In this Article
१३ महिन्यांच्या नुकत्याच चालू लागलेल्या बाळाला खरं तर त्याच्या वाढत्या शरीराच्या आणि वाढलेल्या हालचालींचा सामना करण्यासाठी खूप जास्त पोषणाची गरज असते. फक्त दूध पिणारे बाळ आता खूप यशस्वीपणे घनपदार्थ सुद्धा खात आहे. ह्या वयाच्या बऱ्याचशा बाळांना खाण्याच्या बाबतीत आवडी निवडी येऊ लागल्या आहेत. त्यांच्या खाण्याच्या वेळा आता बदलल्या असून त्या वेळांचा अंदाज लावणे काही वेळा कठीण होऊन बसते. एखाद्या दिवशी बाळ खूप छान जेवण करते तर इतर दिवस त्यांना खाण्यात अजिबात रस नसतो. त्यांच्या जेवणाचे नीट वेळापत्रक ठेवल्यास त्यांच्या जेवणाचा अंदाज लावणे सोपे जाते. तसेच पोषक अन्नपदार्थांचा बाळाच्या आहारात समावेश केल्यास बाळाची विशिष्ट पदार्थाची आवड निवड कमी होऊन दिवसाच्या पोषणाच्या गरजा भागतील.
१३ महिन्यांच्या बाळासाठी पोषणाची गरज
तुमच्या १३ महिन्यांच्या बाळासाठी लागणारी अत्यावश्यक पोषणमूल्ये खालील प्रमाणे
१. प्रथिने
तुमच्या वाढणाऱ्या बाळाला दिवसाला १३ ग्रॅम्स प्रथिनांची गरज असते. प्रथिने ‘बिल्डिंग ब्लॉक्स‘ असून टिशू आणि स्नायू तयार करण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी त्यांची मदत होते.
२. कर्बोदके
लहान मुलांसाठी कर्बोदके फार महत्वाची असतात, मेंदूच्या विकासासाठी आणि शरीर कार्यरत राहताना शरीरास ऊर्जा मिळावी ह्यासाठी कर्बोदकांची गरज असते. एक वर्षापेक्षा जास्त वयाच्या बाळासाठी कर्बोदकांची गरज ही साधारणपणे १३० ग्रॅम्स इतकी असते.
३. फॅट
तुमच्या बाळाला आरोग्यपूर्ण चरबी १ ते २ कप दूधातून मिळू शकते तसेच संपूर्ण चरबीयुक्त डेअरी चे पदार्थ खाल्ल्याने स्नायूंची हालचाल, तसेच पेशी तयार होणे, तसेच रक्त गोठणे व खनिजद्रव्ये आणि व्हिटॅमिन्सचे शरीरात पोषणास मदत होते. लहानमुलांच्या उर्जायुक्त शरीरासाठी चरबी म्हणजे इंधन आहे.
४. तंतुमय पदार्थ
१३ महिन्यांच्या बाळाला एका दिवसाला १९ ग्रॅम्स तंतुमय पदार्थ लागतात त्यामुळे पचनाचे कार्य नीट होते आणि बद्धकोष्ठतेचा समस्या दूर राहतात.
५. लोह
ह्या वयात बाळाच्या आहारात लोहाचे प्रमाण ७ मिग्रॅ इतके असावे. १ वर्षावरील बऱ्याच बाळांना लोहाची कमतरता भासते आणि त्यामुळे ऍनिमिया होतो तसेच त्यांची वाढ आणि विकासावर नकारात्मक परिणाम होतो.
६. मीठ
१३ महिन्यांच्या बाळाला साधारणपणे १ ग्रॅम सोडियम (१/२ टी स्पून मीठ) दिवसाला लागते त्यामुळे स्नायूंचे आणि मज्जातंतूंचे कार्य सुरळीत हते आणि त्यामुळे रक्तदाब नियमित राहतो.
