठेवा! तुम्ही मोठे झाल्यावर ह्या आठवणी सतत तुमच्या सोबत असतील. बालदिनाच्या शुभेच्छा

बालदिनाच्या शुभेच्छा आणि संदेश

  • लहान मुले जेव्हा हसतात तेव्हा किती निरागस आणि आनंदी दिसतात. लहान मुलांमुळे सगळीकडे आनंद पसरतो. माझ्या लहान बाळाला बालदिनाच्या शुभेच्छा!
  • माझ्या मुलांनो, तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यामुळे आम्हाला धन्य वाटते. तुम्ही नुसते हसलात तरीसुद्धा आम्ही जीवनातील सर्व अनावश्यक गोष्टी आणि ताण विसरून जातो. आमच्या जीवनात उत्साह आणि आनंद घेऊन आल्याबद्दल धन्यवाद. बालदिनाच्या शुभेच्छा!
  • माझ्या प्रिय बाळा, तू माझ्या आयुष्यात आनंद (आणि काही वेळा तणावही!) घेऊन येतोस. पण याआधी माझे जीवन इतके आनंदी कधीच नव्हते. बालदिनाच्या शुभेच्छा
  • माझ्या प्रिये, तू आलीस आणि माझे जीवन धन्य झाले. तू गोंडस, निरागस आणि विचारशील आहेस. बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
  • तुझ्या खोलीतून बाहेर ये, मी तुझ्यासाठी कुकीज बेक केल्या आहेत. बालदिनाच्या शुभेच्छा, माझ्या बाळा!
  • तुझी आई असल्याचा मला किती अभिमान आणि आनंद आहे आणि मी तुझ्यावर किती प्रेम करते हे मी शब्दात वर्णन करू शकत नाही. बालदिनाच्या शुभेच्छा!
  • तुझे सुंदर स्मितहास्य आणि सुंदर चेहरा ह्या सगळ्यांनी माझा दिवस उजळून जातो. बालदिनाच्या शुभेच्छा माझ्या सुंदर बाळा!
  • ह्या विशेष दिवशी जगभरातल्या सर्व मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा
  • बालपणीचा काळ सुखाचा ह्याची आठवण बालदिनाच्या दिवशी होते बालदिनाच्या सर्व मुलांना खूप शुभेच्छा
  • प्रत्येक फुल जसे वेगळे असते तसे प्रत्येक मूल वेगळे असते बालदिनाच्या शुभेच्छा!

बालदिनाच्या शुभेच्छा

बालदिनानिमित्त आकर्षक कोट्स

बालदिनानिमित्त काही आकर्षक कोट्स खाली दिलेले आहेत

  • बालपणीचा काळ सुखाचा
  • मुले म्हणजे देवाघरची फुले
  • मुलांशी संवाद साधा, त्यांना प्रोत्साहित करा
  • आजी आजोबांसाठी नातवंडे म्हणजे दुधावरची साय
  • तुमच्या मुलांवर तुम्ही किती प्रेम करता हे त्यांना सांगण्याची संधी सोडू नका
  • पहिली पाच वर्षे मुलांचे लाड करा, पुढची पाच वर्षे त्यांना रागवा आणि मुले १६ वर्षांची झाल्यानंतर त्यांचे मित्र बना चाणक्य
  • मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या वर्तमानाचा त्याग करूयात . पी. जे. अब्दुल कलाम

बालदिनासाठी ११ आकर्षक घोषणा

मुले आपले उद्याचे भविष्य आहेत. आज ते शिकत असलेल्या गोष्टी त्यांना जबाबदार व्यक्ती बनण्यास आणि राष्ट्राला आकार देण्यास मदत करतील. त्याच अनुषंगाने, आपण आपल्या मुलांच्या छोट्या विजयांना प्रोत्साहन का दिले पाहिजे हे समजून घेण्यास मदत करण्यासाठी आम्ही बालदिनानिमित्त तुमच्यासाठी काही घोषणा घेऊन आलेलो आहोत.

  • प्रत्येक मूल हे फुलासारखे असते आणि कोणत्याही दोन फुलांची तुलना होऊ शकत नाही
  • आजची मुलं उद्याचा भारत घडवतील. आम्ही त्यांना ज्या पद्धतीने वाढवतो त्यावरूनच देशाचे भवितव्य निश्चित होईल. – जवाहरलाल नेहरू
  • मुलांना प्रेम द्या म्हणजे ते इतरांना देतील
  • मुले ही देवाची देणगी आहेत, त्यांना त्यांच्या विचारांसह भरारी घेऊ द्या
  • भेटलेल्या प्रत्येक मुलाशी चांगले वागण्याची प्रतिज्ञा घ्या, या साध्या कृतीने एक दिवस इतिहास घडेल

बालदिनासाठी आकर्षक घोषणा

  • जर तुम्ही तुमच्या मुलाचे चांगले पालनपोषण केले तर तो देशाची शान बनेल.
  • बालपण जगातील चांगल्या गोष्टींचे प्रतिनिधित्व करते. आज तो दिवस साजरा करा!
  • या बालदिनी, एखादे मूल संकटात सापडल्यावर तुम्ही पाठ फिरवणार नाही, अशी शपथ घ्या!
  • तुम्ही आज मुलाची काळजी घेतली आणि त्याला आधार दिला तर तो उद्या देशाची काळजी घेण्यासाठी आणि समर्थन करण्यासाठी मोठा होईल!
  • मुलांना श्रीमंत होण्यासाठी शिकवू नका. त्यांना आनंदी राहणे शिकवा जेणेकरुन ते मोठे झाल्यावर त्यांना सर्व गोष्टींचे महत्व कळेल.
  • भरपूर प्रेम दिल्यास प्रत्येक मुलाची वाढ चांगली होते आपल्या लहान मुलांचे आयुष्य आनंदी आणि निरोगी करूया.

बालदिनाच्या सर्वोत्तम शुभेच्छा

मुलं आपल्याला आनंदी आणि प्रामाणिक राहायला शिकवतात ह्या दोन्ही मौल्यवान गोष्टी मोठी लोकं विसरतात. ह्या बालदिनी तुमचे जग उजळून टाकणाऱ्या मुलांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी केक किंवा कुकीज बेक करा, त्यांना मनोरंजन पार्क, प्राणीसंग्रहालय किंवा संग्रहालयात घेऊन जा किंवा त्यांच्यासाठी कथा वाचा. त्यांना प्रेम देण्यासाठी तुम्ही बरेच काही करू शकता. ते तुमच्या प्रयत्नांची मनापासून प्रशंसा करतील आणि तुमच्यावर आधीपेक्षा जास्त प्रेम करतील. तुमच्या लहान मित्रांसोबत काही आनंददायी वेळ घालवा आणि तुमचे स्वतःचे बालपण पुन्हा पुन्हा जगा!

आणखी वाचा: बालदिन २०२२: मुलांसाठी बालदिनाविषयी छोटे आणि मोठे निबंध

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article