Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात वारंवार लघवीला होणे

गरोदरपणात वारंवार लघवीला होणे

गरोदरपणात वारंवार लघवीला होणे

गरोदरपणाच्या कालावधीतून जात असताना कोणते उपाय करायचे आणि कोणते टाळायचे ह्या विचाराने तुमचा थोडा गोंधळ उडू शकतो. आम्ही ह्या लेखामध्ये काही विश्वासार्ह माहिती एकत्र केलेली आहे त्यामुळे तुमच्या शंका दूर होण्यास मदत होऊ शकेल. ह्या लेखात, आपण सर्वात सामान्य लक्षणांपैकी एका लक्षणाची चर्चा करणार आहोत. ह्या लक्षणांची प्रत्येक गर्भवती स्त्री काळजी करते. गरोदरपणातील असेच एक लक्षण म्हणजे वारंवार लघवीला जाणे. गरोदरपणाच्या ६ व्या आठवड्याच्या आसपास (पहिल्या तिमाहीत) असे होऊ लागते आणि गर्भारपणाचे दिवस जसजसे पुढे सरकतात तसे त्यामध्ये वाढ होते.

वारंवार लघवी होण्याची काय कारणे आहेत?

गरोदरपणात वारंवार लघवी होण्याचे कारण म्हणजे एचसीजी हे संप्रेरक होय. हे संप्रेरक स्त्रीच्या मूत्रपिंडात ३५ ते ६०% पर्यंत रक्त प्रवाह वाढवते. अतिरिक्त रक्तप्रवाहामुळे गर्भधारणेनंतर मूत्रपिंड २५% जास्त लघवी तयार करतात. लघवीचे उत्पादन सुमारे ९ ते २६ आठवड्यांपर्यंत वाढते, त्यानंतरच ते स्थिर होते.

रक्त प्रवाह वाढणे हे वारंवार लघवी होण्याचे एक प्रमुख कारण आहे. वाढत्या गर्भाशयामुळे स्त्रीच्या मूत्राशयावरील दाब वाढतो आणि त्याचा परिणाम होऊ शकतो. गरोदर स्त्रियांना गरोदरपणाच्या शेवटच्या तीन महिन्यांत वारंवार लघवी होण्याचे मुख्य कारण म्हणजे मुत्राशयावरील हा दबाव आहे. बाळाचा आकार वाढतो आणि जन्माच्या काही आठवडे आधी हे बाळ आईच्या ओटीपोटात खाली सरकते तेव्हा दबावात ही वाढ होते.

वारंवार लघवी होणे हे गरोदरपणाचे प्रारंभिक लक्षण आहे का?

वारंवार लघवी होणे हे गरोदरपणाचे सामान्य लक्षण आहे. गर्भधारणेच्या पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीत वारंवार लघवी होते . शरीरातील द्रवपदार्थांमध्ये वाढ होते तसेच एचसीजी ह्या संप्रेरकांच्या पातळीत सुद्धा वाढ होते त्यामुळे गर्भवती स्त्री वारंवार बाथरुमला जाते.

प्रत्येक तिमाहीतील लघवी होण्याची प्रक्रिया

गरोदरपणाच्या नऊ महिन्यांत स्त्रीच्या लघवीच्या नमुन्यामध्ये विविध बदल होतात. हे बदल प्रत्येक तिमाहीनुसार खाली स्पष्ट केलेले आहेत.

1. पहिली तिमाही

गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीतील प्रमुख लक्षणांपैकी एक म्हणजे वारंवार लघवी होणे. त्यामागे हार्मोन्सची वाढलेली पातळी हे प्राथमिक कारण आहे. गर्भाशयाच्या वाढलेल्या आकारामुळे मूत्राशयावर दाब पडतो आणि स्त्रीला वारंवार लघवी होते.

2. दुसरी तिमाही

गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये वारंवार लघवी होण्यापासून तुम्हाला थोडा आराम मिळू शकतो. ह्याचे कारण म्हणजे गर्भाशयाचा आकार सतत वाढत असतो, बाळ ओटीपोटातून वरती सरकते, त्यामुळे मूत्राशयावरील दाब कमी होतो. लक्षात ठेवा की हे तात्पुरते आहे!

3. तिसरी तिमाही

तिसऱ्या तिमाहीमध्ये तुम्हाला ह्या लक्षणांमध्ये वाढ झालेली दिसून येते. गरोदरपणाच्या ८ व्या महिन्यात वारंवार लघवी होते. प्रसूतीच्या जवळ असलेल्या स्त्रीच्या पोटातील बाळ खाली सरकते. त्यामुळे मूत्राशयावर पडतो आणि वारंवार लघवीला जावे लागते.

हसताना किंवा शिंकताना मूत्र गळते असे का होते?