७. पाणी
तुमच्या १३ महिन्यांच्या बाळाला साधारणपणे १. ३ लिटर्स इतके द्रवपदार्थ दररोज लागतात ज्यामध्ये दूध, पाणी, ताज्या फळांचा रस आणि पोषक द्रव्ये ज्यामुळे बाळाला स्वतःला योग्यरीत्या सजलीत राहण्यास मदत होईल.
८. व्हिटॅमिन डी
कॅल्शिअम शरीरात शोषून घेण्यास व्हिटॅमिन डी मुळे मदत होते. जे बाळाच्या मजबूत हाडांच्या विकासासाठी गरजेचे आहे. १३ महिन्यांच्या वाढणाऱ्या बाळाला दररोज ४०० आय. यू. (इंटरनॅशनल युनिट्स) व्हिटॅमिन डी लागते.
१३ महिन्यांच्या बाळाला किती अन्न लागते?
प्रत्येक १३ महिन्यांचे बाळ हे वेगळे असते आणि त्यांच्या शारीरिक हालचाली वेगवेगळ्या असू शकतात तसेच त्यांच्या गरजा सुद्धा विशिष्ट असतात. आपल्या बाळाला पुरेसे अन्न मिळते आहे की नाही हे मोजण्याची पालकांना गरज नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे बाळाचे वजन समाधानकारक रित्या वाढत आहे आणि बाळ खेळकर आणि उत्साही असणे जरुरी आहे आहे. तुमच्या बाळाला दररोज संतुलित आणि परिपूर्ण आहार मिळत आहे ना ह्याची खात्री करा. तुमच्या बाळाच्या नाश्त्यामध्ये आणि जेवणात हिरव्या पालेभाज्या, फळे, प्रथिने, सीरिअल दुग्धजन्य पदार्थ ह्यांचा समावेश होतो आहे ना ते पहा. पॅक केलेल्या अन्नपदार्थांपेक्षा घरी केलेल्या अन्नपदार्थांना प्राधान्य द्या.
प्रत्येक प्रकारच्या आहाराची गरज ही दिवसाला बाळाला किती ऊर्जेची गरज आहे त्यावर अवलंबून असते. बऱ्याच मुलांना साधारणपणे दिवसाला १००व ते १४०० कॅलरी इतकी गरज असते. तसेच तुमच्या बाळाच्या आहारात दररोज ३–४ टीस्पून कॅनोला ऑइल सारख्या पोषक तेलाची गरज असते.
१३ महिन्याच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थ
१३ महिन्यांच्या बाळासाठी काही सर्वोत्तम पदार्थ खालीलप्रमाणे:
१. भाज्या
तुमच्या बाळाला भाज्या खाण्याची सवय सुरुवातीपासूनच लावणे हे खूप महत्वाचे आहे. भाज्या खनिजद्रव्ये, व्हिटॅमिन्स आणि लागणारे तंतुमय पदार्थ बाळाच्या आरोग्यपूर्ण वाढीसाठी गरजेच्या असतात. तुम्ही गाजर, टोमॅटो कच्चे कापून बाळाला फिंगर फूड म्हणून देऊ शकता किंवा शिजवून त्यांना चवदार डिश बनवून देऊ शकता.
२. फळे
वेगवेगळी फळे तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. फळे म्हणजे शरीराला लागणाऱ्या पोषणमूल्यांचा उत्तम स्रोत असतो आणि शरीर नीट कार्यरत राहण्यासाठी तसेच शरीराची नीट देखभाल होण्यासाठी ते गरजेचे असते. तुमच्या बाळाला दररोज एक फळ खाण्यास प्रोत्साहित करा. तसेच तुम्ही जी फळे उपलब्ध असतील अशा वेगवेगळ्या फळांचे रंगीबेरंगी फ्रुट सलाड करू शकता.
३. दूध
बाळाला दूध दिल्याने बाळाची हाडे मजबूत होतातच आणि शरीराची चरबी आणि व्हिटॅमिन डी ची गरज सुद्धा भागते. लक्षात ठेवा की दररोज खूपही दूध बाळाला देऊ नका नाहीतर बाळ जेवण करणार नाही आणि त्यामुळे लोहाची कमतरता भासू शकते.
