Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील बधिरता: कारणे आणि उपाय

गरोदरपणातील बधिरता: कारणे आणि उपाय

गरोदरपणातील बधिरता: कारणे आणि उपाय

गरोदरपणामुळे स्त्रीच्या शरीरात बरेच बदल घडतात आणि त्यातील काही बदलांमुळे हात, पाय, पोट किंवा शरीराच्या इतर भागामध्ये बधिरपणा किंवा सुन्नपणा येऊ शकतो. अवयवांना येणारा बधिरपणा हे देखील गरोदरपणाच्या अनपेक्षित लक्षणांपैकी एक आहे आणि बहुधा तो गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत अनुभवला जातो. जर तुम्ही गर्भवती असाल आणि तुमचे पाय, खांदे किंवा हात बधिर होत असतील तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु त्यासोबतच जर गरोदरपणाची इतर लक्षणे दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा.

गरोदरपणातील बधिरपणा म्हणजे काय?

गरोदरपणात बधिरपणा येणे किंवा मुंग्या येणे म्हणजे हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये संवेदना नष्ट होणे होय. हे गरोदरपणाचे एक सामान्य लक्षण आहे. हार्मोनल व शारीरिक बदलांमुळे सहसा स्त्रिया हे लक्षण अनुभवतात. जेव्हा एखादी स्त्री आपल्या गरोदरपणाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत प्रवेश करते तेव्हा पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेमुळे तिच्या हातापायांना सूज येऊ शकते. ही सूज गरोदरपणातील बधिरतेच्या भावनांना कारणीभूत ठरू शकते. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत बधिरपणा अनुभवणे बर्‍याचदा गरोदरपणाचे लक्षण मानले जाते. आणि जेव्हा दुसऱ्या तिमाहीच्या दरम्यान ह्याचा अनुभव घेतला जातो तेव्हा ते मुख्यतः झोपेच्या अयोग्य स्थितीमुळे होते. तिसऱ्या तिमाहीत लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात कारण या वेळी वाढत्या गर्भाशयामुळे आणि झोपेच्या स्थितीमध्ये बदल झाल्यामुळे रक्तवाहिन्या किंवा नसा संकुचित होतात.

गर्भवती स्त्रियांना कधी आणि कुठे बधिरपणा जाणवतो?

गरोदरपणात, शरीराच्या बऱ्याच भागामध्ये (जीभ आणि चेहऱ्यासह) बधिरपणा जाणवतो. गरोदरपणात तुम्हाला शरीराचे काही भाग सुन्न वाटू शकतात.

  • जागरणानंतर गर्भवती स्त्रियांना बर्‍याचदा पायात बधिरपणा जाणवतो. तुम्ही गर्भवती असल्यास, किंवा बराच वेळ बसून राहिल्यास तुमच्या पायांनाही बधिरपणा येऊ शकतो. संवेदना कमी होण्यापासून ते मुंग्या येणे आणि वेदना होणे ही लक्षणे जाणवतात. ही लक्षणे सामान्यत: कूस बदलून किंवा शरीराची स्थिती बदलल्यावर कमी होतात.
  • गर्भवती असताना झोपेतून उठल्यावर किंवा जड वस्तू उचलल्यानंतर तुमचे हात तुम्हाला बधिर वाटू शकतात.
  • काही गर्भवती स्त्रियांना काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर, किंवा मानेला ताण जाणवल्यावर किंवा अचानक हालचाली झाल्यावर सुन्नपणा जाणवतो.

गरोदरपणात बधिरपणा किंवा मुंग्या येण्यामागची कारणे काय आहेत?

