Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळातील सर्व्हिक्स आणि सर्व्हायकल स्थिती

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळातील सर्व्हिक्स आणि सर्व्हायकल स्थिती

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळातील सर्व्हिक्स आणि सर्व्हायकल स्थिती

सर्विक्स (गर्भाशय ग्रीवा) हा नळीच्या आकाराचा अवयव आहे आणि तो गर्भाशयाला योनीशी जोडतो. शुक्राणू या पॅसेजमधून खाली मुखापर्यंत पोहोचतात. हा नाजूक अवयव गर्भधारणेला कसा प्रतिसाद देतो ते पाहूया.

सर्विक्स काय आहे आणि त्याची भूमिका काय आहे?

गर्भाशय आणि योनी हे सर्विक्सने जोडलेले असतात  आणि तो गर्भाशयाचा सर्वात खालचा, अरुंद भाग असतो. त्याची लांबी 3 ते 4 सेंटीमीटर आहे. सर्विक्सचे बाहेरील आवरण म्हणजे हार्मोनवर आधारित श्लेष्मा स्राव करणाऱ्या ग्रंथींचे घर आहे. ओव्हुलेशन दरम्यान श्लेष्मा पातळ होतो आणि त्यामुळे शुक्राणूंना अंड्यापर्यंत पोहोचणे शक्य होते. गरोदरपणात गर्भाशयाला धोकादायक सूक्ष्मजीवांपासून वाचवण्यासाठी श्लेष्मा घट्ट होतो. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात, सर्विक्सचे स्थान आणि पोत, तसेच गर्भाशयाच्या स्त्रावाची सुसंगतता आणि रंग बदलतो.

मासिकपाळी दरम्यान सर्विक्सची स्थिती

संपूर्ण मासिक पाळीत सर्विक्सची स्थिती बदलत राहते. जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा सर्विक्स खालच्या बाजूस असते तसेच ते उघडे आणि कठीण असते. एकदा पाळी संपली की, गर्भाशयाचे मुख बंद असताना ओव्हुलेशन होईपर्यंत ते खालच्या बाजूस आणि कठीण असते.

ओव्हुलेशन दरम्यान सर्विक्सची स्थिती

जसजसे तुम्ही ओव्हुलेशनच्या टप्प्याकडे जाता, सर्विक्स स्वतःला वर ढकलते, तसेच मऊ आणि ओलसर होते. आणि त्यामुळे शुक्राणू गर्भाशयात आणि अंड्यामध्ये सहज प्रवेश करू शकतात. गर्भाशयाचे मुख इतके मऊ होते की ते योनीच्या भित्तिकांपासून वेगळे केले जाऊ शकत नाही. ओव्हुलेशन संपल्यानंतर, सर्विक्स कठीण होते आणि गर्भाशयाचे मुख पुन्हा बंद होते.

गर्भधारणा आणि गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळातील सर्विक्सची स्थिती

ओव्हुलेशन दरम्यान जेव्हा सर्विक्स उंच, मऊ आणि उघडे असते तेव्हा गर्भधारणेसाठी आदर्श वेळ असते. एकदा तुमची गर्भधारणा झाली की, गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात तुमचे सर्विक्स उंच, मऊ आणि बंद असते. म्यूकस प्लग गर्भधारणेसाठी स्वतःला तयार करेल. श्लेष्मा सामान्यतः पातळ आणि रंगहीन असतो. गर्भधारणा झाल्यावर म्युकस प्लग तयार होऊ लागतो. म्युकस प्लग तयार होताना श्लेष्मा घट्ट आणि पांढरा बनतो. त्यामुळे बाहेरील घटक गर्भाशयात प्रवेश करू शकत नाहीत. तुमचे आणि तुमच्या बाळाचे संक्रमणापासून संरक्षण होते. काही स्त्रियांना हा बदल सुरुवातीच्या टप्प्यात जाणवतो, तर काहींना तो नंतरच्या टप्प्यातच जाणवू शकतो.

गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात सर्विक्सची स्थिती दिशाभूल करणारी असू शकते का?

होय. गरोदर नसताना, सर्विक्स गरोदरपणात असते तसे असल्यासारखे असते. काहींसाठी, गर्भधारणा झाल्यावर शरीर बदलण्यास थोडा वेळ लागतो. मासिक पाळी दरम्यान, तुमचे सर्विक्स मऊ आणि वर असते असेल. पण, गरोदर असताना गर्भाशय ग्रीवा तितकी जास्त उंच किंवा मऊ होणार नाही. गर्भाशय मऊ असण्याचे कारण म्हणजे तुमच्या शरीरातील इस्ट्रोजेनचे वाढलेले प्रमाण होय. जर तुमचे सर्विक्स गर्भधारणेची चिन्हे दर्शवत नसेल, तर थोडा वेळ जाऊ द्या. डॉक्टरांकडून तपासणी करून पहा किंवा घरगुती गर्भधारणा चाचणी करून पहा. तुमचे शरीर अद्वितीय आहे, आणि अशा प्रकारे, गर्भधारणा झाली आहे की नाही हे तपासणे योग्य नाही.

गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात गर्भाशय ग्रीवाची स्थिती

सर्विक्सची स्थिती तपासणे उपयुक्त का आहे?

आम्ही वर नमूद केल्याप्रमाणे, गरोदर असताना सर्विक्स श्लेष्माने भरते. सर्विक्स स्वतःचे स्थान वर किंवा खाली असे बदलत राहते. तुमच्या सर्विक्सची स्थिती आणि त्याभोवती असलेल्या श्लेष्माचे प्रमाण हे तुम्हाला गर्भधारणा झाली आहे का हे ठरवण्यात मदत करू शकते.

तुमच्या सर्विक्सची स्थिती कशी तपासायची?

तुमचे सर्विक्स साधारणपणे 3 ते 6 इंच लांबीचे असते आणि तुमच्या योनीच्या वर असते. ओव्हुलेशन नंतर तुमच्या सर्विक्सची स्थिती तपासण्यासाठी येथे काही टिप्स आहेत

1. आपले हात धुवा

या संवेदनशील भागात संसर्ग होऊ नये म्हणून हात स्वच्छ ठेवा. सर्विक्स तपासण्यासाठी सर्वोत्तम वेळ अंघोळी नंतरची आहे.

2. तुमची नखं कापा

लांब नखांमुळे इजा होऊ शकते.

3. तुम्ही योग्य स्थितीमध्ये थांबा

स्क्वाट करा आणि आपले मधले बोट योनीमध्ये घाला. सर्विक्स शोधण्यासाठी तुम्हाला बोट काही इंच आत घालावे लागेल.

4. बोटाचा वापर करा

तुमचे सर्विक्स उघडे आहे की बंद हे जाणून घेण्यासाठी तुमच्या बोटाचा वापर करा.

5. तुमची निरीक्षणे नोंदवा

एकदा पूर्ण झाल्यावर, तुम्ही तुमची निरीक्षणे जर्नलमध्ये किंवा फर्टिलिटी अॅपवर रेकॉर्ड करावी.

तुम्हाला तुमचे बोट किती आत घालायचे आहे यावर आधारित तुम्ही तुमच्या गर्भाशय ग्रीवाची स्थिती ठरवू शकता.

तुम्ही तुमच्या सर्विक्सची स्थिती कधी तपासू नये?

खालील परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या सर्विक्सची स्थिती तपासण्यापासून दूर रहावे.

  • तुम्हाला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) किंवा यीस्ट इन्फेक्शन असल्यास
  • गरोदर असताना गर्भजल पिशवी फुटलेली असल्यास .
  • तुम्ही नुकतेच शरीर संबंध ठेवलेले असल्यास .

गर्भधारणा झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी सर्विक्सची स्थिती तपासणे ही योग्य पद्धत नाही. जर तुमचे सर्व्हिक्स गर्भधारणेच्या स्थितीत नसेल तर निराश होऊ नका. सर्विक्स या स्थितीत जाण्यापूर्वी गर्भधारणा चाचणीचा निकाल सकारात्मक येऊ शकेल.

तुम्हाला विश्वासार्ह उत्तर हवे असल्यास, स्त्रीरोगतज्ञाला भेट द्या किंवा रक्त तपासणी करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात तुमचे सर्विक्स वर आणि कठीण असू शकतेका?

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात तुमचे सर्विक्स वर असेल आणि ते मऊ सुद्धा असेल. गर्भाधानानंतरची ही पहिली घटना आहे. त्यानंतर, सर्विक्स कडक होईल पण उंच राहील. तुमच्या गर्भारपणाचे दिवस जसजसे पुढे सरकत तसतसे सर्विक्स मऊ होईल, प्रसूती सुलभ होईल.

2. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात तुमच्या गर्भाशयाला कसे वाटते?

जर तुम्हाला गर्भधारणा झाली असेल तर सर्विक्स वर असेल. सर्विक्सचा पोत हा सर्विक्स मधील दुसरा स्पष्ट बदल आहे. जर तुम्हाला गर्भधारणा झालेली नसेल, तर मासिक पाळी दरम्यान सर्विक्सची स्थिती न पिकलेल्या फळासारखी कडक असेल. याउलट, तुम्ही गर्भवती असाल तर तुमचे सर्विक्स मऊ असेल.

3. तुमचे सर्व्हिक्स खाली किंवा वर आहे हे कसे ठरवायचे?

जर तुमच्या बोटाचे पहिले पेर आत जात असेल तर सर्व्हिक्स खाली आहे असे समजावे आणि बोट दोन पेरापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त आत जात असेल तर सर्व्हिक्सवर आहे असं समजावे.

4. सर्व्हिक्स कोणत्या स्थितीत आहे हे तुम्ही कसे सांगू शकता?

मधले बोट किंवा तर्जनी सर्व्हिक्स मध्ये घाला आणि वरच्या दिशेने बोट आणखी आत सरकवा. योनिमार्गाला हॉलवे मानले तर सर्व्हिक्स हा शेवटचा दरवाजा आहे.

 

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article