Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) शिक्षण लहान मुलांसाठी १२ प्रेरणादायी कथा

लहान मुलांसाठी १२ प्रेरणादायी कथा

लहान मुलांसाठी १२ प्रेरणादायी कथा

जसजसे तुमचे मूल मोठे होईल, तसतसे त्याच्या सवयीनुसार त्याचे व्यक्तिमत्व घडेल. प्रत्येक दिवसागणिक तुमच्या मुलाच्या जुन्या सवयी जाऊन त्याला नवीन सवयी लागतील.

परंतु तुमच्या बाळाची गोष्टी ऐकण्याची सवय बदलणार नाही. त्याला झोपताना गोष्टी ऐकायची सवय असेल तर त्याला वाचनाची सवय लागण्यासाठी हळूहळू प्रयत्न करा. गोष्टी सांगण्याची वेळ नेहमीच खास असते. मुलांना प्रेरणादायी कथा सांगितल्याने त्यांना नैतिक मूल्ये आणि धडे शिकण्यास मदत होते. हे धडे  त्यांच्यासोबत आयुष्यभर टिकतात. गोष्ट सांगण्याची वेळ झाल्यावर ह्या लेखामध्ये दिलेल्या कथा तुम्हाला उपयोगी पडतील. ह्यामधील काही कथांवर एक नजर टाकूया.

मुलांसाठी प्रेरणादायी लघुकथा

मुलांसाठी सर्वोत्तम प्रेरणादायी  अश्या १२ कथा आम्ही तुमच्यासाठी ह्या लेखाद्वारे निवडलेल्या आहेत.  ह्या कथा तुमच्या मुलासाठी आनंददायी असतील तसेच त्यांना ह्या कथेद्वारे शिकायला मिळेल.

1. दुःखी मोर

दुःखी मोर

तुमच्याकडे जे आहे ते सर्वोत्कृष्ट बनवण्याविषयी भाष्य करणारी ही सुंदर कथा आम्ही तुमच्यासाठी निवडली आहे. महत्त्वाकांक्षा ही वाईट गोष्ट नसली तरी, सामान्यतः लोभात रूपांतर होण्यासाठी मध्ये एक फक्त पातळ सीमारेषा असते. हे दोन्ही मार्गांनी होऊ शकते. काही पालक त्यांच्या मुलांना इतके कठोरपणे वागवतात की मुले निराश होतात. दुसरीकडे, मुले त्यांच्याकडे आधीपासून काय आहे ह्याची पर्वा न करता अधिकची मागणी करू शकतात.

जवळजवळ अशीच काहीशी एका मोराची ही एक अद्भुत कथा आहे

एके काळी एक सुंदर मोर पावसाच्या दिवशी नाचत होता. तो स्वतःच्या सुंदर पिसाऱ्याची प्रशंसा करण्यात मग्न होता, त्याच्या उग्र आवाजाने त्याला स्वतःच्या कमतरतांची जाणीव करून दिली. त्याला झालेला सर्व आनंद, दुःखामुळे नाहीसा झाला. अचानक, त्याला जवळच एक कोकीळ पक्षी गाताना ऐकू आला.

कोकीळ पक्षाचा गोड आवाज ऐकून त्याला स्वतःच्या कमतरतेची पुन्हा एकदा जाणवली. आप्ल्यालाच असा आवाज देवाने का दिला आहे असा तो विचार करू लागला. त्याच क्षणी, इंद्रदेव प्रसन्न झाला आणि त्याने मोराला विचारले,

तू नाराज का आहेस?” इंद्राने मोराला विचारले.

मोराने त्याच्या उग्र आवाजाबद्दल तक्रार केली आणि त्यामुळे तो कसा दु:खी झाला आहे तो म्हणाला. “कोकिळेला इतका आवाज इतका सुंदर आहे. आणि मला का नाही?”

मोराचे म्हणणे ऐकून इंद्रदेवाने सांगितले की, “प्रत्येक जीव हा त्याच्या स्वतःच्या मार्गाने खास असतो. प्रत्येक जीव तयार करण्यामागे एक उद्दिष्ट असते आणि त्याप्रमाणे त्याला तयार केले गेलेले आहे.  होय,कोकिळेला देवाने सुंदर आवाज दिलेला आहे, परंतु तुला देखील किती सुंदर पिसारा दिलेला आहे! तुमच्याकडे जे आहे ते स्वीकारून त्याचा पुरेपूर उपयोग करणे हीच खरी युक्ती आहे.”

