Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात योनीला खाज सुटणे

गरोदरपणात योनीला खाज सुटणे

गरोदरपणात योनीला खाज सुटणे

मॉर्निंग सिकनेस, डोकेदुखी, मनःस्थिती बदलणे आणि थकवा येणे ही गरोदरपणाची काही सामान्य लक्षणे आहेत. तुम्ही गर्भवती असल्यास, तुम्ही ह्यांपैकीं काही लक्षणे अनुभवली असतील. बहुतेक स्त्रिया गर्भवती असताना त्यांना ही लक्षणे जाणवतात, परंतु काहीवेळा, गरोदर असताना त्यांना योनीला खाज सुटण्याचे देखील लक्षण जाणवते. योनीला खाज सुटणे, जरी सर्वांनी अनुभवलेले नसले तरी गरोदरपणात ते सामान्य आहे. आपल्या योनीला खाज सुटल्यास, घाबरून जाण्याची गरज नाही. हे विविध कारणांमुळे होऊ शकते आणि त्यास सामोरे जाण्यासाठी प्रथम योग्य कारण ओळखणे आवश्यक आहे.

योनीला खाज सुटणे म्हणजे काय?

गरोदरपणात योनीला खाज सुटणे हि अशी स्थिती आहे जेव्हा योनीच्या आजूबाजूच्या त्वचेला जळजळ होते, खाज सुटते आणि सूज येते. जेव्हा एखादी स्त्री गर्भवती असते, तेव्हा योनीतून स्त्राव वाढण्याची शक्यता असते ज्यामुळे व्हल्वाच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. तथापि, खाज सुटणे हे गरोदरपणातील संक्रमण किंवा कोणतेही डिटर्जंट, लोशन किंवा साबण ह्या गोष्टींच्या ऍलर्जिक प्रतिक्रियामुळे होऊ शकते.

गरोदरपणात योनीला खाज सुटण्याचे कारण काय आहेत?

गरोदरपणात योनीला खाज सुटण्याची सर्वात सामान्य कारणे खाली नमूद केल्या आहेत.

. यीस्टचा संसर्ग

गरोदरपणात ओटीपोटाच्या भागाकडे रक्तप्रवाह वाढतो आणि यामुळे योनिमार्गाच्या क्षेत्रामध्ये व्यस्तता येते आणि त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. यीस्ट सामान्यत: योनीमध्ये कमी प्रमाणात आढळते. गरोदरपणात होणारे हार्मोनल बदल योनिमार्गाचे पीएच संतुलन बिघडवू शकतात आणि त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. परिणामी, योनिमार्गाच्या भागात यीस्ट वेगाने वाढते, त्यामुळे तीव्र खाज सुटणे, गंधयुक्त कॉटेज चीज सारखा स्त्राव आणि वेदना होऊ शकते. औषधे देऊन यावर सहज उपचार केला जाऊ शकतो. अँटिफंगल क्रीम, मलम किंवा गोळ्या अशाप्रकारची औषधे सुचवली जातात. तथापि, कोणतीही औषधे वापरण्यापूर्वी तुम्ही प्रथम आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

. योनिस्रावात वाढ

गरोदरपणात हार्मोनल बदल, पीएच पातळीत बदल आणि योनिमार्गाच्या भित्तिकांच्या जाडीमुळे योनिमार्गात स्त्राव वाढू शकतो. गरोदरपणात योनिस्राव आणि गर्भाशयाच्या मुखामध्ये वाढ झाल्याने खाज सुटू शकते. जर स्राव स्पष्ट किंवा पांढरा असेल आणि त्यास दुर्गंधी येत नसेल याचा अर्थ असा होतो की खाज सुटणे गर्भधारणेच्या हार्मोन्समुळे होते आहे. जरी योनीतून स्त्राव योनिमार्गाचे रक्षण करीत असला तरीसुद्धा, काहीवेळा तो व्हल्वाच्या त्वचेला त्रास देऊ शकतो, यामुळे त्याभागाची त्वचा लाल होते आणि खाज सुटते. जर आपल्याला योनीतून स्त्राव वाढत असेल तर तो हळूवारपणे पुसून टाका आणि आपल्या योनिमार्गाचे क्षेत्र कोरडे व जास्तीत जास्त स्वच्छ ठेवा. आपण प्रभावित क्षेत्रावर कोल्ड कॉम्प्रेस देखील वापरू शकता किंवा क्षेत्र पाण्याने धुवू शकता.

