Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) शिक्षण मुलांसाठी शिक्षकदिनावर काही छोटे आणि मोठे निबंध

मुलांसाठी शिक्षकदिनावर काही छोटे आणि मोठे निबंध

मुलांसाठी शिक्षकदिनावर काही छोटे आणि मोठे निबंध

भविष्याचा पाया मजबूत तयार करण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करत असतात. शिक्षक त्यांचे संपूर्ण आयुष्य मुलांना शिक्षित करण्यासाठी समर्पित करतात. शाळा म्हणजे मुलांना दुसरे घर वाटावे म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. मुलांच्या बौद्धिक आणि भावनिक विकासासाठी सुद्धा ते प्रयत्न करत असतात. काही शिक्षक कठोर असले तरीसुद्धा ते मुलांना चुका करू देतात आणि शिकू देतात. शिक्षक मुलांना जीवनातील तथ्ये आणि समस्यांबद्दल सुद्धा मार्गदर्शन करत असतात. शिक्षक हे समाजाचे जबाबदार सदस्य आहेत आणि ते मुलांवर कायमची छाप पाडतात. शिक्षकांचे कौतुक केले पाहिजे कारण ते नसते तर प्रत्येक मुलाला जीवनात संतुलन राखण्यासाठी संघर्ष करावा लागला असता. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निबंधापेक्षा दुसरा चांगला मार्ग कोणता असू शकतो? या वर्षी, शिक्षणविषयी लिहून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. ह्या लेखामध्ये त्यासाठी काही दीर्घ आणि छोटे निबंध लिहिलेले आहेत.

शिक्षक दिनावरील छोटा निबंध

मुलांचे संगोपन आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस खरे तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस आहे. डॉ राधाकृष्णन हे प्राध्यापक, तत्त्वज्ञ आणि राजकारणी होते. ऑक्सफर्ड विद्यापीठात ईस्टर्न रिलिजन आणि एथिक्सचे प्राध्यापक आणि नंतर शिकागो विद्यापीठात लेक्चरर होण्यापूर्वी त्यांनी भारतातील काही नामांकित महाविद्यालयांमध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले. ऑक्सफर्डमध्ये ते पहिले भारतीय प्राध्यापक होते.

तत्त्वज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे, पाश्चात्य देशांमध्ये डॉ. राधाकृष्णन यांनी हिंदू धर्माची समज तयार करण्यासाठी केलेले प्रयत्न खूप प्रभावशाली आहेत. त्यांनी पाश्चात्य टीकेपासून हिंदू धर्माचे रक्षण केले आणि समकालीन हिंदू ओळख निर्माण करण्यात योगदान दिले. त्यांना भारतरत्न, नाइटहूड आणि ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटचे मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे.

आपला देश नकाशावर आणणाऱ्या आणि आपल्या कार्याने अनेकांना प्रभावित करणाऱ्या अनेक प्रमुख योगदानकर्त्यांपैकी ते एक होते. आत्तापर्यंत, आपण त्यांच्या वाढदिवसाला शिक्षक दिन का साजरा करतो हे आपल्याला माहित असेल. त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी देण्याची विनंती केली, परंतु त्यांनी त्याऐवजी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सांगितले, त्यामुळे देशातील प्रत्येक शिक्षक त्यांच्या योगदानाबद्दल कौतुक करत आहे. किती छान आहे ना हे!

मुलांसाठी शिक्षक दिनावर छोटा निबंध

शिक्षकांशी लहान मुले दररोज संवाद साधतात. शिक्षक हे त्यांचे ज्ञान आणि प्रेरणा स्त्रोत आहेत. शिक्षक दिनाच्या ह्या छोट्या निबंधाद्वारे तुम्ही आता तुमच्या शिक्षकांचे आभार मानू शकता. हा निबंध छोट्या मुलांसाठी योग्य आहे. परंतु मोठी मुले देखील ह्या छोट्या निबंधाचा आधार घेऊन त्यांचे विचार विस्तृत स्वरूपात मांडू शकतात.

आज मी जो कोणी आहे तो केवळ माझा शिक्षकांमुळेच! 

शिक्षक हे मित्रांसारखे असतात. आणि ते आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यास मदत करतात. शिक्षकांशिवाय फक्त ह्या जगाची कल्पना करून पहा – आपले विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी कसे वाचायचे किंवा कसे लिहायचे हे आपल्याला कळणार नाही किंवा सर्जनशील आणि कल्पनाशील कसे असावे हे सुद्धा समजत नाही. जग मर्यादित, कंटाळवाणे वाटेल, नाही का? आज आपले जीवन इतके छान आहे ते केवळ शिक्षकांमुळेच. हे शिक्षक आपल्याला नवीन गोष्टी करण्यासाठी, नवीन संकल्पनांबद्दल जाणून घेण्यासाठी आणि मोठे झाल्यावर जग एक्सप्लोर करण्यासाठी तयार राहण्यास प्रवृत्त करतात.

