Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

गरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

गरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

अभिनंदन! तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यात पोहोचलेला आहात. गरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यात बहुतेक स्त्रियांना त्या गरोदर असल्याचे समजते. जर तुम्ही बाळाची आतुरतेने वाट बघत असाल आणि तुम्ही आई होणार असल्याचे तुम्हाला समजले असेल तर तुम्ही खूप आनंदात असाल. गरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यात बाळाचे हात आणि पाय दिसू लागतात. ह्याच आठवड्यात पहिल्यांदा अल्ट्रासाऊंड केल्यावर आई बाळाला बघू शकते. ७ व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड मध्ये तुम्ही काय बघू शकता हे ह्या लेखामध्ये दिलेले आहे.

तुम्ही ७ व्या आठवड्यांत अल्ट्रासाऊंड का केले पाहिजे?

७व्या आठवड्यातील स्कॅन विविध कारणांसाठी केले जाते. अल्ट्रासाऊंड करून घेतल्याने खालील फायदे होतात

 • स्कॅनद्वारे बाळाचे गॅस्टेशनल वय निश्चित केले जाऊ शकते
 • सातव्या आठवड्यात , अल्ट्रासाऊंड स्कॅनद्वारे गर्भाच्या हृदयाचे ठोके ओळखले जाऊ शकतात. हृदयाचा ठोका हे निरोगी आणि जिवंत गर्भाचे पहिले लक्षण आहे
 • आईच्या प्रजनन आरोग्याची तपासणी केली जाते
 • ७ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅनद्वारे, जुळी किंवा एकाधिक गर्भधारणा शोधली जाऊ शकते. एकापेक्षा जास्त गेस्टेशनल सॅक्स असतील तर जुळी बाळे असल्याचे स्कॅन मध्ये लक्षात येते
 • बीजवाहिनी किंवा गर्भाशयाव्यतिरिक्त शरीराच्या इतर ठिकाणी गर्भाचे रोपण झाल्यास म्हणजेच एक्टोपिक गर्भधारणेचे देखील ह्या स्कॅन मध्ये निदान केले जाऊ शकते
 • विकृती शोधण्यासाठी बाळाच्या वाढीची तुलना त्याच्या गर्भावस्थेच्या वयाशी केली जाते
 • जर गर्भवती महिलेला रक्तस्त्राव होत असेल, तर द्रुत अल्ट्रासाऊंड स्कॅनने त्याचे कारण शोधले जाऊ शकते

डेटिंग स्कॅन कोणासाठी आवश्यक आहे?

ज्या महिलांची मासिक पाळी अनियमित असते किंवा ज्यांना त्यांच्या शेवटच्या मासिक पाळीची तारीख आठवत नाही त्यांना त्यांच्या प्रसूतीच्या तारखेची गणना करणे आव्हानात्मक वाटते. तसेच, ज्या स्त्रिया तोंडी गर्भनिरोधक घेत असतात त्यांना किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना गर्भधारणेची तारीख लक्षात नसते. अशा परिस्थितीत, बाळाच्या वयाचा अंदाज लावण्यासाठी तसेच अंदाजे प्रसूती तारखेची गणना करण्यासाठी डेटिंग स्कॅन उपयुक्त ठरू शकते. बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील हे स्कॅन उपयुक्त आहे.

७ व्या आठवड्याचे स्कॅन कसे केले जाते?

सात आठवड्यांचा अल्ट्रासाऊंड दोन वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. गर्भवती महिलेच्या तब्येतीनुसार, ट्रान्सव्हॅजिनल स्कॅन किंवा ओटीपोटाचा अल्ट्रासाऊंड केला जातो. ट्रान्सव्हॅजिनल स्कॅनमध्ये योनीमार्गातून प्रोब घातला जातो आणि त्यासाठी स्कॅन करण्यापूर्वी गर्भवती महिलेचे मूत्राशय पूर्णपणे भरलेले असणे आवश्यक असते. पोटाचा अल्ट्रासाऊंड करताना, गर्भ स्पष्ट दिसण्यासाठी मूत्राशय संपूर्ण भरलेले असणे आवश्यक असते.

७ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यासाठी किती वेळ लागतो?

सातव्या आठवड्यातील अल्ट्रासाउंड करण्यासाठी काही मिनिटांचा वेळ लागतो. ह्या स्कॅनमध्ये हृदयाचे ठोके, गर्भारपणाचे वय तसेच बाळाची वाढ तपासली जाते आणि त्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास वेळ लागतो.

