Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास ८ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

८ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

८ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

तुमचं महिन्याचे बाळ आता लवकरच वर्षाचे होणार आहे! महिने कसे भुर्रकन उडून गेले कळलंच नाही ना तुम्हाला? तुमचं महिन्यांचे बाळ आता हालचाल कौशल्य आणि संवेदनांच्या जागरूकतेच्या आधारे नवीन गोष्टींचा शोध घेईल आणि साहस करू पाहिल. त्यांची निरोगी वाढ त्यांची हालचाल क्षमता आणि समन्वय वाढवेल. तुमचे बाळ आता खूप चांगला संवाद साधू लागेल आणि शब्द भाषेचा वापर करू लागेल. त्यांचे कुतूहल असलेले लहान मन त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाविषयी जागरूकता वाढवेल आणि त्यांच्या गंमतशीर कृतींमुळे आपण बऱ्याच प्रसंगी आश्चर्यचकित व्हाल.

महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांचा तक्ता

पार केलेले विकासाचे टप्पे ह्या पुढील विकासाचे टप्पे 
उभे धरलेले असताना शरीराचा भार पायांवर पेलते आधाराने उभे राहते
हलणाऱ्या वस्तूंचा मागोवा घेते

एका हातातून दुसऱ्या हातात वस्तू देऊन हाताळते

हलणाऱ्या वस्तूंच्या मागे जाऊन त्या धरण्याचा प्रयत्न करते

अवघड हालचालींमध्ये बोटांचे नियंत्रण विकसित होते

सोप्या अक्षरांचे शब्द बोलते उदा:’‘, ‘आणि बोललेल्या अक्षरांच्या श्रेणीवर सुधारणा करते
मूलभूत सूचना समजतात बऱ्याच सूचना समजू लागतात
आई बाबांना मामाआणि दादाअशी हाक मारते आई आणि बाबांना बरोबर नाव देते
‘Pincer grasp’ विकसित होते वस्तू पकडण्यासाठी हाताचा वापर करते
दूर होताना चिंता दर्शवतेवियोग सहन करण्याची शक्ती वाढते
रांगण्याची स्थिती लगेच जाते स्वतःचे स्वतः उभे राहते
वैयक्तिक गोष्टींचा हेतू समजतो.स्वतःच्या घरातील वस्तू लक्षात ठेवते.

महिन्यांच्या बाळाचे विकासाचे प्रमुख टप्पे

तुमचे महिन्यांचे बाळ त्यांच्या पहिल्या वाढदिवसाकडे वाटचाल करीत असताना व्यस्त होत आहे. जागेपणाच्या क्षणापासून त्यांची उत्सुकता वाढते आणि प्रत्येक छोट्या गोष्टींमुळे त्यांचे कुतूहल वाढते. आता बाळ त्याला दिसणाऱ्या बऱ्याच गोष्टी इवल्याश्या तोंडात घालू लागते त्यामुळे घर बाळासाठी सुरक्षित करून घेतले पाहिजे. बाळाची तोंडाची चव विकसित होत असल्याने काही विशिष्ट घनपदार्थांची मागणी बाळ करू लागेल. तुमचे बाळ भराभर रांगू लागते आणि आधाराने उभे राहते तसेच काही अविश्वसनीय गोष्टी करू लागते ज्या तुम्ही तुमच्या कायम स्मरणात राहण्यासाठी टिपू शकता. बाळ आई बाबाना मामाआणि दादाअशी हाक मारु शकते जर ते चुकीचे असले तरीही!

आकलन विषयक विकास

बाळाची आकलन विषयक क्षमता ही बाळाच्या बौद्धिक कौशल्य, मेंदूचा विकास आणि आजूबाजूच्या गोष्टींचे आकलन ह्याच्याशी संबंधित असते.

 • भाषिक कौशल्य

तुमचे बाळ मूलभूत अक्षरे जसे की ; ‘आणि इत्यादी बोलू लागते. बाळ वेगवेगळ्या गोष्टीना मूलभूत नावे संलग्न करू शकते आणि त्यांच्या भावंडांच्या नावाला प्रतिसाद देते.


 • कुतूहल

सतत इकडून तिकडे हालचाल करत असणारे बाळ घरातील वस्तू आणि खेळण्यांचे अन्वेषण करेल. तुमचे बाळ गोष्टींवर अचानक छापा घालून ते कसे कार्य करते हे जाणून घेण्यासाठी खोलवर तपासून पाहील आणि त्याचा अर्थ लावेल.

कुतूहल

 • मूलभूत सूचनांचे आकलन करेल

तुमचे बाळ मूलभूत सूचना शिकून त्याची पुनरावृत्ती करेल उदा: जर तुम्ही मान हलवून नाहीअसे म्हणालात तर तुमच्या बाळाला समजेल की एखादी गोष्ट कार्याची नाही आणि ते तुमची आज्ञा पाळेल

 • वस्तूंचा मागोवा घेणे

चेंडू फेका आणि त्याकडे बघत रहा, चेंडू स्थिर होईपर्यंत तुमचे बाळ त्याकडे बघत राहील. ह्या टप्प्यावर, बाळाचा पडणाऱ्या आणि हलणाऱ्या वस्तू बघण्याच्या क्षमतेचा विकास होतो.