स्वतःची तुलना इतरांशी करण्यात आणि स्वतःकडे काय आहे ते विसरून जाण्यात किती मूर्खपणा आहे हे मोराला समजले. त्या दिवशी त्याला जाणवले की प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे अद्वितीय आहे.

बोध:  स्वतःला स्वीकारणे ही आनंदाची पहिली पायरी आहे. तुमच्याकडे जे नाही त्याबद्दल दु:खी होण्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे ते सर्वोत्तम करा.

2. कासव आणि ससा

कासव आणि ससा

ही कथा अनेक वर्षांपासून सांगितली गेली आहे. ह्या कथेतून लहान मुलांना एक मौल्यवान धडा मिळतो आणि तो धडा आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतो. तुम्ही ही कथा आहे तशी सांगू शकता किंवा थोडी बदलून स्वतःची आवृत्ती तयार करू शकता. ही कथा तुमच्या मुलासाठी तरीही एखादा मौल्यवान धडा देणारी असेल.

ससा हा केवळ एक सुंदर छोटा प्राणी आहे. तो त्याचा वेग आणि हुशारीसाठी ओळखला जातो. दुसरीकडे, कासव हा एक उभयचर प्राणी आहे आणि खूप साधा सरळ सुद्धा आहे. अर्थातच, जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये त्यांचा वेग कमी आहे.

एके दिवशी, सश्याला कासवासोबत शर्यत लावण्याची कल्पना सुचली. कासवाने होकार दिला आणि शर्यत सुरू झाली.

ससा कासवावर चांगली आघाडी मिळवण्यात यशस्वी झाला कारण तो एक उत्कृष्ट धावपटू होता. परंतु, सश्याला खूप अहंकार होता. शर्यत जिंकण्याच्या आधी काही अंतरावर त्याने डुलकी घेण्याचे ठरवले. थोडावेळ झोपलो तरी सहज जिंकू याची त्याला खात्री होती.

दुसरीकडे, कासवाचा वेग सश्यापेक्षा खूप कमी होता. परंतु त्याने कुठेही विश्रांती न घेता शर्यत कायम ठेवली. ससा जागा झाल्यावर त्याच्या लक्षात आले की कासव सीमारेषेच्या जवळ पोहोचले आहे. कासवाचा धावण्याचा वेग सश्यापेक्षा कमी असून सुद्धा त्याने शर्यत जिंकली.

बोध:  जोपर्यंत तुम्ही स्थिर आणि दृढनिश्चयी असाल, तोपर्यंत तुमचा वेग कितीही असला तरीही तुम्ही नेहमी जिंकाल. आळस आणि गर्व तुमचे शत्रू आहेत.

3. दोन बागकाम करणाऱ्या शेजारणी

दोन बागकाम करणाऱ्या शेजारणी

ही कथा मूल आणि पालक दोघांनाही मौल्यवान धडा देते. मुले खूप प्रभावी आणि संवेदनशील असतात आणि मुलांनी स्वतंत्र झाले पाहिजे हा विचार पालक म्हणून आपल्याला स्वीकारायचा नसतो.

ही कथा स्वतःहून स्वतःच्या गोष्टी शिकण्याबद्दल भाष्य करते.

एकदा, एका गावात दोन शेजारणी होत्या. ह्या दोघीही आपापल्या बागांमध्ये समान रोपे वाढवत असत. पहिली शेजारीण गोंधळलेली असे आणि तिच्या रोपांची अत्यंत काळजी घेत असे. दुसऱ्या शेजारणीने आवश्यक ते केले, परंतु रोपे एकटी सोडली.

एके दिवशी संध्याकाळी मुसळधार पावसासह प्रचंड वादळ आले. वादळामुळे अनेक झाडे उद्ध्वस्त झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी गोंधळलेली शेजारीण उठली तेव्हा तिला आढळले की रोपे उपटून नष्ट झाली आहेत. पण, जेव्हा अधिक निवांत असलेली शेजारीण जागी झाली तेव्हा तिने पाहिले की तिची रोपे वादळाचा सामना करूनही अजून जमिनीत घट्ट रुजलेली आहेत.

