Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) शिक्षण लांडगा आला रे आला ही बोधकथा

लांडगा आला रे आला ही बोधकथा

लांडगा आला रे आला ही बोधकथा

‘लांडगा आला रे आला!’ ही इसापनितीमधील कथा मुलांमध्ये आणि कथाकारांमध्ये सर्वात लोकप्रिय कथा आहे. कथेचा मुख्य विषय आणि बोध तसाच ठेऊन ही कथा पिढ्यानपिढ्या अनेक प्रकारे सांगितली गेलेली आहे.

ही एक जुनी दंतकथा कथा आहे. ही कथा तिच्या प्रामाणिक आणि मौल्यवान नैतिक मूल्यांमुळे पिढ्यानपिढ्या टिकून आहे. ही कथा सर्वांना त्यांच्या लहानपणापासूनच आठवत असेल आणि आपल्या मुलाच्या हृदयाच्या अगदी जवळ असेल.

‘लांडगा आला रे आला’ ही कथा ह्या लेखामध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे.

‘लांडगा आला रे आला’ ह्या कथेचे मूळ आणि इतिहास

लांडगा आला रे आला (द बॉय हू क्राइड वुल्फ) ह्या दंतकथेचे मूळ तितकेसे स्पष्ट नाही. ह्या कथेचा उगम 620-564 बीसीई दरम्यान प्राचीन ग्रीसमध्ये झाला असे मानले जाते. अप्रामाणिकतेचे काय धोके आहेत आणि त्यासाठी कसे तयार राहावे हे ह्या कथेमध्ये सांगितलेले आहे. अप्रामाणिकतेमधून निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून सावध राहण्याचा संदेश ही कथा देते. म्हणून, खोटे बोलणे सुरू करण्यापूर्वी, ही उत्कृष्ट कथा लक्षात ठेवा आणि खोटे बोलण्यापूर्वी दोनदा विचार करा.

लांडगा आला रे आला (द शेफर्ड बॉय अँड द वुल्फ स्टोरी) ही कथा मराठीमध्ये

एकेकाळी, एक मेंढपाळ मुलगा होता. तो आपल्या मेंढ्यांचा कळप टेकडीवर ताज्या हिरव्या गवतावर चरायला घेऊन जात असे. तिथे बसून त्याला दिवसभर काहीच काम नव्हते. एके दिवशी त्याला एक कल्पना सुचली. त्याचा कंटाळा दूर करण्यासाठी तो ओरडला, “लांडगा आला रे आला ” सगळे लोक आपापल्या काठ्या घेऊन धावत आले परंतु त्यांना एकही लांडगा सापडला नाही. त्यांची फजिती झाल्याचे पाहून मुलगा हसू लागला.

काही दिवसांनी तो पुन्हा ओरडला, “ लांडगा आला रे आला!” ते ऐकून गावकरी पुन्हा टेकडीवर धावत आले. त्यांना पुन्हा फसवण्यात तो यशस्वी झाल्याचे पाहून मेंढपाळ मुलगा हसू लागला. मात्र, यावेळी गावकरी चांगलेच संतापले आणि त्यांनी पुढच्या वेळी मदतीसाठी आरडाओरडा केल्यास ते येणार नसल्याचे सांगितले.

दुसऱ्या दिवशी मेंढपाळ मुलाचा मेंढ्यांचा कळप चरत असताना त्याला अचानक एक लांडगा दिसला. तो मोठ्याने ओरडला “लांडगा आला रे आला !” पण अरेरे! त्याच्या मेंढरांना वाचवण्यासाठी कोणीही आले नाही. मेंढपाळ मुलगा त्याच्या काही मेंढ्या घेऊन रडत घरी परतला. लांडग्याने  त्याच्या काही मेंढ्या लांडग्याने पळवून नेल्या होत्या. त्या दिवसापासून त्याने पुन्हा कधीही खोटे बोलण्याचे वचन दिले.

“लांडगा आला रे आला! ” ह्या कथेतून कुठला नैतिक धडा घ्याल?

खोटेपणावर लोक विश्वास ठेवत नाहीत असा बोध ह्या कथेतून घेता येतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. लांडगा आला रे आला ही सत्यकथा आहे का?

लांडगा आला रे आलाही एक उत्कृष्ट दंतकथा आहे. ही कथा आपल्याला खोटे न बोलण्याचा मौल्यवान धडा शिकवते. पण, ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे का? ह्याचे उत्तर स्पष्ट नाही असे आहे.

ही कथा खरी असल्याचा काही लोकांचा अंदाज आहे, तर इतरांना ही कथा पूर्णपणे काल्पनिक वाटते. परंतु, ही कथा केवळ एक काल्पनिक कथा आहे असे इतिहासकारांना वाटते. ही कथा मुलांना प्रामाणिकपणाचे महत्त्व शिकवण्यासाठी पिढ्यानपिढ्या सांगितली गेलेली आहे.

ही कथा खरी असो अथवा नसो, परंतु आजही खऱ्या आयुष्यात ह्या कथेचे महत्व आहे. जेव्हा कोणी खोटे बोलून अतिशयोक्ती करते तेव्हा ते किती निराशाजनक असू शकते आणि भविष्यात त्यांच्यावर विश्वास ठेवणे कसे कठीण होऊ शकते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तर, कथेतून धडा घेऊयात आणि नेहमी खरे बोलूयात.

लांडगा आला रे आला ही लहान मुलांसाठीची नैतिक कथा प्रत्येक मुलाने वाचली पाहिजे आणि त्यातून मूलभूत धडा शिकला पाहिजे. प्रत्येक वाचकाच्या मनात खोलवर ठसा उमटवणारी ही कथा आहे.

आणखी वाचा: 

लहान मुलांसाठी श्रीकृष्णाच्या १४ सर्वोत्तम कथा

लहान मुलांना नैतिकतेचे धडे देणाऱ्या १० छोट्या प्रेरणादायी भारतीय पौराणिक कथा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article