Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) शिक्षण मुलांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या तयारीसाठी काही टिप्स

मुलांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या तयारीसाठी काही टिप्स

मुलांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या तयारीसाठी काही टिप्स

स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष आणि ब्रिटिशांविरुद्ध दिलेला लढा ह्याविषयी मुलांना माहिती होण्यासाठी, काही शाळा, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, विशेष प्रयत्न करतात. एक राष्ट्र म्हणून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताला मोठे अडथळे आणि आव्हाने पार करावी लागली. पूर्वीच्या पिढ्यांचे बलिदान आणि दुःख, हे स्वतंत्र भारतात जन्माला आलेल्यांना समजणे कठीण आहे. वसाहतवादाचे धडे विसरले जाऊ नयेत आणि स्वातंत्र्याचे मूल्य पुढच्या पिढ्यांनी जपले पाहिजे असा पालक, शिक्षक आणि वयोवृद्ध लोकांचा विश्वास आहे. मुलांनी फक्त आपल्या स्वातंत्र्य चळवळीबद्दलच शिकले पाहिजे असे नाही तर त्यांच्या समवयस्कांमध्ये देखील त्याचे महत्त्व सांगितले पाहिजे.

अनेक शाळा विद्यार्थ्यांना या विशेष दिवशी भाषण तयार करण्यास सांगतात. या लेखात, आपण स्वातंत्र्य दिनासाठी योग्य भाषण तयार करण्याच्या सर्व पैलूंवर विचार करणार आहोत. ह्या लेखामध्ये सर्व आवश्यक बाबींचा समावेश आहे आणि मुलांना स्वातंत्र्यदिनाचे भाषण तयार करण्यासाठी मौल्यवान टिप्स मिळतील.

स्वातंत्र्यदिनाचे भाषण कसे तयार करावे?

एक उत्तम भाषण लिहिणे आणि त्याही पेक्षा ते सादर करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या मुलाला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी द्यायचे भाषण तयार करण्यासाठी इथे काही टिप्स दिलेल्या आहेत.

. इतिहास जाणून घ्या

भारताचा स्वातंत्र्यलढा इतर राष्ट्रांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या तुलनेत अद्वितीय आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा केवळ राजकीय नव्हता तर त्याला वैचारिक आणि अध्यात्मिक पैलू होते. उदाहरणार्थ, महात्मा गांधींजींनी सुरू केलेले अहिंसा तत्त्वज्ञान. मुलांना १५ ऑगस्टचे भाषण तयार करण्यास मदत करण्यापूर्वी त्यांना स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास, त्याच्या चाचण्या, क्लेश, दुःख आणि बलिदान माहित असणे आणि त्यांनी तो समजून घेणे आवश्यक आहे.

. मुलाला तथ्ये माहिती करून घेण्यासाठी मदत करा

ज्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला त्यांनी एका महान राष्ट्राची स्वप्ने पाहिली, त्यामध्ये नागरिकांना मूल्यांसह समान अधिकारांची हमी मिळण्याचा समावेश होता. यापैकी बहुतेक कल्पना ह्या आधुनिक पाश्चात्य लोकशाही मूल्यांवर आधारित होत्या. पाश्चिमात्य राष्ट्रांकडे कारभाराचे आधुनिक लोकशाही स्वरूप होते. ह्या लोकशाहीच्या कारभाराने त्यांच्या नागरिकांना भरपूर स्वातंत्र्य दिले आणि त्यांना मूलभूत अधिकाराची हमी दिली. सर्वसमावेशक कारभाराविषयी बोलणाऱ्या ह्याच राष्ट्रांनी इतर राष्ट्रांच्या लोकांना उपनिवेशित आणि वश केले. आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील मूळ संस्थापकांपैकी काहींनी स्वतः त्या राष्ट्रांमध्ये शिक्षण घेतले आणि वास्तव्य केले व त्यांनी भारतातील लोकांसाठी सुद्धा ही मागणी केली. तुमच्या मुलाला अशा आदर्शांची ओळख असली पाहिजे. तसेच त्याला राष्ट्रगीताचा अर्थ, राष्ट्रध्वजाचे रंग आणि राष्ट्रीय चिन्ह इत्यादी सर्वांविषयी मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. ह्या सर्व गोष्टी तुमच्या मुलास माहिती असल्यास त्याच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये भावना आणि माहिती हे दोन्ही एकाचवेळी असेल आणि त्यामुळे त्याचे भाषण अधिक सुंदर होईल.