ह्या स्कॅन मध्ये काय अपेक्षित आहे?

७ आठवड्याच्या स्कॅन मध्ये काय दिसणार ह्याची अनेक मातांना माहिती नसते. त्यासाठी त्याविषयीची माहिती खाली दिलेली आहे.

 • तुम्ही तुमच्या बाळाचे लहान हात, बोटे आणि अगदी नाकपुड्या देखील पाहू शकाल
 • ७ व्या आठवड्यांत, बाळ ब्लूबेरीच्या आकाराचे असते आणि ते स्पष्ट दिसण्यासाठी प्रतिमा मोठी करणे आवश्यक असते
 • या स्कॅनचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या स्कॅन दरम्यान गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात
 • विकसित होणारे अंतर्गत अवयव सुद्धा दिसू शकतात

ह्या स्कॅन मध्ये काय अपेक्षित आहे?

अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये तुम्ही जुळी बाळे पाहू शकता का?

होय, ७ व्या आठवड्यातील स्कॅनमध्ये तुम्ही जुळी बाळे पाहू शकता. ती सहसा एकाधिक भ्रूण किंवा गॅस्टेशनल सॅक्स म्हणून दिसतात. परंतु काही वेळा, गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात स्कॅन केल्यास आणखी एक बाळ आहे हे दिसत नाही.

७ व्या आठवड्यात हृदयाचे ठोके ऐकू न येणे हे गर्भपाताचे लक्षण आहे का?

होय, सातव्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंडमध्ये हृदयाचे ठोके ऐकू न येणे हे गर्भपाताचे लक्षण असू शकते. परंतु या निष्कर्षावर येण्यापूर्वी अनेक घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. काही वेळेला, गर्भधारणेच्या तारखेची चुकीच्या पद्धतीने गणना केलेली असल्यास हृदयाचे ठोके ओळखले जात नाहीत. ही शंका नाकारण्यासाठी, एक आठवड्यानंतर दुसरे स्कॅन केले जाऊ शकते.

स्कॅनमध्ये काही इतर विकृती आढळल्यास काय?

अंडाशयातील सिस्ट आणि इतर विकृती स्कॅन मध्ये आढळण्याची शक्यता असते आणि ती सातव्या आठवड्यातील स्कॅनमध्ये शोधली जाऊ शकते. सोनोग्राफर गर्भाच्या हृदयाचे ठोके, डोक्याचा व्यास, गेस्टेशनल सॅकचा व्यास आणि इतर महत्त्वाचे मापदंड तपासतो.

७ व्या आठवड्याचा अल्ट्रासाऊंड १००% अचूक का नसतो?

कोणतेही स्कॅन १००% अचूक नसते. काही वेळेला, अल्ट्रासाऊंड स्कॅन संपूर्णपणे अचूक असू शकत नाही.

 • अल्ट्रासाऊंड स्कॅन दरम्यान गर्भ स्वतःला नीट स्थितीत ठेवू शकत नाही. काहीवेळा, बाळ हात पाय जवळ घेते किंवा खूप ताणते किंवा ध्वनी लहरींपासून दूर जाऊ शकते. त्यामुळे ते पाहणे थोडे कठीण होते
 • सोनोग्राफरला कोणतीही विकृती शोधण्यासाठी पुरेसे प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे, स्कॅनचे परिणाम अचूक असू शकत नाहीत
 • अल्ट्रासाऊंड उपकरणाची गुणवत्ता आणि स्थिती देखील स्कॅनच्या अचूकतेवर परिणाम करू शकते

बाळाचा विकास होत असताना कुठलीही असामान्यता आढळ्यास ती शोधण्यासाठी सात आठवड्यांचा अल्ट्रासाऊंड स्कॅन महत्वाचा आहे. तसेच हा स्कॅन गर्भाच्या हृदयाचे ठोके ओळखण्यास मदत करतो आणि त्यामुळे गर्भाचे गॅस्टेशनल वय निश्चित करणे देखील सोपे जाते. म्हणून, गरोदरपणाच्या ७ आठवड्यांनंतर आपल्या स्त्रीरोगतज्ञाना भेटण्याचे लक्षात ठेवा!

मागील आठवडा: गरोदरपणाच्या ६ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन
पुढील आठवडा: गरोदरपणाच्या ८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article