Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ३४वा आठवडा

गर्भधारणा: ३४वा आठवडा

गर्भधारणा: ३४वा आठवडा

अवघड परिस्थितीत स्थिर आणि खंबीर राहिल्यास ती सहज हाताळता येते. तुम्ही तुमच्या ध्येयाच्या अगदी जवळ आहात. गरोदर स्त्री ज्या ज्या त्रास आणि तक्रारींमधून जात असते, त्याची तुम्हाला आता इतकी सवय झालेली आहे की तो त्रास तुम्हाला आता जाणवतही नाही. इथे काही सूचनांची तसेच तुम्हाला गर्भारपणाच्या ३४व्या आठवड्यात असणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

गर्भावस्थेदरम्यान आपल्या बाळाची वाढ – आठवडा ३४ वा

गर्भारपणाच्या ३४व्या आठवड्यात तुम्हाला मुलगा होणार आहे की मुलगी हे लगेच कळू शकते. बाळाच्या अंगावरच्या सुरकुत्या जाऊन बाळाची त्वचा आता मऊ आणि मजबूत झाली आहे. बाळाची प्रतिकार यंत्रणा आणि फुप्फुसे मजबूत झाली असून बाळ आता तुमच्या शरीरावर अवलंबून नाही. आता तुमच्या गर्भाशयाच्या जागेची पूर्ण क्षमता बाळाने व्यापली असून, बाळाने जरासुद्धा हालचाल केलेली तुम्हाला समजणार आहे, किंबहुना तुमच्या बाळाला पोटाला हात लावल्यास तुमचा स्पर्श सुद्धा समजेल. ह्या टप्प्यावर अकाली प्रसूती झाल्यास ते खूप सुरक्षित आहे आणि दवाखान्यातल्या छोट्याशा कामानंतर तुम्ही बाळाला लवकरच घरी घेऊन जाणार आहात. जर तुम्हाला प्रसूती तारखेच्या आसपास प्रसूती कळा आल्या नाहीत तर काळजीचे कारण नाही कारण अकाली प्रसूती फक्त ५ % प्रकरणांमध्ये होते.

बाळाचा आकार केवढा असतो?

गर्भारपणाच्या ३४व्या आठवड्यात बाळाचा आकार पोटाच्या वरच्या ते खालच्या भागापर्यंत ४५ सेंमी असतो, जवळपास मोठ्या भोपळ्याएवढा तो आकार असतो. २ किलो पेक्षा थोडे जास्त वजन असते आणि ते अजून थोडे वाढणार आहे. बाळाची हाडे आता पर्यंत मजबूत झालेली असतात, फक्त बाळाच्या डोक्याची हाडे मऊ असतात कारण जन्माच्या वेळेला डोके बाहेर येणाया मदत होते.

शरीरात होणारे बदल

गर्भारपणाच्या ३४वा आठवडा आव्हाने घेऊन येतो. ह्या आठवड्यात तुम्हाला गर्भारपणातील बदलांपैकी मूळव्याध (Haemorrhoids) झालेला आढळतो. मूळव्याध हा बद्धकोष्ठता तसेच गर्भारपणातील संप्रेरकांमुळे होतो. मागच्या आठवड्याप्रमाणे तुम्हाला शौचाच्या जागी वेदना आणि सूज जाणवेल. औषधे आणि व्यायाम हे आराम मिळण्यासाठी काही पर्याय आहेत.

. योनीमार्गातील स्त्राव

अजून सामान्यपणे आढळणारे लक्षण म्हणजे बाळाच्या जन्मासाठी चिकट स्त्राव स्त्रवतो. इस्ट्रोजेन च्या वाढलेल्या पातळीमुळे असे होते. इस्ट्रोजेनमुळे योनी जवळच्या भागातील रक्ताभिसरण वाढते.

. पायावरील सूज

तुमची पावले आणि घोटे ह्यांना परत सूज (oedema) येईल आणि  त्रास होईल. आरामदायक चपला किंवा बूट वापरा ज्यामध्ये मऊ पॅडिंग असेल त्यामुळे तुमच्या पायांची सूज कमी होण्यास मदत होईल.