. बॅक्टेरियल व्हजायनोसिस

गरोदरपणात योनीला खाज सुटणे सामान्य आहे. सामान्यत: योनीमध्ये जिवाणू आढळतात, परंतु जर योनीमध्ये चांगल्या आणि वाईट जिवाणूंमधील समतोल बिघडला तर ते गरोदरपणातील बॅक्टेरियाच्या व्हजायनोसिसला कारणीभूत ठरू शकते. बॅक्टेरियल व्हजायनोसिसच्या लक्षणांमध्ये खाज सुटणे, सूज येणे, लघवी करताना जळजळ होणे, दुर्गंधीयुक्त स्राव आणि जळजळ यांचा समावेश आहे. या अवस्थेचे निदान डॉक्टरांनी केले पाहिजे. संसर्ग दूर करण्यासाठी डॉक्टर सामान्यत: अँटीबायोटिक्स लिहून देतात.

. विविध उत्पादने

गरोदरपणात, तुम्ही वापरत असलेले कठोर साबण, डिटर्जंट्स किंवा लोशनमुळे योनीच्या संवेदनशील त्वचेला जळजळ होऊ शकते. तुमचे आतील कपडे, परफ्युम, साबण, लोशन, कंडोम, फॅब्रिक सॉफ्टनर आणि डिटर्जंट्समुळे योनिमार्गाच्या त्वचेची जळजळ होऊ शकते. हे टाळण्यासाठी, परफ्युम, साबण आणि लोशन वापरणे टाळा. सौम्य, सुगंधमुक्त साबण आणि लोशन वापरा आणि हायपोअलर्जेनिक डिटर्जंट्स व फॅब्रिक सॉफ्टनर्सची निवड करा.

विविध उत्पादने

. लैंगिक आजार (एसटीडी)

लैंगिक संक्रमित आजारांमुळे (एसटीडी) देखील योनीतून खाज सुटते. एसटीडीच्या उदाहरणांमध्ये सिफलिस, गोनोरिया, क्लॅमिडीया, ट्रायकोमोनियासिस आणि हर्पिस यांचा समावेश आहे. खाज सुटण्याव्यतिरिक्त, या रोगांमुळे दुर्गंधीयुक्त स्त्राव आणि वेदना देखील होतात. एसटीडीच्या बाबतीत त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. एसटीडी असल्यास डॉक्टर योग्य उपचारांची शिफारस करतील. संभोग करताना, कंडोम वापरणे आवश्यक आहे

. पेडिक्युलोसिस (क्रॅब लाईस)

जर तुमच्या जांघेकडील केसांमध्ये तीव्र खाज येत असेल तर ते पेडिक्युलोसिस किंवा (क्रॅब लाईस) उवांमुळे असे होऊ शकते. उवा (क्रॅब लाईस) हे लहान कीटक असून ते मानवी रक्तावर जगतात. ते खूप संक्रामक आहेत आणि सार्वजनिक शौचालयातून किंवा लैंगिक संक्रमणाद्वारे त्यांचा प्रसार होतो. पेडिक्युलोसिसचा उपचार घरी केला जाऊ शकत नाही आणि त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यांचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी अंथरूण आणि कपड्यांची संपूर्ण स्वच्छता पाळणे जरुरीचे आहे. उवांचा उपचार करण्यासाठी कोणत्याही रसायनांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

. मूत्रमार्गाचा संसर्ग (यूटीआय)

योनीतून खाज सुटणे देखील मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे (यूटीआय) होऊ शकते. असे मुख्यत: मूत्रमार्गात जिवाणूंमुळे होते. लघवी करताना खाज सुटणे, वेदना होणे आणि जळजळ होणे, ताप, थंडी वाजून येणे आणि उलट्या देखील असू शकतात. आपल्याला ही लक्षणे आढळल्यास आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे कारण त्यासाठी प्रतिजैविक औषधांची आवश्यकता असेल.

गरोदरपणात योनीला खाज सुटणे कसे टाळता येईल?

जर तुम्हाला गरोदरपणात योनीतून खाज सुटत असेल तर त्यावर आपण स्वतः औषधोपचार करण्याचा प्रयत्न करू नये. औषधे देखील डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच घ्यावीत. परंतु तुम्हाला हा त्रास होत नसेल आणि भविष्यात तो होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही तो प्रतिबंधित करू शकता जेणेकरून तुमच्याकडे गरोदरपणात चिंता करण्यासाठी एक गोष्ट कमी असेल. योनीतून खाज सुटण्याची शक्यता कमी करण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत.