निवांत असलेल्या शेजारणीची रोपटी स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला शिकली होती. म्हणून,  मुळे खोलवर वाढली आणि त्यांनी मातीत स्वतःसाठी जागा बनवली. वादळातही ही रोपे ठाम उभी होती. परंतु दुसरी शेजारीण रोपासाठी सर्व काही करत असे, त्यामुळे रोपाला वादळात स्वतः कसे उभे राहायचे हे कळले नाही.

बोध: कधीतरी तुम्हाला स्वतंत्र व्हावे लागेल. जोपर्यंत तुम्ही गडबड थांबवत नाही तोपर्यंत स्वतःहून कुठलेही  काम होणार नाही.

4. उंदीर आणि सिंहीण

उंदीर आणि सिंहीण

आमची पुढची कथा अजून छान आहे. उंदीर आणि सिंहीणीची ही कथा कधीही जुनी होत नाही.

आपल्याला माहितीच आहे की सिंहीण ही एक उग्र, गर्विष्ठ प्राणी आहे. लहान प्राण्यांकडे सिंहीण कायम तुच्छतेने पाहत असे. अशीच एक सिंहीण एकदा जंगलात फिरत असताना तिच्या पंजामध्ये काटा घुसला. गर्विष्ठ असल्यामुळे सिंहीणीने मदत न मागण्याचा निर्णय घेतला. ती अशक्त होऊन रक्तस्त्राव होत असताना सुद्धा जंगलामध्ये फिरत राहिली.

एके दिवशी, तिला एका नम्र उंदीर भेटला. सिंहिणीला खूप वेदना होत होत्या. उंदीर जरी घाबरला असला तरी मदत देण्याइतपत धैर्यवान होता. लहान उंदीर सिंहिणीच्या पंजातून काटा काढण्यात यशस्वी झाला आणि तिला वेदनांपासून मुक्त केले.

जरी सिंहीण खूप मोठी आणि सामर्थ्यवान होती, आणि उंदीर इतका लहान आणि नम्र होता, तरीही उंदराच्या दयाळूपणामुळे सिंहिणीचे प्राण वाचवले.

बोध: नम्र व्हा आणि कधीही विसरू नका की तुमचा आकार आणि शक्ती किंवा उपयुक्ततेची हमी नसते,

5. तीन मासे

तीन मासे

तीन माशांबद्दलची ही सुंदर कथा आहे. पुन्हा एकदा, ही कथा तुमच्या मुलाला समस्या येत असताना शहाणे कसे व्हावे आणि गरजूंना मदत करण्यास कधीही विसरू नये हे शिकवते.

एका तलावात तीन मासे राहत होते. ते मित्र होते आणि सगळ्या गोष्टी एकत्र करत होते.

एके दिवशी एक मच्छीमार तलावाच्या जवळ आला आणि मासे पाहून त्याला आनंद झाला. जाळे टाकून त्याने माश्यांना पकडण्याचा बेत आखला.

सर्वात हुशार माशांनी वेगळा तलाव शोधण्याची योजना आखली. एका माशाने सहमती दर्शवली, तर दुसऱ्याने नकार दिला आणि म्हणाला की तो तलाव सोडणार नाही. तिसरा मासा पुढे म्हणाला की तलावात कोणताही धोका नाही. “मला हा तलाव सोडण्यात काही अर्थ वाटत नाही. मला वाटते की सगळे भित्रे आहेत.”

पहिले दोन मासे आपल्या मित्राला पटवून देऊ शकले नाहीत आणि म्हणून त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

दुसऱ्या दिवशी मच्छिमारांनी जाळे टाकले तेव्हा पहिले दोन मासे निसटले. मात्र, तिसरा पकडला गेला. त्याने संकट ओळखून त्यानुसार कार्यवाही केली नाही आणि आता धोक्याकडे दुर्लक्ष करण्याची किंमत चुकवत होता.

बोध: एखाद्या समस्येचा सामना करताना वेळीच शहाणे झाले नाही तर त्याची किंमत चुकवावी लागते. लक्षात ठेवा की प्रत्येक समस्या वेगळी आहे, आणि म्हणून, त्याचे निराकरण वेगळे आहे.

6. सोनेरी स्पर्श

आपण सर्वांनी आपल्या लहानपणी ही अद्भुत कथा वाचली किंवा ऐकली आहे आणि आता आपल्या लहान मुलांना ही कथा वाचून दाखवण्याची वेळ आली आहे. ही कथा एका लोभी माणसाची आहे. त्याने  स्वतःच्या मुलीला सोन्यात बदलले पण नंतर तिच्यासाठी शोक व्यक्त करत बसला.