. स्ट्रेच मार्क्स

सावळ्या  स्त्रियांपेक्षा ज्या स्त्रियांचा रंग गोरा आहे त्यांच्या पोटावर स्ट्रेच मार्क्स खूप जास्त ठळक  दिसून येतात तथापि डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही वजनातील वाढ नियंत्रित करू शकता.

. स्तनांमधून द्रव गळणे

तुमचे शरीर बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या पोषणासाठी कोलोस्ट्रम तयार करीत असते आणि त्यामुळे स्तनांमधून ते आधी थोडे पाझरू लागते. तुमच्या ब्रा मध्ये तो स्त्राव शोषून घेणारे पॅड्स वापरल्यास तुम्हाला ओशाळल्यासारखे होणार नाही.

३४व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

. बद्धकोष्ठता

वाढत्या गर्भाशयामुळे ते आतडी बाजूला कोपऱ्यात सरकवली जातात. त्यामुळे आतड्यांची हालचाल अनियमित होते. पुरेसे तंतुमय पदार्थ खाल्य्यास आणि भरपूर पाणी प्यायल्यास अस्वस्थता कमी होते.

. पोट फुगणे

गर्भारपणात गॅस होणे हे खूप सामान्य आहे. गर्भारपणात पचनक्रिया मंदावते आणि चिंतेमुळे परिस्थिती आणखी बिघडते, त्यामुळे ताण हलका करण्यासाठी काही श्वसनाचे व्यायाम करणे गरजेचे आहे.

. पेटके

वाढलेल्या वजनामुळे आणि त्यामुळे झोप न लागल्यामुळे पायांमध्ये वेदनादायी पेटके येतात.

. श्वसनास त्रास

गर्भारपणाच्या अंतिम टप्प्यावर हे सामान्य लक्षण आहे, गर्भाशयामुळे फुप्फुसावर दाब येतो, त्यामुळे पूर्ण श्वास घेऊ शकत नाही. पळणे, जिने चढणे वगैरे क्रिया टाळा त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

. रात्रभर जागे राहणे

चिंता, पेटके, गॅस, बद्धकोष्टता ह्या सगळ्यामुळे तुम्ही रात्रभर जागे राहू शकता. जर तुम्हाला झोप येत नसेल तर TV बघण्याचा प्रयत्न करा किंवा पुस्तक वाचा.

गर्भधारणेच्या ३४व्या आठवड्यात पोटाचा आकार

जर तुम्ही गर्भारपणाच्या ३४व्या आठवड्यात असाल तर पोटाचा आकार वरून ओटीपोटापर्यंत ४५ सेंमी इतका असतो आणि सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे गर्भारपणात कधीही नव्हती इतकी गर्भजल पातळी आता सर्वात जास्त असते. तुमचे गर्भाशय गर्भधारणेच्या आधीपेक्षा १००० पट इतके मोठे होते.

गर्भावस्थेच्या ३४ व्या आठवड्यातील सोनोग्राफी

ह्या टप्प्यावर दर एका आठवड्यानंतर सोनोग्राफी करणे ही एक ठरलेली प्रक्रिया आहे. तुमचे डॉक्टर तुम्हाला “Non Stress Test” किंवा “Biophysical profile “करून घ्यायला सांगू शकतात, त्यामुळे तुम्हाला बाळाच्या श्वसन प्रणाली मध्ये किंवा हृदयात काही दोष असेल तर लागलीच त्याचे निदान होते. ह्या स्कॅन मध्ये बाळाची हालचाल, श्वसन क्रिया कशी आहे हे समजते. जर तुम्हाला हवे असल्यास बाळाच्या चेहऱ्याचे आणि शरीराचे बारकावे थ्री डी  अल्ट्रासाऊंड मध्ये बघू शकता.

आहार कसा असावा?

तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या तब्बेतीसाठी चौरस आहार घेणे हे अतिशय महत्वाचे आहे. ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि दुग्धजन्य पदार्थ भरपूर प्रमाणात खा. जळजळ होऊ नये म्हणून, थोड्या थोड्या वेळच्या अंतराने थोडे खात राहा. गर्भारपणाच्या ३४ व्या आठवड्यात आहारात करावेत असे काही बदल करणे आवश्यक आहेत, ते खालीलप्रमाणे:

व्हिटॅमिन डी, सी, के हे हाडांच्या आणि दातांच्या विकासासाठी तसेच प्रतिकार यंत्रणा मजबूत होण्यासाठी महत्वाचे आहेत. व्हिटॅमिन डी साठी पूरक औषधे घेऊ शकता परंतु दररोज १०-२० मिनिटे सूर्यप्रकाशात बसल्यास पुरेसे व्हिटॅमिन डी मिळू शकते. व्हिटॅमिन सी हे हिरव्या पालेभाज्या, मांस आणि लिंबूवर्गीय फळे ह्यापासून मिळू शकते आणि व्हिटॅमिन के, कॉलीफ्लॉवर, कोबी, बीन्स, डाळिंब, पालक आणि सोयाबीन्स ह्यापासून मिळू शकते.

बाळाची बुद्धिमत्ता सर्वाधिक वाढावी म्हणून ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् घेणे जरुरी आहे. फिश ऑइल आणि फ्लेक्स  सीड ऑइल मधून ते मिळू शकते.

कमीत कमी रोज ३ लिटर्स पाणी पिणे आवश्यक आहे त्यामुळे प्रसूती साठी तुमची तब्बेत चांगली राहते.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

गर्भारपणादरम्यान कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या करू नयेत त्या खालीलप्रमाणे:

हे करा

प्रसूतीच्या वेळेला बाळाची स्थिती नीट योग्य म्हणजेच डोके खाली तसेच बाळाचा चेहरा तुमच्या मणक्याच्या दिशेने असला पाहिजे. काही  व्यायाम प्रकारांमध्ये खुर्ची तसेच चेंडूचा समावेश असतो.

तुम्ही ज्या हॉस्पिटल मध्ये नाव नोंदवले आहे त्या हॉस्पिटल मध्ये एकदा जाऊन या. तुमच्या हॉस्पिटल मधील खोलीची पाहणी करा. तसेच तुम्हाला काही अर्ज वगैरे भरणे आवश्यक असल्यास त्यांची पूर्तता करा.

हे करू नका

जेव्हा तुम्ही गर्भारपणाच्या तिसऱ्या तिमाही मध्ये असता तेव्हा योग्य आहार घेणे खूप आवश्यक असते, तसे न केल्यास ते हानिकारक ठरू शकते. तुमच्या बाळाला आणि तुम्हाला नेहमीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त अन्नाची गरज भासते, त्यामुळे जर कमी प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे गुंतागुंत होऊ शकते. तसेच मसालेदार पदार्थ आणि अल्कोहोल घेणे टाळा.

kegel चे व्यायाम प्रकार करण्यास विसरू नका तसेच त्याविषयी अजिबात संकोच बाळगू नका. ह्या व्यायाम प्रकारांमुळे ओटीपोटाच्या आसपासचा भाग मजबूत होतो आणि प्रसूतीकळा आणि मूळव्याधीच्या त्रास सहन करण्याची क्षमता प्राप्त होते. तसेच ह्या व्यायाम प्रकारामुळे प्रसूती सुलभ होण्यास मदत होते आणि पाठीचे दुखणे कमी होण्यास मदत होते.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

बाळाचे स्वागत खूप छान होणार आहे ह्याची खात्री करा आणि स्वागतासाठीची खोली तुमची असू शकते किंवा बाळाची वेगळी खोली सुद्धा असू शकते. मॅटर्निटी कपडे हे खरेदीच्या यादी मध्ये असणे हे सर्वात महत्वाचे आहे आणि ह्यामध्ये काही स्टायलिश पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. नॅपी, बॉटल्स, नर्सिंग ब्रा आणि बाळाचे कपडे हे पुरेश्या प्रमाणात आणून ठेवा. छोटीशी बाबागाडी आणून ठेवा त्यामुळे बाळाला तुमच्या घराच्या आसपासच्या परिसरात फिरायला नेण्यास मदत होईल. प्रसूतीची तारीख जवळ येत असताना तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी आणि मैत्रिणींशी गप्पा मारा, त्यामुळे तुम्हाला शांत राहण्यास मदत होईल. तुम्ही अंतिम रेषेच्या अगदी जवळ आहात त्यामुळे तुम्ही आता जे करत आहात ते करत रहा आणि लक्षात असुद्या तुम्ही सोन्यासारखेच अमूल्य आहात.

मागील आठवडा: गर्भधारणा: ३३वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: ३५वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article