४. दही
विरजण लावून दुधापासून बनवलेले साधे दही जे गोड़ नसते ते बाळासाठी अगदी योग्य आहे. ज्या मुलांना लॅक्टोस इंटॉलरन्स असतो अशा मुलांना दही खाऊन त्याचा फायदा होतो आणि शरीराला चरबी आणि कॅल्शिअमचा पुरवठा होतो. दह्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि जुलाबासारख्या समस्यांना आळा बसतो.
५. सुकामेवा
सुक्यामेव्याचा तुमच्या बाळाच्या आहारात समावेश केल्यास ते फायदेशीर ठरते कारण त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, खनिजद्रव्ये, व्हिटॅमिन्स, आरोग्यपूर्ण चरबी, तंतुमय पदार्थ, प्रथिने ह्यांचा समावेश असतो. जर तुम्हाला सुकामेवा तुमच्या बाळाच्या घशात अडकण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही पावडर करून बाळाच्या जेवणात ती घालू शकता. बाळाला सुक्यामेव्याची ऍलर्जी तर नाही ना हे त्याला भरवण्याआधी तपासून पहा.
६. चिकन
तुमच्या बाळाच्या आहारात समावेश करण्यासाठी चिकन हा एक पोषक पर्याय आहे. चिकन बी कॉम्प्लेक्स, प्रथिने, लोह, ओमेगा ६ फॅटी ऍसिड्स इत्यादींचा उत्तम स्रोत आहे. ह्यामुळे शरीराची क्षमता आणि हिमोग्लोबिन वाढते.
७. शेंगा
मटार, बीन्स, मसूर इत्यादींद्वारे बाळाला स्नायू बळकट होण्यासाठी प्रथिने मिळतात तसेच हाडांसाठी कॅल्शियम, हृदयासाठी मॅग्नेशिअम, रक्त आणि ऊर्जेसाठी लोह तसेच चांगले पचन होण्यासाठी तंतुमय पदार्थ ह्यांचा उपयोग होतो. शेंगा थोड्या उकळत्या पाण्यात टाकून किंवा त्या उकडून घेऊन तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता.
८. अंडी
अंडी खाल्ल्याने तुमच्या बाळाला खूप फायदा होऊ शकतो कारण अंडी हे लोह, प्रथिने, फोलेट, ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स, कोलिन तसेच व्हिटॅमिन अ, ब१२, डी, आणि इत्यादींनी समृद्ध असते आणि त्यामुळे शारीरिक आणि मानसिक विकासास मदत होते.
९. चीझ
चीझमधून बाळाला प्रथिने, कॅल्शिअम, व्हिटॅमिन अ मिळते त्यामुळे चीझ हे बाळासाठी आरोग्यपूर्ण आणि संतुलित आहार आहे. चीझ खाल्ल्याने शरीराची चरबी आणि ऊर्जेची गरज सुद्धा भागते.
१०. संपूर्ण धान्य
ओट्स, ज्वारी, तपकिरी तांदूळ ह्या सारखी धान्ये बाळाच्या आहाराचा महत्वाचा भाग असतात आणि त्याद्वारे बाळाला वाढीसाठी तंतुमय पदार्थ, प्रथिने, कर्बोदके आणि विविध व्हिटॅमिन्स आणि खनिजद्रव्ये मिळतात.