एके काळी मिडास नावाचा राजा होता तो सत्कर्म करीत असे. पण एके दिवशी, त्याने अशी इच्छा केली  की तो ज्या गोष्टीना स्पर्श करेल त्या सोन्याच्या होतील.

आपल्याला नव्याने वर मिळाल्यामुळे मिडास राजा खूप आनंदित झाला. मिडास राजाने सर्व प्रकारच्या वस्तूंना स्पर्श करण्यास सुरुवात केली आणि प्रत्येक वस्तू शुद्ध सोन्याची झाली. “मी शक्तिशाली आहे. मी सर्व गोष्टी सोन्याच्या करू शकतो,” तो आनंदाने म्हणाला. पण लवकरच, राजाला भूक लागली आणि त्याने अन्नाचा घास उचलला आणि तो घास लगेचच सोन्याचा झाल्यामुळे तो खाऊ शकला नाही.  “मी आता काय करू? मला खूप भूक लागली आहे,” तो म्हणाला. त्याची निराशा पाहून, मिडासच्या मुलीने त्याचे सांत्वन करण्यासाठी त्याला स्पर्श केला आणि ती सुद्धा सोन्याची झाली. तो रडला आणि प्रार्थना केली आणि शेवटी त्याने त्याची लोभी इच्छा सोडली. लाडक्या मुलीसह सोन्यात रूपांतर झालेल्या सर्व गोष्टी आता सामान्य झाल्या. “मी आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीसाठी लोभी होणार नाही,” असे राजा  म्हणाला.

बोध: लोभ नेहमी आपल्याला विनाशाकडे नेतो. लोभ हा एक शाप आहे जो आपल्याला योग्य नसलेल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करतो. लोभ आपल्याला स्वार्थी आणि चिंताग्रस्त करतो. इतरांचा मत्सर करण्यास भाग पाडतो.

7. कोल्हा आणि द्राक्षे

जर तुम्हाला तुमच्या मुलाला कठोर परिश्रमाबद्दलचा धडा शिकवायचा असेल तर ही कथा आदर्श आहे. कठोर परिश्रमाशिवाय आयुष्यात काहीही हाती लागत नाही हे मुलांनी शिकायला हवे.

एके दिवशी कोल्ह्याला खूप भूक लागली आणि तो अन्न शोधू लागला. कोल्ह्याने खूप शोधले  परंतु त्याला खाण्यासारखे काहीही सापडले नाही. शेवटी पोटात खड्डा पडताच त्याला एका शेतकऱ्याची भिंत दिसली. भिंतीच्या पलीकडे, त्याने कधीही न पाहिलेली सर्वात मोठी आणि रसाळ द्राक्षे दिसली. “वाह जांभळी, रसाळ द्राक्षे! मला ही द्राक्षे मिळालीच पाहिजेत,” तो स्वतःशीच म्हणाला.

द्राक्षांपर्यंत पोहोचण्यासाठी कोल्ह्याला हवेत खूप उंच उडी मारावी लागली. उडी मारताना त्याने द्राक्षे पकडण्यासाठी तोंड उघडले पण त्याला द्राक्षे मिळाली  नाहीत. त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी त्याचा नेम चुकला.

शेवटी, त्याने हार मानण्याची वेळ आली आहे असे ठरवले. “द्राक्षे आंबट होती,” तो बडबडत निघून गेला.

बोध: आपल्याजवळ नसलेल्या गोष्टींचा कधीही तिरस्कार करू नका. कुठलीही गोष्ट सोपी नाही. जीवनात काही मिळवायचे असेल तर कठोर परिश्रम केले पाहिजेत.

8. गर्विष्ठ गुलाब

ही एक उत्कृष्ट कथा आहे. एखाद्याच्या बाह्य स्वरूपाच्या आधारावर त्याच्याविषयी मत बनवणे योग्य नाही. एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी,  त्याच्याबद्दल कोणतेही मत तयार करण्यापूर्वी त्याच्याशी बोलणे आणि त्याला समजून घेणे महत्वाचे आहे. चला कथा वाचूया!

