Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात बेटनेसॉल इंजेक्शन्स घेणे: फायदे आणि दुष्परिणाम

गरोदरपणात बेटनेसॉल इंजेक्शन्स घेणे: फायदे आणि दुष्परिणाम

गरोदरपणात बेटनेसॉल इंजेक्शन्स घेणे: फायदे आणि दुष्परिणाम

अकाली प्रसूती झाल्यास नवजात बाळामध्ये हृदय, फुफ्फुसे आणि मेंदूच्या समस्या उद्भवू शकतात. परंतु आजकाल, प्रसूतीस विलंब करणारी काही औषधे उपलब्ध आहेत. बाळाच्या अवयवांची योग्य वाढ होण्यासाठी गर्भवती स्त्रीला ही औषधे दिली जातात. बाळाच्या फुफ्फुसाची चांगली वाढ होण्यासाठी अनेक डॉक्टर गर्भवती स्त्रीला बेटनेसॉल इंजेक्शन देण्याचा विचार करतात. परंतु जेंव्हा ह्या इंजेक्शनचे फायदे जोखमीपेक्षा जास्त असतात तेव्हाच हे इंजेक्शन दिले जाते. तुम्ही गर्भवती असाल तर, गरोदरपणात बेटनेसॉल हे इंजेक्शन घेणे सुरक्षित आहे कि नाही हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. या लेखात, आम्‍ही तुमच्‍यासाठी बेटनेसॉल इंजेक्शनची माहिती दिलेली आहे. तुम्‍हाला हे इंजेक्शन घेणे गरजेचे  असल्‍यास ह्या लेखाची तुम्हाला मदत होऊ शकते.

बेटनेसॉल म्हणजे काय?

बेटनेसॉल (बीटमेथ्यासोन सोडियम फॉस्फेट) हे एक कॉर्टिकोस्टेरॉईड आहे आणि ते हार्मोनल असंतुलन, सूज आणि स्वयंप्रतिकार रोगांवर उपचार करण्यासाठी वापरला जाते. कॉर्टिकोस्टिरॉईड्सची कमतरतेचा आपल्या शरीरावर लक्षणीय परिणाम होतो. शरीरात कॉर्टिकोस्टिरॉईड्सची अनेक महत्त्वाची कार्ये आहेत जसे की, मीठ नियंत्रित करणे, पाण्याचे संतुलन राखणे, तणाव पातळी नियंत्रित करणे, जळजळ कमी करणे आणि हृदयाचे योग्य कार्य सुनिश्चित करणे इत्यादी. हे इंजेक्शन आपत्कालीन परिस्थितीत लक्षणांवर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी दिले जाते.

गरोदरपणात बीटामेथ्यासोन इंजेक्शन घेणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात बेटनेसॉल इंजेक्शन फक्त जर प्रसूतीपूर्व गुंतागुंतीसाठी पर्यायी उपचार उपलब्ध नसेल तरच दिले जाते. गर्भवती स्त्रीला बेटनेसॉल इंजेक्शन दिल्याने तिच्या बाळाला धोका निर्माण होऊ शकतो कारण त्याचा बाळावर परिणाम होऊ शकतो. डॉक्टरांनी शिफारस केल्याशिवाय हे इंजेक्शन कोणत्याही स्वरूपात (इंजेक्शन किंवा टॉपिकल क्रीम) टाळले जाते. यातील जोखमींबद्दल स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घेणे आणि पर्यायांबद्दल विचारून घेणे केव्हाही चांगले.

टीप: डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ते घेऊ नये

गरोदरपणात बीटामेथ्यासोन इंजेक्शन घेणे सुरक्षित आहे का?

बेटनेसॉल कधी वापरले जाते?

गरोदरपणात खालील गुंतागुंत उद्भवल्यास बेटनेसॉल किंवा बीटामेथासोन इंजेक्शन लिहून दिले जाते.

1. मुदतपूर्व प्रसूती

गरोदरपणात मुदतपूर्व प्रसूती ही एक सामान्य समस्या आहे. जर बाळाचा जन्म गरोदरपणाच्या ३२-३५ आठवड्यांपूर्वी झाला तर त्याची फुप्फुसे पूर्णपणे विकसित होत नाही आणि त्यामुळे ही फुप्फुसे  योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत. जेव्हा गर्भवती स्त्रीची अकाली प्रसूती होऊ शकते अशी शंका डॉक्टरांना येते, तेव्हा सर्फेक्टंटची पातळी वाढण्यासाठी ही इंजेक्शन्स देतात. त्यामुळे बाळाची फुप्फुसे परिपक्व होण्यास मदत होते. हे इंजेक्शन सामान्यतः अपेक्षित मुदतपूर्व प्रसूतीच्या 24 तास अगोदर दिले जाते.