१३ महिन्यांच्या बाळासाठी आहार तक्ता/ आहार योजना
-
१३ महिने वयाच्या बाळासाठी आहाराचा तक्ता – आठवडा १ ला
जेवण |
न्याहारी |
सकाळचा नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला |
१/२ उकडलेले अंडे + १ छोटे केळं |
भाज्या घालून केलेला दलिया + १ छोटा ग्लास दूध | नाचणी –गव्हाची रोटी+ मेथी–बेसन भाजी + चेरी टोमॅटो | बदामाची पूड घातलेली १ वाटी लापशी | टोमॅटो–भोपळा –मसूर डाळ सूप पुलाव सोबत |
दिवस २ रा | ठेपला+चुंदा + १ छोटा ग्लास दूध | १/२ अंड्याची भुर्जी + १ छोटा चिकू | बाजरी-,मूग डाळ खिचडी | शेवयांचा उपमा + केसजर वेलची दूध | पालक पनीर पराठा |
दिवस ३ रा | १/२ अंडयांची भुर्जी +१/२ पेअर | १–२ पनीर पालक पराठा | पोळी +डाळ + आवडीची भाजी +काकडीचे काही काप |
गहू सफरचंदाची लापशी |
भाजी घालून केलेली खिचडी दही किंवा कढी सोबत |
दिवस ४ था | १ कप पोहे + १ छोटा ग्लास संत्र्याचा रस | १/२ ऑम्लेट + १ ग्लास केळ्याचा मिल्कशेक |
पराठा + पनीर भुर्जी |
दही पोहे आणि कुस्करलेले केळं | कमी तिखट पावभाजी आणि मूग डाळ सूप |
दिवस ५ वा | १/२ उकडलेले अंडे + पपईची १ फोड | १ वाटी ओट्स मध आणि बदामाची लापशी |
भाज्यांचे सूप + फ्राईड राईस + काही गाजराचे काप |
ओट्स आणि सफरचंदाची प्युरी | बेसन ज्वारीच्या पिठाचे कोथिंबीर घातलेले धिरडे दह्यासोबत |
दिवस ६ वा |
२ छोटे नाचणीचे डोसे + हिरवी चटणी |
२–३ पनीर अंजीर लाडू |
रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीच्या काही फोडी | भाजलेल्या रताळ्याचे तुकडे | राजमा भात टोमॅटोच्या सूप सोबत |
दिवस ७ वा |
१/२ ऑम्लेट + १/२ कप कलिंगड |
१ छोटा कप छोले + २ छोट्या पुऱ्या +१ छोटा ग्लास लस्सी |
ज्वारी – गहू रोटी + छोले पालक + काही चेरी टोमॅटो |
साखर/ मध किंवा चाट मसाल्यासोबत पनीरचे तुकडे (मसाल्याची पावडर मिश्रित) | पोळी+भाजी + डाळ फ्राय |
-
१३ महिने वयाच्या बाळासाठी आहाराचा तक्ता – आठवडा २ रा
जेवण | न्याहारी | सकाळचा नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला |
अंजिराचे तुकडे घातलेला राजगिरा |
पालक ढोकळा |
नाचणी गव्हाची पोळी+ मेथी बेसन भाजी + काही चेरी टोमॅटो | मोसंबीच्या फोडी |
फ्रेंच बीन्स आणि वाटाणा घालून केलेला दलिया दह्यासोबत |
दिवस २ रा | उकडलेले अंडे किंवा घरी केलेले पनीर | कुस्करलेले बटाटे आणि पोहे पावडर | भात राजमा आणि पुदिना सूप |
काकडीचे काप दह्यासोबत |
पालक ढोकळा |
दिवस ३ रा | बेसन–ज्वारी– कोथिंबीर धिरडे दह्यासोबत | गाजर–बीटरूट सूप आणि मुरमुरे | पोळी+डाळ+ आवडीची भाजी + काकडीचे काही काप |
अननस शिरा |
भाजलेले पनीर सॅन्डविच आणि पालक सूप |
दिवस ४ था | ओट्स स्ट्रॉबेरी स्मूदी | २–३ पनीर अंजीर लाडू | संपूर्ण धान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरूट चे काप+ हातसडीच्या तांदळाचा भात | चीझ घातलेला कुस्करलेला बटाटा | मटार आणि बटाट्याची भाजी पराठ्यासोबत |
दिवस ५ वा |
