Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील लघवीचा असंयम ही समस्या

गरोदरपणातील लघवीचा असंयम ही समस्या

गरोदरपणातील लघवीचा असंयम ही समस्या

वारंवर लघवी होणे हे गरोदरपणातील सामान्य लक्षण आहे. खरेतर, गरोदरपणाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी हे एक लक्षण आहे. जसजसे बाळाची वाढ होते तसतसे वाढत्या गर्भाशयाचा मूत्राशयावर दाब पडतो. त्यामुळे लघवीचा असंयम ही समस्या निर्माण  होऊ शकते. जेव्हा एखादी स्त्री शिंकते, खोकते किंवा हसते तेव्हा मूत्र गळती होऊ शकते. पण लाज वाटण्यासारखी ती गोष्ट नाही कारण ३०-५०% गरोदर स्त्रियांमध्ये हे लक्षण दिसून येते आणि ते अत्यंत सामान्य आहे.

गरोदरपणातील लघवीचा असंयम ही समस्या म्हणजे काय?

गरोदरपणात मूत्राशय असंयम किंवा लघवीचा असंयम म्हणजे मूत्रमार्गावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता होय. जेव्हा तुमच्या मूत्रमार्गाच्या सभोवतालचे स्नायू शिथिल होतात तेव्हा लघवीला लागते. लघवी केल्यानंतर स्नायू आकुंचन पावतात. जोपर्यंत तुम्ही तुमचे मूत्राशय पुन्हा रिकामे करण्यास तयार होत नाही तोपर्यंत लघवीचा प्रवाह रोखून धरला जातो. गरोदरपणात संप्रेरकांच्या पातळीतील चढ-उतार आणि मूत्राशयावर गर्भाशयाचा दबाव यामुळे मूत्रमार्ग सैल होतो आणि आकुंचन पावतो.  ह्यामुळे तणाव निर्माण होतो आणि जेव्हा तुम्ही व्यायाम करता, हसता, चालता, धावता किंवा खोकता तेव्हा लघवी होऊ शकते.

गरोदरपणात आणि नंतर कोणत्या प्रकारचे असंयम अनुभवले जातात?

गरोदरपणात आणि नंतर अनेक प्रकारचे असंयम अनुभवले जातात:

 • ताणामुळे निर्माण होणारा असंयम – गरोदरपणात ताणामुळे निर्माण होणारा असंयम सामान्यपणे आढळतो. मूत्राशयावरील दबाव वाढल्यामुळे लघवी जास्त होते. ब्लॅडर स्फिंक्टर, नावाचा स्नायू मूत्र प्रवाह नियंत्रित करतो. गरोदरपणात वाढत्या गर्भाशयामुळे मूत्राशयावर दबाव पडतो. त्यामुळे ब्लॅडर स्पिंकटर हा स्नायू ताणला जातो. अतिरीक्त दाब पडल्यामुळे मूत्राशयातून लघवी बाहेर पडते. विशेषतः जेव्हा स्त्री खोकते, शिंकते किंवा हसते तेव्हा असे होते.
 • अत्यावश्यक असंयम – अतिक्रियाशील मूत्राशय असलेल्या स्त्रियांनाही गरोदरपणात मूत्रमार्गात असंयम असतो. त्यांच्या मूत्राशयात अनियंत्रित पेटके येत असतात त्यामुळे मूत्रमार्गावर परिणाम होतो आणि तीव्र आकुंचनमुळे लघवी नियंत्रित होत नाही. एपिसिओटॉमी किंवा दीर्घ प्रसूतीमध्ये  पेल्विक स्नायू कमकुवत झाल्यामुळे अशा प्रकारचा असंयम बाळंतपणानंतर अनुभवता येतो.
 • मिश्रित असंयम – तणावासह असंयम
 • क्षणिक असंयम – जेव्हा औषधामुळे तात्पुरती लघवी कमी होते किंवा बद्धकोष्ठता किंवा युटीआय सारख्या तात्पुरत्या आरोग्य समस्या असतात तेव्हा ही समस्या उद्भवते.

गरोदरपणात असंयम असण्याची कारणे काय आहेत?

मूत्राशय पेल्विक हाडांच्या अगदी वर असते. मूत्राशय शिथिल असते आणि स्फिंक्टर स्नायूंच्या साह्याने  दिवसभर लघवीने भरलेले असते, जोपर्यंत तुम्हाला बाथरूमला जावेसे वाटत नाही तोपर्यंत मूत्राशय बंद असते. गरोदरपणात आणि बाळाच्या जन्मादरम्यान, पेल्विक स्नायूंच्या अनेक कारणांमुळे अनेक चाचण्या केल्या जातात.

१. वजन

ताण-संबंधित असंयमामध्ये वजन हे प्रमुख कारण आहे. तिसर्‍या तिमाहीपर्यंत, गर्भाशय मूत्राशयावर विसावलेले असते. त्याच्या सहाय्यक अस्थिबंधनांमुळे ते आणि आसपासचे स्नायू ताणले जातात. कोणतीही शारीरिक हालचाल मूत्राशयावर अतिरिक्त दबाव टाकते आणि त्यामुळे असंयम होतो.