2. गर्भाची फायब्रोनेक्टिन चाचणी (FFT)

फेटल फायब्रोनेक्टिन हे एक प्रथिन आहे.  गर्भजल पिशवी गर्भाशयाच्या अस्तरांना चिकटून राहण्यास ह्या प्रथिनामुळे मदत होते. गर्भजल पिशवीमुळे बाळ गर्भाशयात सुरक्षित राहते. परंतु जेव्हा ही गर्भजल पिशवी फुटते, तेव्हा गर्भाच्या फायब्रोनेक्टिनला गर्भाशयाच्या मुखाजवळील स्रावांमध्ये सोडले जाऊ शकते. ह्यामुळे  बाळाच्या वाढीस अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गर्भपात किंवा मुदतपूर्व प्रसूती होऊ शकते. गरोदरपणात, तुमचे डॉक्टर 22 ते 34 आठवड्यांच्या दरम्यान गर्भाची फायब्रोनेक्टिन चाचणी सुचवू शकतात आणि फायब्रोनेक्टिनची उपस्थिती तपासण्यासाठी तुमच्या स्रावाचा स्वॅब घेतला जाऊ शकतो. चाचणी पॉझिटिव्ह असल्यास, तुमची अकाली प्रसूती होण्याची शक्यता आहे. बेटनेसॉल देण्यापूर्वी ही चाचणी केली जाते. जर तुम्हाला जुळी मुले किंवा एकापेक्षा जास्त बाळे असतील तर बहुधा तुम्हाला बेटनेसॉल दिले जाईल.

3. नवजात बाळाच्या फुफ्फुसाचा विकास

काही वेळा, अकाली जन्मलेल्या बाळांची फुप्फुसे नीट विकसित झालेली नसतात. त्यामुळे, त्यांच्या फुफ्फुसांच्या विकासासाठी बेटनेसॉल दिले जाते आणि इंट्राक्रॅनियल रक्तस्त्राव होण्याचा धोका कमी करण्यासाठी देखील हे इंजेक्शन दिले जाते.

बेटनेसॉल निवडण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

गरोदरपणात बेटनेसॉल इंजेक्शन्स घेण्याचे फायदे

गरोदरपणात बेटनेसॉल घेण्याचे विविध फायदे आहेत. यापैकी काही फायदे खालीलप्रमाणे आहेत

1. जळजळ नियंत्रित करण्यास मदत करते

बेटनेसॉल इंजेक्शनमुळे जळजळ नियंत्रित करण्यात मदत होते. ह्या इंजेक्शनमुळे वेदना आणि अस्वस्थता कमी होते.

2. गर्भपात आणि गुंतागुंत होण्याचा धोका कमी करते

हे इंजेक्शन गर्भपाताचा धोका आणि गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंत, उदा: प्रीक्लेम्पसिया कमी करण्यास मदत करू शकते.

3. संसर्गाचा धोका कमी होतो

बेटनेसॉल इंजेक्शनमुळे संसर्गाचा धोका आणि संसर्गाशी संबंधित गुंतागुंत कमी होते.

4. जन्मजात दोषांचा धोका कमी होतो

बेटनेसॉल इंजेक्शनमुळे जन्मजात दोष निर्माण होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.

डोस

गर्भवती स्त्रीचा वैद्यकीय इतिहास तपासून डोस निश्चित केला जातो. तुमचा वैद्यकीय इतिहास समजून घेतल्यानंतर तुमचे डॉक्टर तुमच्याशी बोलू शकतात. जर तुमच्या डॉक्टरांना काही गुंतागुंत होण्याची शक्यता वाटत असेल तर ते इंजेक्शनचा सल्ला देऊ शकतात. म्हणून, ह्या इंजेक्शनचे फायदे आणि तोटे ह्याविषयी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करणे चांगले.

बेटनेसॉल कसे दिले जाते?

बेटनेसॉल खालील प्रकारे दिले जाऊ शकते:

  • संपूर्ण शरीरात प्रभाव निर्माण करण्यासाठी हे इंजेक्शन थेट शिरा किंवा स्नायूंमध्ये दिले जाते. हे ठिबकद्वारे केले जाते. डोस आणि त्याचा कालावधी प्रत्येक केसनुसार वेगळा असू शकतो.
  • सूज कमी करण्यासाठी ते प्रभावित भागात स्थानिकरित्या लागू केले जाऊ शकते. काही प्रकरणांमध्ये,  थेट सूजलेल्या ऊतींमध्ये इंजेक्शन दिले जाते.

औषध दीर्घकालीन आधारावर कधीही दिले जात नाही. हे काही दिवसांसाठी किंवा कदाचित 2-3 आठवड्यांसाठी दिले जाऊ शकते. पण ते अचानक थांबवता कामा नये. लक्षणांची तीव्रता कमी करण्यासाठी ते हळूहळू कमी केले पाहिजे.

 बेटनेसॉल हे सलाईन ड्रिप म्हणून दिले जाऊ शकते

गरोदरपणात बेटनेसॉल इंजेक्शनला कुठला पर्याय आहे?

सामान्यतः गर्भवती महिलांसाठी बेटनेसॉल इंजेक्शनची शिफारस केली जात नाही. म्हणून, ह्या इंजेक्शन ऐवजी इतर पर्यायांविषयीची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. गरोदरपणात बेटनेसॉल इंजेक्शनचे काही पर्यायी उपचार येथे दिलेले आहेत.