एकदा एक गुलाब होता. त्याला स्वतःच्या दिसण्याचा खूप अभिमान होता. गुलाबाच्या जवळच एक निवडुंग होता. रोज रोज गुलाब निवडुंगाचा अपमान करायचा, पण निवडुंग काहीच बोलला नाही. “हा कॅक्टस किती कुरूप दिसतोय,” गुलाब म्हणायचा. गुलाबाच्या सभोवतालची इतर सर्व झाडे, फुले आणि झाडे निष्पाप निवडुंगाला गुलाबाच्या वाईट बोलण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असत. पण गुलाब त्यांच्या सौंदर्याने खूप प्रभावित झाले होते.

वसंत ऋतू गेला, उन्हाळा आला, आणि पाऊस पडला नाही. हळू हळू गर्विष्ठ, सुंदर गुलाबाचा रंग उडून तो कोमेजायला लागला. गुलाबाने एका पक्ष्याला आपली चोच कॅक्टसमध्ये घालून त्यातून पाणी पिताना पाहिले. गुलाबाला कॅक्टसची मदत घ्यायला लाज वाटली, पण शेवटी त्याने विचारले. “तू मला थोडे पाणी देऊ शकशील का, नाहीतर मी लवकरच मरेन,” तो कॅक्टसला म्हणाला. दयाळू कॅक्टस सहमत झाला आणि पक्ष्याने गुलाबाला पाणी दिले.

बोध: कोणाच्याही दिसण्यावरून कधीही कुठलेही मत बनवू नका. काहीवेळा, एखाद्या व्यक्तीचे दिसणे अगदी साधेअसू शकते, परंतु त्याचे आंतरिक सौंदर्य खरोखर महत्त्वाचे असते.

9. एक शहाणा घुबड

नैतिक कथांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांना अधिक शहाणे करू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? एका वृद्ध घुबडाची ही कहाणी वाचूया. हे घुबड फक्त इतरांचे म्हणणे पाहून आणि ऐकून शहाणा झाला.

एकदा ओकच्या झाडावर एक वृद्ध घुबड राहत होते. हे घुबड आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करत असे. एके दिवशी, एक तरुण मुलगा एका वृद्ध माणसाला जड टोपली घेऊन जाण्यास मदत करत असल्याचे त्याने पाहिले. दुसऱ्या दिवशी त्याला एक तरुण मुलगी तिच्या आईवर ओरडताना दिसली. तो जितके जास्त बघत असे तितके कमी बोलत असे.

जसजसे दिवस जात होते तसतसे तो जास्त ऐकू लागला आणि कमी बोलू लागला. घुबडाने वेगवेगळ्या लोकांचे बोलणे ऐकले. त्याने एका मुलीला, “हत्तीने कुंपणावरून उडी मारली होती.” असे बोलताना ऐकले. एक मुलगा, “मी कधीही चूक केली नाही.”असे म्हणताना सुद्धा त्याने ऐकले.

वृद्ध, शहाणा घुबडाने या लोकांचे काय झाले ते पाहिले आणि ऐकले. लोकांचे चांगले तसेच वाईट होताना घुबडाने पहिले. घुबड दिवसेंदिवस शहाणे होत होते.

बोध: अधिक चौकस रहा. कमी बोला आणि जास्त ऐका. ह्यामुळे आपल्याला शहाणे होण्यास मदत होईल. अनावश्यक बोलण्याने केवळ आपल्या उर्जेचा अपव्यय होईल.

10. मुंग्या आणि टोळ

या लघुकथेच्या सहाय्याने कमी महत्त्वाच्या गोष्टींवर त्यांचा मौल्यवान वेळ वाया घालवण्यापेक्षा आवश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व मुलांना समजावून द्या.

शरद ऋतूतील एक दिवस, मुंग्यांचे एक कुटुंब उबदार सूर्यप्रकाशात कामात व्यस्त होते. मुंग्या उन्हाळ्यात साठवून ठेवलेले धान्य सुकवत होत्या. तेवढ्यात एक उपाशी टोळ उठला. हाताखाली सारंगी ठेवून तो टोळ अतिशय नम्रपणे म्हणाला, “मी हे अन्न खाऊ शकतो का ?”

मुंग्यांनी त्याला विचारले, “तू हिवाळ्यासाठी अन्न का साठवले नाहीस?”