गरोदरपणात तुम्हाला शिंकताना, व्यायाम करताना, खोकताना किंवा अगदी हसताना लघवी गळणे हे एक सामान्य लक्षण आहे. विशेषतः गरोदरपणाच्या ८ व्या महिन्यात असे होते. असंयम किंवा अनावधानाने लघवी होणे हा तणाव जडत्वाचा परिणाम आहे. तुमच्या मूत्राशयावर ताण किंवा दबाव आणणार्‍या कोणत्याही शारीरिक हालचालींच्या (वर उल्लेख केलेल्या) दरम्यान असे होते.

हसताना किंवा शिंकताना मूत्र गळते असे का होते?

गरोदरपणात वारंवार लघवी होण्याचा त्रास कसा कमी करावा?

प्रत्येक गर्भवती माता लघवीची वारंवारता कमी करण्यासाठी उपाय शोधत असते. आम्ही खाली काही उपाय सांगितले आहेत आणि ते तुम्हाला नक्कीच मदत करतील:

  1. लघवी करताना पुढे झुकल्याने मूत्राशय रिकामे होण्यास मदत होईल. प्रत्येक वेळी लघवी करताना तुमचे मूत्राशय रिकामे असल्याची खात्री केल्यास, तुमची बाथरूममध्ये जाण्याची वारंवारता कमी होऊ शकते.
  2. कॉफी, चहा, सॉफ्ट ड्रिंक इत्यादींसारखे लघवीचे प्रमाण वाढवणारे घटक असलेले पेय टाळले जाऊ शकते. हे घटक फक्त लघवीचे प्रमाण वाढवतील आणि तुमच्या बाथरूम कडे होणाऱ्या फेऱ्या वाढवतील.
  3. केगेल व्यायामामुळे मूत्रमार्गाचे स्नायू मजबूत होतात आणि अवयवावर नियंत्रण मिळते. त्यामुळे, तुम्हाला तुमच्या लघवीवर चांगले नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. व्यायाम दिवसातून सुमारे तीन वेळा केला जाऊ शकतो. तुमच्या स्नायूंचे सुमारे १० मिनिटे आकुंचन होऊ द्या आणि हे सलग १० ते २० वेळा करा.
  4. अधूनमधून वारंवार लघवी होण्यामागे मूत्रमार्गाचा संसर्ग हे कारण असू शकते. त्यासाठी वैद्यकीय मदत घेणे आवश्यक असते. ही शक्यता नाकारण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना भेट द्या.
  5. बाथरूमला जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्रिया युरिनरी इन्कॉन्टीनन्स पॅड वापरू शकतात. व्यायाम करताना आणि तुम्हाला खोकला असल्यास तुम्ही ह्याचा वापर करू शकता.

वारंवार लघवी करणे हे चिंता करण्यासारखे लक्षण आहे का?

गरोदरपणात वारंवार लघवी होणे हे एक सामान्य लक्षण आहे, मुख्यतः संप्रेरक पातळीतील बदल आणि मूत्रमार्गात असंयम ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. परंतु त्यासाठी इतर घटक सुद्धा कारणीभूत असू शकतात. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे देखील वारंवार लघवी होऊ शकते. संसर्गाची शक्यता नाकारण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले आहे

गरोदरपणातील मूत्रमार्गाचा संसर्ग

गरोदरपणात यूटीआय सामान्य असतात कारण बाळाचा दाब मूत्रमार्गावर पडत असतो, त्यामुळे जीवाणूंची वाढ होते. तसेच, गरोदरपणात मूत्रमार्गाचा विस्तार होतो, त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते आणि जिवाणूंची वाढ अधिक होते. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे लघवी करताना वेदना होणे, वारंवार लघवी, लघवी करताना जळजळ, मळमळ आणि उलट्या, ताप, पाठदुखी, ओटीपोटात दुखणे, ढगाळ किंवा लघवीतून रक्त पडणे आणि वारंवार लघवीची भावना यासारखी लक्षणे दिसून येतात. जर तुम्हाला लघवी करताना वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर त्यासाठी कारणीभूत असणाया युटीआयवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले होय.

गरोदरपणात वारंवार लघवी होण्यापासून कधी आराम मिळेल?

गरोदरपण आणि लघवी लागण्याचे प्रमाण ह्या विषयावर गरोदर स्त्रियांनी अनेकदा चर्चा केलेली आहे. प्रसूतीनंतरही शरीर गरोदरपणातील अतिरिक्त द्रव काढून टाकत असते. प्रसूतीनंतर किमान पहिले काही दिवस वारंवार लघवी करण्याची इच्छा कमी होत नाही. शरीरातील अतिरिक्त द्रव काढून टाकल्यानंतरच तुम्हाला थोडा आराम मिळेल कारण तुमची शारीरिक प्रणाली पूर्वस्थितीत येईल.

लक्षात ठेवा की वारंवार लघवीला जावे लागणे ह्या किरकोळ समस्या आहेत. ह्या समस्या बाळाचा जन्म झाल्यावर नक्कीच नाहीशा होतात.

आणखी वाचा:

गरोदरपणात लघवीला वास येणे: कारणे आणि उपचार
गरोदरपणातील मूत्रमार्गाच्या संसर्गावर (यूटीआय) घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article