आम्हाला सर्वोत्तम गोष्टी शिकवण्यासाठी नेहमी झटणाऱ्या शिक्षकांचे आपण कृतज्ञ असले पाहिजे. ते त्यांचे ज्ञान आणि अनुभव आपल्याला क्रियाकलाप, खेळ, चर्चा आणि अगदी पुस्तकांद्वारे सामायिक करतात. जर ते नसते तर, आपल्यासाठी कंटाळवाणे धडे आम्ही सोडून दिले असते. शिक्षण मनोरंजक आणि सोपे बनवल्याबद्दल मी माझ्या शिक्षकांचा सदैव ऋणी आहे. तुमच्यामुळेच,मला आत्मविश्वास वाटतो आणि दररोज ह्या जगाचा सामना करण्यास तयार असतो!

मुलांसाठी शिक्षकदिनानिमित्त मोठा निबंध

शिक्षकदिनासारख्या विशेष दिवशी मोठ्या मुलांसाठी, हा 500-शब्दांचा निबंध त्यांचे विचार व्यक्त करण्यात मदत करू शकतो. या निबंधात शिक्षकदिनाविषयीच्या बहुतेक पैलूंचा समावेश आहे. निबंध लिहिण्यासाठी तुम्ही सर्जनशील, कल्पक आणि अस्सल असावे.

सर्वोत्तम शिक्षक हे आमच्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद का आहेत?

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन, प्रख्यात प्राध्यापक, तत्त्वज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणूनही काम केले होते. डॉ राधाकृष्णन यांनी शिकवणे कधीच थांबवले नाही. त्यांनी अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले आणि आपल्या देशाचा गौरव केला! एके दिवशी, काही विद्यार्थ्यांनी त्यांना विचारले की ते त्यांचा वाढदिवस, 5 सप्टेंबर रोजी साजरा करू शकतात का? त्याऐवजी, त्यांनी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सांगितले आणि अशा प्रकारे 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे.

आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या दिवसांमध्ये शिक्षक आपल्याला शिकवतात. प्रशिक्षित करतात आणि मार्गदर्शन करतात. शिक्षक आपल्यासाठी सुरक्षित वातावरण करत असतात आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी आम्हाला नेहमी प्रेरणा देतात. शिक्षणासाठी प्रोत्साहन हवेच आणि जर तुमच्याकडे एखादा प्रोत्साहन देणारा शिक्षक असेल, तर तुम्ही धन्य आहात!

शिकत राहण्यासाठी प्रेरणा कशी द्यावी हे सर्वोत्कृष्ट शिक्षकांना माहिती असते. कधीकधी आपल्या खऱ्या क्षमता जाणून घेण्यास मदत करण्यासाठी शिक्षक तयार असतात. शाळेत असो वा घरी ते आपल्याला  समस्यांचा सामना कसा करावा हे शिकवत असतात. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती केवळ आपली योग्यता वाढवण्यास मदत करत नाहीत तर विद्यार्थ्यांना आणि पालकांना भविष्याबद्दल आशावादी बनवतात.

हे शिक्षक नसते तर, आपल्यापैकी अनेकांना योग्य आणि अयोग्य आणि चांगले आणि वाईट यातील फरक समजून घेणे कठीण झाले असते. ते आपले व्यक्तिमत्त्व तयार करण्यात मदत करतात. त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे आणि ते आपल्या आयुष्याच्या निर्णयांमध्ये प्रतिबिंबित होतात.

काही शिक्षकांचा दृष्टीकोन सौम्य असतो, तो आपल्या सर्वांना आवडतो. परंतु कठोर असणे सुद्धा गरजेचे आहे. आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षकांनी कठोर असणे देखील महत्वाचे आहे.  आणि ते विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे.

त्यामुळेच शिक्षक दिनाला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. काही जण म्हणतील की आपल्याला  शिक्षकांसाठी समर्पित दिवसाची गरज नाही आणि ते खरे सुद्धा आहे, कारण आपण शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी दररोज शिक्षक दिन साजरा करू शकतो. परंतु, एक विशेष दिवस आपल्याला त्यांच्याबद्दल किती कृतज्ञ आहोत हे व्यक्त करण्याची संधी देतो. म्हणून, आपण आपला वर्ग सजवतो, हाताने बनवलेल्या भेटवस्तू तयार करतो, आपल्या शिक्षकांचा सत्कार करतो आणि त्यांच्यासोबत या खास दिवशी स्नॅक्सचा आनंद घेतो. ह्यामुळे  आपल्याला त्यांच्याशी बंध जोडण्यास मदत होऊ शकते. शेवटी, ते सुद्धा आपण शाळेत बनवलेले मित्र असतात.

धन्यवाद शिक्षक

शिक्षक दिनावरील हा निबंध तुम्हाला तुमचा स्वतःचा निबंध लिहिण्यासाठी उपयोगी होऊ शकतो. तुम्ही इथे दिलेले निबंध खास बनवण्यासाठी त्यामध्ये तुमचे वैयक्तिक अनुभव जोडू शकता. तुमच्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. शिक्षक दिनाविषयी तुमचे विचार लिहून ठेवा आणि जोपर्यंत एक उत्तम निबंध तयार होत नाही तोपर्यंत लिहीत रहा!

आणखी वाचा:

शिक्षक दिनाच्या मराठी कविता
शिक्षकदिनासाठी शुभेच्छासंदेश,मेसेजेस आणि कोट्स

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article