मुलाला तथ्ये माहिती करून घेण्यासाठी मदत करा

. प्रसिद्ध कोट्स

काही शब्दांचा सारांश म्हणजे कोट. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्रेरणादायी भाषणे लिहिली आहेत आणि त्या मुळे एका महान राष्ट्राच्या स्वप्नाला मूर्त रूप दिले गेले आहे. या भाषणांमधून कोट्स घेतल्यास तुमच्या मुलाचे भाषण चांगले होण्यास मदत होऊ शकते. भाषणात ह्या कोट्सचा फक्त समावेश करू नये परंतु ह्या कोट्सचा संदर्भ आणि अर्थ मुलांनी संपूर्णपणे समजून घेतला पाहिजे आणि स्पष्ट केला पाहिजे. उदाहरणार्थ, अब्राहम लिंकन म्हणाले की ऍज आय वूड नॉट बी अ स्लेव्ह, सो आय वूड नॉट बी अ मास्टरथिस इस माय आयडिया ऑफ डेमोक्रसी“. ह्या कोट मध्ये स्पष्टपणे त्यांच्या लोकशाहीची कल्पना आणि पाश्चिमात्य शैलीच्या लोकशाहीची आकांक्षा स्पष्ट होते. लोकशाहीचे नेमके हेच स्वरूप भारताच्या राज्यघटनेतही अंतर्भूत आहे.

. स्वातंत्र्याचे मूल्य

आजच्या भारत देशाविषयी वेगवेगळी मते व्यक्त केली जातात. काही लोक भारताला आधुनिक लोकशाही अवलंबणारा देश असल्याचा अभिमान बाळगतात, तर काही भ्रष्टाचारामुळे निराश होऊन, ब्रिटिश राजवटी अधिक चांगली असल्याचे मत व्यक्त करतात. सरकारविषयी वेगवेगळी मते आणि टीका ऐकल्या जाऊन त्या खऱ्या लोकशाहीत स्वीकारल्या जातात हे तुमच्या मुलाला समजणे महत्वाचे आहे. देशातील लोकांना स्वयंनिर्णयांचा अधिकार का असावा आणि लोकांमधून प्रशासनासाठी निवडलेला प्रतिनिधींचा संघ का असावा हे देखील तुमच्या मुलाला माहिती असले पाहिजे. परदेशी शक्तीला शेवटी त्याच्या स्वतःच्या राष्ट्राच्या हितासाठी स्वारस्य असेल. म्हणूनच, लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून राज्य चालवणे खूप महत्वाचे आहे.

. देशभक्तीपर मूल्ये

जर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना स्वदेशाभिमान नसता तर कदाचित आपल्याला स्वातंत्र्य कधीच मिळाले नसते. देशभक्ती म्हणजे आपली मातृभूमी, तेथील लोक आणि संस्कृती ह्यांच्याविषयी वाटणारी आसक्ती होय. देशभक्तीशिवाय तयार केलेले भाषण राष्ट्र आणि त्याच्या लोकांसाठी भावनिक आसक्तीच्या दृष्टीने जास्त प्रेरणा देणार नाही. देशभक्तीचा अर्थ असा नाही की समाजातील वाईट गोष्टी आंधळेपणाने स्वीकारल्या जाव्यात तर देशभक्ती म्हणजे फक्त राष्ट्रावर प्रेम करणे आणि राष्ट्राची मूल्ये अखेरीस प्रबळ होतील यावर विश्वास असणे होय. तुमचे मूल देशभक्त असले पाहिजे आणि राष्ट्राच्या मूल्यांवर त्याचा विश्वास असणे गरजेचे आहे.

. सराव सत्र

उत्तम भाषण देण्यासाठी अनेकदा चांगला सराव खूप आवश्यक असतो. आपल्या मुलाला भाषण लक्षात ठेवण्यास प्रवृत्त करा, कारण कागदावरून वाचण्यापेक्षा लक्षात ठेऊन बोलणे चांगले. भाषण करताना आपल्या मुलाला ताठ उभे राहण्यास सांगा तसेच संयम राखून भावना व्यक्त करण्यास आणि स्पष्ट शब्दात बोलायला सांगा. भाषण करताना मुलाने प्रेक्षकांकडे थेट डोळ्यात पहिले पाहिजे आणि त्यांच्याकडून नजर चुकवता कामा नये. भाषणाच्या दिवसापर्यंत अनेक सराव सत्रांची आवश्यकता असू शकते.

