Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) शिक्षण घरी शिकताना: लॉकडाऊन दरम्यान तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी तज्ञांच्या टिप्स

घरी शिकताना: लॉकडाऊन दरम्यान तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी तज्ञांच्या टिप्स

घरी शिकताना: लॉकडाऊन दरम्यान तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी तज्ञांच्या टिप्स

लोकडाऊनचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत आणि ह्याच्याशी आता बरेच पालक सहमत झालेले असतील. लोकडाऊनमुळे तुम्हाला अधिक वेळ मिळतो त्यामुळे घरकाम, ऑफिसचे काम आणि आपल्या मुलांसमवेत वेळ घालवणे काहीसे सोपे होते. परंतु, शाळा बंद असताना या महिन्यांत आपल्या मुलाने महत्त्वाच्या गोष्टी शिकून घेतल्यास आपण आश्चर्यचकित होऊ नका. कारण, ही निर्णायक वर्षे आहेत, बरोबर?

ह्या कालावधी दरम्यान आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी तुम्ही तुमच्या मुलास शिकविणे खूप सोपे आहे आणि महत्वाचे म्हणजे ते करताना मजा घ्या! लॉकडाऊन दरम्यानही आपण शिकण्याची प्रक्रिया कशी चालू ठेवू शकता ते ह्या लेखात दिलेले आहे. तुमच्यासाठी हे सगळं सोपे करण्यासाठी आमच्याकडे एक तज्ञ आहेत! लॉकडाऊन दरम्यान मुलांना शिकवण्याबद्दल, प्रख्यात प्रेरक वक्ता आणि पालक प्रशिक्षक रश्मी सोईन यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्या आणि आधुनिक काळात पालकत्व आणि मुलांना शिकवणे एकत्रित करण्यासाठी त्यांच्या टिप्सचे अनुसरण करा!

मुलं घरी कशी शिकतात?

कोणालाही विचारले तरी सगळे सांगतील की मुले उदाहरणांद्वारे लवकर शिकतात. मुलांना आपण एखादी गोष्ट करायला सांगतो, त्यापेक्षा मुले त्यांचे शिक्षक, मित्रमैत्रिणी आणि पालक ह्यांच्याकडून जास्त शिकतात. प्रत्येकाला त्यांचा थोडा मोकळा वेळ आवश्यक असतो, म्हणून पालक, आया, शिक्षक आणि इतर काळजीवाहक ह्या सगळ्यांकडे लहान मुलाची थोडा वेळ जबाबदारी सोपवल्यास प्रत्येकाला थोडासा आराम मिळू शकतो. पण आता जेव्हा मूल २४ तास आपल्या आसपास असेल तेव्हा काय करावे? मुले कुटुंबातील सदस्यांकडून बरेच काही शिकत असतात. म्हणून तुमची भाषा, तुम्ही वेळ कसा घालवता तसेच तुम्ही  एकमेकांभोवती कसे वागता याची काळजी घेणे आवश्यक आहे. होय, हे कंदाचीत तुम्हाला खूप वाटू शकते परंतु हा काळ कायमचा राहणार नाही आणि तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.  तुम्हाला तुमच्या कुठल्या सवयी बदलायच्या आहेत का किंवा तुम्हाला काही छंदांचा पाठपुरावा करायचा आहे का? हे सर्व आणि बरेच काही करण्यास आता अधिक योग्य वेळ आहे! तर मग मुलं तुमच्याकडून नेमके काय शिकतात? उत्तर आहे ‘सर्वकाही’. कुटुंबातील लोक भांडणात चिडलेले असताना असताना वापरतात ती भाषा इथपासून ते तुम्ही जे करता आणि बोलता इथपर्यंत सगळ्याचे अनुकरण तुमचे मूल करत असते. रश्मी सेन ह्यांनी एका चर्चासत्रादरम्यान सांगितले होते की मुले सतत ऐकत असतात. त्यामुळे, जर तुम्ही ‘तुम्हाला बरे नसल्यामुळे तुम्ही काम करू शकत नाही’ असे तुमच्या बॉसला खोटे सांगितले तर तुमच्या मुलाला ते समजते आणि ते सुद्धा तसे वागू लागते. तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कशी वागणूक देता ह्याचे सुद्धा तुमचे मूल निरीक्षण करेल आणि तुम्हाला त्याच पद्धतीने वागवेल. त्यामुळे, घरात एक छोटा सैनिक आहे जो तुमच्या सर्व कृतींचे निरीक्षण करत आहे ह्याकडे लक्ष ठेवा. त्यामुळे कुठलीही कृती करण्याआधी ‘माझ्या मुलानेही असेच वागावे अशी मला इच्छा आहे काय?’ हा प्रश्न स्वतःला विचारा आणि तुमच्याकडे उत्तर असेल!