गरोदरपणात बधिरपणा किंवा मुंग्या येणे यामागची काही कारणे येथे आहेतः

  • शरीरातील हार्मोनल बदलांमुळे मुंग्या येणे हा त्रास गरोदरपणात होऊ शकतो. गरोदरपणात उशीरा तयार झालेल्या रेलॅक्सीन नावाच्या संप्रेरकांमुळे गर्भाशयाचे मुख मऊ पडते तसेच इतर सांधे देखील मऊ होतात. शरीराच्या वजनामुळे सांध्यातील नसा दाबल्या जातात आणि त्यानंतर संबंधित भाग सुन्न होऊ शकतो.
  • गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात तयार झालेल्या हार्मोन्समुळे शरीरात पाणी टिकून राहते त्यामुळे कार्पल टनेल सिंड्रोम होतो. कार्पल टनेल सिंड्रोम ही वेदनादायक स्थिती आहे. ही स्थिती हातावर परिणाम करते. बाळासाठी स्त्रियांना गरोदरपणात ५०% जास्त रक्त मिळते. हा वाढलेला द्रव हाताच्या मज्जातंतूवर दबाव आणू शकतो आणि त्यामुळे वेदना होतात. हाताचे मधले बोट, तर्जनी आणि अनामिका ह्या बोटांमध्ये वेदना जाणवतात आणि त्या वरती हातापर्यंत पसरतात. ही स्थिती बऱ्यापैकी सामान्य आहे. गरोदरपणात वजन वाढल्यामुळे कार्पल टनेल सिंड्रोम होऊ शकतो.
  • लाल रक्तपेशींची कमी संख्या, लोहाची कमतरता किंवा अनुवांशिक घटक ह्यामुळे देखील सुन्नपणा, चक्कर येणे आणि वेदना होऊ शकतात.
  • गरोदरपणात एखाद्या स्त्रीला सायटिकामुळे वेदना आणि सुन्नपणा देखील जाणवू शकतो. ही एक तीव्र वेदना आहे जी पाठीच्या खालच्या बाजूस आणि खाली पायापर्यंत जाते. दुसर्‍या आणि तिसऱ्या तिमाहीच्या दरम्यान हे अधिक सामान्य आहे कारण वाढत्या बाळामुळे पाठीच्या खालच्या भागात सायटिक मज्जातंतूवर दाब पडतो.

गरोदरपणात बधिरपणा किंवा मुंग्या येण्यामागची कारणे काय आहेत?

जिभेचा बधिरपणा कसा टाळावा?

मज्जातंतूवर दाब पडल्यास, पाठीचा कणा दाबला गेल्यास, बेल्स पाल्सी किंवा ऍलर्जिक प्रतिक्रियांमुळे जिभेच्या बधिरपणाचा अनुभव येऊ शकतो. ह्या बधिरतेचे नेमके कारण शोधून काढल्यास उपचार करण्यास मदत होते आणि हे कसे करावे याबद्दल काही सूचना येथे आहेत.

  • जे पदार्थ खाल्ल्यावर सुन्नपणा येऊ शकतो अशा पदार्थांची यादी करण्यासाठी एक डायरी ठेवा. तसेच, इतर जी कामे केली त्याच्या नोट्स काढा आणि दिवसभर बधिरता आलेल्या वेळांची नोंद ठेवा.
  • विशेषतः तिसऱ्या तिमाहीत वजन उचलून किंवा खराब शरीरस्थितीमुळे आपल्या पाठीवर ताण येऊ देऊ नका.
  • सोडियम जास्त असलेले पदार्थ खाणे टाळा. सोडियम समृद्ध असलेले अन्न आपला रक्तदाब वाढवू शकते आणि आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवते त्यामुळे बधिरता येऊ शकते.
  • रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याने जीभ देखील सुन्न होऊ शकते, म्हणून नियमित अंतराने खा.

पोट किंवा बेंबीकडील भागातील बधिरपणावर कसा उपचार करावा?

जड गर्भाशयामुळे मज्जातंतू वर दाब पडतो तेव्हा पोटावर स्तब्धता येते. हे टाळण्याचे मार्ग येथे आहेतः

  • आपल्या ओटीपोटाच्या खालच्या भागावर दबाव येऊ नये म्हणून बसताना आणि उभे असताना योग्य शारीरिक स्थिती ठेवा.
  • ओटीपोटात फक्त एका बाजूला येणारा दाब कमी करण्यासाठी आणि रक्ताच्या प्रवाहात अडथळा येऊ नये म्हणून झोपलेले असताना कूस बदला.