अंडा भुर्जी |
पपई आणि पेअरचे तुकडे | पोळी आणि पनीर भुर्जी |
नाचणीचे लाडू |
१ छोटा कप छोले + २ छोट्या पुऱ्या + १ छोटा ग्लास लस्सी |
दिवस ६ वा | शेवयांचा उपमा + केशर विलायची दूध | नारळ बर्फी | पोळी + भाजी + आवडीची भाजी + काकडीचे काही तुकडे |
सफरचंदाच्या फोडी |
बाजरी–मूग डाळ खिचडी |
दिवस ७ वा | नाचणी सत्व एक चमचा बदामाची पूड घालून | पालक + द्राक्षे + सफरचंद ज्यूस |
छोट्या इडली सांबार |
अननस रायता |
पोळी +डाळ + आवडीची भाजी + काकडीच्या काही फोडी |
-
१३ महिने वयाच्या बाळासाठी आहाराचा तक्ता – आठवडा ३ रा
जेवण | न्याहारी | सकाळचा नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | मऊ डोसा कमी तिखट सांबार सोबत | पुदिना लिंबू सरबत मध घातलेले |
पोळी + डाळ + तुमच्या आवडीची भाजी |
चिक्कू मिल्कशेक |
बिसिबेले भात + सफरचंद रायता |
दिवस २ रा | गव्हाची सफरचंद घालून केलेली लापशी | कापलेले केळे |
बाजरीची रोटी आणि वांग्याची भाजी आणि उडद डाळीची आमटी |
खजूर आणि दूध पावडर लाडू |
फ्लॉवर पराठा घरी केलेल्या लोण्यासोबत |
दिवस ३ रा | ज्वारीचे मुरमुरे सफरचंद प्युरीसोबत | उकडलेले गाजर आणि रताळ्याचे चाट |
पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काप |
पालक + द्राक्षे + सफरचंदाची स्मूदी | बेसन–पालक ढोकळा + मटार सूप |
दिवस ४ था | किसलेले गाजर घालून केलेले बेसन धिरडे | पालक पुरी |
ज्वारी आणि गव्हाची पोळी + छोले पालक + काही चेरी टोमॅटो |
खजुराचे लाडू आणि दूध | भाज्या घालून केलेली दलिया खिचडी |
दिवस ५ वा | भाज्या घालून केलेला उपमा आणि ताक | अननस शिरा | भाज्यांचे सूप + फ्राईड राईस + गाजराचे काही काप | केळ्याचा मिल्कशेक | मुळ्याचा पराठा आणि लस्सी |
दिवस ६ वा | ऑम्लेट ब्रेड किंवा पनीर सँडविच |
चीझ घालून कुस्करलेला बटाटा |
पोळी+ डाळ +आवडीची भाजी +काकडीच्या काही फोडी |
वेगवेगळ्या फळांचा चाट (Fruit chat) |
बाजरी – मूग डाळ खिचडी + अननस रायता |
दिवस ७ वा | राजगिरा आणि गावाचा शिरा बेदाणे घालून | नाचणीचा लाडू | पालक खिचडी + गाजराची कोशिंबीर |
दलिया |
पोळी + डाळ +भाजी |
-
१३ महिने वयाच्या बाळासाठी आहाराचा तक्ता – आठवडा ४था
जेवण | न्याहारी | सकाळचा नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता |
रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | ब्रोकोली उपमा + वेलची केशर दूध | संत्री–पीच– सफरचंद स्मूदी |
संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीच्या काही फोडी |
पनीरचे तुकडे मध किंवा चाट मसाल्यासोबत |
गव्हाचा पास्ता घरी केलेल्या टोमॅटो प्युरीमध्ये |
दिवस २ रा | केळी–व्हॅनिला मिल्कशेक | कुस्करलेला खाकरा | मेथी– तोंडली पुलाव | पपईचे काप, लिंबू सरबत + फॉक्स नट | जीरे भात आणि डाळ |
दिवस ३ रा |
अंडे किंवा पनीर पराठा आणि हिरवी चटणी |
पालक पुरी |
पोळी+ डाळ + आवडीची भाजी + काकडीच्या काही फोडी | केळ्याचा मिल्कशेक | पनीर – कुस्करलेले सफरचंद |