  • जीवनशैलीतील बदल जसे की व्यायाम, आहारातील बदल आणि तणाव व्यवस्थापन
  • अँटीहिस्टामाइन्स आणि डिकंजेस्टंट्स सारखी औषधे
  • एक्यूपंक्चर
  • मसाज थेरपी
  • कायरोप्रॅक्टिक केअर

गुंतागुंत

ह्या इंजेक्शनमुळे काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. गर्भावस्थेतील बेटनेसॉल इंजेक्शनमुळे खालील दुष्परिणाम होऊ शकतात:

  • बेटनेसॉल हे कॉर्टिकोस्टेरॉईड आहे. त्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती आणि दाहक प्रतिक्रिया कमी होते. त्यामुळे, जर तुम्ही बेटनेसॉल घेत असाल, तर तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.
  • बेटनेसॉलचा उच्च डोस दिल्याने मूड बदलू शकतो आणि वर्तनात बदल होऊ शकतात. जर तुम्हाला बेटनेसॉल इंजेक्शन दिले गेले असेल, तर तुमची जास्त चिडचिड होऊ शकते. तुम्हाला उदास वाटू शकते तसेच तुम्ही काही वेळेला गोंधळलेले असू शकता. तुम्हाला झोप येण्यास त्रास होऊ शकतो.
  • याचा तुमच्या बाळाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमच्या बाळाच्या वाढीस विलंब होऊ शकतो आणि त्याच्या हृदय गती आणि हालचालींवर परिणाम होऊ शकतो.
  • जर बेटनेसॉल जास्त डोसमध्ये दिले गेले, तर तुम्ही बाळाला स्तनपान देत असताना ते बाळापर्यंत  जाऊ शकते आणि त्याचा स्टिरॉइड संप्रेरके निर्माण करणाऱ्या ऍड्रिनल ग्लॅण्डस वर परिणाम होऊ शकतो.
  • इंजेक्शन घेतल्यावर लगेच रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि मधुमेही आईसाठी समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तिला मधुमेहविरोधी औषधांचा डोस घ्यावा लागू शकतो.

इंजेक्शन्स व्यतिरिक्त, ते इतर माध्यमांद्वारे देखील आपल्या शरीरात प्रवेश करू शकते. जर तुम्ही बेटनेसॉल (अगदी कमी प्रमाणात) असलेली काही स्किन क्रीम वापरत असाल तर ते तुमच्या त्वचेद्वारे शोषले जाऊ शकते आणि बाळावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, कोणतीही स्टिरॉइड क्रीम वापरण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गर्भवती असताना बेटनेसॉल इंजेक्शन घेताना घ्यायची खबरदारी

गरोदरपणात बेटनेसॉल इंजेक्शन वापरताना खालील खबरदारी घ्या:

  • बेटनेसॉल इंजेक्शन फक्त डॉक्टर किंवा आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या देखरेखीखाली घेतले पाहिजे
  • डॉक्टरांच्या सूचना आणि औषधांच्या लेबलवरील सूचनांचे पालन करा
  • तुम्हाला औषधातील कोणत्याही घटकांची ऍलर्जी असल्यास इंजेक्शन घेऊ नये
  • तुम्हाला इतर कोणतीही वैद्यकीय समस्या असल्यास किंवा इंजेक्शन घेण्यापूर्वी तुम्ही इतर कोणतीही औषधे घेत असल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. प्रत्येक गर्भवती स्त्रीला बेटनेसॉल इंजेक्शनची आवश्यकता असते का?

नाही, फक्त काही गर्भवती महिलांना बाळाच्या फुफ्फुसांच्या परिपक्वताला चालना देण्यासाठी आणि बाळाचा अकाली जन्म झाल्यास त्यांच्या समस्या कमी करण्यासाठी बेटनेसॉल इंजेक्शन्स घेण्याचा सल्ला दिला जातो.

2. गरोदरपणात बेटनेसॉल 12 मिग्रॅघेणे सुरक्षित आहे का?

होय, सुरक्षित आहे, कारण ते गर्भाची फुप्फुसे परिपकव करण्यासाठी मदत करते आणि अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये इंट्राव्हेंट्रिक्युलर हॅमरेज आणि नेक्रोटाइझिंग एन्टरोकोलायटिस होऊ नये म्हणून ह्या इंजेक्शनचा उपयोग होतो.

हा लेख वाचल्यानंतर आम्हाला आशा आहे की, तुम्हाला बेटनेसॉल इंजेक्शन्सबद्दल चांगली माहिती मिळालेली असेल. त्यामुळे गरोदरपणात आणि प्रसूतीनंतरही हे इंजेक्शन घेणे तुम्ही टाळाल. स्थितीची तीव्रता आणि त्यात असलेले धोके समजून घेण्यासाठी तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी बोला. इतर सुरक्षित पर्यायांविषयी सुद्धा माहिती घ्या.

आणखी वाचा:

गरोदरपणात एचसीजी इंजेक्शन घेणे
धनुर्वाताची लस (टिटॅनस टॉक्सॉइड – टीटी) – गरोदरपणात कधी आणि का दिली जाते?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article