२. हार्मोन्स

गरोदरपणात संप्रेरकांचे खूप चढ- उतार होत असतात. हे बदल मूत्राशयाच्या अस्तरावर आणि मूत्रमार्गावर परिणाम करतात. मुख्यत्वे प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक प्रसूतीसाठी तयार होण्यासाठी तुमचे ऊती आणि सांधे अधिक लवचिक बनवतात, परिणामी, मूत्राशयाला मूत्र सोडण्यापासून नियंत्रित करणारे स्नायू कमकुवत करतात.

३. बद्धकोष्ठता

बहुतेक वेळा गरोदरपणात बद्धकोष्ठता असते त्यामुळे ओटीपोटाकडील भागावर ताण येतो आणि असंयम होतो.

४. वैद्यकीय इतिहास

ज्या स्त्रियांना मधुमेह, मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा भूतकाळात पक्षाघाताचा झटका आला आहे त्यांनाही असंयमचा त्रास होऊ शकतो.

५. मूत्रमार्गात संक्रमण (युटीआय)

४०% पेक्षा जास्त स्त्रिया त्यांच्या युटीआयचा पूर्णपणे उपचार करत नाहीत आणि हे असंयमच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे.

बाळंतपणानंतर, विशेषत: योनीमार्गे प्रसूतीच्या वेळी, दीर्घकाळ कळा दिल्यामुळे नसा खराब होऊ शकतात. त्यामुळे गरोदरपणात असंयम होण्यास मदत होते.

कोणत्या गर्भवती महिलांना मूत्रमार्गात असंयम असण्याचा सर्वाधिक धोका असतो?

गरोदरपणात महिलांना खालील परिस्थितींमध्ये असंयम असण्याचा धोका जास्त असतो.

 • वय जास्त असताना गर्भधारणा झाल्यास
 • वजन जास्त असल्यास किंवा लठ्ठ असल्यास
 • जर आधीची प्रसूती सामान्य प्रसूती झाली असेल तर
 • जर त्यांनी पेल्विक शस्त्रक्रिया केलेली असल्यास
 • धूम्रपान करीत असल्यास तीव्र खोकला झाल्यास
 • जर ते भावनिकदृष्ट्या कमजोर असतील तर

निदान कसे केले जाते?

जेव्हा तुम्ही गरोदरपणाच्या शेवटच्या आठवड्यात असता तेव्हा लघवीची गळती होत आहे किंवा गर्भजल गळती होत आहे हे नक्की कळत नाही. प्रसूती किंवा संसर्गाची कोणतीही चिन्हे नसल्यास, डॉक्टर इतर चाचण्या करू शकतात. खोकताना किंवा शरीरावर दबाव आणल्यावर गळती होते की नाही हे पाहण्यासाठी डॉक्टर मूत्राशय तणाव चाचणी करू शकतात. अल्ट्रासाऊंड वापरून मूत्राशय स्कॅन देखील मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत आहे की नाही हे निर्धारित करण्यात मदत करते. तुम्हाला युटीआय चा त्रास असण्याची शक्यता देखील असू शकते आणि त्यावर उपचार करणे आवश्यक आहे.

गरोदरपणात लघवीच्या असंयमासाठी उपचार

जीवनशैलीतील बदल आणि मूत्राशय व्यवस्थापन हे गरोदरपणाच्या असंयमावर प्रभावी आहे. इथे काही उपयुक्त टिप्स दिलेल्या आहेत.

१. केगेल्सचा सराव करा

तुमचा पेल्विक कडील भाग मजबूत करण्यासाठी केगल व्यायामाचे पाच सेट करण्याचे ध्येय ठेवा. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे व्यायाम प्रसूतीदरम्यान आणि नंतरही तुमच्या श्रोणीला मदत करतात.

२. मूत्राशय प्रशिक्षण वापरून पहा

वेळेवर मूत्राशय रिकामे करण्यासाठी, चार्ट वापरा आणि तुमच्या लघवीच्या वेळा आणि मध्यांतरांची नोंद करा. तुमच्या मूत्राशयाला पुन्हा प्रशिक्षण देऊन सुरुवात करा. ठराविक कालावधीसाठी प्रत्येक तासाला बाथरूमला जाण्यापासून सुरुवात करा. नंतर कालावधी वाढवून वेळापत्रक बदला. कालांतराने, तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे बाथरूमला जाऊ शकता.

३. कॅफिन किंवा एरेटेड पेये कमी करा

कॅफीन आणि फिजी ड्रिंक घेतल्यास तुम्हाला वारंवार बाथरूमला जावेसे वाटू शकते. त्याऐवजी जास्त पाणी किंवा डिकॅफिनयुक्त पेये प्या.

४. रात्री द्रव सेवन कमी करा

बाथरूमला वारंवार जाणे किंवा रात्री गळती होऊ नये म्हणून संध्याकाळी शीतपेये घेऊ नका.

५. फायबरयुक्त आहार घ्या

फायबरयुक्त आहारामुळे बद्धकोष्ठता कमी होते त्यामुळे तुमच्या ओटीपोटाकडील भागातील ताण कमी होतो.