 • तर्जनीने वस्तूंकड़े बोट दाखवणे

आवडणाऱ्या वस्तूंकडे बाळ बोट दाखवू लागेल

 • कारणे आणि त्याच्या परिणामांची चाचणी करू लागेल

आपले बाळ कोणत्याही वस्तूच्या स्वतःच्या मर्यादेपर्यंत चाचणी करून तळाशी जाण्याचा प्रयत्न करणार नाही. ह्यामध्ये वस्तू फेकणे, वस्तू मारणे किंवा वस्तुंना दणका देणे इत्यादींचा समावेश होतो. त्यांना त्यांच्या प्रतिक्रियांना प्रतिसाद द्यायला आवडते आणि तुमच्या लक्षात येईल की तुमचे बाळ दुधाची बाटली वारंवार खाली टाकत असतील.

 • वस्तूंचा संदर्भ लावणे

तुमचे बाळ आता वस्तूंचा आणि त्यांचा उपयोग ह्याचा संदर्भ लावू लागेल. उदा: जरी तुम्ही बाळाला रिकामा कप डॉ;या तरी बाळ तो तोंडाला लावेल. जर तुम्ही बाळाला ब्लँकेट मध्ये गुंडाळलेत तर ते झोपी जाईल.

शारीरिक विकास

ह्या विकासामध्ये हालचाल कौशल्य, स्नायूंचे हालचाल कौशल्य आणि शारीरिक शक्ती ह्यांचा समावेश होतो.

 • आधाराने बसू लागते आणि उभे धरल्यास स्वतःचे वजन पेलते

तुमचे बाळ आता विनासायास बसू लागते आणि आधार दिल्यास उभे राहते आणि पायांवर वजन संतुलित करते.

 • बोटांची पकड (pincer grasp) विकसित होते

पहिली दोन बोटे आणि अंगठा ह्यामध्ये वस्तू पकडण्याचे कौशल्य विकसित होते. हाताच्या शक्ती मध्ये वाढ होते आणि स्नायूंमध्ये झालेल्या वाढीमुळे बाळ वस्तू उचलते, ती हाताळते आणि पुन्हा टाकून देते.

 • अन्नपदार्थ चावते

आतापर्यंत तुमच्या बाळाचे पहिले काही दात आले असतील आणि त्यामुळे बाळ अन्नपदार्थ चावण्याचा प्रयत्न करेल. कच्चे नव्हे तर शिजवलेले अन्नपदार्थ द्या. बाळ ते अन्नपदार्थ तोंडात बारीक करण्याचा प्रयत्न करेल.

 • दोन्ही बाजूला पालथे पडेल आणि रांगेल

पोटावर झोपवल्यावर तुमचे बाळ १८० डिग्री मध्ये दोन्ही बाजूला पालथे पडेल. १० महिन्यांची बाळे अगदी सहज रांगतात.

 • दृष्टी सुधारते

दृष्टी सुधारल्यामुळे तुमच्या बाळाला वस्तुंमधले अंतर ओळखण्यास मदत होते आणि दृष्टी आणि हाताचे स्नायू ह्यामध्ये समन्वय साधला जातो. आपण रांगत कुठे जात आहोत तसेच वाटेत येणारे अडथळे बाळ समजू शकते.

सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे

तुमचे बाळ सामाजिक आणि भावनिक रित्या खूप गुंतले जाते. ह्यामधून बाळाचे सामाजिक कौशल्य, भावनिक स्वभाव आणि लोकांबद्दल असलेला दृष्टिकोन दर्शवला जातो.

 • वेगळे होण्याच्या वेदना

एखादे आवडते खेळणे किंवा जवळच्या आवडत्या व्यक्तीपासून दूर गेल्यावर तुमचे बाळ दुःखी होते किंवा बाळ चिंताग्रस्त होते.

 • मनापासून अभिवादन

तुमचे बाळ तुम्हाला किंवा जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना बघितल्यावर हळूच गालातल्या गालात हसेल. त्यांना कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे किंवा मित्रमैत्रिणींच्या वलयातील एखाद्या व्यक्तीचे महत्व समजते.

 • सहानुभूतीची चिन्हे

बाळाचे मित्रमैत्रिणी रडू लागल्यास बाळ सहानुभूती दर्शवते. जेव्हा जेव्हा त्यांच्यासारख्याच कुणावरतरी संकट येते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दुःख दिसते.