आपल्या मुलांना घरी शिकण्यास मदत करण्यासाठी काही टिप्स

जरी हे एक मोठे काम वाटत असले तरीही आपल्या मुलांना घरी शिकण्यास मदत करणे खूप सोपे आहे आणि त्यासाठी काही किरकोळ समायोजने आवश्यक आहेत. येथे काही मार्ग आहेत ज्यायोगे आपण  लॉकडाऊन दरम्यान आपल्या मुलास घरी शिकण्यास मदत करू शकता.

१. स्क्रीन टाइम कमी करा

स्क्रीन टाइम कमी करा

या यादीमध्ये हा मुद्दा पहिला ठेवण्याचे कारण म्हणजे, आपल्या मुलाला कंटाळा आला असेल किंवा तो चिडचिड करत असेल तेव्हा कार्टून सुरु करण्याचा मोह त्याला दिवसातून अनेक वेळा होऊ शकेल. आणि मुलांना तो मोह होणे साहजिक आहे. पालक आपल्या मुलांइतके सक्रिय नसतात, ज्यांना दिवसभर बहुतेक उत्तेजनाची आवश्यकता असते, शिवाय ते घरातील कामे आणि इतर कामांमध्ये व्यस्त असतात. रश्मी सोईन स्क्रीनची वेळ कमी करण्याविषयी आणि त्याऐवजी मेंदूला निष्क्रीयातून सक्रिय अवस्थेकडे वळवणाऱ्या शारीरिक क्रियांवर लक्ष केंद्रित करण्याविषयी बोलतात. आपल्याकडे घरात अनेक कोडी किंवा खेळ नसल्यास तुम्ही घरी अगदी सहज सोप्या गोष्टी तयार करू शकता ज्यांना जास्त सामग्रीची आवश्यकता नसते आणि त्या तुमच्या मुलास त्या तासनतास व्यापून ठेवतात.

२. घरातील समस्या

आपल्या मुलांना एखादी गोष्ट शिकवण्याआधी त्यांना विचार करण्यास शिकवा. दररोजच्या जीवनातील एखादी समस्या तुमच्या मुलांना सांगा. त्यांना त्या समस्येचे सोल्युशन विचारा. असे केल्याने त्यांना ते स्वतः मौल्यवान आणि जबाबदार वाटतील. तसेच त्यामुळे त्यांचा तार्किक युक्तिवाद वाढण्यास मदत होईल. जर तुमची तुमच्या बॉस सोबत दुपारी १२ वाजता मिटिंग असेल आणि त्याआधी तुम्हाला २ कामे करून संपवायची असतील तर तुमच्या मुलाला मदत करण्यास सांगा त्यामुळे तुमच्या वेळेचे नियोजन तुम्हाला करता येईल आणि कामे सुद्धा होतील. रश्मी सोईन यांच्या मते, समस्येचे निराकरण केल्याने संज्ञानात्मक विकासास मदत मिळते आणि घरीच शिकण्याची प्रक्रिया सुरू होते.

३. डीआयवाय

डीआयवाय

जेव्हा आपण डीआयवाय म्हणतो, तेव्हा आम्ही फक्त घरात वस्तू बनवणे ह्या अर्थाने म्हणत नाही तर घरी तुमच्या मुलाने सहजपणे एखादा क्रियाकलाप किंवा खेळ खेळणे असा त्याचा अर्थ होतो.  एकदा तुम्ही त्याविषयी विचार करू लागल्यावर तुमच्या लक्षात येईल की घरातच असणाऱ्या वस्तू मुलाच्या विकासास किती सहजगत्या मदत करू शकतात. रश्मी सोईन शिफारस करतात की पुठ्ठ्यातून वेगवेगळे आकार कापून घ्या आणि त्या आकाराचे नाव घेऊन तुमच्या मुलास ते एकत्र जोडण्यासाठी सांगा. तुम्ही संख्या आणि अक्षरे ह्यांचे देखील आकार करू शकता. त्या आणखी एक खेळ सुचवतात आणि तो खेळ म्हणजे एका वाडग्यात राजमा आणि छोले एकत्र मिसळून तुमच्या मुलास ते वेगळे करण्यास सांगा,त्यामुळे मुलाचे  उत्तम मोटर कौशल्ये विकसित करण्यात मदत होईल.

४. क्वालिटी टाईम

ऑफिस आणि घरकामामुळे तुम्हाला तुमच्या मुलासोबत क्वालिटी टाईम घालवता येत नाही परंतु तुमच्या मुळाशी बंध निर्माण होण्यासाठी हा सर्वात चांगला काळ आहे. तसेच त्यामुळे तुम्हाला थोडी विश्रांती देखील मिळू शकते. रश्मी सोईन ह्यांनी दिलेली एक उत्कृष्ट टीप म्हणजे प्रत्येक रात्री कुटुंबासमवेत काही गेम खेळा . तुम्ही दररोज एक नवीन गेम निवडू शकता, जसे की लुडो, साप शिडी इ. तुमच्याकडे बोर्ड गेम नसल्यास, चिंता करू नका, कारण असे खेळ देखील आहेत ज्यासाठी केवळ कागद आणि पेन्सिल आवश्यक आहे (किंवा आपले मन), हे खेळ म्हणजे नाव-गाव-फूल-फळ किंवा टिक-टॅक-टू हे होत. आमच्यावर विश्वास ठेवा की दिवसाचा हा तुमचा आवडता वेळ असेल आणि कोणाला माहिती, तुम्ही लॉकडाऊन नंतर सुद्धा हे खेळ खेळणे सुरूच ठेवू शकता.