“मी उन्हाळ्यात संगीत तयार करण्यात खूप व्यस्त होतो की माझ्याकडे अन्न साठवण्यासाठी वेळ नव्हता,” टोळ उत्तरला.

मुंग्या सहजपणे  म्हणाल्या, “आता तुम्ही संगीत तयार केले आहे, तुम्हीही त्यावर नाचले पाहिजे.” मुंग्यांनी मग टोळाकडे पाठ फिरवली आणि परत आपल्या कामाला लागल्या.

बोध: कामाची एक वेळ असते आणि खेळण्यासाठीची एक वेळ असते. एखाद्याने आपला वेळ नीट कारणी लावला पाहिजे, कारण आपल्या छंदांचा पाठपुरावा करण्यासाठी आपण कामाव्यतिरिक्त उरलेला वेळ काढू शकतो. वेळ मौल्यवान आहे आणि आपण सकारात्मक गोष्टी करून त्याचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे.

11. विहिरीतील कुत्रा

आई-वडील जे करू नका असे सांगतात ते करण्याची मुलांना अनेकदा सवय असते. आपल्या मुलाने आपल्या वडिलांचे का ऐकले पाहिजे हे त्यांना कळण्यासाठी ही कथा त्यांना वाचा.

एक कुत्रीण आणि तिची पिल्ले एका शेतात राहत होती. शेतात एक विहीर होती. कुत्रीण तिच्या पिल्लांना नेहमी म्हणायची, “कधीही विहिरीजवळ जाऊ नका किंवा विहिरीभोवती खेळू नका.”

एके दिवशी, एका कुत्र्याच्या पिल्लाला कुतूहल वाटले. आपली आई आपल्याला विहिरीजवळ का जाऊ जात नाही. म्हणून, त्यांनी ते शोधायचे ठरवले.

तो विहिरीजवळ गेला आणि आत डोकावण्यासाठी भिंतीवर चढला. विहिरीतील पाण्यात त्याने स्वतःचे  प्रतिबिंब पाहिले आणि त्याला वाटले की हा दुसरा कुत्रा आहे. विहिरीतील कुत्रा त्याचेच अनुकरण करते आहे हे पाहून त्याला राग आला. त्याने लढायचं ठरवलं.

लहान पिल्लाने विहिरीत उडी मारली, फक्त तेथे कुत्रा नव्हता. त्याला सोडवायला शेतकरी येईपर्यंत तो भुंकत राहिला. पिल्लू आता धडा शिकला होता आणि पुन्हा त्या विहिरीकडे परत गेला नाही.

बोध: आईवडिलांचे  नेहमी ऐका आणि त्यांचा अपमान करू नका. आई वडिलांना जीवनाचा अनुभव जास्त असतो आणि ते आपल्याला नेहमी योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात.

12. लांडगा आणि मेंढी

आपल्या सभोवतालच्या गोष्टींकडे लक्ष देण्याची ताकद आपल्या सर्वांना समजते. पण आपण आपल्या मुलांना तेच शिकवले पाहिजे. त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय चालले आहे याची जाणीव असली पाहिजे. तसेच सभोवतालच्या घडामोडींविषयी सुद्धा त्यांनी जागरूक असले पाहिजे. खालील कथा सभोवताली लक्ष देणे महत्त्वाचे का आहे याचा धडा शिकवते.

अस्वलाशी लढताना लांडगा गंभीर जखमी झाला होता. तो हालचाल करू शकत नव्हता आणि त्याची तहान किंवा भूक भागवू शकत नव्हता.

एके दिवशी लांडगा जिथे लपला होता तिथून एक मेंढी जात होती. लांडग्याने त्याला हाक मारली, “मला पाणी आण. त्यामुळे मला जेवण्याची शक्ती मिळेल.”

जेव्हा मेंढ्याने “जेवण” हा शब्द ऐकलं  तेव्हा त्याला समजले की तो लांडगा फक्त त्याला खाण्याचा सापळा रचत होता.

बोध: जर कोणी लक्ष देत असेल तर एखाद्या व्यक्तीचे गुप्त हेतू शोधणे सोपे आहे. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे ह्याविषयी आपण जागरूक राहिले पाहिजे आणि संभाव्य धोक्याकडे लक्ष दिले पाहिजे.