. भाषणाचा आशय महत्वाचा आहे

भाषण लिहिताना त्यामध्ये विषयाची मांडणी योग्य प्रकारे होणे महत्वाचे तर आहेच परंतु त्यासोबतच त्या लिखाणामध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता देखील हवी आणि ते श्रोत्यांशी संबंधित असावे. एखाद्या सैनिकासाठी तयार केलेले स्वातंत्र्यदिनाचे भाषण शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या भाषणापेक्षा भिन्न असेल. लक्षात ठेवा की हे भाषण प्रेक्षकांसाठी लिहिले गेले आहे आणि ह्या प्रेक्षकांमध्ये शिक्षक आणि सहकारी विद्यार्थी समाविष्ट आहेत. हे विद्यार्थी नजीकच्या भविष्यात लवकरच प्रौढ होणार आहेत. ह्या विद्यार्थ्यांनी स्वतंत्र राष्ट्राचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी त्यांचे राष्ट्रासाठी योगदान समजून घेणे आवश्यक आहे. तुमच्या मुलाच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचे लिखाण वरील गोष्टी विचारात घेऊन केले पाहिजे.

. आशय प्रवाह आणि वेळ

शाळेमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी एक निश्चित वेळ असेल. खूप छोटे भाषण असल्यास त्यातून स्वातंत्र्यदिनाचे महत्व नीट सांगितले जाणार नाही. दुसरीकडे, खूप मोठे भाषण असल्यास ते एकसूरी आणि कंटाळवाणे होईल. भाषणाचा आशय हा स्पष्टपणे प्रारंभ, मध्य भाग आणि निष्कर्ष ह्यामध्ये विभागला गेलेला असावा. एकदा तुम्ही उपशीर्षकांची यादी तयार केली की, प्रत्येक उपशीर्षकासाठी बोलण्याची वेळ लक्षात ठेवून प्रत्येक उपशीर्षकासाठी लिहायला सुरुवात करा. प्रत्येक उपशीर्षकासाठी वेळेची मर्यादा ठरवून घ्या आणि भाषण थांबवतानाची वाक्ये बोलण्यासाठी काही क्षण ठेवा.

आशय प्रवाह आणि वेळ

. भाषणाची सुरुवात

भाषणाच्या सुरुवातीला शिक्षक, सहकारी विद्यार्थी आणि सन्मानित पाहुण्यांना संबोधित केले पाहिजे आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणि या दिवशी एकत्र येण्याचे कारण स्पष्ट केले पाहिजे. स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगताना १९४७ मध्ये त्याचे महत्त्व आणि आजची प्रासंगिकता ह्याचा संदर्भ दिला पाहिजे. देशाच्या बदलत्या प्राधान्यक्रमाबद्दल थोडक्यात सांगितले पाहिजे, कारण १९४७ मध्ये प्राधान्यक्रम वेगळा होता आणि आता वेगळा आहे.

१०. क्रांतिकारकांची स्वप्ने आणि आकांक्षा

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या क्रांतिकारानी एका महान देशाचे स्वप्न पहिले होते आणि त्यांनी लोकांच्या कौशल्यांवर, आकांक्षांवर आणि सामूहिक क्षमतेवर विश्वास ठेवला. स्वतंत्र भारतामध्ये त्यांनी जपलेल्या आदर्शांनुसार जगण्याची आकांक्षा बाळगून आपण क्रांतिकारकांच्या स्मृतीचे कौतुक केले पाहिजे. ते आदर्श म्हणजे सहिष्णुता, लोकशाही, समानता, सर्वसमावेशकता आणि विविधतेमध्ये एकता इत्यादी होत.

११. शहीद आणि बलिदानाची गाथा

मानवजातीच्या सर्व महान संघर्षांप्रमाणे, भारताचा स्वातंत्र्य लढासुद्धा दुःख, महान धैर्य, धडाडीचे नेते आणि लढायांच्या कथांनी परिपूर्ण आहे. स्वातंत्र्याच्या खडतर प्रवासामध्ये देशाच्या महान नेत्यांनी केलेले निर्भय नेतृत्व आणि निःस्वार्थ बलिदानाचा उल्लेख केला पाहिजे.

१२. नेत्यांचे नेतृत्व

स्वातंत्र्यपूर्व भारतातील महान नेत्यांमुळे, लोकांना गौरवशाली राष्ट्राचे स्वप्न पाहता आले. १८५७ मध्ये मंगल पांडे यांनी सुरू केलेल्या विद्रोहापासून ते भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू ह्यांच्या सारख्या सर्व महान नेत्यांच्या बलिदानाचा उल्लेख करा. सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, खान अब्दुल गफ्फार खान ह्यांच्यासारख्या नेत्यांनी दाखवलेले धैर्य आणि लवचिकता ह्याचाही भाषणामध्ये उल्लेख करा.