दिवस ४ था | नाचणी डोसा + चॉकलेट मिल्क | उकडलेल्या अंड्याचा बलक किंवा घरी केलेले पनीर | ज्वारी–गहू रोटी + छोले पालक + चेरी टोमॅटो | फ्रुट योगर्ट | पोहे पुडिंग |
दिवस ५ वा | बदाम आणि बेदाणे घातलेली शेवयांची खीर | भोपळ्याचे काप | अंडी आणि पनीर पुलाव |
दुधी भोपळ्याचा हलवा |
पनीर – कुस्करलेले सफरचंद |
दिवस ६ वा |
दूध आणि खजुरासोबत राजगिरा |
वेगवेगळ्या धान्यांचे धिरडे |
पोळी + डाळ + आवडीची भाजी + गाजराचे काही काप |
घरी केलेले मफिन किंवा पोळी + गूळ | नारळी भात भाजीसोबत |
दिवस ७ वा |
केळ घालून केलेला गव्हाचा शिरा आणि दूध |
रवा इडली भाज्या घालून |
ज्वारी–गहू रोटी + छोले पालक + काही चेरी टोमॅटो |
बेसन लाडू |
व्हेजिटेबल पुलाव आणि कोशिंबीर |
१३ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांच्या पाककृती
१. ओटमील मफीन्स
मफीन्स झटपट करता येण्याजोगी नाश्त्याची पाककृती आहे
घटक
- २ अंडी
- १/२ कप तेल
- १/२ कप दूध
- २/३ कप साखर
- १ कप पीठ
- ३/४ कप ओटमील
- १/२ टीस्पून बेकिंग सोडा
- १ टी स्पून बेकिंग पावडर
कृती
- ओव्हन २०० डिग्री सेल्सिअसला गरम करून घ्या
- मफीन ट्रे ला तेल लावा
- सगळे द्रव घटक एकत्र करा. कोरडे घटक चाळून घ्या आणि मिक्सर मधून काढून ओल्या मिश्रणात घाला
- हे पीठ मफीन कप मध्ये घाला आणि २० मिनिटे बेक करा.
२. अंड्याची भुर्जी
तुमच्या बाळाला अंड्यांमधील पोषणमूल्ये पुरवण्याचा हा साधा मार्ग आहे.
घटक
- अंडे
- १/४ कप दूध
- बटर
- मीठ
कृती
- अंडे फेटून घ्या आणि त्यात मीठ घाला
- बटर वितळवून घ्या आणि त्यात अंड्याचे मिश्रण घाला
- हळुवारपणे दुमडा
३. चिकन भात
रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही रुचकर पदार्थ करू शकता ह्या पदार्थामुळे तुमचे बाळ आनंदी होईल.
घटक
- १/४ कप वाफवलेले चिकन ब्रेस्ट ( तुकडे केलेले)
- १ कप ऍप्रिकॉट
- १/२ कप शिजवलेला भात
कृती
- सगळे घटक एकत्र करा
- गरम किंवा गार खायला द्या
४. पास्ता
हा चीझ घालून केलेला पास्ता बाळाच्या दुपारच्या जेवणासाठी चांगला पर्याय आहे.
घटक
- १ कप पास्ता (उकडलेला)
- १ टोमॅटो (चिरलेला)
- चीझ( किसलेले)
- तेल
कृती
- भांड्यात तेल गरम करून घ्या आणि त्यामध्ये पास्ता आणि चीझ घाला
- झाकण ठेवा आणि चीझ वितळेपर्यंत शिजू द्या
- चिरलेला टोमॅटो वरती घालून खायला द्या
५. गाजराच्या चकत्या
तुमच्या बाळाला गाजराच्या चकत्या खूप आवडतील आणि बाळ त्या नाकारू शकणार नाही
घटक
- गाजर ( वरचे साल काढून चकत्या केलेले)
- ऑलिव्ह ऑइल
- मीठ (हवे असल्यास)
कृती
- ओव्हन १८० डिग्रीला गरम करून घ्या
- सगळ्या गाजराच्या चकत्या बेकिंग ट्रे वर ठेवा
- मीठ घालून ३० मिनिटांसाठी भाजून घ्या
बाळाला भरवण्यासाठी काही टिप्स
बाळाला भरवण्याच्या काही टिप्स खालीलप्रमाणे
- बाळाच्या आहाराचे नियोजन केल्यास आपल्या बाळाच्या विविध आहार संक्रमणास सामोरे जाण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते.