प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी काही टिप्स

  1. मुलांना प्रेरणादायी कथा दिवसा वाचून दाखवल्या पाहिजेत, कारण तेव्हा तुमचे मूल सावध असेल. थकलेले नसेल. त्यामुळे कथा ऐकताना मुले एकाग्र होतात आणि त्यांना कथेचे आकलन चांगले होते.
  2. प्रेरणादायी कथा असली तरी ती कंटाळवाणी होईल अशी वाचू नये. इतर कोणत्याही कथेप्रमाणे ती वाचा. कोणतीही कथा मनोरंजक बनवण्यासाठी विविध आवाज आणि खेळपट्टी वापरा.
  3. कथेच्या शेवटी तुमच्या मुलाला प्रश्न विचारा. कथेच्या पात्राच्या जागी तुम्ही असाल तर काय कराल किंवा कथेचे नैतिक काय आहे असे प्रश्न मुलांना विचारा.
  4. तुमच्या मुलासाठी कथा अधिक सुसंगत बनवण्यासाठी तुम्ही ती बदलू शकता. तुमच्या मुलाच्या आवडीनिवडी नुसार कथा निवडा. ज्या कथांमध्ये त्याला अधिक रस आहे अश्या कथा त्याच्यासाठी निवडा.
  5. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलाला कथा नीट समजत नाहीये तर कथावाचन थांबवा आणि पुढे काय होईल याचा अंदाजघ्या. खरं तर, तुम्ही ह्याचा नियमित सराव देखील करू शकता. तुमच्या मुलाला अंदाज विचारल्याने कल्पनाशक्ती वाढण्यास मदत होते.

तर, या काही सर्वोत्कृष्ट कथा आहेत. ह्या कथा तुम्हाला आणि तुमच्या मुलांना आवडतील. लक्षात ठेवा आपल्या प्रत्येकामध्ये एक कथा आहे  ह्या कथा केवळ मुलांना प्रेरित करत नाहीत तर त्यांना मौल्यवान धडे देखील शिकवतात. ह्या कथा त्यांना वेगवेगळ्या कल्पना  करण्यास आणि स्वप्न पाहण्यास देखील प्रोत्साहित करू शकतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. आपल्याला नैतिक धडा शिकवणाऱ्या कथेला तुम्ही काय म्हणता?

नैतिकतेचा धडा शिकवणारी कथा दंतकथा म्हणून ओळखली जाते. ह्या कथा एका खऱ्या घटनेवर आधारित असू शकतात आणि ह्या कथांमध्ये अनेकदा प्राणी पात्र म्हणून दाखवलेली असतात. ह्या कथांमध्ये बोलणारा चहाचा कप किंवा परी राजकुमारी सारखी काल्पनिक पात्रे असल्याने, कथानकाकडे आणि त्याच्या नैतिक धड्याकडे मुलांचे लक्ष वेधणे सोपे जाते.

2. सर्वोत्तम प्रेरणादायी कथा कोणती आहे?

आपण वाचलेली प्रत्येक कथा आपल्याला प्रेरणा देते आणि आपल्याला काहीतरी शिकण्यास मदत करते. मुलांना नैतिक मूल्ये शिकण्यास मदत करण्यासाठी आम्ही या लेखात त्यांच्यासाठी काही प्रेरणादायी कथांचा समावेश केलेला आहे. “एक शहाणा घुबड,” “सोनेरी स्पर्श”आणि “कोल्हा आणि शेळी” ह्यासारख्या कथा येथे दिलेल्या आहेत. ह्या कथा तुम्हाला नक्कीच आवडतील.

तुम्ही तुमच्या मुलाची कल्पनाशक्ती आणि शब्दरचना कौशल्ये विकसित करण्यासाठी Intellikit सारखा  क्रियाकलाप बॉक्स खरेदी करू शकता. ह्या बॉक्समध्ये इतर कौशल्यांसह सर्जनशीलतेला चालना देणारे अतिशय आकर्षक आणि मजेदार क्रियाकलाप आहेत. मल्टिपल इंटेलिजेंसच्या सिद्धांतावर आधारित, प्रत्येक बॉक्समध्ये महिन्यासाठी एक अद्वितीय थीम असते आणि ती तुमच्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करते. सदस्यत्व घ्या आणि तुमचा बॉक्स घरपोच मिळवा!

आणखी वाचा:

मुलांसाठी उत्तम नैतिक लघुकथा
लहान मुलांसाठी मराठीतून छोट्या पंचतंत्र कथा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article