नेत्यांचे नेतृत्व

१३. महत्त्वाच्या घटना

जालियनवाला बाग हत्याकांड, १८५७ चा उठाव, बंगालची फाळणी यासारख्या दुःखद घटना भारतीय जनतेचे डोळे उघडवणाऱ्या होत्या. आणि त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याचे क्रूर स्वरूप आणि स्वशासनाची गरज लोकांच्या लक्षात आली. भारत छोडो आणि असहकार चळवळींनी ब्रिटिशाना भारत सोडून जाण्यास भाग पाडले. ह्याचा सुद्धा भाषणामध्ये तपशीलवार उल्लेख केला पाहिजे.

१४. आधुनिक भारत

तुमच्या भाषणात आधुनिक भारताला सामोरे जाताना कुठले अडथळे पार करावे लागले तसेच भारताचा समृद्ध वारसा आणि स्वातंत्र्य संग्रामातून घेतलेले धडे ह्यांचा थोडक्यात समावेश केला पाहिजे. स्वातंत्र्यानंतर देशाने केलेल्या कामगिरीवरही भर दिला पाहिजे. जेव्हा ब्रिटिशांनी शेवटी भारत सोडला तेव्हा ते त्यांच्या पूर्वीच्या वसाहतीच्या अस्तित्वाबद्दल खूप साशंक होते. भारताच्या कर्तृत्वामुळे पश्चिमेकडील देश गोंधळात पडले. स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षात , भारतामध्ये केवळ एक कार्यक्षम लोकशाही तर होतीच परंतु एक अतिशय सक्रिय आणि यशस्वी अणुशक्तीही होती. जगातील फक्त काही राष्ट्रांनी ह्याची बरोबरी केली आहे.

१५. शेवट आणि निष्कर्ष

शेवटच्या निवेदनात आदर्श नागरिक बनण्याची आणि आपल्या संविधानात नमूद केलेल्या आदर्शांनुसार जगण्याची वचनबद्धता समाविष्ट असणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य, लोकशाही यासंदर्भात काही राष्ट्रीय किंवा परदेशी महान नेत्याचे प्रसिद्ध आणि प्रेरणादायी कोट्स भाषणाच्या शेवटी वापरता येऊ शकतात.

आपल्या मुलाला स्वातंत्र्यदिनाचे भाषण तयार करण्यासाठी टिप्स

तुमच्या मुलाला उत्तम भाषण देण्यासाठी सराव करण्यास मदत करा आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी खालील टिप्स वापरा. ह्या टिप्सची त्याला नक्कीच मदत होईल.

. भाषण लक्षात ठेवणे

आपल्या मुलाला भाषण लक्षात ठेवण्यासाठी प्रवृत्त करा आणि अनेक वेळा त्याचा सराव करा. जर तुमचे मूल कागदावर लिहून दिलेले भाषण न वाचता आत्मविश्वासाने भाषण देऊ शकले तर त्याचा आत्मविश्वास दिसून येईल. तसेच, त्याच्या स्टेजवरील भीतीवर मात करण्यासाठी त्याला काही तंत्रे शिकवा, उदा: दूरच्या वस्तूंकडे बघणे इत्यादी.

. वेशभूषा

आपल्या अनेक नेत्यांची आणि स्वातंत्र्यसैनिकांची कपड्यांची विशिष्ट अशी निवड होती. काहींनी अतिशय सभ्य कपडे घातले, तर काहींची वेगळी शैली होती. आपल्या भूतकाळातील महान नेत्यांची आठवण होईल अशा पद्धतीने आपल्या मुलाची वेशभूषा करा.

स्वातंत्र्य दिन हा भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. जर तुमच्या मुलाला या दिवशी भाषण देण्यासाठी निवडले गेले असेल तर ती खूप अभिमानाची गोष्ट आहे. या दिवसासाठी योग्य भाषण तयार करण्यासाठी वरील सूचनांचे कृपया अनुसरण करा.

आणखी वाचा:

तुमच्या मुलांसाठी भारतीय स्वातंत्र्यदिनाविषयी मनोरंजक माहिती
मुलांसाठी १० सुप्रसिद्ध भारतीय देशभक्तीपर गीते (रचनेसह)

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article