फायबरयुक्त आहार घ्या

६. तुमचे वजन पहा

तुमच्या पोटाभोवती असलेल्या अतिरिक्त वजनामुळे मूत्राशयावर दबाव वाढू शकतो. व्यायाम करून आणि सक्रिय जीवनशैली जगून तुमचे वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा.

७. औषध घ्या

काहीवेळा, डॉक्टर मूत्रमार्ग अवरोधित करण्यासाठी आणि श्रोणि स्नायूंना अवरोधित करण्यासाठी उपकरणे वापरण्यास सुचवतात. मूत्राशय किंवा अतिक्रियाशील मूत्राशयातील स्नायूंच्या पेटक्यांसाठी डॉक्टर औषधे देखील लिहून देतात.

८. यूरोलॉजिस्टना भेटा

वरील उपाय करूनही समस्या कायम राहिल्यास, यूरोलॉजिस्टला भेटा. ते तुमच्यावर योग्य उपचार करतील

मूत्रमार्गातील असंयम नियंत्रित करण्यासाठी केगेल व्यायाम

केगेल व्यायाम हे गरोदरपणात मूत्रमार्गात असंयम नियंत्रित करण्यासाठीचा उपाय आहे. हे व्यायाम प्रकार ओटीपोटाकडील भागातील स्नायूंना घट्ट आणि मजबूत करण्यास मदत करतात. हे स्नायू मूत्रमार्ग आणि मूत्राशय स्फिंक्टरचे कार्य सुधारतात  आणि त्यामुळे मूत्रप्रवाह नियंत्रित करतात.

तुमचे केगेल स्नायू शोधण्यासाठी, टॉयलेटवर बसून लघवी करून सुरुवात करा. प्रवाहाच्या मध्यभागी लघवी करणे थांबवा आणि लघवीचा प्रवाह थांबवण्यासाठी तुम्ही जे स्नायू वापरता ते केगेल स्नायू आहेत. तसेच  तुम्ही केगल व्यायाम करू शकता.

व्यायाम कसे करावे:

 • ओटीपोट, मांड्या आणि कुल्ल्यांकडील स्नायूंना आराम द्या
 • ओटीपोटाकडील स्नायू घट्ट करा
 • स्नायू होल्ड केले आहेत तोपर्यंत १० मोजा
 • ओटीपोटाकडील स्नायू रिलॅक्स केल्यानंतर १० मोजा.

हे व्यायाम सकाळी, दुपारी आणि रात्री १० वेळा करण्याची शिफारस केली जाते. तुमच्या डेस्कवर, गाडी चालवताना किंवा तुमच्या सोफ्यावर बसून सुद्धा हे व्यायाम प्रकार केले जाऊ शकतात.

प्रतिबंध

गरोदरपणात लघवीला जाणे टाळण्यासाठी कोणताही निश्चित मार्ग नाही. ओटीपोटाकडील भागातील स्नायूंवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही व्यायाम आहेत. हे व्यायाम केल्यास लघवीचा प्रवाह नियंत्रित होण्यासाठी मदत होते. नियमित केगल व्यायाम केल्यास मूत्राशय प्रशिक्षित करण्यास आणि लघवीचा प्रवाह नियंत्रित करण्यास मदत होते. तुमच्या ओटीपोटाकडील स्नायूंना बळकट करण्याचा प्रयत्न करा. आणि ते  केवळ तुम्ही गरोदर असतानाच नाही तर इतरही वेळेला महत्वाचे असते. ओटीपोटाकडील स्नायूंचा नियमितपणे वापर न केल्यास ते सैल पडतात. त्यामुळे स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम तुम्ही केले तर ते उपयुक्त ठरेल.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात तुम्हाला मूत्रमार्गात असंयम आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. मूत्रमार्गाच्या संसर्गाची शक्यता पडताळून पहिली जाते. मूत्रमार्गाच्या  संसर्गामुळे पुढील समस्या उद्भवू शकतात. गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात लघवीचा असंयम ही समस्या निश्चितपणे येईल. प्रसूतीनंतरही काही आठवडे ह्याचा त्रास होईल. परंतु, प्रसूतीनंतर सहा आठवड्यांपर्यंत तुम्हाला असंयमचा त्रास होत असेल, तर तपासून घ्या.

लघवीची गळती होत असल्यास बऱ्याचशा स्त्रिया ते नाकारतात. आणि डॉक्टरांशी चर्चा करण्यास टाळाटाळ करतात. परंतु काळजी करण्यासारखे काही नाही. गरोदरपणात किंवा नंतर सुद्धा ह्या समस्येमुळे तुमच्या दिनचर्येत अडथळा येत असल्यास, त्वरित डॉक्टरांची मदत घ्या. दरम्यान, मूत्राशयाचा असंयम आणि लघवीच्या अनपेक्षित गळतीमुळे निर्माण होणारी जोखीम आणि ओशाळणे कमी करण्यासाठी ह्या लेखात दिलेल्या तंत्रांचा सराव करा.

आणखी वाचा:

गरोदरपणात वारंवार लघवीला होणे
गरोदरपणात लघवीला वास येणे: कारणे आणि उपचार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article