- बाळांसाठीच्या अन्नाऐवजी तुमच्या जेवणातील पदार्थांचा समावेश तुमच्या बाळाच्या आहारात करा.
- तुमच्या बाळाला स्वतःच्या हाताने खाण्यास प्रोत्सहीत करा. बाळ स्वतःच्या हाताने खाताना आजूबाजूला घाण होऊ शकते परंतु असे केल्याने मुले शिकतात.
- १३ महिन्यांच्या बाळाच्या आहारातची योजना करताना जास्तीत जास्त अन्नपदार्थांच्या ग्रुप्सचा समावेश करा आणि तुमची सर्जनशीलता वापरून शक्य तितके वैविध्य आणा.
- गोड आणि प्रक्रिया केलेले अन्न कमीत कमी वापरा. अधूनमधून तुम्ही बाळास ट्रीट म्हणून ते देऊ शकता.
- नवीन अन्नपदार्थांचा नियमित समावेश करा जेणेकरून तुमच्या बाळाला वेगवेगळ्या चवीचे आणि पोत असलेल्या अन्नपदार्थांची चव विकसित होईल.
- पोषक आहाराची निवड आणि सवय ह्यासंबंधी पालक हे बाळांचे रोल मॉडेल असतात. जेवणाची वेळ ही कौटुंबिक आनंदाची वेळ असल्यास तुमच्या बाळाला चांगले जेवण करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि ते निरोगी राहील.
अस्वीकारण:
- प्रत्येक मूल हे वेगळे असते त्यामुळे तुमच्या विवेकबुद्धीनुसार ह्या आहाराच्या योजना वापरा. तुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीनुसार/ गरजेनुसार ह्या आहार योजनांमध्ये बदल करू शकता.
- बाळाला जबरदस्तीने कधीच भरवू नका.
- फॉर्मुला तयार करताना बॉक्सवरील सूचना पाळा आणि त्याबरोबर दिलेला मापाचा चमचा वापरा.
- बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना सुरुवातील पाणीदार सूप करूंन द्यावे. जसजसे बाळाची वाढ होईल तसे बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने किंवा आईने बाळाला गिळता येईल अशा पद्धतीने सूपचा घट्टपणा वाढवावा. खूप घट्ट अन्नपदार्थांमुळे बाळाचे पोट बिघडते किंवा जड होते, आणि खूप पातळ पदार्थांमुळे बाळ भुकेले राहू शकते.
- काही मुले काही दिवस कमी खातात ज्या मुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. तथापि, जर बाळ सलग ३–४ दिवस कमी खात असेल तर तुमच्या डॉक्टरांची मार्गदर्शनासाठी भेट घ्या.
- दात येताना किंवा बाळाला बरे नसेल तर तो किंवा ती कमी खाऊ शकते. तुम्ही स्तनपान किंवा फॉर्मुला ह्या दिवसात वाढवू शकता. बाळ बरे झाल्यावर पुन्हा तुम्ही हे अन्नपदार्थ बाळाला देऊ शकता.
- बाळाला जुलाब होत असतील तर बाळाला भरवणे बंद करू नका.
- जर तुमचे मूल सुरुवातीला अन्नपदार्थ खात नसेल तर दालचिनी, जिरेपावडर, लिंबाचा रस, कढीपत्त्याची पाने वापरून तुम्ही अन्नपदार्थांची चव बदलू शकता.
- तुमच्या मुलाला सुकामेवा, ग्लूटेन किंवा अंड्यांची ऍलर्जी असेल तर बाळाला कुठलेही अन्नपदार्थ भरवण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी कृपया संपर्क साधा.