५. वाचा, वाचा, वाचा

वाचा, वाचा, वाचा

शब्दसंग्रह सुधारण्यापासून ते संकल्पना स्पष्ट करण्यापर्यंत तुमच्या मुलाला वाचनाचे बरेच फायदे आहेत, अन्यथा त्याला ते समजणे कठीण झाले असते. रश्मी सोईन तुमच्या मुलासाठी दररोज वाचनाचे महत्त्व सांगतात, मग हे वाचन दिवसा असो किंवा झोपण्याआधी असो. मुलांसाठी पुस्तके वाचल्याने त्यांची कल्पना शक्ती सुधारते, तसेच त्यांना इतरही गोष्टी समजू लागतात जसे की इंग्रजी शब्द डावीकडून उजवीकडे वाचायचे असतात तसेच पान उलटल्यानंतर सुद्धा कथा सुरु राहते इत्यादी. कथा वाचून झाल्यावर तुम्ही तुमच्या मुलाला पुढील प्रश्न विचारू शकता. जसे की ‘कथेतून तुम्ही काय शिकलात?’ , ‘कुठले पात्र तुम्हाला जास्त आवडले?’, ‘तुम्ही कथेतील एखादे पात्र असला असतात तर काय झाले असते?’ वगैरे प्रश्न तुम्ही तुमच्या मुलाला विचारू शकता त्यामुळे त्याची ग्रहणशक्ती आणि सर्जनशीलता वाढते. आपल्या मुलासाठी नैतिक कथा वाचणे हा  मुलांना  मूल्ये शिकवण्याचा आणखी एक चांगला मार्ग आहे. इष्टतम विकासासाठी तुमच्या मुलासाठी जितके वाचता येईल तितके वाचण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.

६. नियमित दिनक्रम तयार करा

क्रियाकलापांद्वारे आपल्या मुलांशी बंध निर्माण करताना जीवनातील सर्वात मोठे कौशल्य विसरू नका आणि ते म्हणजे शिस्त! स्वतःसाठी तसेच आपल्या लहान मुलासाठी सुद्धा दिनचर्या सेट करा. घराची कामे, ऑफिसची कामे, खेळाचा वेळ, टीव्हीचा वेळ आणि बरेच काही यासाठी एक निश्चित वेळ ठेवा. लॉकडाऊन दरम्यान आरामशीर राहणे आणि आपल्या वेगाने गोष्टी करणे सोपे आहे, परंतु आपला लहान मुलगा सतत आपल्याकडून काहीतरी शिकत असतो. तो शाळेत जात नसल्यामुळे, तुमच्या मुलाला शिस्त लागावी म्हणून तुम्ही घरी तसे वातावरण करणे जरुरीचे आहे. अर्थात रविवार हा मजा करण्यासाठीच असतो!

७. स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रित करा

स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रित करा

बरेच पालक आपले मूल बिघडू नये म्हणून प्रयत्न करत असतात. प्लेस्कूलमध्ये जाऊन आणि इतरांना भेटल्यामुळे मुलांना स्वातंत्र्याची भावना मिळते, परंतु घरी तसे होत नाही. घरी असल्यामुळे तुमच्याकडे मुलांसाठी जास्त वेळ असल्याने तुम्ही मुलांकडे प्रमाणाबाहेर तर लक्ष देत नाही ना याची खात्री करा. तुमच्या मुलाला स्वतःचे स्वतः खाण्यास तसेच कपडे निवडण्यास शिकवा. तुम्हीच तुमच्या मुलाचे सगळे केले पाहिजे अशी त्याला सवय लावू नका.

मुलाची शिकण्याची प्रक्रिया घरी देखील सुरू असते आणि लॉकडाऊन दरम्यान ती आणखी वाढू शकते. तुमच्या मुलाचे जीवन कौशल्य वाढण्यासाठी तसेच त्याचा विकास होण्यासाठी आणि त्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी आणि त्याला शिस्तप्रिय व्यक्ती बनवण्यासाठी तुमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये थोडे समायोजन केल्यास ते सोपे जाईल!

आणखी वाचा:

मुलांसोबत घरून काम करणे सोपे आणि सुलभ करण्यासाठी काही टिप्स
कोरोनाविषाणूचा उद्रेक झालेला असताना, तुमच्या मुलाला व्यस्त ठेवण्यासाठी घरात करता येतील असे १५ क्रियाकलाप

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article