  • कॉटनच्या पॅंटी घाला: गरोदर असताना सुती पँटी घाला आणि घट्ट कपडे घालण्याचे टाळा. लाइक्रा आणि स्पॅन्डेक्स फायबरची निवड करू नका कारण ते त्वचेचा ओलावा शोषून घेतात आणि त्यामुळे त्वचा कोरडी पडून त्वचेला खाज सुटू शकते.
  • ओल्या वाईप्सचा वापर करा: दिवसभरात बाथरूमला जाऊन आल्यावर वासरहित किंवा अल्कोहोलरहित मऊ वाईप्सने योनिकडील भाग पुसून घ्या.
  • स्वच्छ आणि कोरडे रहा: शक्य तितके स्वच्छ आणि कोरडे रहा. घाम आणि स्रावापासून मुक्त होण्यासाठी दिवसातून २३ वेळा आपली अंतर्वस्त्रे बदला. तसेच, संभोगानंतर पूर्णपणे नखे स्वच्छ करा.
  • हायपोअलर्जेनिक उत्पादनांची निवड करा: सौम्य साबण, लोशन आणि शॉवर जेल वापरा. आपले आतले धुण्यासाठी हायपोअलर्जेनिक फॅब्रिक सॉफ्टनर आणि डिटर्जंट्स वापरा.
  • कोल्ड कॉम्प्रेसचा वापर करा: खाज कमी होण्यासाठी कोल्ड कॉम्प्रेसचा वापर होऊ शकतो. योनिमार्गाची त्वचा संवेदनशील असल्यास, ती धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा कारण गरम पाण्यामुळे जळजळ वाढू शकते.
  • दही खा: दह्यामुळे शरीराची संतुलित पीएच पातळी राखण्यास मदत होते. आपल्या दैनंदिन आहारामध्ये दह्याचा समावेश करा. तथापि, आपल्या शरीराची पीएच पातळी संतुलित करण्यात मदत करण्यासाठी, कमी चरबी असलेले दही निवडा.
  • अँटीइच क्रीम किंवा कॉर्नस्टार्च वापरुन पहा: आपल्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेतल्यावर तुम्ही औषधांच्या दुकानात मिळणारे क्रीम वापरू शकता. त्या क्रीम मध्ये आपल्या बाळाला हानी पोहचू शकणारे कोणतेही घटक नसल्याची खात्री करुन घ्या. खाज सुटणाऱ्या भागावर, कॉर्नस्टार्चआधारित पावडर शिंपडण्याचा देखील प्रयत्न करू शकता. त्यामुळे तो भाग कोरडा राहण्यास आणि खाज कमी होण्यास मदत होते.
  • चांगल्या स्वच्छतेचा सराव करा: लैंगिक संबंधांनंतर किंवा बाथरूमला जाऊन आल्यानंतर योनिमार्गाचे क्षेत्र स्वच्छ करण्याचा एक नियम बनवा. नेहमी पुढून मागे पुसून टाका.

डॉक्टरांना कधी भेटावे?

जर तुम्ही गरोदरपणात योनीतून स्त्रावाचा अनुभव घेत असाल आणि त्यास दुर्गंधी येऊन वेदना होत असतील तर तुम्ही एसटीडी आणि इतर संसर्ग काढून टाकण्यासाठी लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात योनीला खाज सुटण्याचे मुख्य कारणे म्हणजे संप्रेरकांमधील बदल आणि संसर्ग ही आहेत. जर जास्त दिवस खाज सुटली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुम्हाला वेदना जाणवत असतील किंवा दुर्गंधी येत असेल किंवा योनिमार्गाच्या भागात अल्सर, फोड किंवा काही असामान्य आढळले तर आपल्या डॉक्टरांना फोन करा. तुमच्या डॉक्टरांकडून समस्येचे योग्य निदान झाल्यानंतर ते तुमच्यासाठी योग्य उपायांची शिफारस करतील.

गरोदरपणात योनीला खाज सुटणे खूप सामान्य आहे आणि अचूक कारण निश्चित केल्यावर डॉक्टरांद्वारे त्यावर उपचार केला जाऊ शकतो. परंतु ही समस्या उद्भवू नये म्हणून तुम्ही स्वच्छता राखणे आवश्यक आहे. आपली योनी स्वच्छ आणि कोरडी ठेवा. आपल्या डॉक्टरांना न विचारता योनीच्या खाज सुटण्यावर उपचार करण्यासाठी कोणतेही औषध वापरू नका.

आणखी वाचा:

गरोदरपणात योनीला येणारा दुर्गंध: कारणे आणि उपचार
गरोदरपणातील पिवळा स्त्राव

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article