संवाद कौशल्य

 • संवाद साधण्यासाठी हात आणि खांद्यांचा वापर करणारे तुमचे बाळ म्हणजे तुम्हाला आईन्स्टाईन सारखेच वाटेल.
 • भाषिक कौशल्यांमध्ये तुमचे बाळ मूलभूत शब्दांचा वापर करू लागेल. आणि कुणीतरी उचलून घ्यावे म्हणून हात पुढे करेल.
 • तुमच्या बाळाला आता नाहीह्या शब्दाचे महत्व कळेल
 • तुमच्या मुलाशी बोलत राहा आणि बाळाला संभाषणात गुंतवून ठेवा आणि त्यांची आकलनक्षमता वाढवण्यास मदत करा.

डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधला पाहिजे?

येथे काही मुद्धे दिले आहेत जे आपल्या मुलाच्या विकासात काही अडथळे दर्शवितात

 • आधाराशिवाय बसू शकत नसेल तर

तुम्ही मदत करून सुद्धा जर बाळ स्वतःचे स्वतः बसू शकत नसेल तर काही तरी समस्या आहे असे निर्देशित होते. बाळाच्या पावित्र्यात (posture) जर तुम्हाला काही त्रुटी आढळल्या किंवा बसवल्यावर सुद्धा बाळ पडत असेल तर तुम्ही वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे.

 • घट्ट स्नायू

जर तुम्ही बाळाला उभे धरले तर बाळाने नैसर्गिकरित्या पाय जमिनीला मारले पाहिजेत. जर बाळाचे हात पाय घट्ट गुंडाळले जात असतील तर ते काळजीचे कारण असते.

 • कुठलाच आवाज करत नाही

तुमचे बाळ शब्दांचा वापर करत नाही किंवा हळू आवाजात बोलणार नाही परंतु त्यांनी त्यांच्या स्वरयंत्राला व्यायाम मिळावा म्हणून साधे आवाज काढले पाहिजेत. जर तुमचे बाळ फारच शांत असेल आणि तुम्हाला क्वचितच बाळाचा आवाज ऐकू येत असेल तर विकासामध्ये खूप गंभीर उशीर झाला आहे.

 • परिचित चेहेरे ओळखत नाही

बाळाचे काळजी घेणारे तसेच बाळाचे आजी आजोबा ह्यांचे चेहरे ओळखण्यास बाळ असमर्थ ठरत असेल तर बाळाला नयूरॉलॉजीकल डिसऑर्डर असू शकते. अशी बाळे अलिप्त असतात आणि सगळ्यांच्यात मिसळत नाहीत.

 • दृष्टी एकाग्र न होणे

जर तुमच्या बाळाला गोष्टींवर दृष्टी एकाग्र करता येत नसेल किंवा आवाजाच्या दिशेने ते बघत नसेल किंवा अगदी हळू सरकणाऱ्या वस्तूंचा मागोवा घेता येत नसेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

तुमच्या बाळाला ८ महिन्यांचे विकासाचे टप्पे गाठण्यास मदत करण्यासाठी काही टिप्स

समर्पित प्रयत्नांसह तुम्ही तुमच्या बाळाला ह्या टप्प्यावर अपेक्षित विकासाचे टप्पे गाठण्यास मदत करू शकता.

 • बाळाशी संवाद साधून खेळा

उत्तेजक आणि अनुकूल क्रियाकलापांमध्ये सामील व्हा जेणेकरून त्यांना अधिक चांगले होण्यास मदत होईल.

बाळाशी संवाद साधून खेळा

 • वस्तू आणि व्यक्तींना नाव द्या

खेळणी आणि व्यक्तींना नाव द्या कारण तुम्हाला त्यांची ओळख होईल. त्यामुळे वस्तू आणि त्या वस्तूचे नाव ह्यांचा संबंध लक्षात येईल आणि तुमचे बाळ ते कालांतराने शिकेल.

 • गोष्टीची वेळ

गडद चित्रे असलेल्या पुस्तकातून गोष्टी वाचा. बाळाची दृष्टी आणि रंग ओळखण्याची क्षमता सुधारण्यासाठी प्रत्येक शब्द दाखवा.

 • सामाजिक सुसंवाद वाढवा

स्वतःला सामाजिक संघांमध्ये गुंतवून घ्या आणि नवीन लोकांना भेटा त्यामुळे तुमच्या बाळाचे सामाजिक कौशल्य आणि स्मरणशक्ती सुधारेल. ह्यामुळे अनोळखी लोकांबद्दलची चिंता सुद्धा कमी होईल.

 • रांगायला प्रोत्साहन मिळण्यासाठी खेळ खेळा

स्नायूंना बळकटी मिळण्यासाठी रांगणे ही महत्वाची क्रिया आहे. म्हणून पिकाबू किंवा चेंडू फेकणे किंवा झेलण्याने त्यांना चालायचे शिकण्यास मदत होते.

आपल्या आठ महिन्यांच्या बाळाने आतापर्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी असेल. आपण स्वत: ला बाळासोबत अशा क्रियाकलापांमध्ये सामील करू शकता जिथे तिच्या विकासास वेगवान मदत करण्यासाठी उत्तेजन मिळेल व आपण तिच्या कौशल्यांचे पालनपोषण करू शकाल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article