पाय आणि पावलांच्या बधिरपणावर कसा उपचार करावा?

गरोदरपणात पायात मुंग्या येणे खूप सामान्य आहे. जर तुम्ही जास्त काळ उभे असाल किंवा बसलात तर तुमचे पाय बधिर होऊ शकतात. हे बहुधा रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाहास प्रतिबंधित करते आणि त्यामुळे मुंग्या येऊ शकतात. गरोदरपणातील बधिरतेवर इथे काही उपाय दिलेले आहेत.

  • जेव्हा तुम्ही विश्रांती घेता किंवा झोपता तेव्हा प्रत्येक वेळी आपल्या डाव्या कुशीवर झोपा.
  • जेव्हा तुम्हाला विश्रांती घ्यावीशी वाटत असेल तर झोपण्याऐवजी आरामात बसून राहणे चांगले कारण झोपल्याने ओटीपोटाच्या खालच्या भागावर दबाव येऊ शकतो आणि आपले पाय सुन्न होऊ शकतात.
  • आपण गरोदरपणात व्यायाम करत असल्यास, बधिरपणा येण्यास कारणीभूत असलेल्या हालचालींकडे लक्ष द्या. त्यांची नोंद ठेवा आणि त्या हालचाली करणे टाळा.

पाय आणि पावलांच्या बधिरपणावर कसा उपचार करावा?

तुम्ही बधिरपणा किंवा सुन्नपणा थांबवू शकता?

गरोदरपणात शरीरात येणारी बधिरता रोखणे शक्य नसले तरी आपल्या रूटीनमध्ये काही बदल करून तुम्हाला बरे वाटू शकते. झोपताना हात वर घेऊन झोपल्यास किंवा हातांच्या मुठी केल्यास बोटांमध्ये मुंग्या येणे आणि मनगटात सूज येणे टाळता येते. आपण बसता, उभे राहता किंवा झोपता तेव्हा योग्य शरीरस्थिती राखल्यास त्याचा चांगला परिणाम होऊन बधिरपणा मोठ्या प्रमाणात कमी होतो. तसेच, सपाट टाच आणि मऊ सोल असलेले आरामदायक शूज घाला. त्यामुळे पायांवर दाब कमी येतो आणि सुन्नपणा दूर होतो.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जरी गरोदरपणात हात आणि पाय बधीर होणे सामान्य असले तरी अचानक तीव्र सुन्नपणा किंवा मुंग्या येणे एखाद्या गंभीर गोष्टीचे सूचक असू शकते. अचानक होणारी इजा किंवा ब्लॉकेजची ती लक्षणे आहेत आणि अशा वेळी त्वरित वैद्यकीय मदत घेणे गरजेचे असते. जर तुम्ही पोटावर किंवा पायांमध्ये सुन्नता दूर करण्यासाठी कोणतेही वैकल्पिक औषध किंवा क्रीम वापरण्याचे ठरविल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशा क्रीममध्ये बहुतेक वेळा अनियमित हर्बल घटक असतात आणि ते गरोदरपणात धोकादायक ठरू शकतात. तसेच, तुम्हाला काही असामान्य लक्षण आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गरोदरपणात बधिरपणा आणि मुंग्या येणे ह्या संवेदना सामान्य असतात आणि बहुतेकदा त्यामध्ये चिंता करण्याचे कारण नसते. आवश्यक काळजी घ्या आणि आपल्याला बरे वाटत नसल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला निरोगी गर्भधारणेसाठी शुभेच्छा!

आणखी वाचा:

गरोदरपणात पायांवर सूज येण्याच्या समस्येवर १७ परिणामकारक घरगुती उपचार
गरोदरपणात लघवीला वास येणे: कारणे आणि उपचार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article